नमस्कार,
मायबोलीला ह्यावर्षी तब्बल २५ वर्षॆ पुर्ण झाली आणि मायबोली गणेशोत्सवाचे देखील हे २२ वे वर्ष आहे. २०२१ च्या ह्या गणेशोत्सवातील वेगवेगळ्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.
एक प्रथा म्हणून तर आहेच पण पडद्याआडचे संयोजकांचे अनुभव आणि आनंद तुम्हा सगळ्यांबरोबर वाटुन घेण्यासाठी मनोगताचे 4 शब्द लिहायला हवेतच.
यंदाही मायबोली गणेशोत्सवाची घोषणा झाल्यावर, अनेकांनी संयोजन मंडळात सहभागी होण्यासाठी नावं नोंदवली आणि जुने-नवीन, सक्रिय-रोमात, देश-परदेश अश्या सदस्यांचा रंगीबेरंगी चमू बनला. मग सुरवात झाली कामाची यादी करायला. नवनवीन उपक्रमाच्या कल्पना, स्पर्धा की उपक्रम ह्यावर चर्चा, लहान-मोठ्या गटासाठी अवघड-सोप्या विषयांची निवड वगैरे वगैरे.. शिवाय वेमांनी, तुम्हाला जमेल तसे, जमॆल तितकॆ आणि जमेल ते काम करा असं सांगुन धीर दिला. त्यामुळे संयोजकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला.
प्रतिसादाबद्दल खात्री नसल्याने काही उपक्रम बदलावे लागले, तर तांत्रिक बाबी लक्षात घेऊन, अंमलबजावणी करणे कठीण असल्याने काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. अर्थातच जुन्या-जाणत्या माजी संयोजकांच्या अनुभवी सल्ल्यामुळे प्रश्न सहज सुटत गेले. सर्व संयोजकांनी आपापले व्याप सांभाळून, टाइम-झोन, तारीख, वेळ यावर लक्ष ठेऊन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्सव संपला तरी नंतरच्या कामाची यादी वेळेत संपविण्यासाठी उत्साह टिकवून ठेवला.
अर्थातच हे घरचं कार्य असल्याची भावना सर्व संयोजकांच्या मनात होती. त्यामुळेच वेगवेगळ्या देश-गावातील, काहीश्या अनोळखी लोकांबरोबर फोन, कायप्पा वरून संवाद साधणे, एकमेकांच्या कल्पनांचा आदर करत काम पुढे नेणे हे सगळं खूप सहजपणे जमून गेलं.
मायबोलीकरांनी ही आपल्या घरचे गणपती, कामं सांभाळून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. छोटे दोस्त सुद्धा आपल्या ऑनलाईन शाळेचे वेळापत्रक सांभाळून ह्या आनंदात उत्साहाने सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक!
या गणेशोत्सवात 'शशक पूर्ण करा' आणी 'माझ्या आठवणीतील मायबोली' ह्या उपक्रमांना सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. शशक उपक्रमातील गोष्टी कल्पक तर होत्याच, पण प्रतिसादातून त्यांची नवनवीन आवृत्ती देखील वाचायला मिळाली. मायबोलीच्या स्मरणरंजनात तर अनेक किस्से-कहाण्या जुन्या-जाणत्या माबोकरांच्या बरोबरीने नवीन सदस्यांना पण वेगळाच आनंद देऊन गेल्या असतीलच. हो ना? माबॊकरांचा सभासद कालावधीतला रंजक प्रवास वाचुन अनेक वाचनमात्र सदस्यांना सुद्धा प्रतिक्रिया द्यायचा मोह आवरता आला नाही.
बकेट लिस्ट चा प्रवास आणि पूर्ती चे समाधान वाचकांनी पण तितक्याच समरसून अनुभवलॆ आणि स्वतंत्र लेख न लिहिताही प्रतिसादातून अनेकांनी आपल्या बकेट लिस्ट चा प्रवास अगदी मनमोकळेपणाने सर्वांसमोर मांडला. भेटकार्ड आणि गणपती बाप्पा साकारणे यात छोटे दोस्त सुंदर कलाकृती करून उत्साहात सामील झाले त्याबद्दल त्यांचे समस्त मायबोली परिवाराकडून खूप कौतुक!
पाककृती स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना जास्त मेहनत घ्यावी लागते, पण नाविन्यपूर्ण पदार्थ सर्वांच्या पसंतीस उतरले की त्या कष्टांचे चीज होते. तरी यंदा मायबोलीवरच्या बल्लवाचार्यांचा उत्साह थोडा कमी पडला की काय असे प्रवेशिकांची संख्या पाहून जाणवले. अर्थातच शब्दखेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू आणि विनोदी लेखन या उपक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, धमाल केली आणि गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण प्रसन्न ठेवले. लसीकरण हा विषय खरे तर हॉट टॉपिक म्हणावा असा असतानाही तो अनुभव लेखनातून पोचवायला तेवढी उत्सुकता दिसली नाही. लोक आता खरंच कंटाळलेले असावेत. ऑलम्पिक खेळणारा बाप्पा आणि शॅडो आर्ट ह्या उपक्रमांना देखिल फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. पण अशा कार्यक्रमात हे थोडेफार होणारच.
या गणेशोत्सवातल्या स्पर्धा, त्यांचे मतदान आणि विजेत्यांची यादी इथे पाहता येईल.सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अगदी कमी वेळ असतानाही , rar, साजिरा, पुरंदरे शशांक, aschig, भास्कराचार्य,कविन ,चैतन्य दीक्षित, सीमंतिनी, जयवी -जयश्री अंबासकर या मायबोलीकरांनी त्यांचे लेखन/ त्यांच्या कलाकृती सादर केल्या त्यामुळे गणेशोत्सवाची रंगत अजून वाढली. . Arundhati Joshi यांनी पाककलेसंदर्भात मार्गदर्शन केले. या सर्वांचे आभार
मायबोलीच्या पहिल्या गणेशोत्सवात संयोजनाचे काम केलेले मायबोलीकर समीर आणि असामी यांनी मदतीचा हात पुढे केला त्याबद्दल त्यांचे आभार.
तर मायबोलीकरांना वाचक, स्पर्धक म्हणून हा गणेशोत्सव कसा वाटला हे जाणून घ्यायलाही आम्हाला खूप आवडेल. काय त्रुटी होत्या, काय आवडलं, काय सुधारणा करता येतील, एखाद्या कार्यक्रमाऐवजी हे हवं होतं किंवा हे नसतं तर चाललं असतं या आणि अशा प्रकारच्या सर्व सूचना/मते/टीका यांचे स्वागत आहे. सर्व संयोजक, समस्त मायबोली परिवार आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या गणेशोत्सवात सहभागी असलेल्या कोणाचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल तर त्यांनाही अनेक धन्यवाद.
लोभ आहेच तो असाच वाढुदे ही विनंती. __/\__
कळावे,
संयोजक मंडळ २०२१
(किशोर मुंढे,तेजो, गोल्डफिश, आभा, अजय)
छान झाले सगळे उपक्रम.आठवणीतली
छान झाले सगळे उपक्रम.आठवणीतली मायबोली मधले प्रश्न पण भारी होते.
उत्सव मस्त झाला.
उत्सव मस्त झाला.
पुढल्यावर्षी लवकर या!
उत्सव दणक्यात पार पडला. नक्की
उत्सव दणक्यात पार पडला. नक्की बाप्पाम्चे भरघोस आशीर्वाद होते/ आहेत.
खूप छान झाला उत्सव. अनेक
खूप छान झाला उत्सव. अनेक उपक्रमांना दणकून प्रतिसाद मिळाला. स्पर्धा व उपक्रम कल्पक होते.
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
संयोजकांचे आभार !
खूप एन्जॉय केला गणेशोत्सव!
खूप एन्जॉय केला गणेशोत्सव! संपूर्ण संयोजकचमूचे खूप कौतुक व अभिनंदन!
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद.
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन!!
त्या त्या धाग्यावर पूर्वी प्रशस्तिपत्रक द्यायचे. ह्यावर्षी अजून नाही दिलं. एखादं मायबोली सर्टीफिकेट मिळतं ते प्रिंट आउट काढून छान हॉलमध्ये मुलांच्या मेडल्स इ बरोबर ठेवतात कुणीकुणी. (जस्ट सेईंग... नायतर एखादे वर्षी मलाच सर्वोत्तम खिट्खिट बद्दल प्रशस्तिपत्रक द्याल...)
खूप एन्जॉय केला गणेशोत्सव!
खूप एन्जॉय केला गणेशोत्सव! संपूर्ण संयोजकचमूचे खूप कौतुक व अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
छान झाला यंदाचा गणेशोत्सव.
छान झाला यंदाचा गणेशोत्सव.
आठवणीतील मायबोली आणि बकेट लिस्ट हे दोही उपक्रम आणि त्यांत आलेले लेख आवडले.
त्या त्या लेखावर प्रतिसाद द्यायचं राहून गेलंय.
लसीकरणाच्या अनुभवावर आधीच एक धागा येऊन गेलाय त्यामुळे इथे अधिक लेख आले नसतील.
@सीमंतिनी प्रशस्ती पत्रकं
@सीमंतिनी प्रशस्ती पत्रकं येत आहेत.
छोट्या गटात सहभागी झालेल्या
सगळे उपक्रम मस्तच..
फक्त जमले तर छोट्या गटात सहभागी झालेल्या सगळ्यांना प्रशस्तीपत्रक देता आले तर बघा.
आठवणीतील मायबोली आणि बकेट
आठवणीतील मायबोली आणि बकेट लिस्ट हे दोही उपक्रम आणि त्यांत आलेले लेख आवडले. +१
झब्बू ला पण मजा आली
मायबोली रॉक्स !!!
फक्त जमले तर छोट्या गटात
फक्त जमले तर छोट्या गटात सहभागी झालेल्या सगळ्यांना प्रशस्तीपत्रक देता आले तर बघा. >> +१ थँक्यू संयोजक.
खूप एन्जॉय केला गणेशोत्सव!
खूप एन्जॉय केला गणेशोत्सव! संपूर्ण संयोजकचमूचे खूप कौतुक व अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन + + १११
जमले तर छोट्या गटात सहभागी
जमले तर छोट्या गटात सहभागी झालेल्या सगळ्यांना प्रशस्तीपत्रक देता आले तर बघा +1
छान झाला यंदाचा गणेशोत्सव.
छान झाला यंदाचा गणेशोत्सव.
संयोजकांचे अभिनंदन आणि आभार. सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
आठवणीतील मायबोली आणि शशक उपक्रम आवडले.
यंदाचा गणेशोत्सव खूप छान झाला
यंदाचा गणेशोत्सव खूप छान झाला...उपक्रम खूप रोचक होते..संयोजकांचे खूप खूप आभार !
वा वा, सांगता समारंभाची वाट
वा वा, सांगता समारंभाची वाट बघत होते. मनोगत छान लिहीलय. आणि कार्यक्रम खरंच दणक्यात झाला. खऱ्या गणेशोत्सवाला लाजवेल अशी धामधूम ह्या आपल्या व्हर्च्युअल गणेशोत्सवात असते. संयोजकांचे आभार आणि अभिनंदन. आणि सगळ्या स्पर्धकांचे , उपक्रमात सहभागी झालेल्यांचे पण अभिनंदन.
छान झाला गणेशोत्सव. सगळेच
छान झाला गणेशोत्सव. सगळेच उपक्रम आवडले.
लसीकरणाच्या अनुभवावर लेख लिहायला खूप मजा आली.
संपूर्ण संयोजक चमूचे खूप कौतुक व अभिनंदन! सर्व विजेत्यांचे (माझ्यासकट) अभिनंदन.
सर्व वाचकांचे आणि मतदात्यांचे खूप खूप आभार, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल.
सगळेच लेख खूप छान आहेत. २४% मतदात्यांना special thanks , मला motivate केल्याबद्दल.
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद.
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद. खूप छान झाला उत्सव. स्पर्धा व उपक्रम कल्पक होते.
मायबोलीच्या आठवणी आणि बकेट लिस्ट लिहीताना आणि इतरांच्या वाचताना मजा आली.
गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमामधे सहभागी व्हायला जमेल का? असा जेव्हा अॅडमीनचा इमेल आला तेव्हा बरेचसे लिखाण अर्धवट ड्राफ्ट स्वरुपात गुगल ड्राईव्हवर निपचीत पडले होते. एकच कविता जी पुर्ण होती ती अगदीच निगेटीव्ह मूडची असल्याने गणेशोत्सवात द्यावी वाटत नव्हते. जुने काही लिहीलेले पण इथे न आणलेले असे काही शोधल्यावर मिळाले पण तरी त्यातले काही फेसबुकवर तर काही व्हॉट्स अॅप गृपवर शेअर करुन झाले होते. थोडक्यात कोरे करकरीत नव्हते. आणि गणपती बाप्पाच्या सेवेत असे शिळेपाके द्यावे हे मनाला पटत नव्हते. पण यथामती सेवा बाप्पा आपल्याकडून घडवून घेतोच. तोच त्या त्या वेळी बुद्धी देतो, चालना देतो गती देतो आणि आपण लेखनिक होऊन लिहून काढतो. यंदाही गणेशवंदना त्याने अशीच पूर्ण करुन घेतली माझ्याकडून. गणेशोत्सव संयोजक, अॅडमीन यांच्यामुळे ही सेवा घडून येण्याचा योग आला म्हणून संयोजक आणि अॅडमीन यांचे परत एकदा आभार.
छान झाला गणेशोत्सव. दहा दिवस
छान झाला गणेशोत्सव. दहा दिवस खुप मजेत गेले. सगळ्या स्पर्धा आणि उपक्रम कल्पक होते. उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाल्याने उत्साही वातावरण होतं माबो वर.
जमले तर छोट्या गटात सहभागी झालेल्या सगळ्यांना प्रशस्तीपत्रक देता आले तर बघा +1 >> अगदी हेच मनात होतं. मी तर ह्या स्पर्धेसाठी मतदान ही करू शकले नव्हते. मुलांनी भाग घेतला हेच महत्वाचं . त्यात डावं उजवं करणं कठीण.
संयोजक घेत असलेल्या मेहनतीची कल्पना असल्याने त्यांचं विशेष कौतुक आणि आभार. सर्व भाग घेतलेल्या आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन.
मायबोली शीर्षक गीत ईझींली ऐकता येईल असं काही करण्याची वेमा ना पुन्हा एकदा विनंती.
कुणा व्यक्तीचा उल्लेख राहून
कुणा व्यक्तीचा उल्लेख राहून गेला का माहीत नाही, परंतु ...
...
यंदाच्या उत्सवात सर्व स्पर्धा, उपक्रम व खेळ ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त प्रतिसाद लाभलेल्या धाग्यांपैकी दुसरा (आणि त्या अर्थाने लोकप्रिय) धागा - खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी हा ह्या सर्व गडबडीत अनुल्लेखाने गतप्राण झाल्याबद्दल दोन मिनिटे शांतता पाळण्यात येत आहे.
प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने - ज्या धाग्याला इतर कुठल्याही गणेशोत्सव-२०२१ धाग्याच्या प्रतिसादांच्या दुप्पटीपेक्षा अधिक प्रतिसाद लाभले - हे देखिल विशेष उल्लेखनीय आहे असे वाटले.
असो. सर्व उपक्रम आवडले. संयोजकांच्या कल्पनांचं, कष्टाचं आणि वेळेचंही कौतुक आहेच. त्यांचंही अभिनंदन.
खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी >
खेळ : शीघ्रकवींची अंताक्षरी >> हो हो इथे वाचायला आणि लिहायलही मजा आली होती
छान झाला गणेशोत्सव . सर्व
छान झाला गणेशोत्सव . सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजित करणाऱ्या संयोजकांचे आभार !!!
मायबोलीचा यंदाचा गणेशोत्सव
मायबोलीचा यंदाचा गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा झाला.. त्याबद्दल मायबोली व्यवस्थापन आणि संयोजकांचे खूप आभार..! मनोगतही छान...
गणेशोत्सवातल्या सगळ्या स्पर्धा आणि उपक्रम तसेच झब्बूचे धागे खूपच मनोरंजक होते. i
शशक, आठवणीतली मायबोली, बकेट लिस्टचा प्रवास अतिशय सुंदर उपक्रम होते. सगळे लेखही वाचनीय होते. जुन्या - जाणत्या मायबोलीकरांचे अनुभव, त्यांचे विचार वाचून माहितीत अधिक भर पडली.
घरच्या गणपतीची तयारी आणि इतर कामाच्या गडबडीत यावेळेस स्पर्धेत भाग घेता येईल की नाही असं वाटत होतं, पण वर कविन ह्यांनी लिहिल्या प्रमाणे गणराया म्हणजेच बुद्धीची देवता आपल्याला बळ देते, उत्साह देते.. आणि आपल्या हातून करवून हे अगदी खरं..! माझे कोविड लसीकरण ह्या स्पर्धेत लेख लिहिला आणि कृपाळू मायबोलीकरांमुळे त्याला प्रथम पारितोषिक मिळाले त्यासाठी समस्त मतदार मायबोलीकर आणि रसिक वाचकांचे ऋण माझ्यावर राहिल..!
भेटकार्ड बनविणे ह्या स्पर्धेची मुदत उलटत असताना मुलाला मी स्पर्धेविषयी सांगितल्यावर तो थोडा हिरमुसला होता, पण संयोजकांनी स्पर्धेची मुदत वाढविल्यावर त्याचा उत्साह दुणावला.. !! मी आग्रह न करता स्वतःहून त्याने स्पर्धेत सहभागी होणे ही माझ्यासाठी समाधानाची बाब ठरली. त्यासाठी संयोजकांचे पुनश्च आभार..!!
यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या मायबोलीस अनेक शुभेच्छा..!!
गणपती बाप्पा मोरया..!!
आता पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाच्या प्रतिक्षेत..!!
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद.
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद. खूप छान झाला उत्सव. स्पर्धा व उपक्रम कल्पक होते. >>> मम. खास टाळ्या टीमसाठी.
संयोजकांचे अभिनंदन!! कुठेही
संयोजकांचे अभिनंदन!! कुठेही काही वाद न होता खूपच धमाल- मज्जेच्या वातवरणात पार पडला गणेशोत्सव!! स्पर्धा, उपक्रम सगळेच आवडले.
संयो जकांचे आभार. आता हीच टीम
संयो जकांचे आभार. आता हीच टीम ठेवुन थोडक्यात का होईना दिवाळी अंक जमेल का ते बघा. आपली एक परंपरा आहे न. आता नवे लेखक पण आले आहेत खूप सारे.
>>> कुठेही काही वाद न होता
>>> कुठेही काही वाद न होता खूपच धमाल- मज्जेच्या वातवरणात पार पडला गणेशोत्सव
खरंतर आस्चिगने प्रयत्न केला होता, पण...
ह. पा.
जोक्स अपार्ट, खरंच मजा आलसंगणेशोत्सवात. धन्यवाद, संयोजक मंडळ आणि सर्व सहभागी.
संयोजक मंडळ २०२१
संयोजक मंडळ २०२१
(किशोर मुंढे,तेजो, गोल्डफिश, आभा, अजय)
>>>>>
धन्यवाद मित्रांनो, मजा आली. फक्त चार पाच नावे. मला वाटले सात आठची तरी टीम असेल. सणासुदीला घरचे व्याप सांभाळून ईथे वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार.
झब्बूचे सारेच विषय एक नंबर होते.
कधी नव्हे ते यंदा झब्बूत रप्पारप फोटो टाकले
अपवाद तो दागिन्यांचा धागा. तो बायकांसाठीच वाटला. खरे तर नवरा हाच बायकांचा खरा दागिना, पण तिथे एकाही बाईने आपल्या अहोंचा फोटो न टाकल्याने मनाने खचलो आणि मग तिथे फिरकलोच नाही.
लिखाणाची अजून एखादी स्पर्धा असावी असे वाटले होते. स्पेशली विनोदी ढंगातले लिखाण वा मग शशकचीही स्पर्धा करता आली असती. कारण ईतर कितीही सतरापगढ प्रकार आणि स्पर्धा असल्या तरी लिखान हाच मायबोलीचा आत्मा आहे असे मला वाटते. ईथे ९० टक्के जनता लिहावाचायलाच येते. आठवणीतील मायबोली आणि बकेटलिस्ट उपक्रमांनी ते दाखवून दिले. सारेच वाचायला छान वाटले
कोरोना लस अनुभवाची स्पर्धा घेण्याऐवजी लोकांना आपला डोस घेतल्यानंतरचे सेल्फी टाकायला एक धागा उघडून दिला असता तर त्यात प्रत्येकाने आपल्या फोटोसोबत किस्से लिहिले असते असे वाटले. अर्थात हे नंतरचे जर तर झाले.
आता फक्त ते सर्टिफिकेट कडक द्या. म्हणजे कोरोनाच्या लेखासोबत ते डकवून फेसबूकवर टाकता येईल. त्या सर्टिफिकेटवर स्पर्धकांचा लस घेतल्यानंतरचा सेल्फीही टाकता आला तर फेसबूकवर लेखासोबत दोन वेगळे फोटो शेअर करावे लागणार नाहीत. किंवा मग असे करता का, रिक्त जागा तरी सोडा. आमचे आम्ही फोटोशॉप करून टाकून घेतो
Pages