Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54
पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! अंजली , तुमचा प्रतिसाद
वा! अंजली , तुमचा प्रतिसाद एकदम तोंपासू आहे .
मला बेदाणे टाकलेली बिर्याणीत
मला बेदाणे टाकलेली बिर्याणीत अजिबात आवडत नाही. बेदाणे टाकलेले असले की एकतर मी ते बाजूला करतो नाहीतर सरळ दुसरं काही असेल ते खातो.
Dry fruits are not added to
Dry fruits are not added to biryani.
अगदी सहमत बोकलत. गोव्याला मी
अगदी सहमत बोकलत. गोव्याला मी एकदा झिंगा बिर्याणी मागितली. त्याने आणली तेव्हा इतका मस्त सुगंध पसरला मसाल्यांचा आहाहा! त्याने माझ्या प्लेटमध्ये सर्व्ह करे पर्यंत मी शांतपणे वासाचा आस्वाद घेतला आणि मग तुटून पडलो. आणि धक्का बसला. बेदाणे होतेच, पण बिर्याणीही गोडसर होती. बेदाणे काढुन खाल्ली तरी बऱ्यापैकी गोड. चांगलाच विरस झाला. तरी खाण्याचा प्रयत्न केला, झिंगे संपवले पण पुढे जाईचना. शेवटी सोडून दिली.
बिर्याणी येई पर्यंत बराच उशीर लागल्याने लचं टाइम संपत आला होता तेव्हा अजून काही तिथे ऑर्डर करणे शक्य नव्हते, बाहेर स्टॉलवर सँडविच मिळत होते ते खाऊन कामाला परतलो.
मला वाटते तशी बिर्याणी खायची सवय व्हायला हवी मग चांगली लागत असेल.
अहो मानव, बिर्याणी गोड नसतेच.
अहो मानव, बिर्याणी गोड नसतेच. मधून मधून मसाल्यांचा स्वाद बॅलन्स करायला बेदाणे घासात आलेले छान लागतात. अमा, हैद्राबादी बिर्याणीत 'ड्रायफ्रूटस' घालत नसतील. आम्ही काजू आणि बेदाणे घालतो. ज्यांना आवडत नाहीत त्यांनी बाजूला काढावेत. पण फार मसालेदार बिर्याणी चांगली लागत नाही.
मधून मधून मसाल्यांचा स्वाद
मधून मधून मसाल्यांचा स्वाद बॅलन्स करायला बेदाणे घासात आलेले छान लागतात.>>> नाही हो नाही चांगलं लागत ते कॉम्बिनेशन. म्हणजे मला तरी आवडत नाही. शिरा खाल्ल्याची फिलिंग येते.
अंजली, तुमची रेसोपी मी पूर्ण
अंजली, तुमची रेसोपी मी पूर्ण वाचली नव्हती, त्यात काजू बेदाणे आहेत हे वाचलं नव्हतं आधी. मी गोव्याला जी खाल्ली ती गोडसर होती, बेदाणे काढुनही.
मी वर लिहिलंय ना, तसे खायची सवय झाली तर छान लागत असेल.
चांगलं लागत ते कॉम्बिनेशन.
विकतच्या बिर्याणी खाताना गोडसर लागली तर त्यात ॲप्रिकॅाट होते.
कोणत्यातरी बिर्याणी मसाल्यात जर्दाळू (ॲप्रिकॅाट) पाहिल्याचेही आठवते.
ड्रायफ्रूटस टाकले की तो
ड्रायफ्रूटस टाकले की तो पदार्थ शाही झाला असा एक भाबडा समज असतो.
अंजली , धाग्याचे नाव 'हेट
अंजली , धाग्याचे नाव 'हेट क्लब ' आहे.
उगा तोंपासू पोस्टी टाकून , मुळावर घाला करू नये
वरचे स्टेटमेंट भरपूर भाबडे
ड्रायफ्रूटस टाकले की तो पदार्थ शाही झाला असा एक भाबडा समज असतो.
>>>>>
वरचे स्टेटमेंट भरपूर भाबडे समज असलेल्या अनुभवी माणसाकडून.
मानव , काश्मिरी पुलाव ट्राय
मानव , काश्मिरी पुलाव ट्राय केलात का? एकदा आम्ही ट्राय केलेला .गोडसर आणि भरपूर द्रायफ्रूट टाकलेले
खाल्लाय थोडासा, बुफेत असतो
खाल्लाय थोडासा, बुफेत असतो उत्तरेत हॉटेल्समध्ये.
गोड भातामध्ये नारळी भात तेवढा थोडा आवडतो, गोडसर पुलाव नाही आवडत मला.
हा साला कोरोना यायच्या आधी
हा साला कोरोना यायच्या आधी गेले दोन तीन वर्ष अपवाद वगळता दर शुक्रवारी आमच्या ऑफिसमध्ये टीटीयमयम बेसिसवर चिकन बिर्याणी पार्टी ठरलेली. सहा पुरुषांत एक किलो तसेच आठ बायकांमध्ये एक किलो या हिशोबाने जितके बारा पंधरा जण जमायचो तेवढ्यात दोन अडीच किलो बिर्याणी मागवायचो. सोबत प्रत्येकाला दोन पीस चिकनचे स्टार्टर.
बिर्याणीत स्टॅण्डर्ड चिकन बिर्याणी हैदराबादी, तंदूरी, टिक्का, सीग कबाब, कोलकत्ता वगैरे सात आठ प्रकार आलटून पालटून मागवायचो. स्टार्टरही तंदूरी. लॉलीपॉप, कबाब, ६५, चिकन चिल्ली, चिकन साटे, चिकन लाडू असे विविध प्रकार मिळायचे.
दोन ठरलेले कॅटरर्स होते. दोन्ही मुस्लिम हा एक योगायोगच. दोघांचे आलटून पालटून मागवायचो.
आम्हीच नाही तर ऑफिसमधील सगळेच आपापल्या ग्रूपमध्ये मागवायचे. त्यामुळे दर शुक्रवारी सगळे ऑफिस वा कॅण्टीन बिर्याणीच्या घमघमाटाने दुमदुमून जायचे. जर एखाद्या शुक्रवारी आपल्या ग्रूपचा प्लान नसेल तर मग घरचा जेवणाचा डब्बा घश्याखाली ऊतरायचा नाही. त्यामुळे अशी वेळ कोणी येऊच द्यायचे नाही.
आता कोरोना पश्चात मात्र ऑफिसच तीन ग्रूपमध्ये विभागत प्रत्येक ग्रूप दोन दोन दिवस ऑफिसला येतो. त्यामुळे कोणाचा आधीचा एकत्र ग्रूपच जमतच नाहीये.
तरी आमच्या ग्रूपचा ऑर्गनायझर मी असल्याने जे लोकं शुक्रवारच्या ग्रूपमध्ये आहेत ते मला एखाद्या शुक्रवारी येऊया आणि बिर्याणीचा प्लान जमवूया अशी गळ घालत आहेत. जर जमवले तर प्रत्येकाच्या मनापासून ईतक्या दुवा मिळतील की एखाद्या हजयात्रेचे पुण्य पदरी जमा होईल
सांगायचा मुद्दा हा की गेले दोन तीन वर्षे अविरत वर्षाला किमान ४० शुक्रवार म्हणजे टोटल १०० चिकन बिर्याणी पार्टी झाल्या आहेत. पण कोणालाही कधी वीट आला नाही. एक चटक लागली आहे आमच्याईथे सर्वांनाच. त्यामुळे आम्हाला बिर्याणी आवडत नाही असे कोणी म्हटले की पचायला जड जाते
त्यामुळे आम्हाला बिर्याणी
त्यामुळे आम्हाला बिर्याणी आवडत नाही असे कोणी म्हटले की पचायला जड जाते >> कुणाला एखादा पदार्थ आवडत नाही असे कळल्याने तो पदार्थ आपल्याला पचायला जड जाणे हा मनोकायिक परीणाम झाला. मेडीटेशन करून पहा नक्की फायदा होईल.
चीन मध्ये लोक मला वैतागले होते. साप नको, वटवाघूळ नको, अमुक नको, तमुक नको, येऊन जाउन काय तर चिकन, मटण, मासे, व्हेज बस! त्यांनी त्यांच्या फोरमवर "जिव्हासुखाला मुकणारे लोक" असा धागाही काढला होता, सुदैवाने मला मंडारीन येत नसल्याने तो वाचावा लागला नाही.
पण त्यातील कुणी मी साप, वटवाघूळ वगैरेंना नाक मुरडतो म्हणुन त्यांना ते पदार्थ पचायला जड जातात असे कधी म्हटले नाही, आणि मस्त खायचे सुद्धा. मनाने स्ट्रॉंग असतील ते.
बिर्याणीही गोडसर होती>>>>
बिर्याणीही गोडसर होती>>>>
जाफरानी पुलाव!
@अंजली , काय वर्णन केलय !
@अंजली , काय वर्णन केलय ! त्या बिर्याणीला पण भारी वाटलं असेल.
खुप मस्त..! घरी मांसाहार वर्ज्य आहे पण मी बाहेर खाते अधुनमधून. तुम्ही केलेले वर्णन वाचुन आत्ताच खावीशी वाटतेय.
या धाग्याचा परिणाम म्हणून
या धाग्याचा परिणाम म्हणून "बिर्याणी" मागवून खाल्ली. तेव्हा जीव शांत झाला
बिर्याणी बाय किलो कोणी खाल्ली
'बिर्याणी बाय किलो' कोणी खाल्ली आहे काय? अंधेरीला आहे बहुतेक. सगळे ऍक्टर ऐक्ट्रेस इथूनच मागवून खातात.
आपल्याला परवडेबल असेल का मग
आपल्याला परवडेबल असेल का मग
>>> या धाग्याचा परिणाम म्हणून
>>> या धाग्याचा परिणाम म्हणून "बिर्याणी" मागवून खाल्ली.
धाग्याचा परिणाम पेक्षा, वरची तोंपासू रिसीपी वाचून आज रात्री आमच्याकडे पण बिर्याणी
हे हे अतुल . हेटर्स गॉना हेट
हे हे अतुल . हेटर्स गॉना हेट बट बिर्याणी रॉक्स
अतुल यांनी लिहिले आहे
अतुल यांनी लिहिले आहे हैदराबाद मध्ये दोन तीन ठिकाणी खाल्ली पण आवडली नाही... कुठे खाता हे महत्वाचे आहे...
दर्दी बिर्याणी रसिकांसाठी मी काही ठिकाणे सांगू इच्छितो -
1. शादाब - ओल्ड सिटी. चारमिनार के पास... बाहेर खडे चम्मच की चाय मिळते ती पण ट्राय करावी बिर्याणी नंतर...
2. Bawarchi ( ओरिजिनल) - ओरिजिनल बावरची गुगल करा, म्हणजे याचा पत्ता सापडेल...
हा इतका फेमस आहे की याचे हजारो डुप्लिकेट संपूर्ण हैदराबाद मध्ये पसरलेले आहेत... लाल बावरची, एअरपोर्ट बावरची, हरा बावरची... लक्षात घ्या फक्त ओरिजिनल बावरची मधेच जा.. अंबियन्स इतका चांगला नाहीय.. पण बिर्याणी झकास...
3. शाग हाऊस - इथेही चांगली बिर्याणी मिळते.. परदायिझ पेक्षा बेटर...
4.परदायिझ - चेन आहे... एझिली अवैलबल.. अंबियन्स मस्त... जाणकार सांगू शकतील कोणते लोकेशन चांगले बिर्याणी साठी.. मी एकदाच खाल्ली आहे इथे.. बंजारा हिल्स जवळच्या शाखेत...
अंजली च्या रेसिपी ने व्हेज/एग
अंजली च्या रेसिपी ने व्हेज/एग दम बिर्याणी अनेकदा केली आहे (मायनस रेझिंस) आणि उत्तम झाली आहे.
बाहेर उत्तम मिळण्याची खात्री असेल तरच बिर्याणी मागवावी. उगा पबलिक रंगीत भाताला बिर्याणी म्हणून खपवते आणि हेटर्स तयार होतात.
बिर्याणी लव्हर्स वर फार मोठी
बिर्याणी लव्हर्स वर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
बिर्याणी ग्रेट आहे हे सिद्ध करण्याची. सगळे कामाला लागा.
व्हीबींंनी प्रामाणिकपणे हा धागा काढला, अजून कोण बिर्याणी न आवडणारे आहेत हे पहायला.
पण मला या धाग्या वरील प्रतिसादांवरून वरून बिझिनेस आयडिया सुचली आहे.
माझी डोमिनोज, लिझा, पिझ्झा हट, पापा जॉन्स वगैरेंशी बोलणी सुरू आहेत. मी २०% मागतोय, ते १०% वरून आता १५% वर आलेत, अजून घासाघीस सुरू आहे माझी. लौकरच होईल फायनल.
मग मी पिझ्झा हेटर्स क्लब काढणार.
लोक मग धडाधड पिझ्झा ऑर्डर करणार. अचानक वाढलेल्या बिझिनेस वर मला २०% मार्जिन मिळणार.
मला मिळालेल्या इन्कम मधील 20% मी माबोकरांंना पार्टी देण्यास ठेवणार. कुठे, केव्हा, काय पार्टी द्यायची यासाठी धागा काढेनच.
कुठे फोडू नका ही आयडिया.
मी एकदाच खाल्ली आहे इथे..
मी एकदाच खाल्ली आहे इथे.. बंजारा हिल्स जवळच्या शाखेत...>>> अच्छा, तिथे खाल्ली होय. म्हणुन नसेल आवडली.
पॅराडाईज बिर्याणी ही सिकंदराबाद पॅराडाईज सर्कल वरील पॅराडाईझलाच खावी.
अजून खूप रेस्टॉरंट्स आहेत झक्कास नॉनव्हेज बिर्याणी साठी.
व्हेज मात्र वरील पॅराडाईझ मध्येच.
सिकंदराबाद पॅराडाईज सर्कल
सिकंदराबाद पॅराडाईज सर्कल वरील पॅराडाईझलाच खावी.>> किंवा अल कमिनो रियाल, Santa clara.
सांगलीमध्ये शेरखान्स दिल्ली
सांगलीमध्ये शेरखान्स दिल्ली दरबारमध्ये खाल्लेली बिर्याणी एव्हड्या परिसरातली सगळ्यात चांगली आहे.
शानच्या बिर्याणी मसाल्यात
शानच्या बिर्याणी मसाल्यात जर्दाळू असतो.
हैद्राबादला पण जर्दाळु असतात.
हैद्राबादला पण जर्दाळु असतात. पण बिर्याणीत नाही. तर "खुबानी का मिठा" या स्वीट डिश मध्ये. बिर्याणी खाऊन झाली की मग खुबानी का मिठा खायचे.
Pages