चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करेक्ट.
मक्खी, राऊडी राठोड सारखे असतील तर चालतील.

परत चित्रपटांबद्दल चर्चा करूया!

आम्ही ४था मॅट्रीक्स पाहिला. मला आवडला बायकोला ठीक वाटला. एक खुप विचार करून बनवलेला पिक्चर आहे. पण परत एकदा टेक्निकल झालेला आहे. आणि बरेच पॉप कल्चर - करंट रेफरन्सेस आहेत त्यात मागचे ३ पिक्चर पाहिलेले नसतील तर अजिबात कळणार नाही. बहुतेक मी अशा कमी लोकांमधला आहे की ज्यांना २ - ३ हे पहिल्या भागापेक्षा जास्ती आवडले होते कारण ते जास्ती फिलॉसॉफिकल आणि टेक्निकल होतात आणि त्यामुळेच मला ४था आवडला.

तरीपण नुसती फायटींग आणि भन्नाट सीन्स पहायला सुद्धा हा भाग मस्त आहे. ट्रीनीटीला थोडे कमी काम आहे पण नविन मॉर्फियस आणि बग्ज (जेसिका हेन्विक) यांचे काम मस्त झाले आहे.

पुष्पा सगळे शो फुल्ल आहेत

तिकीट नाही
83 मोकळा आहे

पुष्पां रेग्युलर तिकीट आहे, 130
83 , देशप्रेमी मुवि म्हणे , 250 रु तिकीट

चित्रपटात मुस्लिम दाखवलेत, पंजाबी देखील खूप दाखवले आहेत, साऊथ ईंडियन्स दाखवले आहेत, पिक्चर बघताना सारे भारतीयच वाटतात. >>> +१०० होपफुली वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीने पिक अप घेईल दुसर्‍या आठवड्यापासून. बाकी पिक्चर्स रिलीज करताना खूप मोठ्या बॅनर्सच्या आसपास रिलीज न करणे हे धंद्याचे गणित त्यांनी सांभाळायला हवे होते. हा पिक्चर एकदा थिएटर मधे व नंतर अधूनमधून स्ट्रिमिंगवर पाहण्याइतका चांगला आहे. प्रमोशनही शोज मधून चांगले सुरू आहे.

मेट्रिक्स परत पहिल्यापासून बघायला सुरूवात केली आहे. कंटाळा येतो पण पाहताना. मुळात मला स्काय-फाय फारसे आवडत नाहीत. तुकड्यातुकड्यात पाहतोय Happy सर्वात पहिला जेव्हा पाहिला होता तेव्हा काहीच माहिती न काढता पाहिला होता. पूर्ण डोक्यावरून गेला होता. मग नंतर दुसरा आला तेव्हा सर्व माहिती, संदर्भ वगैरे माहिती करून पाहिला. तरी एंगेजिंग वाटला नाही इतका. नॉट माय कप ऑफ टी!

तुकड्यातुकड्यात पाहतोय >> मॅट्रिक्स तुकड्यातुकड्यात कसा काय पाहू शकतोस रे ?

४था मॅट्रीक्स मला ठिकठाक वाटला. त्यात त्या गेम बद्दल वॉर्नर ब्र्दर्स नी जबरदस्ती पुढचा भाग काढायला भाग पाडले आहे हा संवाद सिनेमाला पण लागू होतो असे वाटले. खटकण्यासारखे फारसे काही नाही नि मागच्या भागांशी नीट लिंक जोडली आहे खरी पण मूलात चौथ्या भागाची खरच गरज होती का ह्याचे उत्तर माझ्यासाठी नाही येते. पहिल्या तीन सिनेमांचे कल्ट स्टेटस ह्याला वाटले नाही.

चौथ्या भागाची खरच गरज होती का ह्याचे उत्तर माझ्यासाठी नाही येते. >> पण त्यांनी आपण सगळे नीट केले - हॅप्पीली एव्हर अफ्टर कसे फोल असते ते दाखवलेले आहे यात त्यामुळे तसे गरज पेक्षा वेगळी कन्सेप्ट आहे. तू म्हणतोस तसे "हिरोज जर्नी" ही ३ भागांमध्ये संपली.

कारण कंटाळा येतोय पाहताना. आजूबाजूला इतके इंटरेस्टिंग मटेरियल असताना (स्ट्रीमिंगवर Wink ). त्याचा कन्स्पेट आणि एकूण संदर्भ मला दुसरा पाहिला तेव्हापासून माहीत आहेत. चौथा अजून पाहिला नाही - त्याकरताच हे रिकॅप करतोय.

फा, पाहिला आवडला नाही (आणि दुसरं काही बघायला असेल) तर अजिबात २ ३ ४ करत वेळ दवडू नकोस. चहाचा कप नाही म्हण आणि सोडून दे.
पहिला बघितला तेव्हा मला वाटतं १२ झालेलो किंवा इंजि. फर्स्ट इअरला होतो. थेटरात बघून मग टोरंट डाऊनलोड करून मित्राबरोबर एक एक संवाद परत परत ऐकून एंडलेस चर्चा करून त्याचा अगदी चोथा केला होता. सो नॉस्टॅल्जियाच जास्त आहे. Happy

ज्या देशात सुर्यवन्शी किव्वा अन्तिम सारखे स्टोरीलेस चित्रपट धो धो चालतात तिथे ८३ सारखा चान्गला चित्रपट पडणे स्वाभाविक आहे.

आरआरआर चित्रपट कोरोनामुळे ढकलला असावा.

>>एक खुप विचार करून बनवलेला पिक्चर आहे.<< +१

आणि तो पहिल्या मेट्रिक्ससारखाच एकदा बघुन समजणारा नाहि. बरेच प्रश्न अनुत्तरीत वाटत असल्याने परत पहावा लागतो. नेस्टेड फंक्शन्सचा अतिवापर केल्याने कोड जसा मोनोलोथिक्/काँप्लिकेटेड होतो - तसाच काहिसा हा प्रकार आहे. पण बघा एकदा तरी; कळला नाहि म्हणुन अस्वस्थ झाला असाल तर परत बघा. मी या मागच्या दोन लाँग विकेंडच्या कृपेने ट्रिलजी पण परत बघितली; वुचास्कि ब्रदर्स (सिस्टर्स?) ची मुलाखत हि बघितली.

रेझरेक्शन मधे वॉर्नर ब्रदर्स, झकरबर्गला दिलेले जॅब्स, अगदि अ‍ॅप्ट आहेत. लवस्टोरी, सेव द ह्युमॅनिटि, मेटाफिजिक्सचे फंडे या सगळ्यांचं रसायन आहे, आणि ते बर्‍यापैकि जमलेलं आहे. आता निओ+ट्रिनिटि रेझरेक्ट झालेले आहेत, त्यांची कंबाइन्ड पावर लिमिटलेस आहे यावरुन पुढच्या भागाची शक्यता नाकारता येत नाहि. अ‍ॅटलिस्ट वॉर्नर ब्रदर्स कॅट्रिक्स च्या तयारीला लागलेले आहेत अशी वदंता आहे... Wink

फा, पाहिला आवडला नाही (आणि दुसरं काही बघायला असेल) तर अजिबात २ ३ ४ करत वेळ दवडू नकोस. चहाचा कप नाही म्हण आणि सोडून दे. >>> त्याच फेन्सवर आहे. तोच विचार करतोय Happy

स्टार वॉर्स सिरीजबद्दलही तेच. मार्व्हल, डीसी वगैरेही "Meh"! तिन्ही आयर्न मॅन पाहिले. मधे पुन्हा जरा नीट पाहू म्हणून कॅप्टन अमेरिका पाहिला. बघताना इंटरेस्टिंग आहेत. पण बाकी पर्याय सोडून बघण्याइतका इंटरेस्ट वाटलेला नाही.

मला अवतारही काही भारी वाटला नाही. तो वेळेवर पाहिला नाही हे एक, आणि टीव्हीवर पाहिला हे दुसरे असू शकते. मात्र आधी न पाहिलेली पण पाहिल्यावर एकदम आवडलेली फ्रॅन्चायझी म्हणजे प्लॅनेट ऑफ द एप्स - नवीन सिरीज.

यातले काही चित्रपट जर रिलीजच्या ८-१० वर्षे नंतर पाहिले तर त्यांनी त्यावेळेस आणलेले "नॉव्हेल" कन्सेप्ट्स नंतर कॉमन होतात व त्यात नावीन्य राहात नाही. "28 Days Later" हा एक झॉम्बी जॉनरा मधला फार भारी पिक्चर समजला जातो. तो मी नुकताच पाहिला तर काही खास वाटला नाही. पण तो आला २००३ साली. नंतर "द वॉकिंग डेड' वगैरे सिरीज मधे हेच कन्सेप्ट्स आले होते. कदाचित जास्त चांगल्या पध्दतीने. पण त्यामुळे नावीन्य वाटत नाही.

बाय द वे बहुतांश झॉम्बी जॉनरा मधे हे झॉम्बी पब्लिक पाण्यातून जाउ शकत नाही असे दाखवले आहे (इव्हन गॉट मधे ते "वाइट्स" पोहू शकत नाहीत). त्यामुळे आता शार्कनेडो या सर्व स्काय फाय व सर्व लॉजिक धाब्यावर बसवणार्‍या सिरीज वाल्यांचा नवीन "झॉम्बी टायडल वेव्ह" येतोय त्याबद्दल कुतूहल आहे Happy

आता जाल काकवा पण रेड पिल ब्लू पिल . करून मॅट्रिक्स न बघताच त्यातील वाक्ये फेकू लागल्यात.
म्याट्रिक्स टू एकदम स्टायलिश व थ्री मध्ये स्टोरी खतम केलेली आहे. आता ओटीटी वर आल्यावरच बघ णार रीसरेक्षन. उगीच प्रिचो ला फुटेज का दिले आहे पण

फा, तू डेडपूल नि व्हेनम बघ. तुला संवाद वगैरे आवडतात ते त्याच्यात झक्कास जमले आहेत. डेडपूल पोरांबरोबर बघू नकोस. तिन्ही आयर्न मॅ नि कॅप्टन अमेरिका मार्व्हलच आहेत की रे.

तू म्हणतोस तसे "हिरोज जर्नी" ही ३ भागांमध्ये संपली. >> नि हीरॉईन जर्नी सुरू झाली असे ना पण. पहिल्या तीन भागांमधे नीट सुसंवाद आहे नि गोष्टी का नि कशा होतात ह्याचे नीट स्पष्टिकरण येते. चौथ्यामधे तेच सगळे रीसायकल करून वापरलेले वाटते . तू अ‍ॅनी मॅट्रिक्स बघितलेली आहेस का ? ती प्री॑क्वेल म्हणून जास्त समर्पक वाटलेली त्यामुळे कदाचित माझ्या अधिक अपेक्षा असतील.

उगीच प्रिचो ला फुटेज का दिले आहे पण >> अमा सती म्हणून फ्रिडा पिंटो शोभली नसती म्हणून असेल Happy

तिन्ही आयर्न मॅ नि कॅप्टन अमेरिका मार्व्हलच आहेत की रे. >>> हो ते मार्व्हल/डीसी संदर्भात लिहीले आहे त्याचेच उदाहरण म्हणून.

डेडपूल बघितलाय मी. तो ही बघणेबल होता. फक्त इतकेच की बाकीचे सोडून हे बघावेसे वाटत नाही.

ओह बाय्दवे, नील पॅट्रिक हॅरीस हॅज डन ए ब्रिल्यंट जॅाब ॲज ॲन ॲनलिस्ट. ओरकल, आर्किटेक्ट पेक्शा जास्त फुटेज आहे त्याला. शिवाय ॲन ॲनलिस्ट एंडेड अप पर्जिंग ओरकल ॲंड आर्किटेक्ट? हम्म, साउंड्स फमिलियर…

83 चे अपयश

https://mulukhmaidan.com/due-to-these-five-things-83-films-faded-in-fron...
एसएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ’83’ या दोन्ही चित्रपटांच्या बजेटमध्ये खूप फरक आहे. धोनीचा बायोपिक केवळ 104 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 250 कोटी रुपयांचा व्यवसाय केला जो किमतीच्या दुप्पट आहे. दुसरीकडे, ’83’ बद्दल बोलायचे तर त्याचे बजेटच 270 कोटी रुपये होते. अशा परिस्थितीत, चित्रपटाला खर्च भरून काढण्यासाठी अनेक पटींनी कमाई करणे आवश्यक आहे, जे तो अजिबात करू शकला नाही.

तो वेळेवर पाहिला नाही हे एक, आणि टीव्हीवर पाहिला >> अवतार मध्ये राजेश खन्ना खूप म्हातारा झाला होता म्हणून तसे वाटले असेल Proud
नाही पण अवतार हा खरे म्हणजे थ्रीडी मध्ये पहायचाच पिक्चर आहे. फारच भारी आहे. खूप कमी पिक्चर असे आहेत की जे खरच ३डी करता बनवलेले वाटतात. त्यात अवतार आणि डॉ. स्ट्रेंज हे नक्कीच वरती आहेत.

शांतपणे तुकडे करत बघायचे असतील तर लॉर्ड ऑफ द रिंग्ज चे एक्सटेंडेड कट्स बघ. एक एक भाग ४ - ४ तासांचा आहे. पण आपण एक कादंबरी स्क्रीन वर शांतपणे बघतो आहोत असे वाटते. मस्त एकदम.

पण एकंदरीत सायफाय / फँटसी हा तुझा विषय नाही असे तुझ्या प्रतिसादावरून दिसते आहे. प्लॅनेट ऑफ द एप्स मधला जुन्यातला पहिला भाग फार भारी आहे. त्याचा शेवट हा मला आवडलेल्या शेवटांमधला वन ऑफ द बेस्ट एण्डीग आहे.

शांतपणे तुकडे करत बघायचे असतील तर लॉर्ड ऑफ द रिंग्ज चे एक्सटेंडेड कट्स बघ. एक एक भाग ४ - ४ तासांचा आहे. पण आपण एक कादंबरी स्क्रीन वर शांतपणे बघतो आहोत असे वाटते. मस्त एकदम. >>> यस! नक्कीच.

वतार मध्ये राजेश खन्ना खूप म्हातारा झाला होता म्हणून तसे वाटले असेल >>> Lol

'कारखानिसांची वारी' बघितला, आणि फारच आवडला.
चार भाउ आणि एक बहिण, आता सगळे उतारवयाला लागलेले. त्यात मोठ्या भावाचे निधन होते. तेव्हा सगळे एकत्र जमलेले आहेत. त्या भावाने आपल्या अस्थी दोन-चार ठिकाणी टाकाव्या... आपलं विसर्जित कराव्या, आणि मग बेडरुमच्या कपाटातल्या खणात ठेवलेला लिफाफा उघडावा असं एका भावाच्या कानात मरणाआधी सांगितलेलं असतं. जिवंत भावांतील एक अत्यंत फाटक्या तोंडाचा, रुढींमुळे आलेल्या प्रिव्हलेज, सुप्रिमसीत जगणारा मोहन आगाशे, दुसरा अमेरिकेत रहाणारा, तिसरा डोक्याने फार स्मार्ट नसलेला (म्हणजे सगळ्या व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डवर डोळे झाकुन विश्वास ठेवणारे जे नातेवाईक आपल्या डोळ्यासमोर येतील ना तसा) आणि बहिण (गीतांजली कुलकर्णी) ठाम, व्यवहारी आणि क्लॉजेट मधुन आऊट होऊ न शकलेली.
मेलेल्या भावाचा मुलगा अमेय वाघ आणि बायको वंदना गुप्ते. अमेय वाघची गर्लफ्रेंड अगेन ठाम विचारांची मृण्मयी देशपांडे.
तर हे तीन भाऊ, बहिण आणि अमेय वाघ असे अस्थी विसर्जनाला निघतात, आणि एकेकाच्या स्वभावाचे कंगोरे, वर्षांनुवर्षे बुद्धीवर चढलेली पुटं आणि त्यातुन निर्माण होणारे मजेदार प्रसंग अगदी हहपुवा करतात. सगळे प्रसंगनिष्ठ विनोद घडत जातात. थोडंफार लोकशिक्षण घडेल असा अंडरटोन ठेवून सगळं घडतंय हे नंतर विचार केल्यावर समजतं. पण चित्रपट बघताना कॅरीकेचर्स न करता, मुद्दाम विनोदासाठी विनोद न करता फक्त जे घडत जातं ते बघायला फार मजा येते.
गीतांजली कुलकर्णी, वंदना गुप्ते, मृण्मयी देशापांडे आणि नंतर शुभांगी गोखले... या बायकांचे संवाद/ नंबर ऑफ सीन्स मोजले तर फार काम नाही. पण त्यांची कॅरेक्टर, निर्णय, ठामपणा इतका आहे की त्याच मनावर ठसतात. हे फारच मजेदार आणि मग विचार केला तर कदाचित जाणूनबुजुन केलेलं असावं. शेवट जरा टुकार होणार वाटत असताना एक दृष्य येतं आणि याहुन छान शेवट झाला नसता याची खात्री पटते.
अमेय वाघ ने फारच सुंदर काम केलं आहे. फार मतं नसलेला मुखदुर्बळ मध्यमवर्गीय मुलगा अगदी दिसत रहातो. मोहन आगाशे बेस्टच! 'कारखानिसांची वारी' असं एक गाणं आहे ते पण चागलं जमलंय. एकुण चित्रपट आवडला.
आयपी टीव्हीवर बघितला. बाकी अधिकृत ओटीटीवर कुठे आहे कल्पना नाही.

वतार मध्ये राजेश खन्ना खूप म्हातारा झाला होता म्हणून तसे वाटले असेल >> >> Lol

शांतपणे तुकडे करत बघायचे असतील तर लॉर्ड ऑफ द रिंग्ज चे एक्सटेंडेड कट्स बघ. >> +1 एकदम ओव्हर लोड होतो रे. ड्यून तसाच असेल असे वाटलेले पण पहिल्यात तरि अजून तीमजा जाणवली नाहिये.

नील पॅट्रिक हॅरीस हॅज डन ए ब्रिल्यंट जॅाब ॲज ॲन ॲनलिस्ट. >> नील पॅट्रिक हॅरीस एकदम अंडररेटेड आहे रे. नेहमी असाच भाव खाऊन जातो. गॉन गर्ल आठव.

कारखानिसांची वारी>>>>>>> मला पण बघायचा आहेच. तेवढ्यासाठी आयपी टिव्ही घेणार नाही पण इतरत्र कुठे दिसला तर सांगा प्लीज.

काल अतरंगी रे बघितला.. वेगळी स्टोरी म्हणून आवडला पण डिरेक्शन बऱयाच ठिकाणी गंडलंय. सुरूवातीचा अर्धा तास रांझना २ बघतोय की काय असं वाटतं (रांझना आवडला होती मला) .. त्याच वेळेस नक्की काय चाल्लय हे कळत नाही.. मग एक ट्विस्ट येतो.. बाकी तुम्ही बघा आणि इथे लिहा.

'कारखानिसांची वारी' बघितला, आणि फारच आवडला. >>>>>>> नसीरुद्दीन शहाची एक हिन्दी वेबसिरिज ह्याच विषयावर होती का? नाव आठवत नाही.

रामप्रसाद की तेराहवी म्हणून एक पिक्चर आलेला, सीमा पहावा चा. नासीर गेस्ट होता.
त्याच्या पेक्षा हा उजवा वाटला.

लॉर्ड ऑफ द रिंग्ज चे एक्सटेंडेड कट्स कुठे मिळतील?
The Hobbit आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज फार आवडतात.

रामप्रसाद की तेराहवी म्हणून एक पिक्चर आलेला, सीमा पहावा चा. नासीर गेस्ट होता. >>>>>>>> ओह येस आठवल नाव. आता कोणी कोणाची कथा चोरली हा एक प्रश्नच आहे.

अमेझॉन प्राईमवर उद्या 7 जानेवारी पुष्पा येणारे.
तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम मधे.

Pages