मायबोली app स्लो चालते आहे का?

Submitted by रीया on 18 November, 2021 - 00:23

मला गेल्या 2 दिवसांपासून मायबोली app (Android device वरून) access करायला खूप वेळ लागत आहे. काल रात्री तर नवीन लेखनाचं पण उघडायला 10 मिनिटं लागली.

हा problem सगळ्यांनाच येतोय का हम स्पेशल है???

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाहती पाने उघडायला आधी वेळ लागायचा. आता त्या मानाने लौकर उघडत आहेत पण तिथे प्रतिसाद सेव्ह व्हायला खूप वेळ लागतोय.

मानवदादा +१
माझा अनुभव म्हणजे व्हिडिओ असलेली जाहिरात असली की स्लो होते, साधी जाहिरात असली की बरे असते.
अतुल, जबरी निरिक्षण.

कालपर्यंत स्लो मुंबई लोकलच्या स्पीडने चालत होती मायबोली. आज मालगाडीचा स्पीड आहे.

जाहिराती दाबल्यात तर एक्स्प्रेसच्या स्पीडने (किमान पॅसेंजरच्या स्पीडने) चालेल.

सीमंतिनी, धन्यवाद,
काहीच धागे यायला खूप वेळ लागतोय आणि एकदा बरेच जण तो धागा बघण्यासाठी उत्सुक झाले की इतर सगळीकडेच ताण येतोय.

तुम्ही जर मायबोलीत प्रवेश केला असेल ( लॉगईन असलात) तर मायबोली खूप हळू चालतेय. पण तुम्ही वाचनमात्र असलात (लॉगाआऊट) तर डाटाबेस न वापरावा लागल्याने पूर्वीसारखीच जोरात चालतेय असे दिसेल. पण ती पाने काही मिनिटे जुनी असू शकतील.
मतंग्या एरिशेरी धागा ही वाचनमात्र असलात तर चटकन दिसेल.

धन्यवाद ! ठीक आहे. नो प्रतिसाद, वाचनमात्र जाते.
मात्र भोपळ्यासाठी वर्गाबाहेर काढणारे पहिलेच मास्तर तुम्ही.... Light 1

मायबोली app स्लो चालते आहे का? >>> हो अतिशय. आधीच यायला जमत नाही आणि डोकवावं म्हटलं तर स्पीडमुळे काही वाचता येत नाही.
सीमंतिनी Lol

गेंडा आणि पाणघोड्यासारख्या वजनदार प्राण्यांमुळे मायबोली स्लो झाली असावी.
अ + त ही दोन अक्षरे एकत्र असलेले शब्द टाईप केल्यास येणा-या function at() { [native code] } या कोडमुळे हे प्राणी नाहीसे होतील.

तुम्ही कुठला कळपाट वापरता? त्याप्रमाणे सांगतो. माबोच्या संस्थळ आवृतीवर संगणक वापरून लिहित असाल तर शिफ्ट आर + वाय केल्यास र्‍य येतो.

धन्यवाद. जमले.
कळपाट मुळे गोंधळ झाला. काळवीटाचा प्रकार असावा असे वाटले.
कळफलक सवयीचा आहे शब्द.

कळपाट Lol
फर्स्ट इम्प्रेशन थोडे विचित्र आहे (कळकटलेला कीबोर्ड डोळ्यासमोर येतो)
पण छान शब्द आहे कीबोर्ड साठी Happy

आज तर मायबोली ओपन होण्याकरता खूपच वेळ घेतला. साधारण ६०-९० सेकंद लागले, नक्कीच काहीतरी गडबडले आहे. डाटाबेसची कामे केली का? एकदा डाटाबेस आणि द्रुपल रिस्टार्ट करून बघा, काही फरक होतोय का.

शांमा, काळविटांच्या कळपात काळपट कळपाट ठेवला, तरी ह्या कल्पात त्यांच्या केसांना लावलेल्या कलपात काही बदल होईल का, अश्या कपोलकल्पित प्रश्नाचा कळकळीने विचार केल्यास माबोचा भासमान वेग चांगला वाटू लागेल.

वेमा, वरील कलकलाटाबद्दल क्षमस्व.

भारताबाहेरील राजकारण, भारताबाहेरील घडामोडी, गझल - कविता - कुठलेही पद्य विभाग, गायन, वाचू आनंदे, उपग्रह वाहिनी, भटकंती आणि प्रवासवर्णन... वगैरे वगैरे अनेक विभाग आहेत जिथे मी फिरकत नाही. ती माझी आवड नाही. जर मी त्या विभागाचे सदस्यत्व घेतच नसेल तर मला ते लॉगिन झाल्यावर कधीच काहीच दिसणार नाहीत, म्हणजे ते माझ्या मायबोली पॅकेजमध्येच नसतील असे काहीतरी सेटींग करता आले तर प्रत्येकाचा पेज लोड व्हायचा स्पीड त्याच्या आवडीचे नसलेले विभाग टाळून वाढू शकेल का?

@webmaster ,
मुळात app वापरण्याचे फायदे काय आहेत?

तिथून शेअरिंग लिंक मिळत नाही. जी मिळते ती
"पहा मला काय सापडलं "मायबोली" app वर:app ची लिंक"
ब्राउजरमधून कुणाला थेट लेखावर नेत नाही. मायबोली app download करा आणि मग शोधा काय सापडलं ते.
______________
वेबसाईटवरून मात्र लेखाची लिंक मेसेज केली की तो थेट लेखावरच जातो.

माझे/कुणाचे लेखनाची लिंक बाहेरच्या वाचकास उघडता येऊ नये असा जामर लावला आहे. त्याला युझर आईडी नंबर कळू नये यासाठी. पण त्यामुळे कुणा सभासद नसलेल्या वाचकाला अमुक एकाचे सर्व लेखन पाहता येत नाही.

Pages