आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फालतूगिरी आहे ! 13 चेंडूत 9 धांवा हव्या आहेत आंणि आल्या आल्या कार्तिकसारखा अनुभवी फलंदाज एका अप्रतिम चेंडूवर अक्षरशः जणूं विकेट फेकायचीच ठरवून आडवी बॅट फिरवतो ! शकीब, जो महत्वाच्या आंतरराष्ट्रीय अटीतटीच्या सामन्यांत शांत राहून अफलातून खेळी करण्यात पटाईत, तो देखील तयाच प्रकारे आपली विकेट फेकतो !!
* उगाच माहौल करत आहेत.. * is an understatement !!

उगाच माहौल करत आहेत.. हे ही मला आधीच वाटलेले. कारण कलकत्ता असा सामना हरल्यावर जास्त राडा झाला असता. पण शेवटी त्यांनाच जिंकायचे होते लास्ट ओवरला. आश्विनने २ बॉल ६ असताना जो चेंडू टाकला त्याची लाईन आणि लेंथ बोलकी होती. सिक्स लिहूनच पाठवला होता तो चेंडू..

* उगाच माहौल करत आहेत.. * is an understatement !! >> बघा हां भाऊ , तुम्ही थोडक्यात गिल, मॉर्गन , शाकीब, अश्विन, नरेन, पंत, त्रिपाठी, कार्तिक किमान एव्हढे सगळे जण तरी फिक्सिंग मधे सामील होते असे सुचवताय. तेव्हढेच कशाला पंधराव्या ओव्हर पर्यंत पूर्ण दिल्लीची टीम च खांदे पाडून होती नि नंतर कलकत्त्या ची टीम नखे खात होती. म्हणाजे एकंदर सगळेच बावीस सामील होते , बरे प्लॅनिंग तर एव्हढे जबरदस्त होते कि नरेन उंचच सिक्स मारायचा प्रयत्न करणार , अश्विन लेंग्थ कमी ठेवणार म्हणजे नरेनच्या बॅटच्या टो एंडला लागून उंचच कॅच जाणार , फिल्डर कॅच पकडणारच. तेव्हढ्या वेळात त्रिपाठी पण स्ट्राईक ला आलाच पाहिजे म्हणजे ठरल्याप्रमाणे अश्विन त्याला सिक्स मारता येईल असाच बॉल देणार. सत्य कल्पितापेक्षा अद्भुत असते म्हणतात ते खरंच दिसतय Happy

ह्या विकेट वर नवीन येणार्‍या बॅटसमनला अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लागत होता. शाकीब, मॉर्गन नि कार्तिक ह्यांच्यामधे कोणीही जबरदस्त फॉर्म मधे आहे असे नाही. एखाद दुसर्‍या चुकार इनिंग वगळत ते झगडलेच आहेत. नरेन शॉट मारणार हे शेंबड्या पोराला सुद्धा माहित होते नि अश्विन सारखा मुरब्बी बॉलर त्याला सहजासहजी मारून देईल हे अशक्य आहे. कलकत्त्याचा हा आयपील फेज पूर्ण अय्यर, गिल, नि काही अंशी त्रिपाठी नि राणा ह्या बॅटसम नी तोलून धरला होता. त्यातले तीन आत गेल्यावर मॅच ओपन असणे फारसे अनैसर्गिक वाटत नाही. त्रिपाठी मिडल नि लेग वरचे बॉल ज्या सहजतेने मिड् विकेट वरून मारतो ते बघितल्यावर बॉल ऑफ किंवा बाहेर टाकणार नि अर्थात बॅटच्या आर्क मधे येऊ नये म्हणून लेंग्थ कमी ठेवली जाणार हे फार कठीण नाही वाटत समजायला. त्रिपाठी ने अँटिसिपेट केला नि पूर्ण बेसबॉल स्टाईल मधे फिरवलाय पट्टा. तोही नीट बसलाय असे नाही फक्त योग्य वेळी कनेक्ट झाल्यामूळे नि शॉर्ट बाऊंडरीज असल्यामूळे जाऊ शकला. शॉत कंट्रोल मधे होता असे वाटत नाही.

"कलकत्त्याचा हा फेज पूर्ण अय्यर, गिल, नि काही अंशी त्रिपाठी नि राणा ह्या बॅटसम नी तोलून धरला होता. " - खरंय. हे बॅट्समेन आणि स्लो बॉलर्स नी केकेआर ला तारलंय आणि चेन्नई हेच एक्स्पोज करायचा प्रयत्न करेल असं वाटतंय.

"ह्या विकेट वर नवीन येणार्‍या बॅटसमनला अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लागत होता" - हे मात्र खरंय. स्टॉयनिस, पंत, श्रेयस हे दिल्लीचे बॅट्समेन सुद्धा झगडले. काही काही बॉल्स तर अक्षरशः सरपटी म्हणावे इतके खाली राहिले.

"म्हणाजे एकंदर सगळेच बावीस सामील होते" - नुसते बावीस नाही रे. हे सगळं घडवून आणायला कोचिंग आणी सपोर्ट स्टाफ, मॅच ऑफिशियल्स सगळेच ह्यात सामील व्हायला हवेत. ह्यातल्या कुणालाही आपल्या करियरची चिंता नाहीये.

बाकी एकीकडे 'पुरावे नसताना लोकं सेलिब्रेटीजविरूद्ध आरोपांची राळ उठवतात' म्हणून धागे काढायचे आणि दुसरीकडे कुठलाही पुरावा नसताना केवळ 'मला वाटतं म्हणून आयपीएल फिक्स्ड आहे' असा प्रचार करत रहायचं हे स्पेशल स्किल आहे. Lol Lol Lol

तो शेवटचा बॉल मी परत पाहिला. तो जर थोडा खाली राहिला असता (जे ह्या पीचवर अपेक्षित होतं), तर तो त्रिपाठीच्या पट्ट्यात अजिबात आला नसता, तो बर्यापैकी लांब होता आणि फार फार तर तो ग्राऊंड च्या लाँग बाऊंड्रीकडे गेला असता. तो बॉल कनेक्ट होणं हे त्रिपाठीच्या आणि अंतिमतः केकेआरच्या पथ्यावर पडलं.

अहो जसे घडले तसेच अगदी प्रत्येक बॉल टू बॉल घडवायचे असते हे गरजेचे नसते. ३ बॉल ६ ला नारायणचा सिक्स आला असता तरी चालले असते. एण्ड रिझल्ट तोच. माहौल.
२१ बॉल ११ चा सामना ८ विकेट हातात असून ज्या प्रकारे खेळवत खेळवत. आधी डॉट बॉल काढत मग पॅनिक झालोय असे दाखवत आंधळी बॅट फिरवत, मग विकेट फेकत २ बॉल ६ ला आणतात. त्यातही दोन धावा अय्यरने मिसफिल्ड करून दिलेल्या.. म्हणजे १९ चेंडूत (३.१ ओवरमध्ये# फक्त ५-२ = ३ धावा स्वबळावर मारतात हे खरेच मजेशीर आहे. सारेच बॅटसमन अपयशी आणि चारही वेगवेगळे बॉलर हिट .. फारच हास्यस्पद पद्धतीने हे करतात. मॉर्गनचा फॉर्म सोडा. त्या आधी फॉर्मातल्या त्रिपाठीने अठराव्या ओवरला सलग चार बॉल डॉट आणि पाचव्याला सिंगल. सहाव्याला विकेट. स्पिनर स्टंपवर बॉल टाकणार आणि हे स्वीप मारायच्या ॲक्शनमध्ये बॅट हवेत फिरवून एलबीडब्ल्यू होणार. हे तर एक नवीन निघालेय. काय काय आणि कित्ती किती. प्रत्येक बॉल बघताना ते डब्ल्यू डब्ल्यू एफची खोटी कुस्ती आठवत होती. प्रेक्षकांना गृहीतच धरले जातेय. कारण प्रेक्षकही आपलीच मजा कमी होऊ नये म्हणून खरे असेल बाबा म्हणतात Happy

अरे पण किती वेळा अश्या चमत्कारांची पाठराखण कराल. दर दिवसा आड हेच चालूय. दिल्लीने तर सलग तिन्ही सामन्याला धमाल उडवली. मुंबई शेवटचे दोन सामने हवा करून गेली. पंजाब तर आपली पंजाबच आहे. ईमेजच अशी करायची की सहज जिंकले तर लोकांना नवल वाटावे. त्याआधीचेही निकाल पाँटस टेबल रोचक करणारे लागले. तिथे तर पंजाबनेही सहज चेन्नईला तुडवला. ते ठिक आहे. पण चमत्कारापलीकडे गेलेले सामने तरी असे वारंवार घडवू नका. आणि ते ही अश्या बालिश पद्धतीने जे सहज लक्षात यावे.

असो, आयपीएल आहे. हा निव्वळ खेळ नसून सोबत व्यवसाय आहे. यावर बरीच मोठी बेटींग चालत असेल. ईथले मालक हार जीतने नाही तर सहभाग नोंदवून कैक प्रकारे पैसा कमावत असतील. खेळाडूही कमावत असतील. आपण का कोणाच्या पोटावर पाय द्या. पण एका लिमिटपर्यंत ठिक आहे. अति होऊ लागले तर यात क्रिकेटचे नुकसान होईल असे वाटतेय.

नुसते बावीस नाही रे. हे सगळं घडवून आणायला कोचिंग आणी सपोर्ट स्टाफ, मॅच ऑफिशियल्स सगळेच ह्यात सामील व्हायला हवेत. ह्यातल्या कुणालाही आपल्या करियरची चिंता नाहीये. >> शेवटचे वाक्य कळीचे आहे रे. ह्या लिस्ट मधे एस्टब्लिश्ड प्लेयर्स (अश्विन, मॉर्गन, पंत) आहेत , होतकरू प्लेयर्स आहेत (गिल ) , टीम चा दरवाजा ठोठावणारे आहेत (अत्रि, अक्षर ) , आयपील मधले कन्सीस्टंट प्लेअय्र्स आहेत ( त्रिपाठी), ऑलरेडी स्कॅनर मधे असलेले शाकीब, नरेन सारखे प्लेयर्स आहेत - सगळेच आपपल्या करीयर्स हातावर घेऊन फिरताहेत.

असो, आयपीएल आहे. हा निव्वळ खेळ नसून सोबत व्यवसाय आहे. यावर बरीच मोठी बेटींग चालत असेल. ईथले मालक हार जीतने नाही तर सहभाग नोंदवून कैक प्रकारे पैसा कमावत असतील. खेळाडूही कमावत असतील. आपण का कोणाच्या पोटावर पाय द्या. पण एका लिमिटपर्यंत ठिक आहे. अति होऊ लागले तर यात क्रिकेटचे नुकसान होईल असे वाटतेय. >> असेल, असतील - coulda, shoulda वगैरे ह्यातच आले. बेटींग नि फिक्सींग मधे काय फरक आहे ? फिक्सींग चा इतिहास वाचलास तर लक्षात येईल की रीझल्ट फिक्स करण्यापेक्षा स्पॉट फिक्स करणे का सुरू झाले (अरे हो तूला वाचनाचे वावडे आहे - तेंव्हा जाऊ दे).

या स्क्रिप्टमध्ये सामील न होणाऱ्यांचे करीअर धोक्यात असेही असू शकते. जे पडद्यामागचे आपल्याला माहीत नाही त्यावर का बोलावे. जे समोर सरळसरळ संशयास्पद दिसतेय त्यावर भाष्य करावे.

बाकी जे खेळाडू या स्क्रिप्टमध्ये सामील होत असतील मला त्यांच्यावर काही ठपका ठेवायचा नाहीये. कम् ऑन हे आयपीएल आहे. फ्रॅंचायझी क्रिकेट. त्या मालकांना ते हवे तसे ते खेळतील. आपल्याला काय. रिॲलिटी शो बाबत शंका आल्या तरी आपण बघतो ना मजेने तसे बघावे. शंका तेवढ्या चघळाव्यात. आय्प्पीएल हा एक क्रिकेटचा रिॲलिटी शो च झाला आहे.. रिॲलिटी शो स्क्रिप्टेड असल्यास कोणा कलाकाराला शिक्षा झालीय, त्याचे करीअर संपलेय असे कधी ऐकलेय का Happy

चला तुर्तास्स्
शुभरात्री !

फिक्सींग चा इतिहास वाचलास तर लक्षात येईल की रीझल्ट फिक्स करण्यापेक्षा स्पॉट फिक्स करणे का सुरू झाले
>>>>

चला क्रिकेटमध्ये फिक्सिंग नावाचा प्रकार असतो हे तरी मान्य केलेत.
तेवढीच झोप चांगली येईल Happy

बाकी जे खेळाडू या स्क्रिप्टमध्ये सामील होत असतील मला त्यांच्यावर काही ठपका ठेवायचा नाहीये. >> कमाल आहे ! मग वर काय खेळाडूंचे लीळाचरित्र लिहिले आहेस का तू ?

. कम् ऑन हे आयपीएल आहे. फ्रॅंचायझी क्रिकेट. >> एकदा आयपीएल हे आय सीसी ने रेग्युलेट केले आहे का ? फक्त क्लब क्रिकेट एव्हढ्यापुरते च धरले जाते का ए दर्जाचे धरले जाते ? अँटिकरप्शन कमीटी मॉनिटरींग वगैरे ह्यात सामील आहेत का ? ह्याबद्दल थोडासा शोध घेऊन बघ. (रच्याकाने, दोन दिवसांपूर्वी फिक्स्ड आयपील च्या कामगिरीच्या जोरावर चहल ला अक्षर पटेलच्या जागी नि तब्बल पाच (फिक्स्ड) आयपील जिंकल्याबद्दल रोहित देवच कसा आहे ह्याबद्दल इथे कोणीतरी शंखनाद करत होते ! अशा फुटकळ विसंगतींकडे आपण दुर्लक्ष करूया - चांगली झोप लागेल Happy )

*बघा हां भाऊ , तुम्ही थोडक्यात गिल, मॉर्गन , शाकीब, अश्विन, नरेन, पंत, त्रिपाठी, कार्तिक किमान एव्हढे सगळे जण तरी फिक्सिंग मधे सामील होते असे सुचवताय* -
1) मला अशी धमकी देण्यापूर्वी आयपीएलच्या संदर्भातला 'फिक्सींग ' चा नेमका अर्थ समजून घेणं उचित ठरेल. आयपीएलमधे खेळाडूंवर बोली लावून त्याना घेतलं जातं व त्यामुळे 'मालक - कर्मचारी ' नातं कितीही नाकारलं तरी तें खेळावर अंकुश ठेवून असतंच. मालकाला काय हंवय हें स्पष्टपणे न सांगताही कितीही मोठा खेळाडू असला तरीही तो तें समजून असतो व त्या कलाने खेळणं, याला त्याने ' फिक्सींग ' मानणं , न मानणं optional असतं असं मला वाटतं. तुम्ही उल्लेखिलेला कोणताही खेळाडू आपलया राज्य, देशाचं प्रतिनिधत्व करतानाचे ' फिक्सींग'चे निकष आयपीएलमधेही तितकयाच कांटकोरपणे पाळेलच असं नाहीं. किंबहुना, मालकाच्या थोडं कलाने खेळणं हें तो ' फिक्सींग ' समजेलच असंही नाहीं.
2) पीच ॲडजस्ट करायला कठीण आहे, हें सर्वच जण सतत ओरडून सांगत होते, तुम्हा आम्हालाही तें स्पष्ट जाणवत होतं. व त्यामुळेच त्याबाबत अनुभवी खेळाडूंनी दाखवलेली इतकी बेफिकिरी संशयास्पदच नाहीं ठरत ? ( पीचनुसार स्वताचा खेळ ॲडजसट करत सुरवातीच्या कमी अनुभवी फलंदाजांनी मॅच सहज जिंकण्याच्या अवस्थेत आणली होतीच ना !)
3) आणि, सर्वात महत्वाचं - हें रूढार्थाने 'मॅच फिक्सींग ' नसून मॅचेस कृत्रिमपणे अटीतटीच्या करून आयपीएलचा दबदबा वाढवण्याचा उघडं उघड डाव दिसतो. म्हणून, मी ' फिक्सींग ' म्हटलं नाहीय, ' फालतूगिरी' म्हटलंय !!

मालकाला काय हंवय हें स्पष्टपणे न सांगताही कितीही मोठा खेळाडू असला तरीही तो तें समजून असतो व त्या कलाने खेळणं, याला त्याने ' फिक्सींग ' मानणं , न मानणं optional असतं असं मला वाटतं
म्हणजे तुम्हाला आस म्हणायचं आहे का की समजा कोलकाता चे खेळाडू शाहरुख ला काय पाहिजे ने शाहरुख ने न सांगताही समजून घेत असतील, म्हणजे शाहरुख स्पष्ट काहिही बोलणार नाही पण खेळाडू परंतु खेळाडू त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घेणार आणि तसाच खेळ करत असणार. शाहरुख चा मूड चांगला असला की त्याच्या टीम चे खेळाडू चांगले खळत असतील , शाहरुख ने डोळा मारला की हातातली match हारत असतील. मालकाच्या कलाने खेळणं हे फिक्सिंग च आहे ह्याला तुम्ही फालतूगिरी म्हणा किंवा अजून काहीही. बर हे करताना अजूनपर्यंत एका ही खेळाडुणे साधी तक्रार पण का नाही केली. जे अत्ता खेळत आहेत त्यांना सोडूनद्या पण जे रिटायर झालेत ते पण का बोलत नाहीत? नवीन प्लेयर्स जीव तोडून खेळत असताना कुठलाही पुरावा नसताना केवळ स्वप्नरंजन करून fixing चा आरोप करण चुकीचे आहे.

हा कोली एव्हडा टुकार कॅप्टन आहे कि आयपीएल फिक्स असून पण याला एकही कप जिंकता नाही आला. खरोखरचा कप काय जिंकवेल हा.

*नवीन प्लेयर्स जीव तोडून खेळत असताना कुठलाही पुरावा नसताना केवळ स्वप्नरंजन करून fixing चा आरोप करण चुकीचे आहे.* -- नवीन खेळाडूंचं कौतुक आहेच ना -
"पीचनुसार स्वताचा खेळ ॲडजसट करत सुरवातीच्या कमी अनुभवी फलंदाजांनी मॅच सहज जिंकण्याच्या अवस्थेत आणली होतीच ना !)"
म्हणूनच तर अनुभवी फलंदाज बेफिकिरीने खेळणः अनाकलनीय व संशयास्पद वाटतं ना !!
असल्या बाबतीत आपापल्या अनुभवातून आपल्याला प्रामाणिकपणे काय वाटतं तें महत्वाचं, पुरावे मागणं/ देणः नसावं. आपलं मत वेगळं असूं शकतं व मीं त्याचाही आदर करतो.

कमाल आहे ! मग वर काय खेळाडूंचे लीळाचरित्र लिहिले आहेस का तू ?
>>>>>>
अहो मला सिरीअसली जर हे माझ्या संशयाप्रमाणे स्क्रिप्टेड असेल आणि त्यात माझे लाडके खेळाडू सामील असतील तर त्यात काहीही वावगे वाटत नाहीये. ईटस ओके फॉर मी. मी आयपीएलला रिअ‍ॅलिटी शो प्रमाणे एक व्यवसाय म्हणूनच बघतो. परवाचे ते अचानक भयानक मध्ये वयोमानानुसार कुंथत असलेल्या धोनीचे शॉर्ट आणि हलव्या चेंडूंचा समाचार घेत ६ बॉल १८ मारणार्‍या माझ्या आवडत्या धोनीचे ना कौतुक आहे ना राग.. फक्त हसायला आले ईतकेच Happy
पण हेच मला आंतरराष्ट्रीय सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व करताना आढळले आणि पुढे ते सिद्ध झाले तर कधी ढुंकून पाहणार नाही त्यांच्याकडे. जसे अझर जडेजा मनातून उतरलेत ते उतरलेच आहेत. एक माणूस म्हणून मी त्यांना माफ केलेय, पण क्रिकेट चाहता म्हणून नाही.

खरोखरचा कप काय जिंकवेल हा.
>>>>
कोहली हा कप्तानीत स्पेशली लिमिटेड फॉर्मेटमध्ये धोनीच्या आसपासही नाही. अर्थात टीम चांगली असेल आणि ईतर अनुभवी मार्गदर्शन असेल तर जिंकेलही. शर्माचेही याचसाठी त्याच्या सोबत असणे गरजेचे. पंत हा यष्टीरक्षक असेल. त्यालाही कप्तानीचा अनुभव मिळतोय हे चांगले. तो ही आपल्या परीने मदत करेल.

आयपीएल स्पर्धाच केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने खेळली जाते. त्यात सहभागी विदेशी खेळाडू देखिल आपले आंतरराष्ट्रीय सामने सोडून इथे खेळतात. ICC देखिल BCCI समोर झुकते. त्यामुळे ये सब पैसे का मामला है भाई यहाँ कुछ भी हो सकता है!! Wink

"आयपीएलमधे खेळाडूंवर बोली लावून त्याना घेतलं जातं व त्यामुळे 'मालक - कर्मचारी ' नातं कितीही नाकारलं तरी तें खेळावर अंकुश ठेवून असतंच." - लीग स्पोर्ट्स चं स्वरूप हे साधारणतः असंच असतं. प्रायव्हेट फ्रँचायझी - प्लेयर्स ड्राफ्ट्स वगैरे. पण ते 'मालक-कर्मचारी' स्वरूपात काम करत नाहीत. EPL, NFL सारखे इतर खेळातले लीग्ज सुद्धा ह्याच प्रकारे काम करतात. फ्रँचायझी ओनर्स ह्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरमधे काम करतात ज्याच्या घटना, नियम असतात. त्यामुळे 'मालकाच्या इच्छेनुसार खेळाडू खेळले' हे मला तरी थोडं over simplification वाटतं. त्यातून हे सगळे प्रोफेशनल खेळाडू आहेत. त्यांना काहीच प्रोफेशनल एथिक्स नसतील हे कुठल्याही ठोस पुराव्याअभावी मान्य करणं अवघड आहे. थोडा वेगळा विचार केला तर, हे सर्वच खेळाडू त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या टीम्सकडून खेळतात ती क्रिकेट बोर्ड्स सुद्धा प्रायव्हेट संस्थाच आहेत.

आजच्या काळात फिक्सिंग करणे फार कठीण आहे. ऑडियो ,व्हिडियो रेकॉर्डिन्ग सहज होते.
एवढी रिस्क कोण घेइल स्वतःच्या करियर्ची वा फ्रेन्चाइझशी.
फार तर मालक कोण खेळेल गेममध्ये हे ठरवु शकेल, पण खेळाडुला अन्डरपर्फॉर्म करायला सांगणे फार रिस्की आहे.
नॉट वर्थ इन्व्हेस्ट्मेंट.

अर बर्‍याच जणांनी आजच्या जमान्यात मधे फिक्सिंग करणे किती वर्थ लेस आहे हे लिहिल्यानंतर त्याबद्दल परत लिहित नाही. फक्त 'माल उवाच' क्लब मधल्यांनी 'अंबानी ला इतर मालक असे काय देऊ शकत होते की - मुंबई टीम आहे त्या स्वरुपामधे परत एकत्र येणे कठीण आहे हे दिसत असतानाही मुंबई ला मॅच हरा किंवा किमान जिंकू नका , असे सांगितले असेल' ह्याचा विचार करून पहा.

त्यामुळेच त्याबाबत अनुभवी खेळाडूंनी दाखवलेली इतकी बेफिकिरी संशयास्पदच नाहीं ठरत ? ( पीचनुसार स्वताचा खेळ ॲडजसट करत सुरवातीच्या कमी अनुभवी फलंदाजांनी मॅच सहज जिंकण्याच्या अवस्थेत आणली होतीच ना !) >> बॉल नवा असताना मारणे अधिक सोपे होते. दिल्ली सुद्धा ह्याच प्लॅन ने उतरली होती हे पाँटिंग ने सांगितले मॅच नंतर. नंतरचे प्लेअय्र्स फॉर्म मधे नाहीत हे बघितल्यावर नि एकंदर मॅकमुल्लम चा अ‍ॅग्रेसिव्ह अ‍ॅप्रोअच बघितल्यावर Lets hit out of the situation' खरच खटकत नाही. परत कलेक्टीव्ह ब्रेन फेड हा फक्त आयपील मधेच होतो असे नाही ना.

If Match Fixing is Art, CSK is Picasso, Say IPL Fans

#fixer_kings असा ट्रेंड सुरू झालेला चेन्नई दिल्ली सामन्यानंतर

हे फक्त रोचक माहिती म्हणून ईथे शेअर करत आहे Happy

*आजच्या काळात फिक्सिंग करणे फार कठीण आहे. ऑडियो ,व्हिडियो रेकॉर्डिन्ग सहज होते.*-
जिंकायला 13 चेंडूत 9 धांवा हव्या असतांना एका खेळायला कठीण विकेटवर कार्तिक पासून सर्व अनुभवी फलंदाज येवून बेफिकीर षटकारच मारायचा प्रयत्न करून आऊट होतात. टेकनाॅलाॅजी असो वा नसो, हें स्पष्ट दिसतं व संशय निर्माण करतातच व व्हिडिओ रेकाॅरडींग तो संशय दूर करण्याचा संबंधच येत नाहीं.

*क्रिकेट बोर्ड्स सुद्धा प्रायव्हेट संस्थाच आहेत.* आयपीएल संघांचे मालक व क्रिकेट बोर्ड एकाच पातळीवर ! !! खूप कायदेशीर फरक आहे हो. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या कमकाजाची दखल घेवून प्रशासक नेमला होता, आठवतं ना !

त्यामुळे 'मालकाच्या इच्छेनुसार खेळाडू खेळले' हे मला तरी थोडं over simplification वाटतं. त्यातून हे सगळे प्रोफेशनल खेळाडू आहेत. त्यांना काहीच प्रोफेशनल एथिक्स नसतील हे कुठल्याही ठोस पुराव्याअभावी मान्य करणं अवघड आहे. >> ह्यावरून थोडे अधिक - भाऊ NFL मधे शेवटी येणाॠ टीम पहिला ड्राफ्ट पिक घेते. बहुतेक वेळा तो क्वारटर बॅक असतो. पूर्ण गेम प्लॅन त्याच्या जीवावर चालतो. जनरेशनल क्वारटर बॅक लाखात एक निघतो पण प्रत्येक टीम ला आपल्याकडे तसा असावा असे वाटणे साहजिक आहे. कॉलेज फूटबॉल च्या कामगिरीवरून ड्राफट मधे कोणता पिक पहिला - दुसरा असेल हे उघड झालेले असते. एव्हढे सगळे असतानाही सीझन टँक करून - जाणून बुजून हरून - पहिला दुसरा पिक मिळवण्याची उदाहरणे दोन आहेत. - इथे मालक , कोच बर्‍यापैकी हिंटस देत असतानाही प्लेयर्स हरणे टाळतात. त्यांना कल्पना आहे की ह्या टीम मधून बाहेर निघालो तर इतर टीम त्यांचा फक्त त्यांचा खेळ / फॉर्म बघणार म्हणून हे होते. आयपील मधे काही वेगळे सूत्र लागू होईल असे वाटत नाही. जाणून बुजून हरणे प्रोफेशनल प्लेयर्स ला करता येणे मला वैयक्तिक रित्या कठीण वाटते.

वरचा "ऑडियो ,व्हिडियो रेकॉर्डिन्ग सहज होते.*-" हा उल्लेख मॅच बाहेर फिक्सिंग होत असताना असावा असे मला वाटते. किंवा मालक मॅच हरा असे सांगत असेल तेंव्हाचा ....

१-२ खेळाडू पैशासाठी काही करणं आणि दोन्ही अख्खे संघ, ऑफिशिअल्स, ह्यात सचोटीसाठी नावाजलेले गेलेले एक्स-प्लेयर्सही आले, जाणूनबुजून कलेक्टिव्हली अश्या कृती करणं ह्यात फार फरक आहे. त्यात पुन्हा सिक्स मारण्याजोग्या बॉलवर नेहमीच सिक्स मारता येतेच असं समजणंही आलं. जणू इथे काही कॉम्प्युटर प्रोग्रॅमवर चालणारे पत्र्याचे खेळाडू आहेत. असं असतं तर द्रविड इ.‌लोक करिअरमध्ये फक्त अनप्लेयेबल बॉल्सवरच आऊट व्हायला पाहिजे होते. आता सगळंच क्रिकेट सगळ्याच वेळी फिक्स असतं असं समजायचं असल्यास बोलणंच खुंटलं.

आजच्या काळात फिक्सिंग करणे फार कठीण आहे. ऑडियो ,व्हिडियो रेकॉर्डिन्ग सहज होते.*-
जिंकायला 13 चेंडूत 9 धांवा हव्या असतांना एका खेळायला कठीण विकेटवर कार्तिक पासून सर्व अनुभवी फलंदाज येवून बेफिकीर षटकारच मारायचा प्रयत्न करून आऊट होतात. टेकनाॅलाॅजी असो वा नसो, हें स्पष्ट दिसतं व संशय निर्माण करतातच व व्हिडिओ रेकाॅरडींग तो संशय दूर करण्याचा संबंधच येत नाहीं.
>>
सॉरी भाउ मला म्हणायचे होते की फिक्सिन्गचे कॉन्व्हर्सेशन सहज रेकॉर्ड होउ शकते अशा वेळी असे काही बोलण्याची रिस्क कोण
घेइल. खुप सामने खेळल्यामुळे अनुभवी खेळाडु बेफिकीर होउ शकतात हे जास्त पर्याप्त वाटते.

वरचा "ऑडियो ,व्हिडियो रेकॉर्डिन्ग सहज होते.*-" हा उल्लेख मॅच बाहेर फिक्सिंग होत असताना असावा असे मला वाटते. किंवा मालक मॅच हरा असे सांगत असेल तेंव्हाचा ....

Submitted by असामी on 14 October, 2021 - 09:38

+१ जस्ट इमॅजिन एवढी नामुष्कीची रिस्क अम्बानी घेइल?. त्याच्या दुसर्या बिझनेसमध्ये पैसे कमवणे त्याला जास्त सोपे आहे असे मला तरी वाटते.

*त्यात पुन्हा सिक्स मारण्याजोग्या बॉलवर नेहमीच सिक्स मारता येतेच असं समजणंही आलं * *असं असतं तर द्रविड इ.‌लोक करिअरमध्ये फक्त अनप्लेयेबल बॉल्सवरच आऊट व्हायला पाहिजे होते*. - जेव्हा कार्तिक, नारायण, शकीब सारखे प्रचंड अनुभवी फलंदाज एकापाठोपाठ एक तसेच चूकीचे फटके चुकिच्या वेळी मारत बाद होतात, तेंव्हाच संशय निर्माण होतो.. बाकी कोणताही फलंदाज कसलाही फटका मारतांना कधीही आऊट होवूं शकतो, इतकं तरी क्रिकेट इथलयाना कळतं असं गृहित धरायला हरकत नसावी !

एक गंमतीशीर निरीक्षण
दिल्लीचे शेवटचे तीनही सामने ते अंतिम षटकात मोक्याच्या क्षणी सिक्स खाऊन हरले
फलंदाज होते - भरत, धोनी आणि त्रिपाठी
बॉलर होते - आवेश खान, टॉम करन, आश्विन
भरतच्या वेळी १ बॉल ६ असताना आवेश खानने लेग साईड फुलटॉस टाकला. मग मॅच एक बॉल ५ झाली. सुपरओवरची तयारी होती बहुधा. पण चौका न येता छक्काच आला आणि सुपर ओवरची मजा हुकली यंदा Sad

जेव्हा कार्तिक, नारायण, शकीब सारखे प्रचंड अनुभवी फलंदाज एकापाठोपाठ एक तसेच चूकीचे फटके चुकिच्या वेळी मारत बाद होतात, तेंव्हाच संशय निर्माण होतो.. बाकी कोणताही फलंदाज कसलाही फटका मारतांना कधीही आऊट होवूं शकतो, इतकं तरी क्रिकेट इथलयाना कळतं असं गृहित धरायला हरकत नसावी ! >> आता ही दोन वाक्यं सलग लिहून तुम्हीच ती हरकत निर्माण करू पाहता आहात. असामीने ब-याच वेळा लिहिलं आहे तसं तिथली पिचेस नवीन येणा-या फलंदाजांसाठी जास्त घातक आहेत असं दिसतं. केकेआरने त्याच्यासाठी या तो आर नही तो पार हे एक सोल्युशन धरलेलंही दिसलं, आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. भारतात पार तळाला गेलेले ते इथे वर आले. हे एक टॅक्टिकल सोल्युशन आहे. त्यात ते कधी पार नाही झाले तर बुडणार हे त्यांना माहितीच आहे. पण म्हणून त्यांनी ऐन मोक्याच्या वेळी त्यांचं सोल्युशन बदलायलाच हवं आणि तसं केलं तरच ते फिक्स्ड नाही हा अट्टहास चुकीचा आहे, कारण त्यात अनेक प्लेयर्सच्या इंटिग्रिटीवर ते फक्त तुमच्या अनुमानाप्रमाणे खेळले नाहीत म्हणून शंका आहे. आपल्या क्रिकेट आकलनाला अनुसरून खेळले नाहीत, तर आपण त्यांना नीट खेळता आलं नाही, असं म्हणू अगदी, पण ते ठरवूनच तसे खेळले हे कशाला?

Pages