Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जडेजा फेल गेला.. 15 ते 20 रन
जडेजा फेल गेला.. 15 ते 20 रन कमी पडले .. त्याने भरपूर बॉल वाया घालवले...
चँडलर च्या भाषेत सांगायचं तर,
चँडलर च्या भाषेत सांगायचं तर, and the ‘चिरडर’ becomes ‘चिरडी’ >>> could this BE more true!
८ ओवर १२५ हवे होते.. १६.६
८ ओवर १२५ हवे होते.. १६.६ धावगती हवी होती.. लास्ट ओवरला १५-१६ रन्स हवे असताना ते एखाद्या सेट बॅटसमनने मारले तरी भारी वाटते. पण ८ ओवर सातत्याने १५-१६ धावा, विकेट न टाकता, ते सुद्धा विविध गोलंदाजांना मारायचे म्हणजे भारीच.. वन ऑफ द ग्रेटेस्ट पॉवरहिटींग ऑफ ऑल टाईम .. आणि आज पोलार्ड खेळला तरच हे होऊ शकते हा त्याच्यावरचा विश्वास.. हॅट्स ऑफ टू क्लीन पॉवर हिटींग ऑफ पोलार्ड !!!!
@ भाऊ
@ भाऊ
>>> एका अप्रतिम खेळीवर शतकाचा मुकूट चढणं, ही क्रिकेटमधील सदाकालीन एक साधी, सरळ, निखळ आनंदाची बाब आहे, त्या फलंदाजासाठी, संघसहकारी व क्रिकेटरसिकांसाठी. म्हणून, जर निकालावर परिणाम होणार नसेल, तर त्याला शतक करणयाची संधी मिळावी ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया. .>>>>
>>>>
निकालावर परीणाम याच मुद्द्यावर मी म्हणालो की धावगती वाढवायला पंत आला त्याने वाढवली गेला. या धावगती वाढवायच्या प्रोसेसमध्ये शॉ ने सुद्धा मारून त्याचे शतक झाले असते तर मलाही निखळ आनंदच झाला असता.
@ प्रवीन द रायडर
धवन कसा खेळत होता मग ? का धवन ला जोरात खेळता येत नाही ? त्याला पण सांगायच ना रनरेट पाहीजे.
>>>>
तो सुरुवातीपासून एका बाजूने स्लो खेळत होता, कारण समोरून शॉ मारत होता. रनरेट वाढवायचा विचार आता सामना सेफ झाला आपण हरत नाही हे क्लीअर झाल्यावरच केला जातो. त्यानेही नंतर मारायल घेतलेलेच. बॉल टू बॉल स्कोअर चेक केला तर समजेल.
.
पृथ्वी ला दिला असता चान्स की Go for it. सामना तर जिकंला असताच पण त्याचा संघात आदर ही वाढला असताच. नक्कीच शिकेल तो...
>>>>>>>
माझ्या मनातील पंतबद्दलचा आदर उलट काल वाढला की एकूणच दिल्ली टीम एखाद्या खेळाडूच्या वैयक्तिक शतकाचा विचार न करता आपल्या गेमप्लान नुसार खेळतेय तर यंदा त्यांचा जिंकायचा चान्सही जास्त आहे.
जेव्हा सचिन १९४ वर असताना द्रविडने डाव घोषित करून त्याला द्विशतकापासून रोखले होते तेव्हा द्रविडबद्दलचा आदर घटला होता का?
प्रामाणिक ऊत्तर द्या
द्रविडला वेगळा निकष आणि पंतला वेगळा असे करू नका.
..
सचिन शेवटी शतक करण्यासाठी
सचिन शेवटी शतक करण्यासाठी खेळत होता हे सगळे बोलतात पण 90 ते 99 यामध्ये तो 27 वेळा आऊट झालाय याकडे सगळे दुर्लक्ष करतात.
>>नर्व्हस 90s .. ते शतक करण्यासाठी खेळतांना व्हायचे त्याचे... सेफ खेळायला जायचा.. नर्व्हस होऊन विकेट फेकली जायची... चेंज इन फॉर्म.. सुंदर फॉर्म मध्ये एकसे बढकर एक शॉट्स मारायचा आधी आणि 90 आसपास आले की स्लो व्हायचा...
>>>>
च्रप्स यांच्याशी सहमत आहे. सचिन असो वा कोणीही एखादा सेट बॅटसमन नव्वदीत जर स्वतःच्या शतकाचा विचार करून नर्वस नाईटीज कारणास्तव बाद होत असेल तर यात संघाचे नुकसान होते.
धोनी जेव्हा कसोटीतून निवृत्त झाला त्या दौर्यात मला आठवतेय की तेव्हा आपण ऑस्ट्रेलियात हरतच होतो. एका धोनी नसलेल्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी चेस करताना मुरली विजय आणि कोहली दोघांनी मोठी पार्टनरशिप करून सामना खेचलेला. एक अविस्मरणीय वाटावा असा विजय आवाक्यात आला. पण मुरली विजय शतकाजवळ आल्यावर शतकाचा विचार करून अचानक त्याचा गेमच बदलला.. आणि त्यातच ९९ धावांवर एलबी डब्ल्यू बाद झाला. अगदी म्हणजे तो सामना बघतानाच मला समजत होते की हा नर्वस नाईटीजचा शिकार होतोय. ओरडून सांगावेसे वाटत होते की अरे मुर्खा तुझे शतक नाही आपल्याला सामना जिंकणे महत्वाचे आहे. पण तो गेला, पाठोपाठ रहाणेला चुकीचा बाद दिला आणि सामनाच फिरला. मग तो जिंकायचा सामना आपण अनिर्णित राखणेही न जमता हरलो.
हा त्याचा स्कोअरबोर्ड - https://www.espncricinfo.com/series/border-gavaskar-trophy-2014-15-75471...
५७-२ ते २४२-२ अशी दोघांची भागीदारी होती. त्यानंतर ३१५ धावांवर सर्वबाद होत आपण ४८ धावांनी हरलो होतो.
आज तुम्ही हा स्कोअरबोर्ड बघाल आणि म्हणाल वा दोघे छान खेळले, त्याचे शतक हुकले हळहळाल, पण त्या शतकाच्या विचारात आपला ऑस्ट्रेलियातील एक विजय हुकला हे खरे फॅक्ट आहे !
क्रिकेटच्या ईतिहासात अशी खूप उदाहरणे आहेत. म्हणून जर फलंदाजाच्या डोक्यातून हे शतकाचे खूळ काढून टाकले तर त्याचा फायदा संघालाच होतो. आणि तुम्ही म्हणत आहात शतक करायची संधी देत प्रोत्साहीत करावे. शतकाची हाव कधी संपते का
शतकच कश्याला, आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपच्या हावेने फलंदाजांना गरज असतानाही रिस्क न घेता स्लो खेळताना पाहिलेय. तसेच पर्पल कॅपच्या आणि विकेटसच्या हावेपोटी गोलंदाजांना अखेरच्या ओवरमध्ये यॉर्कर न टाकता लेंथ बॉल टाकून विकेटसाठी जाताना पाहिले आहे
पंतला नक्कीच अजून खूप शिकायचे आहे, जसे की ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक चेसमध्ये जिंकवताना विजय एका फटक्यावर आलेला तेव्हा तो ग्लोरी शॉट खेळायला गेलेला आणि त्या नादात बॉल हवेत उडालेला. सुदैवाने मोकळ्या जागेत पडल्याने वाचलेला. मग मात्र सावकाशपणे ग्राऊंडशॉट खेळत जिंकवून दिलेले. या अश्या चुका न करणे हे जरूर शिकावे त्याने.
अवांतर, भाऊ, ऋन्मेष, विक्रम,
अवांतर, भाऊ, ऋन्मेष, विक्रम, स्वरुप, आणि इतर जे भारतात आहेत, होप तुम्ही आणि तुमचा परीवार नीट आहे सध्याच्या वातावरणात. आय पी एल बघत घरी राहा.
>>>>>>>
धन्यवाद, तेच करतो. एकीकडे लॅपटॉप वर्क फ्रॉम होम, शेजारीच मोबाईल स्टँडला अडकवून हॉटस्टारवर आयपीएल, आणि रात्री ईथे या धाग्यावर
पोलार्ड च्या इनिंग्स चे हाय
पोलार्ड च्या इनिंग्स चे हाय लाईट्स पुन्हा पुन्हा पाहून समाधान होत नाहीये. काहीच्या काही शॉट्स होते. ठाकूर ला सिक्स खर्या अर्थाने उत्तुंग होता. मागे फक्त पांड्या असताना खेळलेली इनिंग म्हणून अधिकच भारी होती. डी कॉकचे शॉट्स पण एकदमच भारी होते. रोहोत मात्र अजून चाचापडतोच आहे . त्याची एक मोठी इनिंग ड्यू आहे. मुंबई अचूक वेळेला पीक होऊ लागली आहे.
जाडेजा ला बॅक फूट वर खेळण्यापेक्षा समोरच्या व्ही मधे खेळायला लागले की त्याच्या बॉलिंगची लय जाते हि चिंतेची बाब आहे.
शर्माला बहुधा त्याच्या इनिंग
शर्माला बहुधा त्याच्या इनिंग बिल्ड शैलीच्या विपरीत खेळायची गरज भासल्याने त्याची लय बिघडत होती.
म्हणूनच हे शर्मा, राहुल, धवन, कोहली असे एकाच छापाच्या चार प्लेअरपैकी ३ जर भारतीय २०-२० संघात खेळणार असतील आणि तिघे टॉप ३ मध्ये येणार असतील तर कोणी काय भुमिका घ्यायचे हे ठरवणे अवघड आहे. वनडेमध्ये चौघे एकदमही चालतील. पण २०-२० मध्ये मागे पंत पांड्या जडेजा, मध्ये एखादा सुर्या किंवा किशन वा गेला बाजार अय्यर वा सॅमसन आणि पुढे पृथ्वी शॉ ओपनिंगला असे काहीतरी सळसळते तरुण रक्त घेऊनच २०-२० वर्ल्डकपला जायला हवे.
असामी आम्ही ठिक आहोत. धन्यवाद
असामी आम्ही ठिक आहोत. धन्यवाद.
कालचा चेस बघायला मजा आली. एकदा शार्दूल आणि एकदा जडेजा मरता मरता वाचले. जडेजाच्या हातातून बॉल गेला. पण कॅच सोडला असे म्हणता येणार नाही. हेल्मेट घालून बोलिंग करायची वेळ आली आहे.
हरल्यामुळे रायडूची खेळी झाकोळली गेली. करिअरच्या अगदी सुरूवातीला त्याला प्रति सचिन म्हणायचे नंतर तो त्याच्यातल्या गुणवत्तेला न्याय देउ शकला नाही. टेंपरामेंटचा लोचा. दुसरे काय.
चेन्नाइला मॅच खेळावी न लागल्यामुळे चेन्नाइचा फायदा झालाय. आता मुंबईला क्वालिफाय व्हायला फारसा त्रास होउ नये.
माझ्या मते बुमरा पाठीच्या दुखण्यातून अजून सावरला नाहीये. कुठेतरी थोडा कमी पडतोय. पूर्वी सारखा भेदक राहिला नाही. विकेट घेण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेय. हुकमी गोलंदाज वाटत नाही. जे काय आहे ते लवकर बरे होवो. मलिंगा आणि बुमरा या दोघांनी डेथ ओवर्स मधे गोलंदाजीच्या जोरावर मुंबईला खूप मॅचेस जिंकून दिल्या आहेत. पण सध्या मुंबईची गोलंदाजी फलंदाजीच्या मानाने थोडी कुमकुवत वाटतीय.
द्रविडबद्दलचा आदर घटला होता
द्रविडबद्दलचा आदर घटला होता का?
प्रामाणिक ऊत्तर द्या.... आदर नाही पण एकमेव दिवस असेल की द्रविड ने इतक्या शिव्या खाल्लया असतील. तसंंही एका ओवर ने किती फरक पडला असता.
सचिन कसाही खेळला... स्वता साठी कोणाला वाटत असेल तरी तो आमच्या साठी देवच आहे... आमच्या कडे ना सचिन होता तोपर्यंतच मोठ्या पडद्यावर सामने लावत. कसोटी सामना पण सचिन खेळत असेल तर...
धोनी जाम आवडायचा पण आता नाही आवडत... असं सचिन बाबतीत कधीच नाही वाटलं भावा... कालही आवडायचा, आजही आणि उद्याही...
मुरली विजय चं नको सांगु बाबा... कधीच नाही आवडला. मुरली विजय, आकाश चोप्रा अशी मंडळी डोक्यात जातात... चोप्रा तर आता पण डोक्यात जातो...
कोणताही खेळाडु शतका जवळ
कोणताही खेळाडु शतका जवळ आल्यानंतर बरेचदा विरूध्द संघ आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाना समोर आणतोच आणि सचिन समोर अक्रम, शोएब, वॉल्श, डोनाल्ड, मँग्रा, वॉर्न, अँडरसन, बॉन्ड, सकलेन, वास, मुरली असे गोलंदाज येत. त्यांना विकेट न देता शतक केलं तर संघाचा फायदाच होता आणि सचिनच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्याने शतक केल्यानंतर ही खेळला आहे. 150+ मध्ये आघाडीवर...
फक्त शतका जवळ येऊन हळु खेळणं आणि का हळु खेळला त्या मागील कारणे या मध्ये तफावत आहेच...
लारा 400 रन्स साठी किती वेळ खेळला माहीत असेलच...
*आणि सचिनच्या बाबतीत बोलायला
*आणि सचिनच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्याने शतक केल्यानंतर ही खेळला आहे. 150+ मध्ये आघाडीवर...* - सचिनचीं शतकं व भारताचा विजय यांच्या संबंधावर दोन्ही बाजूनी इतकीं वर्ष इतकं लिहीलं गेलंय कीं आतां तो विषय चघळायच्याही पलीकडे गेलाय. मीही कळवळून सचिनच्या बाजूने लिहीत असे, भांडतही असे. पण आतां मीं त्या निरर्थक, निष्फळ भानगडीतच पडत नाही . माझ्या मताविरूद्ध असलेल्यांनीही आपलं मत न बदलतांही तो विषय मात्र आतां सोडावा, असं मला तीव्रतेने वाटतं. खूप इतर कांहीं नवीन आहे क्रिकेटमधे, पहाण्या - लिहीण्या -वाचण्यासारखं !
असामी, इथे सगळे ठीक आहे....
असामी, इथे सगळे ठीक आहे.... घरुन काम चालू आहे त्यामुळे विशेष काळजीचे कारण नाही.
बायकोने कारमधला मोबाईल स्टॅंड काढून आणून किचन सिंक समोर चिकटवून दिला आहे.... त्यामुळे IPL बघता बघता पडतील तितकी भांडी हसत हसत घासतो
कालची मॅच कमाल म्हणजे कमाल झाली.... अगदी १७/१८ व्या ओव्हरपर्यंत चेन्नईच जिंकेल असे वाटले होते पण पोलार्ड दर सीझन ला ज्या एक दोन मॅच एकहाती काढूम देतो त्यातली मॅच होती काल!
फाफ, मोईन, रायडू चांगलेच खेळले काल.... मोईन अलीमुळे चेन्नईच्या संघाला एक प्रकारचा समतोल आल्यासारखे वाटतेय..... सुरुवातीच्या मॅचला लयीत वाटलेला रैना मात्र फारसा चालेनासा झालाय. काल तर अगदीच बेजबाबदार फटका मारुन आउट झाला तो!
कालचे पीच बघता एंडीडीच्या ऐवजी ब्राव्हो जास्त चांगला पर्याय ठरला असता!
इतक्या मोठ्या धावसंख्येचा केलेला यशस्वी पाठलाग मुंबईला अजुन आत्मविश्वास देवून जाईल!
बुमराहला इतका मार पडलेला क्वचितच पहायला मिळतो.... मुंबईच्या संघात याबद्दल नक्कीच आत्मचिंतन होईल!
चेन्नईतून बाहेर पडल्यानंतर हार्दिक, कृणाल हे मुंबईचे हुकुमी लोक चालायला लागलेत पण सूर्यकुमार का जरा चाचपडतोय?
रोहित किती कूल कर्णधार आहे हे काल परत एकदा दिसले.
सामना जरी मुंबईने जिंकला असला तरी त्याचा चेन्नईच्या मनोधैर्यावर फारसा परिणाम होवू नये.... पोलार्डचा तो कॅच जर फाफ ने घेतला असता तर सामन्याचा निकाल बहुदा वेगळा लागला असता आणि इथे धोनीच्या डावपेचांवर कौतुकाचा वर्षाव झाला असता!
मुंबईच्या अश्या अचाट विजयांनंतर हटकून दिसणारा पराग कसा काय फिरकला नाही इकडे काल?
बाय द वे; काल टॉसनंतरही आणि मॅचनंतरही धोनी आणि रोहित शर्मा बऱ्याच गप्पा मारताना दिसत होते? कधीकधी वाटते की इतके काय बर बोलत असावेत ते?
*हरल्यामुळे रायडूची खेळी
*हरल्यामुळे रायडूची खेळी झाकोळली गेली......नंतर तो त्याच्यातल्या गुणवत्तेला न्याय देउ शकला नाही. टेंपरामेंटचा लोचा. दुसरे काय.* --
रायडूसारख्या नवोदित खेळाडूंविषयी मला सहानुभूती पण वाटते. त्याना स्वत:ची ओळख निर्माण करायला टी-20 मधे फटकेबाजीचंच तंत्र व मानसिकता आत्मसात करावी लागते. संबंधितांच्या नजरेत भरलाच, तर तें तंत्र व मानसिकता बदलत एकदिवसीय व कसोटी सामन्यांना साजेसा खेळ करावा लागतो. हें सगळं करतांना भरीव कामगिरीचं सातत्यही राखावं लागतं. एखादा पंत हें जमवतोही पण तीव्र स्पर्धेत हीं पथ्य पाळून कामगिरी उंचावत नेणं म्हणजे तारेवरची कसरतच ! तोल जाण्याची शक्यताच अधिक.
बटलर सुटलाय आज!
बटलर सुटलाय आज!
२०० तरी केला पाहिजे राजस्थानने!
फार सुंदर खेळला बटलर.
फार सुंदर खेळला बटलर.
भाऊ, आला बघा आपला त्यागी!
भाऊ, आला बघा आपला त्यागी!
आणि ज्या पध्दतीने बॉलिंग करतोय ते बघता उनाडकटला बसवेल आता काही मॅचेस बाहेर!
काय भन्नाट मारलेत काल
काय भन्नाट मारलेत काल पोलार्डने! मजा आली. चेन्नई संघातून दर मॅचला वेगळा हीरो मिळतोय. ते चांगले आहे. त्या मानाने मुंबई अजूनही चाचपडत आहे, पण तरीही टॉप ४ मधे आहे. रोहित, सूर्यकुमार यादव वगैरे अजून पूर्ण भरात आलेले नाहीत.
आजची बटलरची बॅटिंगही मस्त.
मुंबईच्या अश्या अचाट
मुंबईच्या अश्या अचाट विजयांनंतर हटकून दिसणारा पराग कसा काय फिरकला नाही इकडे काल? >>>> हाहा, अरे जरा कामात होतो म्हणून इथे येता आलं नाही. मी मॅच पहाताना इतका ओरडाआरडा केला की आमचं भुभु घाबरलं बिचारं आणि टेबलाखाली जाऊन बसलं.
मस्त मजा आली. पोलार्ड भा हा री ही खेळला !
वर द्रविडच्या डाव घोषित करण्याच्या निर्णयाबद्दल आलं आहे. त्या निर्णयामुळे त्याच्या बद्दलचा आदर आजिबात वाढला-बिढला नाही. उलट कॅप्टन म्हणून तेव्हाची थोडी इम्मॅच्युरिटीच जाणवली. सामना तेव्हा अश्या स्थितीत होता की त्यावेळी आणखीन एक-दोन ओव्हर्सनी काहीच फरक पडला नसता. शिवाय पाकिस्तानात पाकिस्तान विरुद्ध २०० झळकावणे हे फक्त सचिनलाच नाही तर पूर्ण संघालाच अजून पेटवून गेलं असतं. द्रविडच्या उगीच अति-कडक असण्याची झलक होती ती. जर तर च्या गोष्टींना काही अर्थ नाही पण गांगुलीने असा निर्णय घेतला नसता असही तेव्हा वाटलं.
पराग प्लस वन...
पराग प्लस वन...
द्रविड चा तो निर्णय चू होता याबाबत कोणतेच दुमत नसावे.. मला इमाजिन करवत नाही सचिन ची मनस्थिती काय असेल बाकी फिल्डिंग मध्ये वगैरे... आधीच सेहवाग चे 300 होते, सचिनचे 200.. असा विक्रम हा भारत देश म्हणून सन्मानाची गोष्ट झाली असती... एकाच इंनिंग मध्ये एक ट्रिपल सेंच्युरी आणि एक डबल सेंचुरी.. तेदेखील पाक विरुद्ध...
>>उलट कॅप्टन म्हणून तेव्हाची
>>उलट कॅप्टन म्हणून तेव्हाची थोडी इम्मॅच्युरिटीच जाणवली.<< +१
वर भाऊंच्या मताशी पण सहमत. सध्यपरिस्थितीचा आढावा घेउन योग्य निर्णय घेणे यात कॅप्टनच्या नेतृत्व गुणांचा कस लागतो. माझ्या मते तेंव्हा द्रविड, आणि आता पंत सपशेल नापास झाले...
हरप्रितने काय सॉलिड दांडी काढली आज पृथ्वीची. मार्वलस...
*हरप्रितने काय सॉलिड दांडी
*हरप्रितने काय सॉलिड दांडी काढली आज पृथ्वीची.+1. शाॅ ' फाॅरवरड डिफेनस ' करताना अजूनही पूर्ण आश्वासक वाटत नाहीं. हा हरप्रीत जिगरी व हुशार वाटतो. त्या दिवशीं फलःदाजी पण नेटकी करत होता.
त्यागीने चांगली गोलंदाजी केली व महत्वाची विकेटही घेतली .
( *भाऊ, आला बघा आपला त्यागी!* - हें कोणत्याही खेळाडूला 'आपला' म्हणणं शक्यतो टाळलेलंच बरं. कारण, त्यामुळे, नकळत आपण त्याच्याबद्दल possessive होतो व मग चर्चेत कांहींही झालं तरी नेहमीं त्याचंच समर्थन करण्याकडे आपला कल होतो.)
द्रविड चा तो निर्णय चू होता
द्रविड चा तो निर्णय चू होता याबाबत कोणतेच दुमत नसावे..>> त्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यामागे ग्रेग चॅपेलची संघात सिनियर खेळाडूत फूट पाडण्याची खेळी होती असे मला नेहमीच वाटत राहिले आहे. द्रविड त्याच्या गळाला लागला.
द्रविड चा तो निर्णय चू होता
द्रविड चा तो निर्णय चू होता याबाबत कोणतेच दुमत नसावे..>> त्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यामागे ग्रेग चॅपेलची संघात सिनियर खेळाडूत फूट पाडण्याची खेळी होती असे मला नेहमीच वाटत राहिले आहे. द्रविड त्याच्या गळाला लागला.
तेव्हा चॅपेल नव्हताच ना ?
तेव्हा चॅपेल नव्हताच ना ?
आजही दिल्लीने शेवट रनरेट
आजही दिल्लीने शेवट रनरेट वाढवायचा प्रयत्न करायचा हेच डोक्यात ठेऊन केला. आधी पंतने तो अॅप्रोच दाखवला मग हेटमायरने फटकावत फिनिश केला. फक्त आज धवन शतकाजवळ नसल्याने त्यावर चर्चा होणार नाही. बघण्याचा दृष्टीकोन. शतकाला दिलेले महत्व. गल्ली क्रिकेटमध्ये खेळताना आपण कधी स्वतः कितीवर खेळतोय हे बघतही नाही. आणि कोणी मोजतही नाही. निव्वळ जिंकायला किती हवेत आणि तिथे कसे पोहोचायचे हाच एकमेव विचार. आणि टूर्नामेंट असेल, रनरेट बघितला जाणार असेल, तर लवकरात लवकर कसे पोहोचावे हा दुसरा विचार. अर्थात या ईंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जिथे धावांचा आणि शतकांचा रेकॉर्ड ठेवला जातो. तिथे आपण प्रेक्षकांनीही शतकाला ईतके महत्व दिले आहे आणि ते मोजू लागलो आहोत त्यामुळे आपल्याला हा विचार पचनी पडणे अवघड आहे हे मी समजू शकतो.
सचिन १९४ आणि द्रविडचे उदाहरण देण्याचा मूळ हेतू हा होता की जुना लाडका सिनिअर खेळाडू बघून कोणाचा निकष बदलत तर नाही ना हे चेक करायला एक खडा टाकलेला. ते तसे नाहीये बघून आनंदच झाला.
मी तो सामना लाईव्ह पाहिलेला. तो निर्णय एकट्या द्रविडचा नाही तर त्यावर दादाचा प्रभाव होता. त्याआधी दादाने येऊन तसे द्रविडला खुणावलेलेले. दादाच्या चेहर्यावरचे भाव बोलके होते. याचा उल्लेख गूगलवर या विषयाच्या चर्चेत कुठे सापडणार नाही म्हणा...
ते सोडा, पण आपल्याला सचिन १९४ पर्यंत पोहोचलेला ते दिसले आणि मग अजून दोन ओवरचाच तर प्रश्न होता म्हणून हळहळ वाटली. पण साधारण १६०-१७० पासून १९४ पर्यंत जाईपर्यंत तो द्विशतकाचा विचार करून स्लो तर नव्हता ना झालेला हे सुद्धा बघायला हवे. खरे तर त्याने आधीच मारायला सुरुवात करायला हवी होती जे डिक्लेअर करण्याआधी कोणीही करतात. कोणत्याही संघाची हिच स्ट्रॅटेजी असते.. पण जर कोणी २०-२५ वर खेळत असते तर तो मारूनच खेळला असता. सेट फलंदाजाने तर आणखी मारायला हवे. पण आता कोणी शतकाजवळ वा द्विशतकाजवळ आहे तर त्याला ते स्लो खेळून ते पुर्ण करायची मुभा द्यावी जे संघहिताविरुद्ध जातेय तर मला वाटते वरवर हार्श भासणारा निर्णय एक ऐतिहासिक होता.
पण लोकभावना. ती द्रविडच्या विरोधात गेली. जे साहजिकच होते. त्या वयात मलाही पचायला हे जड गेलेले. माझेही विचार नंतरच बदलले आहेत. एकेकाळी मी सुद्धा आवडते खेळाडू म्हणून सचिन-दादाची शतके मोजायचो. पण आता पुन्हा त्या घटनेकडे बघताना मी द्रविडच्या बाजूला आहे.
एक मात्र मी मानतो सचिन द्रविड दोघांनाही. ऑनफिल्ड सचिनच्या बॉडी लँगवेजमध्ये काही जाणवले नाही. कधी दोघांत टेंशन दिसले नाही. आज ईतक्या वर्षानंतरही त्यांच्या नात्यात या विषयावरून कटूता दिसली नाही. आणि हे फार ग्रेट आहे. दोघांचे कॅरेक्टर डिफाईन करते. या बाबतीत खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही यांचा आदर्श घ्यावा असे आहेत.
तेव्हा चॅपेल नव्हताच ना ?>>
पण त्यामागे ग्रेग चॅपेलची संघात सिनियर खेळाडूत फूट पाडण्याची खेळी होती असे मला नेहमीच वाटत राहिले आहे. द्रविड त्याच्या गळाला लागला.
>>
जॉन राईट होते. निर्णयामागे ते आणि दादा यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे.
रायडूसारख्या नवोदित
रायडूसारख्या नवोदित खेळाडूंविषयी मला सहानुभूती पण वाटते. >> तुम्ही चुकून रायूदू लिहिलत का ? रायुडू जुना आहे बराच आय सी एल मधे गेला नसता तर भारतासाठी खेळला असताच एव्हढा गुणवान होता. मॅच्युरिटी पेक्षा पॉलीटीक्स मधे अडकला बिचारा.
जोवर खेळाडू च्या यशा मापदंड शताकांमधे मोजला जाणार आहे तोवर शतका जवळ आल्यावर स्लोव होणे स्वाभाविक आहे असे मला वाटते.
तेव्हा चॅपेल नव्हताच ना ?>>
तेव्हा चॅपेल नव्हताच ना ?>> बरोबर. माझी चूक झाली.
माझ्या डोक्यात द्रविडचे कर्णधार्पद आणि चॅपेलची कारस्थाने हे समिकरण घट्ट बसलय.
आजही दिल्लीने शेवट रनरेट
आजही दिल्लीने शेवट रनरेट वाढवायचा प्रयत्न करायचा हेच डोक्यात ठेऊन केला.... ६ सामने शिल्लक आहेत आणि त्या पैकी २ सामने जिकंले की बाद फेरी निश्चित आहे. तरीही जर दिल्ली रनरेट... रनरेट करत असेल तर मग धन्य ती दिल्ली आणि पंत पण... या रनरेट च्या नादात २~३ सामने जर हरली ना मग तर झालंच कल्याण...
दिल्ली अशा स्थितीत आहे की केवळ सामने जिकंली तरी पहिल्या दोन मध्ये राहील. असाच जर दबाव घेत राहिली ना तर बाद फेरीत महत्वाच्या सामन्यात बाहेर जाण्याची नामुष्की ओढवेल.
भावा प्रश्न शतकाचाच नाही तर एक कप्तान आपल्या खेळाडू ला कसं खेळवतो/ प्रोत्साहीत करतो याचा आहे. द्रविड ने ती चुक केली ते पण अशा वेळी आणि संघा विरुद्ध की ती घोडचूक ठरली. वर उल्लेख केल्याप्रमाणे...
पंत लहान आहे तो शिकेलच...
गल्ली क्रिकेट बोलशील तर आम्ही जिंकायला सोपी किंवा २~५ धावा हव्या असतील तर आजही लहान मुलांना जा रे जिकंव... कारण गल्ली क्रिकेट मध्ये शतकं नाही करत कोणी... त्या लहान मुलांना प्रोत्साहीत एका सामन्यात केलं ना ते दिवस भर किपर मागे उभे राहून चेंडू आणून देतात. तर विचार कर पंत ने असं काही केलं तर ते खेळाडू काय काय करतील...
मुद्दा फक्त हा की जिकंण्या सोबत तुझे खेळाडू पण समाधानी ठेवने कप्तानाच काम आहे नाहीतर RR / SRH गेला बाजार पाक सारखी अवस्था होते...
Pages