गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळे लिहिते झाले बघून मलाही छोटूंसं काहीतरी लिहिण्याची सुरसुरी आली. हे बकेट लिस्ट प्रकरण आपल्या मूड प्रमाणे एक्स्ट्रा स्मॉल ते एक्स्ट्रा लार्ज काहीही करता येईल म्हणून बकेटीत उडी घेतली आहे.
लहानपणी मी फारच अभ्यासू वगैरे समजली जायचे तेव्हा एक सुप्त इच्छा होती, एखाद्या विषयात नापास व्हायचं. ते स्वप्न इंजीनियरिंग ला पहिल्याच वर्षी, पहिल्या सेमिस्टरलाच अप्लाइड मेकॅनिक्स विषयात नापास होऊन पूर्ण झाले. बकेट लिस्ट आयटम वन चेक्ड.
लग्नासाठी स्थळं बघणं सुरू झालं तेव्हा मुलीबद्दलच्या अपेक्षांमध्ये गोरी, उजळ, सरळ नाक वगैरे वगैरे रूपाबद्दलच्या अपेक्षा वाचून मलाही स्थळांमध्ये काय बघावं याची कल्पना (अक्कल) आली. तर सरळ नाकाच्या गोऱ्यापान मुलाशी लग्न करायचं हे माझं पक्कं ठरलं. मी सावळी आणि भज्या नाकाची असल्यामुळे अरेंज्ड मॅरेज मध्ये हे अप्राप्य स्वप्न होतं. हे मी बोलले असते तर सगळ्यांनी हाणून पाडलं असतं. म्हणून मी कुठेही वाच्यता केली नाही. फक्त मनात पक्के ठरलेले. पण म्हणतात ना (काय कुणास ठाऊक) त्याप्रमाणे माझे नुसत्या गोर्या पान नव्हे तर लाल गोऱ्यापान, सरळ नाकाच्या मुलाशी लग्न झाले. त्याला फक्त हुशार स्मार्ट मुलीची (पक्षी आगाऊ) अपेक्षा होती. बकेट लिस्ट आईटम टू चेक्ड.
मला मराठवाड्याचा उन्हाळा अजिबात सहन व्हायचा नाही. थंड हवेच्या ठिकाणी कायमचे राहण्याचे माझे स्वप्न होते. अमेरिकेत येऊन मिशिगन सारख्या अतिथंड हवेच्या बर्फाळ राज्यात कायमचे राहायला आल्यामुळे बकेट लिस्ट आइटम ३ चेक्ड.
लहानपणी, तरुणपणी मी कधीही काहीही कलात्मक काम/ कलाकुसर केली नव्हती. माझ्या बोटांमध्ये ती क्षमता आहे याचीच मला खात्री नव्हती. पण आपल्या हातूनही काहीतरी कलात्मक निर्मावं अशी इच्छा होती. मायबोलीवरील अवलच्या ऑनलाइन क्लासमध्ये शिकून माझ्या बोटांतून चक्क क्रोशाचे काही मास्टरपीसेस (माझ्या महत्वाच्या मते) जन्माला आले. बकेट लिस्ट आइटम फोर चेक्ड.
इथल्या काही लेखांमध्ये आणि प्रतिसादांमध्ये नोकरीतून फायर होऊन रिटायर होऊन जायची इच्छा वाचली तेव्हा मनात गुदगुल्या झाल्या. कारण तुमचा बकेट लिस्ट आइटम मी माझ्या बादलीत टाकू शकते. डिसेंबर मध्ये कंपनीवाइड ले-ऑफ्स मध्ये माझी वर्णी लागली आणि तगड्या सेवेरंस पॅकेज सह मी एक वर्षासाठी तरी नक्कीच रिटायर झालेय.
पण माझी बादलीतली इच्छा होती कधीही उठायचं, दिवसभर किंवा वाटेल तितका वेळ शून्यात बघत राहायचं( माईंड यू शून्यात! पुस्तकात किंवा टीव्हीत नव्हे), कधीही झोपायचं. ही इच्छा मात्र या दुसऱ्यांच्या उधार घेतलेल्या बकेट लिस्ट आयटम मुळे पूर्ण झाली. बकेट लिस्ट आइटम 5 चेक्ड.
तर आता या काही अपूर्ण बकेट लिस्ट इच्छा.
मला कधीची एक मॅरेथॉन धावायची आहे. आता पन्नाशी आली. फार उशीर करून चालणार नाही. या एक-दोन वर्षात धावून टाकते. मॅरेथॉन माझ्यासाठी बकेट लिस्ट आइटम असण्याचं कारण म्हणजे मी स्प्रिंट रनर आहे. मॅरेथॉन साठी लागणारा संयम जिद्द आणि वेळ हे सगळं कम्फर्ट झोन ताणून मला करावे लागणार.
नवरा बघताना मी गृहकृत्यदक्ष अपेक्षा त्याच्या रूपापुढे विसरूनच गेले होते. तर आता मला नवऱ्याला बेसिक भारतीय स्वयंपाक शिकवून स्वतंत्र करायचे आहे म्हणजे मला कधीकधी परतंत्र होता येईल. सुरुवात दमदार झाली आहे, माझं चढलेलं डोकं उतरवणारा फक्कड चहा आता त्याला येतो. बकेट लिस्ट आइटम क्वार्टर चेक्ड?
थंड हवेच्या ठिकाणी कायमचे राहण्याचे स्वप्न बघताना थंड हवेच्या रेंजची मला अजिबात कल्पना नव्हती. आता त्या स्वप्नाची दुरुस्ती करण्यासाठी आणखीन एक स्वप्नं लिस्टमध्ये घालावे लागले. प्रत्येक हिवाळ्यात दोन महिने तरी उष्ण हवेच्या प्रदेशात राहायला जायचे.
मला एक महिना तरी मुलीच्या खोलीत पडलेला पसारा/ कचरा पाहूनही ( हो, नाहीतर तिच्या खोलीत न जाण्याचा ऑप्शन तिने मला दिलेलाच आहे) त्याबद्दल चकार शब्द न काढता मुलीशी खर्याखुर्या अत्यंत प्रेमाने वागायचे आहे.
मला एक दिवस तरी पूर्वीच्या कोणत्याही दुःखद, त्रासदायक आठवणी न काढता राहायचं आहे.
मला एक तास तरी पूर्वीच्या कोणत्याही सुखद किंवा दुःखद आठवणी न काढता घालवायचा आहे.
मला एक मिनिट तरी पूर्वीच्या कोणत्याही सुखद किंवा दुःखद आठवणी न काढता आणि पुढची कोणतीही सुखद किंवा दुःखद स्वप्नं न करता राहायचं आहे.
ते काय हल्ली लिव्हिंग इन द मोमेंट म्हणतात तसं.
पण तो मोमेंट येईपर्यंत बादली भरत राहणारच.
अवांतर नाही पण मायबोलीवर कधीतरी काही(ही) तरी लिहायची पण एक बकेट लिस्ट इच्छा होती. गणेशोत्सवात सर्वचजण सर्वांशीच प्रेमानेच वागताहेत हे पाहूनच ती आज पूर्ण केली. बाप्पा मोरया.
खुसखुशीत मस्त झालीये बकेट
खुसखुशीत मस्त झालीये बकेट लिस्ट.
सामो, धन्यवाद पहिल्या
सामो, धन्यवाद पहिल्या प्रतिसादाबद्दल.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
थंड हवेवरुन आठवलं... इकडे समर समर करत लोक उन्हाने भाजुन घेत ब्युटिफुल वेदर ऑ SS करत हिंडत असतात. मला त्यांना बाणेदारपणे डोंबलाचं ब्युटिफुल, बेकार गरम होतंय हे तोंडावर सांगायचय!
छान लिहले आहे.
छान लिहले आहे.
आवडले लिखाण
आवडले लिखाण
(No subject)
मस्त लिहिले आहे वंदना.
मस्त लिहिले आहे वंदना.
मला मराठवाड्याचा उन्हाळा अजिबात सहन व्हायचा नाही. थंड हवेच्या ठिकाणी कायमचे राहण्याचे माझे स्वप्न होते.>>>+1
शेवटचे परिच्छेद अतिशय आवडले. तुझ्या सर्व बकेट इच्छा पूर्ण होओत. शुभेच्छा.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
आवडलं
आवडलं
भारीच लिहिलंय.
भारीच लिहिलंय.
मस्त लिहिलय. मजा आली .
मस्त लिहिलय. मजा आली .
अगगग कसलं भारी लिव्हलस गो
अगगग कसलं भारी लिव्हलस गो लैचचच आवडली तुझी लिस्ट। आणि क्रोशा खरच किती छान विणतेस तू मी काय फक्त टिपा दिल्या। तुला ऑलरेडी येतच होतं की। पण या निमित्ताने एक मस्त मैत्रिण मिळाली अन माझ्या बकेटलिस्टीतली एक टीक वाढली हे मात्र खरं
जियो! तुझी बकेट अशीच भरभरून वाहू दे आणि तितकीच पूर्ण होऊन रिकामीही होऊ देत
मस्त लिहीलय. शैली आवडली
मस्त लिहीलय. शैली आवडली लिखाणाची. आता अजून असच काहीबाही वाचायला मिळूदेत आम्हाला.
छान लिहिलय..मजेशीर.
छान लिहिलय..मजेशीर.
खूप छान लिहिलं आहे. आवडलं
खूप छान लिहिलं आहे. आवडलं
आवडलं
आवडलं
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
मराठवाड्यात कुठल्या तुम्ही?
विचारूनच घेते
मस्तच लिहिलं आहेस वंदना.
मस्तच लिहिलं आहेस वंदना.
शेवटचा परिच्छेद तर अगदी अगदी.
सुरुवात छानच झाली आहे. आता पुलेशु.
छान लीहिलंय, खुसखुशीत.
छान लीहिलंय, खुसखुशीत.
छानच लीहिलंय.
छानच लीहिलंय.
एकदम खुसखुशीत! मॅरेथॉनमध्ये
एकदम खुसखुशीत! मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची इच्छा लवकर पूर्ण होवो अशा शुभेच्छा! त्याचा अनुभव मायबोलीवर वाचायला आवडेल
छान लिहीलंय. आवडलं.
छान लिहीलंय. आवडलं.
बादलीतील पूर्ण अपूर्ण यादी
बादलीतील पूर्ण अपूर्ण यादी आवडली. १ दिवस, तास, मिनिट पूर्वीच्या कोणत्याही सुखद दुःखद आठवणी विसरण्यासाठी शुभेच्छा.
फार फार आवडलं.
फार फार आवडलं.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
अय्या, प्रतिसादांनी पाव शतक
अय्या, प्रतिसादांनी पाव शतक गाठले. मी खूप खूपच खुश झालेय.
(आणखी एक आयटम चेक्ड. आधी बोलले नाही, फारच नीडी वाटलं असतं ना) . तुमच्या कौतुकामुळे हुरूप वाढलाय, जोश चढलाय. ते दोन्ही उरलेल्या एक दिवसात माझ्या आठवणीतली मायबोलीवर उतरवते.
मस्त लिहिलंय आवडलं.
मस्त लिहिलंय आवडलं.
एक नंबर भारीच ! खुसखुशीत
एक नंबर भारीच ! खुसखुशीत लिखाण. फार आवडलं.
फार छान खुप आवडल!
फार छान खुप आवडल!
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
Pages