कशाला?

Submitted by _आदित्य_ on 8 May, 2021 - 01:09

तुझ्या जीवनाचा तूच हो रचयिता !
कुणाच्या मतांची उधारी कशाला?

अरे माकडाचा माणूस झाला !
मग आता इथे हे मदारी कशाला?

ऐकू जनाचे कि ऐकू मनाचे..
तलवार ऐशी दुधारी कशाला?

उंबरे तयांचे झिजवून वेड्या..
होतोस असला भिकारी कशाला?

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

रचना आवडली. केंद्राकडे सतत हे द्या ते द्या मागणारे असे काही तरी आठवून गेले.

-दिलीप बिरुटे