मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बरं झालं.

मैत्रेयी मलाही अ‍ॅक्ट रायडर बरा वाटतो पण मी बघत नाही, वोटींग बघते फक्त.

माझ त्याच्याविषयी मिक्स मत होत म्हणजे त्या सोनाली पेक्षा बर्‍या होत्या पण एकदरित त्याचाही इगोचा प्रॉब्लेम होताच कुणी काहि सान्गितल तर त्याना पटेलच अस नव्हत, सोनाली थोडक्यात वाचली आहे अस म्हणता येइल तिने आता खरच बर खेळाव.
ममाची चावडी अगदी मनातली असली तर स्पर्धक कन्फ्युज होवु शकतिल असे पोईन्ट होतेच कॅप्टन होण्यासाठी विशाल सोडून सगळे धडपड करतात वैगरे त्यानी बडबड केली पण मग तेच स्नेहाला म्हटले की सलग दोनदा कॅप्टन होवु शकतो मग कशाला उतरलीस? गिव्हप का केलस ?
स्नेहाला फार बोलले नाही.
एक व्हीडियो बघितला ज्यात त्रुप्ती,जय, स्नेहा बसलेत त्यात बीबॉ सोडून एरवी सगळे कसे असतात आणी म्ग कूणाची वय काय वैगरे चर्चा चालु होती त्यात त्रुप्ती ताईनी स्नेहाला चक्क बालिश वागतेस अस सुचवल होत, कालही त्याचा सगला रोख जय-स्नेहा प्रकरणावरच होता.
एकदरित जय-स्नेहाची स्टोरी थोडी सै-पुश्कर सारखी आहे त्यामुळे चालू ठेवलिये बीबॉने .

मी अतरंगी डिमांड मध्ये जय आणि विशालचा पंजा फाईट टास्कची मागणी केले.
Submitted by बोकलत on 21 October, 2021 - 10:35>>> :गॉगल लावलेली बाहुली:
बरं झालं बिग बॉस तुम्ही ऐकलं. ईथल्या अनेकांचा विशाल जयला भारी पडतो या गोड भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल धन्यवाद आणि आभार.

स्नेहा अ‍ॅव्हरेज आहे अगदी , जयचा अ‍ॅन्गलनेच टिकलीये, हे तिलाही माहिती आहेच, कळेत अजुन किती दिवस या अ‍ॅन्गलने टिकेल ते!
पुश्कर-सईच जे काय होत त्यातही दोघ प्लेयर म्हणुन चान्गलेच होते. यात फक्त जयच चान्गला आहे.

स्नेहाबद्दल मीरा योग्य म्हणाली विकेंड डावात, निगेटीव्ह वाईब्ज येतात ते. आम्हालाही येतात. मी पहीला भाग बघितला, अतिशहाणी वाटली आणि चढल्यासारखी वाटली. म मां तिला डायरेक्ट बांडगूळ म्हणाले नाहीत. सोनाली, मीनलला म्हणाले. मीनल कुठल्या angle ने आहे काय माहिती. सोनाली आहे.

स्नेहाला फार बोलले नाही. >>> अगदी अगदी म्हणून ती फार चढून बोलत होती, जयचे बांडगूळ आहे ती एक नंबर. इथला हा शब्द म मां नी उचलला, हाहाहा आणि तो दुसरीकडे वापरला.

गायत्रीचं जाम कौतुक केलं, त्याअर्थी ती चांगली वागली असेल. एकंदरीत आवडला भाग, जय उतक्याला छान तासले. मीराला जरा जास्तच बोलतात अस वाटतं. मीनल जर नीट वागली नसेल आणि बोलले असतील तर तिने सुधारणा करावी स्वत:त.

स्नेहाकडे आता बघवत नाही मात्र. जास्तीतजास्त डोक्यात जाते. आता ही आधीची स्टेपनी आणि आत्ताचा टायर बदला.

टिम ए च ब्रेकअप हा फक्त ड्रामा होता गेल्या आठवडयाचा. आता पुन्हा ओरिजनल ए टिम एकत्र!

गायत्री- काशीबाई आणि जय- बाजीराव. मग मस्तानी स्नेहा का?

बाकी गादा सो सो एक्टिन्ग करते, रागात असताना मात्र एक्टिन्ग छान करते.

आज तिच सुप्रसिद्द रडण आय मीन पसरण भोकाड बघायला मिळाल तृप्तीताई जाताना.

मीराचे दोन्ही भाचा-भाची क्यूट आहेत.

पुढच्या वेळी दादूस जावे.

पु. भा. मध्ये बिबॉने बॉम्बच फोडला.

किती बोरिंग एपिसोड, फालतु खोटी रडारड आणि टिपी , मीरा तर रडण्यात खोटी नं १ Proud
व्हरायटी एन्टरटेन्मेन्ट तर फॉरवर्ड करायच्या लायकीची , आलेले पाहुणेही अगदीच सुमार !
टिम ए मधे नक्की कोण कोण जाणारेत ?
विशाल एकटा वि. बाकी सगळे होणार बहुतेक लवकरच , गुड फॉर हिम !
मीनल वाटच पहातेय जय बरोबर खेळायची, निगेटिव होऊन फॅन्स घालवायला वेळ लागणार नाही .
सोनाली तर फार डोक्यात जातेय, घालवा तिला दादुस आधी !

मीनल वाटच पहातेय जय बरोबर खेळायची, निगेटिव होऊन फॅन्स घालवायला वेळ लागणार नाही .
सोनाली तर फार डोक्यात जातेय, घालवा तिला दादुस आधी !>>+१

सोनालीचा कंटाळा आला खरंच. ममां मस्त बोलले तिला "नुसती रटारटारटारटा बोलत सुटतेस, त्यात मुद्दा काय हेच कळत नाही" Lol
ममां इज रॉकिंग धिस सीझन Happy
काल चा एपिसोड नुस्ता पळवत होते मी. काहीच ऐकण्या बघण्यालायक नव्हते. तृप्तीला कसली पावर पण नाही दिली. चुगल्या पण अगदी फुसक्या, अ‍ॅवरेज. जय ला त्या कलर्स वरच्या पाहुण्या अंतरा ने तू मुलींच्या दिल की धडकन झाला अहेस इ. बोलून चढवलेय. त्यामुळे त्याला आपणच बाहेर जाम पॉप्युलर आहोत असाच समज झाला असेल. ते चहा चे टास्क पण कसले बोअरिंग. खोटेपणा नुसता.
आता आज मीराला काहीतरी नॉमिनेशन संदर्भात पॉवर दिली आहे वाटते.

चला म्हणजे दुसरा भाग बघण्यात वेळ घालवायला नको.

मीनलने सेल्फ गोल करु नये. आता तिला एवढाही अंदाज आला नाहीका जय बाहेर आवडत नाही त्याचा, मग कठीण आहे. एकटी खेळ त्यापेक्षा.

मीनल खेळते तरी पण सोनाली जय-उत्कर्षच्या गटात जाऊन काय करणार. ते ये ये म्हणतील आणि नॅामिनेशन मधे ढकलून देतील. विशाल चुगलीवर जास्त रिॲक्ट होत नाही पण ती लक्षात ठेवतो. त्याने तिला बरेच वेळा खेळ सुधारायला सांगितले, शिवाय जय-स्नेहासारखी फालतूगिरी करण्यात काही पॅाईंट नाही हेही समजावले. पण तिच्या खेळात काहीच बदल झालेला दिसला नाही.

सोनाली जय-उत्कर्षच्या गटात जाऊन काय करणार. ते ये ये म्हणतील आणि नॅामिनेशन मधे ढकलून देतील. >>> अगदी ! शनिवारी ममा म्हटले ना की मिनल-सोनालीला ते समजत नाही हे एक सोडूण द्या! खरतर या सिझनला ममा इतके पत्ते ओपन करुन देतात की अगदी सहज हिन्टस घेता येतात.
काल उत्कर्षला कोण सेफ होणार विचारले तेव्हा त्याने बरेच क्लियर केले की त्याला सोनाली विक वाटते आणी तिला त्याला उडवायचे आहे.
बाकी टास्क बोरिन्ग होते, गेस्ट पण बोअर , चुगल्या नतर ते पॅचअपची बोलणी तर अगदीच.
सोनाली विक आहेच पण दादुस पण तेच आहेत, कुठल्याही प्लॅनिन्ग डिस्कशन मधे ते फक्त हजर असतात त्याच मत देताना वैगरे दिसत नाहित.
निथा पेक्षा आदिश बरा होता, कुणी डॅशिन्ग मिळत नाहि का याना?

हो ममां हिन्ट्स देत होते आपल्यापेक्षा वीक लोकांना नॉमिनेशन मधे टाकायचे वगैरे. हे लोक कशाला दर आठवड्यात विशाल ला नॉमिनेशन मधे टाकतात? कळत नाही का त्यांना की तो एलिमिनेट किंवा बॉटम मधेही येत नाही आहे.
मीरा, उत्कर्ष, स्नेहा येतच नाहीयेत नॉमिनेशन मधे. Sad
बाप रे त्या गायत्रीने आणि जय ने तो बाजीराव आणि काशीचा सीन काय भयाण केला !! जय तरी जाऊ दे अ‍ॅक्टर नाहीये. पण गायत्री!! काय माठपणाने बोलत होती.
त्या नीताचा शून्य इन्फ्लुएन्स झालाय. कशाला पाठवले हिला. नॉमिनेट करा आणि पाठवा घराबाहेर.

जय स्मोकिंग रूम बोलून गेला.
काल परवा मांजरेकर रूमचं नाव घेणं टाळत होते. स्टोरेज रूम, तुम्हांला माहीत आहे कोणती रूम ते.

जयला विशालला सौंदर्यावरून चिडवलं म्हणून झापले आणि तो काय करतो तो आरसा दाखवला. सुधारणा होणार नाहीच म्हणा, बांडगुळ बाळगणारच तो.

होणार नाहीच म्हणा, बांडगुळ बाळगणारच तो.>>> पोरी तरी कशाला त्याच्याकडे जातात? स्नेहा सारखं दादूसला बाबा-बाबा करते पण त्यांच्यासमोर पकडापकडी, उचलाउचली बरी जमते तिला.
मीराला कोणालातरी बाहेर काढायला किंवा नॅामिनेट करायला सांगितले आहे ना?
विशालला करावे तिने. मग त्याला बिबॅासने गुप्त खोलीत ठेवावे. तसेही सो,मि,वि दोन दगडावर पाय ठेवायला बघतात तर तो गायब झाल्यावर कसे खेळतात ते बघायला आवडेल.

जय, विशाल, विकास ,सोनाली, दादूस
पहिल्या तिघांमुळे टास्क अर्धवट राहिली.
सोनाली कुजबूज.
दादूस पाण्यात पडले. कमेरा डॉमेज.

विशाल, जय, उत्कर्ष, दादूस, नीता, सोनाली , विकास नॉमिनेटेड.
आजचा पूर्ण भाग मी म्यूट करून ठेवला. शेवटची पाच मिनिटे अनम्यूट केली

धन्यवाद भरत.

एक प्रोमो बघितला त्यात स्नेहा एक नंबरवर, मीनल दोन, गा दा तीन वर उभी होती. तोच टास्क होता का. तेच तेच टास्कस का असतात दरवर्षी.

दादुस जातील बहुतेक. सोनाली गेली तर जास्त आवडेल.

स्नेहा अमरत्व घेऊन आलीय, जयला घालवा म्हणजे बाहेर आल्यावर जयला समजेल स्वत:चा मुर्खपणा.

बाय द वे मागच्यावेळी बॉटम दोन मधे सोनाली दाखवली का जय.

जयला अजिबात काढणार नाहित, तो फायनलला असणारच आहे ,स्नेहा जयला चिकटुन राहिली तर काही आठवडे असेलच.
दादुसला फॅन फॉलॉइग असाव त्याने टिकतिल, निता-सोनालीच कळत नाही, निथा एक-दोन मुव्हिज मुळे माहित आहे,सोनालीला मी पहिल्यादाच पाहिल.

जय नाही जाणार, मला अजुनही ममा एक हात विशालचा एक जयचा असे टॉप २ मधे डोळ्या समोर येतात, खर्‍या अर्थाने शो लिड करणारे २ काँटेस्टन्ट्स.. मग जय आवडो किंवा न आवडो !
त्या नंबर टास्क मधे स्नेहा नं १ वर जाऊन उभी राहिली, थोडी तरी लाज बाळगावी कि Uhoh
माझे रँकिंग:
१.विशाल
२.मीनल
३.जय
४.विकास
५,मीरा
६.उत्कर्ष
७.दादुस
८.गायत्री
९.सोनाली
१०.स्नेहा
११.नीथा

हो जय फिनाले डिजर्व करतो. तो एका प्रोमो मधे स्नेहाला म्हणताना देखिल दिसतो, की मी १ नं वर हवा आणि तू नं ७ ला Happy अन ती विशाल शी भांडतेय की तुझी टास्क स्ट्रॅटेजी म्हणजे नुसती कुस्ती मारामारी. तू नं १ डिजर्व करत नाहीस. अगं बाई मग हे त्या जयलाही सांग की Happy

मला माहीतेय जय नाही जाणार, त्याची नेहा होणार. मी ते असंच लिहीलं, असं झालं तर कसं होईल, स्नेहा स्नेहा करतोय ना म्हणून.

डीजे माझे पहीले पाच सेम तुझ्यासारखे आहेत. बाकी विचार मी नाही केला. उत्क्या पण असेल फायनलला, सहावाच ठेवतील बहुतेक.

मला स्नेहा फार पोचलेली वाटायला लागली आहे, येडा बनकर पेढा खानेवाली, तेही काहीही न करता.

Pages