Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:12
२३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.
या सिरियलच्या निमित्ताने श्रेयस तळपदे अन प्रार्थना बेहेरे बर्याच वर्षांनी डेलीसोप मधून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.
चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ही बघाविशी वाटतेय. टाईमस्लॉट
ही बघाविशी वाटतेय. टाईमस्लॉट पण तसा रिकामाच आहे. आणि पोरगी गोडू आहे एकदम.
ही बघाविशी वाटतेय. टाईमस्लॉट
ही बघाविशी वाटतेय. टाईमस्लॉट पण तसा रिकामाच आहे. आणि पोरगी गोडू आहे एकदम. >>> + १२३
प्रोमो आवडले.
मला ही दोघं आवडतात म्हणून
मला ही दोघं आवडतात म्हणून बघेन नेटवर. ती मुलगी जाम गोड वाटली आणि सहज अभिनय करते.
ती गोड मुलगी is famous
ती गोड मुलगी is famous youtuber Myra Vaikul
She and her family own a youtube channel Myra's corner, that's how she got famous and got this show.
Myra's corner: https://youtube.com/c/MyrasCorner
I follow her youtube channel and Instagram .
माय्रा वायकूळ च्या आईंचं नाव
माय्रा वायकूळ च्या आईंचं नाव ईशा वायकूळ तर नाही ना?
नाही, मायराची श्वेता वैकुळ .
नाही, मायराची आई श्वेता वैकुळ .
ओके.. थँक यु दीपांजली
ओके.. थँक यु दीपांजली
झी च्या सिरीयल मध्ये हिरो
झी च्या सिरीयल मध्ये हिरो किंवा हिरॉइन यांची 400 कोटी ची कंपनी+हेलिकॉप्टर+एवढी श्रीमंती असून सुस्वभावी असं असलंच पाहिजे हा नियम आहे का..?
पाचशे कोटी.
पाचशे कोटी.
सध्या बघेन म्हणते ही आणि सोनी वर मुक्ता उमेशची.
हीरोला त्याचा मित्र म्हणतो दुबईत की आज जी पहिली मुलगी दिसेल ती माझी वहिनी. दुबईहून मुंबईत येताना एकही मुलगी दिसत नाही डायरेक्ट प्रार्थनाच दिसते मुंबईत ट्रॅफिक मध्ये.
छोटी मुलगी खूप समजूतदार दाखवली आहे, आगाऊ नाही वाटली. हिरोची मोठी काकू भयाण वाटली, दोन नंबर जरा बरी वाटली. हिरॉईनच्या शेजारचे काका ओके, काकू आवडली आणि तिची मैत्रीण अजिबात आवडली नाही.
श्रेयस प्रार्थना आवडले, तो यंग वाटतो तिच्यापुढे. संकर्षण आगाऊ वाटला थोडा पण योग्य मित्र आहे.
नीलिमा आई कुठे काय करते मधून
नीलिमा आई कुठे काय करते मधून इथे आली आहे पण काम तेच, दुस्वास, जेलसी, कट कारस्थान. राजवाडा विनोदी आहे, ती छोटी गाडी तर अगदीच काहीतरी. काल कापलेला केकही स्वस्तातला वाटत होता. बुर्ज खलिफा मध्ये पार्टी एकदा फेकायचं ठरवलं तर होऊन जाऊ दे
कोणता बॉस असा एकट्या बाईला वेळ काळ न बघता, पूर्व सूचना न देता खंडाळ्याला पाठवतो आणि ही पण निघाली लगेच गरीब चेहरा करून.
प्रार्थना त्या गाडीच्या काचेत बघून स्वतःचा मेकप नीट करत असते, गाडीत कोणी असू शकतं एवढं कळत नाही का तिला. हिरोही अगदी सदगुणाचा पुतळा. ते शंभर माणसाची नोकरी जाईल वगैरे सहानुभूतीचे कढ झीच्या हिरो/हिरवीनीलाच येऊ शकतात.
प्रार्थना त्या गाडीच्या काचेत
प्रार्थना त्या गाडीच्या काचेत बघून स्वतःचा मेकप नीट करत असते, गाडीत कोणी असू शकतं एवढं कळत नाही का तिला >>> हो ना अगदीच काहीतरी.
ती छोटी गाडी तर अगदीच काहीतरी >>> हा हा हा. तो माणूस उगाच इथे तिथे फिरवतो.
कालचा भाग पाहीला. प्रार्थना
कालचा भाग पाहीला. प्रार्थना आवडायची अगोदर पण यात जरा थोराडच दिसतेय
सध्या तरी पाहावीशी वाटतेय ही मालिका.
हो प्रार्थना थोराड दिसतेय.
हो प्रार्थना थोराड दिसतेय. तिथे दुसरीकडे मुक्ताही थोराड दिसतेय पण आवडते आणि सहज अभिनय. तिथे उमेश जेवढा सॉलिड वाटतोय, तेवढा इथे श्रेयस वाटला नाही. सध्या उगाच कंपेअर होतेय माझ्याकडून दोन सिरियलमध्ये. उमेश मुक्ता सिरियल जास्त आवडते पण ही ही बघेन सध्या.
हो उमेश फारचं भारी! मुक्ता
हो उमेश फारचं भारी! मुक्ता हसते कीती गोड. प्रार्थना अनाॅइंग वाटते नेहमीच. सिरीअलही बोर आहे. मुंबई पोचेपरयंत एकही मुलगी न दिसणे, काचेत बघुन टिकली नीट करणे. काहीपण!
तिथे दुसरीकडे मुक्ताही थोराड
तिथे दुसरीकडे मुक्ताही थोराड दिसतेय पण आवडते आणि सहज अभिनय. तिथे उमेश जेवढा सॉलिड वाटतोय, तेवढा इथे श्रेयस वाटला नाही. सध्या उगाच कंपेअर होतेय माझ्याकडून दोन सिरियलमध्ये. उमेश मुक्ता सिरियल जास्त आवडते पण ही ही बघेन सध्या.>> हो.. मीही घरच्यांमुळे अधे मधे मुक्ताची सिरियल जाता येता बगह्तो. पहिल्या दिवशी मीही तिच्या थोराड वाटण्याबद्दल बोललो.. पण एक-दोन दिवसांनंतर तसं काही वाटेनासं झालं.
बाकी तीत ती शर्मिला राजाराम भन्नाट अॅक्टिंग करतेय असं लक्षात आलं.
कायच्या काय दाखवलंय बाबा ,
कायच्या काय दाखवलंय बाबा , घरात इकडून तिकडे जायला गाडी काय , तो तिला हेलिकॉप्टरने काय सोडतो , घाबरलेच मी तर एवढी श्रीमंती पाहून , omg
तिथे उमेश जेवढा सॉलिड वाटतोय, तेवढा इथे श्रेयस वाटला नाही. >>> हो , उमेश कामत एव्हरग्रीन आहे अगदी. सगळीकडे आवडतो तो. पण दोन्ही सिरियलच्या हीरवीणी हीरोंच्या मोठ्या बहिणी दिसताय. मुक्ता एका ठराविक साच्यातलीच वाटते, मुंपुमुं पाहिल्यापासून तर सगळीकडे तशीच ,सेम ॲटीट्यूड दिसतो. मीच शहाणी , तू वेडा टाईप्स. उमेश आणि तिचे सीन बघताना फार जाणवते.
, तो तिला हेलिकॉप्टरने काय
, तो तिला हेलिकॉप्टरने काय सोडतो >>> मग अगोदर स्वतः घरी येताना गाडीने का येतो ? Helicopter नेच यायचं ना आजोबांना भेटायला.
हेलिकॉप्टरनेच आला तो दुबई ते
हेलिकॉप्टरनेच आला तो दुबई ते मुंबई. घराच्या गच्चीवर हेलिपॅड नसेल म्हणून मुंबईत उतरल्यावर गाडीने घरी.
तो मालक आहे हे कोणालाच माहिती नाही, कोणी कधी त्याचा फोटोही बघितला नाही. मित्राला बॉस बनवायचं ही अगदी जुनी ट्रिक. मी वाट बघतेय तो हेलिकॉप्टर राईडचे किती सांगतो, कधी गरज लागली तर बोलवता येईल
घराच्या गच्चीवर हेलिपॅड नसेल
घराच्या गच्चीवर हेलिपॅड नसेल म्हणून मुंबईत उतरल्यावर गाडीने घरी. >>> अरे, पण त्याच घरातून हेलिकॉप्टरने तिला सोडलं ना
घरातून सोडलं की नाही माहित
घरातून सोडलं की नाही माहित नाही. ते त्याचच अंगण होतं की दुसरी कुठली जागा कुणास ठाऊक. घेऊन गेला असेल त्या छोट्या गाडीतून हेलिकॉप्टरपर्यंत.
कालच अंजू यांनी म्हटलं की लहान मुलगी समजूतदार आहे तर आज तिने हट्टीपणा करून दाखवला
हो चंपा, हट्टीपणा दाखवला तिने
हो चंपा, हट्टीपणा दाखवला तिने पण नॉर्मल वाटला. हेलिकॉप्टरने आई आली आपल्याला मात्र नाही बसायला मिळालं हे बरोबर वाटलं मला, तिच्या वयानुसार. आता हिरो नेईल तिलाही हेलिकॉप्टरने. अनोळखी माणसाशी एवढ्या लहान मुलीने पटकन मिक्स होणं मात्र थोडं पटलं नाही.
तो मालक आहे हे कोणालाच माहिती नाही, कोणी कधी त्याचा फोटोही बघितला नाही. मित्राला बॉस बनवायचं ही अगदी जुनी ट्रिक. >>> सेम आलं मनात. घिसीपिटी स्टोरी.
मी वाट बघतेय तो हेलिकॉप्टर राईडचे किती सांगतो, कधी गरज लागली तर बोलवता येईल >>> सही.
बाकी तीत ती शर्मिला राजाराम भन्नाट अॅक्टिंग करतेय असं लक्षात आलं. >>> हो आळशीपणा, भोचकपणा बेअरींग छान पकडलं आहे तिने. मनुच्या बाबतीतला भोचकपणा योग्य वाटला मला.
पण दोन्ही सिरियलच्या हीरवीणी हीरोंच्या मोठ्या बहिणी दिसताय. >>> हम्म्म. मुक्ता आवडते मला तरीही पण एवढं वय का दाखवलं आहे, म्हणजे ती मोठी असेल वयाने बहुतेक उमेशपेक्षा पण हल्लीच दोन तीन वर्षांपुर्वी रुद्रममधे एवढं वय वाटलं नव्हतं.
रेशीमगाठ मधे धाकटी जाऊ मोठ्या जावेला हे ते ऐकुन सांगायला जाते, ती सेम सुख म्हणजे नक्की काय असतंची कॉपी केलीय, त्यात ती देवकी शालीनीला जाऊन सांगत असते.
झी च्या सिरीयल मध्ये हिरो
झी च्या सिरीयल मध्ये हिरो किंवा हिरॉइन यांची 400 कोटी ची कंपनी+हेलिकॉप्टर+एवढी श्रीमंती असून सुस्वभावी असं असलंच पाहिजे हा नियम आहे का..? >>>>>>>> तुपारेचा विक्रान्त कुठे होता सुस्वभावी?
प्रार्थना श्रेयसपेक्षा लहान असेल मेबी. मुक्ताने याआधीही काम केल होत की उमेशबरोबर.
मी एक एपिसोड पाहिला ह्या
मी एक एपिसोड पाहिला ह्या मालिकेचा. पण मला प्रार्थना थोराड वगैरे दिसली आहे असं नाही वाटलं. एका ६-७ वर्षाच्या मुलीची आई दिसेल तशीच वाटली.
मुक्ता खर्या आयुष्यात आता ४२ वर्षाची आहे. इथे ३५शीची दाखवली आहे. मग मोठीच दिसणार ना?
प्रार्थनाचे डोळे अमानवी मोठे
प्रार्थनाचे डोळे अमानवी मोठे आणि गोलगोल आहेत. बटबटीत वाटतात. त्यात त्या लांब लांब खोट्या पापण्या शिंकली तरी गालावर पडतील अशी भिती वाटते. पण तरी त्या इशाचा यायचा तसा राग येत नाही तिचा.
श्रेयस खूपच मेंटेंन्ड आहे. जसा विशीत होता तसाच. कौतुक वाटलं.
उमेश ४३ आहे आणि बिना दाढी
उमेश ४३ आहे आणि बिना दाढी-मिशी त्याचंही वय दिसतं हे आणि काय हवं सीजन तीन मध्ये प्रकर्षाने जाणवते. श्रेयस तेव्हडा वयस्कर वाटत नाही उलट तरुण होता त्यापेक्षा आता जास्त छान दिसतोय. मानबा मध्ये शर्मिला राजाराम मला शेवटी खूपच जाडी दिसली होती आणि आता परत चवळीची शेंग. आई वडील मिरेचं फारच कौतुक करतात, तुलनाही करतात आणि वरून म्हणतात आम्ही कधी भेदभाव केला नाही.
मुक्ताने याआधीही काम केल होत
मुक्ताने याआधीही काम केल होत की उमेशबरोबर. >>> हो पण तेव्हा इतका फरक जाणवला नव्हता, इव्हन रुद्रम हल्लीच तर झाली, दोन तीन वर्षांपूर्वी, तेव्हाही ती तिच्या वयापेक्षा यंग वाटलेली. यावेळीच जे वय आहे तिचं, ते जाणवले.
उमेश दाढीत छान दिसतो, फ्लॅशबॅक मध्ये नाही दिसत चांगला. श्रेयस काल जरा यंग वाटला पहिल्या एपिसोडपेक्षा, त्याचे डोळे छान आहेत, स्माईल कृत्रिम वाटतं मला आता या सिरियलमध्ये. उमेशचे स्माईल कयूट आणि natural वाटतं.
झी मराठीच्या मन उडू उडू झाले
झी मराठीच्या मन उडू उडू झाले चा प्रोमो सध्या न्यूज चॅनल वर दाखवत आहेत. त्यात तो स्टार प्रवाह चा विठोबा हीरो आहे , तो छान दिसतोय, एका प्रोमोत थोडा बावळटही वाटला पण हॅंडसम आहे पण ती हृता दूरगुळे थोराड वाटली मला चेहऱ्याने त्याच्यापुढे.
मुक्ताची सिरिअल कुठली??
मुक्ताची सिरिअल कुठली??
मुक्ता लै आवडते राव
हृता दूरगुळे थोराड वाटली मला
हृता दूरगुळे थोराड वाटली मला चेहऱ्याने त्याच्यापुढे.
>>> फुलपाखरू मधील ना ! त्यात गळ्याच्या शिरा दिसायच्या आणी यात आता चेहरा सुजल्यासारखाच दिसतोय
मुक्ताची सिरिअल कुठली??>>>>
मुक्ताची सिरिअल कुठली??>>>>
"अजूनही बरसात आहे " सीरिअल आहे, मुक्ता आणि उमेश कामत यांची, सोनी मराठी वर, रात्री 8 वाजता
Pages