मला काही अजेंडा वगैरे जाणवला नाही. तो आर्मी सीन सुद्धा कोणाला हतबल वगैरे दाखवले आहे असे काही वाटले नाही. आर्मीचा क्रिकेटमधला इंटरेस्ट दाखवला आहे. असे सीझफायर एरव्ही ईद, दिवाळी वगैरेला होते. ते मॅचच्या वेळेस झाले तर आश्चर्य नाही. ते मुस्लिम कुटुंबही कर्फ्युबद्दल बोलताना दाखवले आहे. दंगेखोरांबद्दल नाही.
संपूर्ण चित्रपटात एकही हिंदू देवदेवतांचा फोटो/मूर्ती दिसणार नाही. ठीक आहे. 83 ची टीम सगळेच नास्तिक असणार >> अरे देवा..चित्रपटाचा कंटेंटच इतका जबरदस्त होता की ह्या गोष्टींकडे का लक्ष जायला हवं?
मला काही अजेंडा वगैरे जाणवला नाही. तो आर्मी सीन सुद्धा कोणाला हतबल वगैरे दाखवले आहे असे काही वाटले नाही. आर्मीचा क्रिकेटमधला इंटरेस्ट दाखवला आहे. असे सीझफायर एरव्ही ईद, दिवाळी वगैरेला होते. ते मॅचच्या वेळेस झाले तर आश्चर्य नाही. ते मुस्लिम कुटुंबही कर्फ्युबद्दल बोलताना दाखवले आहे. दंगेखोरांबद्दल नाही.//
Ceasefire चा mutual pact असेल तर त्यात भारतीय आर्मी पाकिस्तानी आर्मीचे आभार मानण्याचा सीन टाकण्याची गरज काय? पाकिस्तानी आर्मी आणि ISI - they are basically terrorists without any war ethics. कबीर खान whitewash करून त्यांना 'दिलदार उमदा शत्रू' म्हणून पेश करतोय.
कर्फ्यु, दंगल यांनी हिंदू लोकही affect झाले असतीलच ना. मग फक्त एक मुस्लिम कुटूंब, मुस्लिम वस्ती दाखवणं हे positioning आहे. Rewriting history. उद्या कबीर खानसारखे लोक 1983 च काय 1946 मध्येही डायरेक्ट ऍक्शन डे च्या दिवशी नौखालीत दंगल चालू आहे, मुस्लिम खूप घाबरलेले आहेत, हिंदू तलवारी घेऊन देशभर थैमान घालत आहेत, जिना आणि सुरावर्दी बिचारे हात जोडून हिंदूना शांततेचं आवाहन करत आहेत- असंही दाखवतील.
नॉर्मल दाखवा ना की सगळ्या धर्माचे पंथाचे क्रिकेट चाहते मॅच बघत आहेत. तिथे propaganda कशाला.
व्हाईटोबा, तुम्ही कुठे पाहिला चित्रपट ?
आमच्याकडे जो चित्रपट दाखवला त्याचा दिग्दर्शक कबीर खन्ना होता. त्यात मंदीरावर भगवा झेंडा दाखवला होता. तिरंगा पण नाही. हिंदू राष्ट्रात तिरंग्याला मान्यता नाही. त्यात हिरवा रंग सुद्धा आहे. आमच्या चित्रपटात भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला अटक करून फायनलच्या वेळी फायर करण्यापासून रोखते असा सीन होता. तर एक भगवे दल मुस्लीम कुटुंबाला टीव्हीचा अँटेना सेट करून देते असा सीन होता. तुम्हाला नक्कीच ड्युप्लीकेट चित्रपट दाखवला असणार. पैसे परत घ्या.
गेली काही वर्षे भारतात काय चावटपणा चालू आहे कळत नाही. मैने प्यार किया पासून आम्ही ज्याला सन्मान खन्ना म्हणून प्रेम करतोय त्याला काही भागात सलमान खान म्हणून पेश केले जात आहे. सलमान खान नावाचा माणूस गणपती कसा काय बसवेल ? समीर खन्नाला आंमीर खान, शेखर खन्ना चे शाहरूख खान कोण करतंय असं ? सध्याचे मुस्लीम सरकार गेले की या गोष्टींचा तत्काळ छडा लावता येईल.
Submitted by शांत प्राणी on 2 January, 2022 - 21:19
रणवीर सिंग- दीपिका यांचा 83 चित्रपट theatrical flop झाला आहे असं वाचलं
>>>>>
कुठे वाचलं
सॉरी हे तुमच्यावर नाही हसलो तर जिथे वाचले त्यांच्यावर हसलोय. अहो काल रात्री ११ ते २ चा शो हाऊसफुल्ल होता. आमच्याईथे लोकांनी जवळपास पंधरा ते वीस सीन्सना उत्स्फुर्त टाळ्या वाजवल्या. शेवटी एकाने "भारतमाता की" असे बोलताच सारे एकसाथ "जय" म्हणाले. माझ्या सात वर्षांच्या मुलीने शक्य तितके झोप लांबवून पिक्चर एंजॉय केला. मी तर म्हणतो चित्रपटप्रेमी असाल तर हा पिक्चर थिएटरलाच बघा. नाहीतर आयुष्यात एका सुंदर अनुभवाला मुकाल
हे अजेंडा प्रकरण ईथेच कळले. पिक्चर बघताना जाणवतही नाही. आणि मी फेसबूकवर वगैरे असल्या फालतू पोस्ट वाचतही नाही. तरीही खरेच भारत-पाक आणि हिंदू-मुस्लिम संबंध सुधारायला काही अजेंडा असेल तर त्याचे स्वागतच आहे. कारण ते पलीकडचे फायरींग करणार नाहीत असे सांगतात तेव्हाही आमच्याकडे लोकांनी टाळ्या वाजवल्या. कारण त्यावेळी थिएटरमधील पब्लिकचा एकच धर्म झाला होता आणि तो म्हणजे क्रिकेट. आणि यासाठी तुम्ही मूळचे क्रिकेटप्रेमी असण्याचीही गरज नाही. जसे मी आयुष्यात एकही हॉकी वा कुस्तीचा सामना बघितला नसूनही चक दे आणि दंगल एंजॉ मध्य केले तसे क्रिकेटमध्ये फारसा रस नसलेली व्यक्तीही हा चित्रपट एंजॉय करू शकते. किंबहुना क्रिकेटप्रेमींपेक्षा जास्तच एंजॉय करेल जर तिला ८३ वर्ल्डकपबद्दल फारशी माहिती नसेल. हे खात्रीने सांगू शकतो कारण माझ्यापेक्षा जास्त एंजॉय माझ्या बायकोने केले. घरी आल्यावर पहाटेपर्यंत चित्रपटाबद्दलच बोलत होती. एकूण एक प्लेअरबद्दल बोलली. अन्यथा मला ट्रेलर बघून वाटलेले की कपिल देववरच केंद्रीत आहे की काय. पण चित्रपट तसा बिलकुल नाहीये. सारेच कॅरेक्टर ऊठून दिसतात. जे त्या वर्ल्डकपला चमकलेत जे जेवढे डिजर्व्ह करतात तेवढे फूटेज प्रत्येकाला आहे. क्रिकेट म्हणजे टीम गेम हे पदोपदी जाणवते पिक्चर बघताना.
तरी कोणी पिक्चरबद्दल मन कलुषित करायचा अजेंडा ठेवून लिहीत असेल तर त्याला बिलकुल बळी पडू नका. अन्यथा मला अश्यांबद्दल खूप वाईट वाटेल. चित्रपटात मुस्लिम दाखवलेत, पंजाबी देखील खूप दाखवले आहेत, साऊथ ईंडियन्स दाखवले आहेत, पिक्चर बघताना सारे भारतीयच वाटतात. लोकहो पिक्चर थ्रीडी मध्येच बघा. आणि थ्रीडीचाच तेवढा चष्मा घाला. दुसरे कुठलेच चष्मे घालायची गरज नाही.
मला या अजेंडा वाल्या ज्यापोस्ट फॉरवर्ड असतात त्यांची अक्षरशः दया येते. सर्व साधारणपणे प्रेक्षकांना न उमगलेले किंवा त्यांनीलक्ष देण्याइतके महत्वाचे नसलेले बरोबर याना दिसते आणि ते हायलाईट करून लोकांच्या माथी मारले जाते.
कधी कधी मला वाटतं की डिरेक्टर पेक्षा या लोकांना हा अजेंडा पसरवण्यात रस जास्त आहे
८३ पडला असे म्हणतात. खरे असेल. एकतर सिनेमाघरात ५०% परवानगी आहे. दिल्लीतर पुर्ण बंदी. त्यामुळे धंदा बसणे शक्य आहे. Spiderman is giving tough competition to 83. We also watched Spiderman instead of 83. घरी ८३ चा २ वि. १ मताने पराभव झाला :-). फक्त मलाच ८३ मधे इंटरेस्ट होता.
एकतर सिनेमाघरात ५०% परवानगी आहे. दिल्लीतर पुर्ण बंदी. >>> त्यामुळे तिकीटांचेही भाव वाढवलेत. पॉपकॉर्नचे भाव वाढवलेत. काही काळाने हा ओटीटीवर येणार, मग आता हा भुर्दंड सोसून चित्रपटगृहात का जा असा विचार लोकांनी करणे स्वाभाविक आहे. त्यात स्पायडरमॅन स्पर्धेला असेल तर स्पेशल ईफेक्ट मोठ्या पडद्यावर बघायला जाऊया म्हणून पहिले मत त्याच्या पारड्यात पडणे स्वाभाविक आहे. या काळात लोकं दोन दोन मूवीला जाणेही अवघडच आहे. तरी माऊथ पब्लिसिटीवर जास्त काळ तग धरेल हा.. आणि ओटीटी वगैरे वर किती कमाई होते माहीत नाही पण तिथे आणि नंतर टीव्हीवर विकला जाऊन आणखी कमावेलही.. पडला डिक्लेअर करायची घाई कश्याला.. मी स्वत: हा पुन्हा पुन्हा बघणार आहे. चित्रपटाला रिपीट वॅल्यु आहे.
मुळात सध्या पिक्चर पडला म्हणजे चित्रपट गृहातून बाहेर पडताना लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे बघावे. मला अजूनपर्यंत एकही जण चित्रपट न आवडलेला भेटला नाही. उलट भरभरून कौतुक करणारेच बघतोय.
सूर्यवंशी आणि अंतिम गेले कि कमावून. त्यांना हेच नियम होते ना?
पहिल्या आठवडय़ात पुष्पा हा अललू अर्जुनाचा चित्रपट डल्ला मारून गेला. दुसऱ्या आठवडय़ात ८३ हिट कडे वाटचाल करीत आहे. १५० कोटी उत्पन्न मिळाले आहे. १२० कोटी प्रॉडक्शन कॉस्ट + ४० कोटी स्वामित्व हक्क + २० कोटी मार्केटिंग असे बजेट आहे. https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/83-box-office-collectio...
Submitted by शांत प्राणी on 3 January, 2022 - 04:57
सूर्यवंशी आणि अंतिम गेले कि कमावून. त्यांना हेच नियम होते ना?
>>>
नाही. सगळे मुद्दे लागू नव्हते. एक म्हणजे स्पायडरमॅन त्यांच्या स्पर्धेला नव्हता. तसेच क्रिकेट एके क्रिकेटचा चित्रपट आहे म्हणून त्यात रस नसणाऱ्यांनी फुल्ली मारली हा मुद्दाही नव्हता.
तरीही अंतिम आणि सुर्यवंशी यांनी किती कमावले आणि ८३ किती कमावेल हे चित्र काही आठवड्यांनी स्पष्ट होईल.
सध्याचे तिघांचे कमाईचे अधिकृत आकडे काय आहेत हे कोणाला माहीत असल्यास बघायला आवडतील.
83 च्या मागे सगळी ओरिजिनल टीम जाहिरात करत फिरत आहे म्हणजे स्टोरी प्ले मध्ये रॉयल्टीच्या नावाने त्यांचेही बारा वाटे असणार , नैतर 200 कोटी खरचावे असे त्यात काय होते ?
उषा मंगेशकरांचा यु ट्यूबवर किस्सा आहे. संतोषी माता सिनेमाची गाणी म्हणायला त्यांना फक्त 400 गुणिले 3 , फक्त 1200 रु मिळाले
लोक थेटरात दक्षिणा ठेवत तीदेखील सगळी निर्माता गोळा करत असे म्हणे, पिक्चरही चालला , निर्माता कधी मलेशियात कधी थायलंडला फिरू लागला, त्याने कुणालाही नफ्यातील वाटणी दिली नव्हती
मग त्याने त्याच गुर्मीत दुसरा सिनेमा काढला, नबाब साहेब नावाचा.
संतोषी मातेने बरोबर परत त्याला फुटपाथवर आणून सोडले
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2022 - 09:55>>> पूर्णपणे सहमत. काही फ्लॉप वगैरे झालेला नाहीये. आम्ही मॅटिनी शो बघितला.. ९० टक्के थिएटर भरलेलं. दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीने बघितला तर तिलाही सहजी तिकीट मिळालं नव्हतं.
तरी कोणी पिक्चरबद्दल मन कलुषित करायचा अजेंडा ठेवून लिहीत असेल तर त्याला बिलकुल बळी पडू नका. अन्यथा मला अश्यांबद्दल खूप वाईट वाटेल. चित्रपटात मुस्लिम दाखवलेत, पंजाबी देखील खूप दाखवले आहेत, साऊथ ईंडियन्स दाखवले आहेत, पिक्चर बघताना सारे भारतीयच वाटतात. लोकहो पिक्चर थ्रीडी मध्येच बघा. आणि थ्रीडीचाच तेवढा चष्मा घाला. दुसरे कुठलेच चष्मे घालायची गरज नाही +१०००
आम्ही ४था मॅट्रीक्स पाहिला. मला आवडला बायकोला ठीक वाटला. एक खुप विचार करून बनवलेला पिक्चर आहे. पण परत एकदा टेक्निकल झालेला आहे. आणि बरेच पॉप कल्चर - करंट रेफरन्सेस आहेत त्यात मागचे ३ पिक्चर पाहिलेले नसतील तर अजिबात कळणार नाही. बहुतेक मी अशा कमी लोकांमधला आहे की ज्यांना २ - ३ हे पहिल्या भागापेक्षा जास्ती आवडले होते कारण ते जास्ती फिलॉसॉफिकल आणि टेक्निकल होतात आणि त्यामुळेच मला ४था आवडला.
तरीपण नुसती फायटींग आणि भन्नाट सीन्स पहायला सुद्धा हा भाग मस्त आहे. ट्रीनीटीला थोडे कमी काम आहे पण नविन मॉर्फियस आणि बग्ज (जेसिका हेन्विक) यांचे काम मस्त झाले आहे.
मला काही अजेंडा वगैरे जाणवला
मला काही अजेंडा वगैरे जाणवला नाही. तो आर्मी सीन सुद्धा कोणाला हतबल वगैरे दाखवले आहे असे काही वाटले नाही. आर्मीचा क्रिकेटमधला इंटरेस्ट दाखवला आहे. असे सीझफायर एरव्ही ईद, दिवाळी वगैरेला होते. ते मॅचच्या वेळेस झाले तर आश्चर्य नाही. ते मुस्लिम कुटुंबही कर्फ्युबद्दल बोलताना दाखवले आहे. दंगेखोरांबद्दल नाही.
संपूर्ण चित्रपटात एकही हिंदू
संपूर्ण चित्रपटात एकही हिंदू देवदेवतांचा फोटो/मूर्ती दिसणार नाही. ठीक आहे. 83 ची टीम सगळेच नास्तिक असणार >> अरे देवा..चित्रपटाचा कंटेंटच इतका जबरदस्त होता की ह्या गोष्टींकडे का लक्ष जायला हवं?
चित्रपट फ्लॉप होण्याचे दोन
चित्रपट फ्लॉप होण्याचे दोन कारणे मला वाटतात-
तिकीट दर खूप जास्त ठेवले होते...
Drama कमी पडला चित्रपटात... (जो ms dhoni चित्रपटात भरपूर होता)
मला काही अजेंडा वगैरे जाणवला
मला काही अजेंडा वगैरे जाणवला नाही. तो आर्मी सीन सुद्धा कोणाला हतबल वगैरे दाखवले आहे असे काही वाटले नाही. आर्मीचा क्रिकेटमधला इंटरेस्ट दाखवला आहे. असे सीझफायर एरव्ही ईद, दिवाळी वगैरेला होते. ते मॅचच्या वेळेस झाले तर आश्चर्य नाही. ते मुस्लिम कुटुंबही कर्फ्युबद्दल बोलताना दाखवले आहे. दंगेखोरांबद्दल नाही.//
Ceasefire चा mutual pact असेल तर त्यात भारतीय आर्मी पाकिस्तानी आर्मीचे आभार मानण्याचा सीन टाकण्याची गरज काय? पाकिस्तानी आर्मी आणि ISI - they are basically terrorists without any war ethics. कबीर खान whitewash करून त्यांना 'दिलदार उमदा शत्रू' म्हणून पेश करतोय.
कर्फ्यु, दंगल यांनी हिंदू लोकही affect झाले असतीलच ना. मग फक्त एक मुस्लिम कुटूंब, मुस्लिम वस्ती दाखवणं हे positioning आहे. Rewriting history. उद्या कबीर खानसारखे लोक 1983 च काय 1946 मध्येही डायरेक्ट ऍक्शन डे च्या दिवशी नौखालीत दंगल चालू आहे, मुस्लिम खूप घाबरलेले आहेत, हिंदू तलवारी घेऊन देशभर थैमान घालत आहेत, जिना आणि सुरावर्दी बिचारे हात जोडून हिंदूना शांततेचं आवाहन करत आहेत- असंही दाखवतील.
नॉर्मल दाखवा ना की सगळ्या धर्माचे पंथाचे क्रिकेट चाहते मॅच बघत आहेत. तिथे propaganda कशाला.
तुम्ही काढा पिक्चर अन देवाचे
तुम्ही काढा पिक्चर अन देवाचे गाणे घाला
खान पैसे घालून पिक्चर काढणार तर तो मशिदच दाखवणार
व्हाईटोबा, तुम्ही कुठे पाहिला
व्हाईटोबा, तुम्ही कुठे पाहिला चित्रपट ?
आमच्याकडे जो चित्रपट दाखवला त्याचा दिग्दर्शक कबीर खन्ना होता. त्यात मंदीरावर भगवा झेंडा दाखवला होता. तिरंगा पण नाही. हिंदू राष्ट्रात तिरंग्याला मान्यता नाही. त्यात हिरवा रंग सुद्धा आहे. आमच्या चित्रपटात भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला अटक करून फायनलच्या वेळी फायर करण्यापासून रोखते असा सीन होता. तर एक भगवे दल मुस्लीम कुटुंबाला टीव्हीचा अँटेना सेट करून देते असा सीन होता. तुम्हाला नक्कीच ड्युप्लीकेट चित्रपट दाखवला असणार. पैसे परत घ्या.
गेली काही वर्षे भारतात काय चावटपणा चालू आहे कळत नाही. मैने प्यार किया पासून आम्ही ज्याला सन्मान खन्ना म्हणून प्रेम करतोय त्याला काही भागात सलमान खान म्हणून पेश केले जात आहे. सलमान खान नावाचा माणूस गणपती कसा काय बसवेल ? समीर खन्नाला आंमीर खान, शेखर खन्ना चे शाहरूख खान कोण करतंय असं ? सध्याचे मुस्लीम सरकार गेले की या गोष्टींचा तत्काळ छडा लावता येईल.
पण पिक्चर बहुतेक पडला आहे
पण पिक्चर बहुतेक पडला आहे
Rrr यायची वेळ झाली , आता 4 दिवसात 83 चा बाजार उठेल
RRR इतक्यात येणार नाही. रिलीज
RRR इतक्यात येणार नाही. रिलीज डेट पुढे ढकलली.
खेळावरचा सुंदर पिक्चर एकच ,
खेळावरचा सुंदर पिक्चर एकच , लगान
कारण त्यात देशभक्तीचे डायलॉग नव्हते
नंतर चक दे पासून खेल , बायोपीक आले त्यात जणू काय खेळुन देशावर उपकार केले असे पिक्चर निघत आहेत.
रणवीर सिंग- दीपिका यांचा 83
रणवीर सिंग- दीपिका यांचा 83 चित्रपट theatrical flop झाला आहे असं वाचलं
>>>>>
कुठे वाचलं
सॉरी हे तुमच्यावर नाही हसलो तर जिथे वाचले त्यांच्यावर हसलोय. अहो काल रात्री ११ ते २ चा शो हाऊसफुल्ल होता. आमच्याईथे लोकांनी जवळपास पंधरा ते वीस सीन्सना उत्स्फुर्त टाळ्या वाजवल्या. शेवटी एकाने "भारतमाता की" असे बोलताच सारे एकसाथ "जय" म्हणाले. माझ्या सात वर्षांच्या मुलीने शक्य तितके झोप लांबवून पिक्चर एंजॉय केला. मी तर म्हणतो चित्रपटप्रेमी असाल तर हा पिक्चर थिएटरलाच बघा. नाहीतर आयुष्यात एका सुंदर अनुभवाला मुकाल
हे अजेंडा प्रकरण ईथेच कळले. पिक्चर बघताना जाणवतही नाही. आणि मी फेसबूकवर वगैरे असल्या फालतू पोस्ट वाचतही नाही. तरीही खरेच भारत-पाक आणि हिंदू-मुस्लिम संबंध सुधारायला काही अजेंडा असेल तर त्याचे स्वागतच आहे. कारण ते पलीकडचे फायरींग करणार नाहीत असे सांगतात तेव्हाही आमच्याकडे लोकांनी टाळ्या वाजवल्या. कारण त्यावेळी थिएटरमधील पब्लिकचा एकच धर्म झाला होता आणि तो म्हणजे क्रिकेट. आणि यासाठी तुम्ही मूळचे क्रिकेटप्रेमी असण्याचीही गरज नाही. जसे मी आयुष्यात एकही हॉकी वा कुस्तीचा सामना बघितला नसूनही चक दे आणि दंगल एंजॉ मध्य केले तसे क्रिकेटमध्ये फारसा रस नसलेली व्यक्तीही हा चित्रपट एंजॉय करू शकते. किंबहुना क्रिकेटप्रेमींपेक्षा जास्तच एंजॉय करेल जर तिला ८३ वर्ल्डकपबद्दल फारशी माहिती नसेल. हे खात्रीने सांगू शकतो कारण माझ्यापेक्षा जास्त एंजॉय माझ्या बायकोने केले. घरी आल्यावर पहाटेपर्यंत चित्रपटाबद्दलच बोलत होती. एकूण एक प्लेअरबद्दल बोलली. अन्यथा मला ट्रेलर बघून वाटलेले की कपिल देववरच केंद्रीत आहे की काय. पण चित्रपट तसा बिलकुल नाहीये. सारेच कॅरेक्टर ऊठून दिसतात. जे त्या वर्ल्डकपला चमकलेत जे जेवढे डिजर्व्ह करतात तेवढे फूटेज प्रत्येकाला आहे. क्रिकेट म्हणजे टीम गेम हे पदोपदी जाणवते पिक्चर बघताना.
तरी कोणी पिक्चरबद्दल मन कलुषित करायचा अजेंडा ठेवून लिहीत असेल तर त्याला बिलकुल बळी पडू नका. अन्यथा मला अश्यांबद्दल खूप वाईट वाटेल. चित्रपटात मुस्लिम दाखवलेत, पंजाबी देखील खूप दाखवले आहेत, साऊथ ईंडियन्स दाखवले आहेत, पिक्चर बघताना सारे भारतीयच वाटतात. लोकहो पिक्चर थ्रीडी मध्येच बघा. आणि थ्रीडीचाच तेवढा चष्मा घाला. दुसरे कुठलेच चष्मे घालायची गरज नाही.
मला या अजेंडा वाल्या
मला या अजेंडा वाल्या ज्यापोस्ट फॉरवर्ड असतात त्यांची अक्षरशः दया येते. सर्व साधारणपणे प्रेक्षकांना न उमगलेले किंवा त्यांनीलक्ष देण्याइतके महत्वाचे नसलेले बरोबर याना दिसते आणि ते हायलाईट करून लोकांच्या माथी मारले जाते.
कधी कधी मला वाटतं की डिरेक्टर पेक्षा या लोकांना हा अजेंडा पसरवण्यात रस जास्त आहे
83 चे बजेट 370 कोटी आहे
83 चे बजेट 370 कोटी आहे
आजवरचे इन्कम सुमारे 30 कोटी आहे
८३ पडला असे म्हणतात. खरे असेल
८३ पडला असे म्हणतात. खरे असेल. एकतर सिनेमाघरात ५०% परवानगी आहे. दिल्लीतर पुर्ण बंदी. त्यामुळे धंदा बसणे शक्य आहे. Spiderman is giving tough competition to 83. We also watched Spiderman instead of 83. घरी ८३ चा २ वि. १ मताने पराभव झाला :-). फक्त मलाच ८३ मधे इंटरेस्ट होता.
एकतर सिनेमाघरात ५०% परवानगी
एकतर सिनेमाघरात ५०% परवानगी आहे. दिल्लीतर पुर्ण बंदी. >>> त्यामुळे तिकीटांचेही भाव वाढवलेत. पॉपकॉर्नचे भाव वाढवलेत. काही काळाने हा ओटीटीवर येणार, मग आता हा भुर्दंड सोसून चित्रपटगृहात का जा असा विचार लोकांनी करणे स्वाभाविक आहे. त्यात स्पायडरमॅन स्पर्धेला असेल तर स्पेशल ईफेक्ट मोठ्या पडद्यावर बघायला जाऊया म्हणून पहिले मत त्याच्या पारड्यात पडणे स्वाभाविक आहे. या काळात लोकं दोन दोन मूवीला जाणेही अवघडच आहे. तरी माऊथ पब्लिसिटीवर जास्त काळ तग धरेल हा.. आणि ओटीटी वगैरे वर किती कमाई होते माहीत नाही पण तिथे आणि नंतर टीव्हीवर विकला जाऊन आणखी कमावेलही.. पडला डिक्लेअर करायची घाई कश्याला.. मी स्वत: हा पुन्हा पुन्हा बघणार आहे. चित्रपटाला रिपीट वॅल्यु आहे.
मुळात सध्या पिक्चर पडला म्हणजे चित्रपट गृहातून बाहेर पडताना लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे बघावे. मला अजूनपर्यंत एकही जण चित्रपट न आवडलेला भेटला नाही. उलट भरभरून कौतुक करणारेच बघतोय.
सूर्यवंशी आणि अंतिम गेले कि
सूर्यवंशी आणि अंतिम गेले कि कमावून. त्यांना हेच नियम होते ना?
पहिल्या आठवडय़ात पुष्पा हा अललू अर्जुनाचा चित्रपट डल्ला मारून गेला. दुसऱ्या आठवडय़ात ८३ हिट कडे वाटचाल करीत आहे. १५० कोटी उत्पन्न मिळाले आहे. १२० कोटी प्रॉडक्शन कॉस्ट + ४० कोटी स्वामित्व हक्क + २० कोटी मार्केटिंग असे बजेट आहे.
https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/83-box-office-collectio...
सूर्यवंशी आणि अंतिम गेले कि
सूर्यवंशी आणि अंतिम गेले कि कमावून. त्यांना हेच नियम होते ना?
>>>
नाही. सगळे मुद्दे लागू नव्हते. एक म्हणजे स्पायडरमॅन त्यांच्या स्पर्धेला नव्हता. तसेच क्रिकेट एके क्रिकेटचा चित्रपट आहे म्हणून त्यात रस नसणाऱ्यांनी फुल्ली मारली हा मुद्दाही नव्हता.
तरीही अंतिम आणि सुर्यवंशी यांनी किती कमावले आणि ८३ किती कमावेल हे चित्र काही आठवड्यांनी स्पष्ट होईल.
सध्याचे तिघांचे कमाईचे अधिकृत आकडे काय आहेत हे कोणाला माहीत असल्यास बघायला आवडतील.
मुवींचे नाव कलेक्शन असे
मुवींचे नाव बॉक्स ऑफिस कलेक्शन असे इंग्रजी गुगल करा
आजवरचे आकडे येतात
https://www.bollywoodhungama
https://www.bollywoodhungama.com/movie/antim-the-final-truth/box-office/
https://en.m.wikipedia.org/wiki/Antim:_The_Final_Truth
अंतिम : अंतिम कलेक्शन 39 कोटी
बजेट 25 कोटी
https://www.bollymoviereviewz.com/2021/12/83-box-office-collection-day-5...
83 : कलेक्शन 90 कोटी
बजेट 270 कोटी
https://en.m.wikipedia.org/wiki/Sooryavanshi
सूर्यवंशी : कलेक्शन 294 कोटी
बजेट 250 कोटी
अंतिमपेक्षा जास्त कमावलेत की.
अंतिमपेक्षा जास्त कमावलेत की...
बजेट काय होते यावर नेट प्रॉफिट ठरेल. मात्र कलेक्शन जास्तच आहे..
अंतिम चे बजेट फक्त 25 कोटी
अंतिम चे बजेट फक्त 25 कोटी होते
83 च्या मागे सगळी ओरिजिनल टीम जाहिरात करत फिरत आहे म्हणजे स्टोरी प्ले मध्ये रॉयल्टीच्या नावाने त्यांचेही बारा वाटे असणार , नैतर 200 कोटी खरचावे असे त्यात काय होते ?
राजमौळीने म्हणूनच आर आर आर
राजमौळीने म्हणूनच आर आर आर पुढे ढकलला असेल
उषा मंगेशकरांचा यु ट्यूबवर किस्सा आहे. संतोषी माता सिनेमाची गाणी म्हणायला त्यांना फक्त 400 गुणिले 3 , फक्त 1200 रु मिळाले
लोक थेटरात दक्षिणा ठेवत तीदेखील सगळी निर्माता गोळा करत असे म्हणे, पिक्चरही चालला , निर्माता कधी मलेशियात कधी थायलंडला फिरू लागला, त्याने कुणालाही नफ्यातील वाटणी दिली नव्हती
मग त्याने त्याच गुर्मीत दुसरा सिनेमा काढला, नबाब साहेब नावाचा.
संतोषी मातेने बरोबर परत त्याला फुटपाथवर आणून सोडले
पुष्पांला लई डिमांड आहे
पुष्पांला लई डिमांड आहे
एक दोनच मोकळ्या खुर्च्या आहेत
https://en.m.wikipedia.org/wiki/Pushpa:_The_Rise
बजेट 250 कोटी
आजवरचे कलेक्शन 300 कोटी
अजून एक महिना खाली येणार नाही.
500 कोटी तरी मिळवेल
Submitted by ऋन्मेऽऽष on 3
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2022 - 09:55>>> पूर्णपणे सहमत. काही फ्लॉप वगैरे झालेला नाहीये. आम्ही मॅटिनी शो बघितला.. ९० टक्के थिएटर भरलेलं. दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीने बघितला तर तिलाही सहजी तिकीट मिळालं नव्हतं.
तरी कोणी पिक्चरबद्दल मन कलुषित करायचा अजेंडा ठेवून लिहीत असेल तर त्याला बिलकुल बळी पडू नका. अन्यथा मला अश्यांबद्दल खूप वाईट वाटेल. चित्रपटात मुस्लिम दाखवलेत, पंजाबी देखील खूप दाखवले आहेत, साऊथ ईंडियन्स दाखवले आहेत, पिक्चर बघताना सारे भारतीयच वाटतात. लोकहो पिक्चर थ्रीडी मध्येच बघा. आणि थ्रीडीचाच तेवढा चष्मा घाला. दुसरे कुठलेच चष्मे घालायची गरज नाही +१०००
परत चित्रपटांबद्दल चर्चा
परत चित्रपटांबद्दल चर्चा करूया!
आम्ही ४था मॅट्रीक्स पाहिला. मला आवडला बायकोला ठीक वाटला. एक खुप विचार करून बनवलेला पिक्चर आहे. पण परत एकदा टेक्निकल झालेला आहे. आणि बरेच पॉप कल्चर - करंट रेफरन्सेस आहेत त्यात मागचे ३ पिक्चर पाहिलेले नसतील तर अजिबात कळणार नाही. बहुतेक मी अशा कमी लोकांमधला आहे की ज्यांना २ - ३ हे पहिल्या भागापेक्षा जास्ती आवडले होते कारण ते जास्ती फिलॉसॉफिकल आणि टेक्निकल होतात आणि त्यामुळेच मला ४था आवडला.
तरीपण नुसती फायटींग आणि भन्नाट सीन्स पहायला सुद्धा हा भाग मस्त आहे. ट्रीनीटीला थोडे कमी काम आहे पण नविन मॉर्फियस आणि बग्ज (जेसिका हेन्विक) यांचे काम मस्त झाले आहे.
अल्तारनेट खुर्चीने गणित
अलटरनेट खुर्चीने गणित कोलमडले आहे
अलटरनेट खुर्चीने गणित कोलमडले
अलटरनेट खुर्चीने गणित कोलमडले आहे >> १२० रू चे तिकीट ३०० रू ला आहे.
कुठले ?
कुठले ?
इकडे तर सगळी 130 च आहेत , घाटकोपरला
राजमौळीचा तो भगंदर कि काय तो
राजमौळीचा तो भगंदर कि काय तो पाहिला. त्यानंतर बाहुबली. आता बास.
आर आर आर आणि प्रभासचा
आर आर आर आणि प्रभासचा ज्योतिषी असल्याचा सिनेमा पुढे ढकलला ऐकून वाईट वाटले
मगधीरा ?
मगधीरा ?
Pages