Submitted by सुप्रिया जाधव. on 21 January, 2019 - 14:52
तरही
ओळीसाठी बेफिकीरजी ह्यांचे आभार मानून...
पूर्वी तुझीच होते, अजुनी तुझीच आहे
(आहे तशीच होते, होते तशीच आहे)
काळानुरूप नाती बदलू नकोस मित्रा
दिनदर्शिका बदलते खुंटी जुनीच आहे
झाले बरेच झाले अश्रू झरून गेले
डोळ्यांमधे व्यथेला जागा हवीच आहे
प्रेमामधे स्वतःच्या पडते अश्याचसाठी
वर्षानुवर्ष जागा ती मोकळीच आहे
आयुष्यभर जिच्यावर विश्वास टाकला तू
ती साथ सोडणारी छाया तुझीच आहे
एकांतवास मिळता हे ही कळून आले
दोघांमधे तफावत आहे बरीच आहे
पूर्वी म्हणायचा जो आहेस फक्त माझी !
विसरून सर्व हे तो गेला कधीच आहे
ह्यांच्यातली समस्या ही वेगळीच आहे
तोही कवीच आहे तीही कवीच आहे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह वाह फार सुंदर...
वाह वाह फार सुंदर...
ह्यांच्यातली समस्या ही वेगळीच आहे
तोही कवीच आहे तीही कवीच आहे> किती मस्त! हे फार आवडले...
आयुष्यभर जिच्यावर विश्वास टाकला तू
ती साथ सोडणारी छाया तुझीच आहे> छान!
छान जमलिए!
छान जमलिए!
आयुष्यभर जिच्यावर विश्वास
आयुष्यभर जिच्यावर विश्वास टाकला तू
ती साथ सोडणारी छाया तुझीच आहे
>>>
अ प्र ति म _/\_
A1
A1
प्रचंड आवडली
प्रचंड आवडली
झाले बरेच झाले अश्रू झरून गेले
डोळ्यांमधे व्यथेला जागा हवीच आहे >> जबरा सुंदर
वाह खूप छान
वाह खूप छान
ह्यांच्यातली समस्या ही वेगळीच
ह्यांच्यातली समस्या ही वेगळीच आहे
तोही कवीच आहे तीही कवीच आहे>> सहीच !
दोघांमधे तफावत आहे बरीच आहे
दोघांमधे तफावत आहे बरीच आहे +१
Problem with reason is already mentioned.
मस्त आवडली
सगळ्यांना अंतःकरणापासून
सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद मंडळी
अप्रतीम गझल ताई!!!
अप्रतीम गझल ताई!!!
छान आहे.
छान आहे.
अप्रतिम !
अप्रतिम !
"प्रेमामध्ये स्वतः च्या पडते
"प्रेमामध्ये स्वतः च्या पडते अशाचसाठी
वर्षानुवर्षे जागा ती मोकळीच आहे "
हे खूप आवडले.
सुंदर...
सुंदर...
"प्रेमामध्ये स्वतः च्या पडते
"प्रेमामध्ये स्वतः च्या पडते अशाचसाठी
वर्षानुवर्षे जागा ती मोकळीच आहे " >> सुंदर!!
सगळेच शेर सुरेख. मक्ता फारच
सगळेच शेर सुरेख. मक्ता फारच आवडला.
- कुमार