' काळ्या मेघाराजाने आभाळात दाटी-वाटी केली होती. वारा भिरभिर घिरट्या घालत होता. फक्त एका थेंबाच्या प्रतिक्षेत कुठेतरी एखादा चुकार चातकपक्षी आवासून आशेने नभाकडे टक लावून होता. शेवरीच्या झाडाची बोंड आता चांगलीच तयार झाली. त्यातून निघणार्या सफेद म्हातार्या गोल-गोल भिंगर्या घालत स्वच्छंद विहार करत होत्या. लहानपणी आम्ही त्यांनाच कपाशी समजायचो, आणि ही कपाशी म्हणजे कापसासारखी दिसणारी म्हातारी जेव्हा वार्याबरोबर उडायची, तेव्हा जो पहीला पाऊस यायचा त्याला म्हणायचो, 'कपाशीचा पाऊस'.
'कपाशीचा पाऊस'... वीज चमकावी तसं काहीस मला झालं. नको तो कपाशीचा पाऊस. नकोच त्या आठवणी. कधी काळी चिंब कोसळलेल्या त्या पावसाने पार भिजवून टाकल या मनाला, एवढं की आता भिती वाटते याची. '
‘पाऊस यायच्या आधी शाळा गाठावी .’ मी लगबगीने आपली पर्स सावरत पाय उचलला.
*****
" सुप्रभात बाई! "
सुप्रभात मुलांनो! म्हणत मी रजिस्टर हातात घेणार, एवढ्यात शिपाईकाका वर्गात येऊन टपकले.
" बाई तुम्हाला स्टाफरुममध्ये बोलावलं आहे. कालचे ते गणेश मानेचे पालक, तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत. "
" दामूकाका, गणेशचे पालक तर कालच त्याच्या मास्तरांना भेटून गेले ना! आता परत काय आहे? " मी आश्चर्याने प्रश्न केला.
" बाई जरा येऊन बघता का? :तुम्हालाच भेटायचं आहे,' असं म्हणतात ते. " म्हणत शिपाईकाका निघून गेले आणि मी सुद्धा त्यांच्या मागून केबिनकडे निघाले. गणेशच्या आई आणि तो स्वत: दोघेही आधीच तिथे येऊन माझी वाट पाहत होते.
" हा बोला! काय म्हणताय काकू." मी प्रश्न केला.
त्याच्या आई अगदी शांत होत्या, कधी बाजूच्या भिंतीकडे, तर कधी समोरील टेबलाकडे टकमक बघत त्यानी गणेशकडे पाहीले. पण एक शब्द ही त्यांच्या तोंडातून बाहेर पडेना.
" काकू जे असेल ते बिनधास्त बोला. तिकडे माझा वर्ग चालु आहे. मला लवकर जाव लागेल. " मी पाण्याचा ग्लास त्यांच्यापुढे करत त्याना बोलत करण्याचा प्रयत्न केला. दोन… पाच मिनिट अशीच शांतता पसरली. मग मात्र मी गणेशला बाहेर थांबायला सांगून त्या काकुंशी बोलले .
विषय नाजूक होता.
' दुसर्या वर्गातील एका मुलीशी गणेशचे प्रेम सूत जुळले आहे, अशी चर्चा शाळेत चालू होती, त्या मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापकांजवळ गणेश विरुद्ध तक्रार ही केली होती. त्यावेळी फार आरडाओरड आणि गोंधळ झाला होता. शाळेत या चर्चेस उधाण आले होते. प्रकरण जरा जास्तच चिघळले. या अशा प्रकारामुळे शाळेला नावं पडायला नको, बदनामी नको, म्हणून मुख्याध्यापकांनी सहमताने तडक गणेशचे नाव शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.'
यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये ही एकच शाळा... आपल्या मुलाचे शालेय नुकसान होऊ नये, ही त्या मातेची कळकळ होती.
मी गणेशला आतमध्ये बोलावल. खरेखोटे मला त्याच्या तोंडून ऐकायचे होते. १४-१५ वर्षाचे ते पोर, पण तो जे काही बोलला, ते ऐकून मला एक झटका लागला. " म्हणे… खरच आवडते मला ती, तिच्यासाठी खुप कष्ट घेईन, मोठा ऑफिसर बनेल, पण आता मी अभ्यासात लक्ष देईन, कोणालाच त्रास वगैरे होईल अस यापुढे वागणार नाही." त्याने प्रामाणिकणे सारं काही कबूल केल. अगदी कोणतीही गोष्ट न लपवता. मी देखील त्याला समजावलं. ' अद्याप तरी तू खुप लहान आहेस. पण समजूतदार आहेस. सध्या या सगळ्या गोष्टींपेक्षा अभ्यास महत्वाचा आहे. शिकून खुप मोठा हो.... बाकी सगळ्या गोष्टी त्या त्या वयामध्ये आपोआप होत जातात. मी मुख्याध्यापकांना समजावेन, पण लक्षात ठेव, यापुढे यासंदर्भात तुझी एकही तक्रार येता कामा नये. '
गणेश आणि त्याची आई निघून गेले. मी तडक आबांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना गणेशला एक संधी देण्यासंदर्भात विनंती केली. एका मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न होता. शिक्षण नाही तर त्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणार नाही. जिल्ह्याच्या शाळेत घालून त्याला शिकवण्याएवढी त्या माऊलीची परिस्थिती नव्हती. मी प्राध्यापक म्हणजेच आबांशी, त्या मुलाच्या भवितव्यासाठी एक संधी मागितली, पण आबांनी साफ नकार देऊन या विषयी काहीही न बोलणे पसंत केले. मी खजिल मनाने माझ्या वर्गाकडे जायला निघाले आणि तेवढ्यात कोणीतरी मला हाक मारली. आवाजाच्या दिशेने सहज लक्ष टाकले तर तिथे गौरी उभी होती. माझी एक हुशार विध्यार्थीनी.
" गौरी तू .... काय गं? वर्गात गेली नाहीस का? "
" नाही बाई, मी जिल्ह्याच्या शाळेत शिकायला जाते. आजच दाखला देऊन आले. खर तर तुमचे आभार मानायचे होते, म्हणूनच इथे आले. "
" आभार कसले गं? " मी अती आश्चर्याने प्रश्न केला.
" बाई गणेशला एक संधी दिल्याबद्दल आभार! तो भेटला होता मला. माझ्यामुळे त्याचे नुकसान होऊ नये, म्हणुन मी स्वतःच बाहेरच्या शाळेत शिकायला जाते. त्याला इथे शिकू देत. "
आजूबाजूचा कानोसा घेत तिने सगळे स्पष्ट केले होते. आता कुठे माझ्या लक्षात यायला लागले.
" बाई आम्ही चुकीच काही केल नव्हत हो! कधीतरी येताजाता भेटायचो, पण शाळेतल्या मुलांनी एकाच दोन करुन काय मनाला वाट्टेल ते सगळीकडे पसरावलंय. जेव्हा मिटिंग झाली, तेव्हा मला कोणीही काही बोलण्याची संधी दिली नाही. पण आता जेव्हा गणेशला एकट्यालाच दोषी ठरवून, शाळेतून काढणार समजले, तेव्हा मी सारे काही घरी सांगून टाकले, आणि स्वतःच शाळाही बदलण्याचा निर्णय घेतला. यापुढे कोणाला त्रास होईल अस अजिबात वागणार नाही. "
बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. परत एकदा आभार मानून ती जड पावलांनी निघूनही गेली.
खरतर आबांनी गणेशला शाळेत ठेवण्याची परवानगी तर दिली नाहीच. मला माझीच लाज वाटली, आणि तिच कौतुक. कारण आज तिच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा काही वर्षांपूर्वी मी दाखवला असता तर? तर असाच कोणतरी गणेश एकटाच दोषी ठरला नसता. पण तेव्हा ते साहस माझ्यामध्ये नव्हते. मी एका लाचारासारखे परिस्थिती पुढे हात टेकले होते. पण नाही ... आता नाही. आज परत आबांना मी जिंकू देणार नाही.
मी तडक निघाले ते मॅनेजमेंट कमिटीकडे. पण नेहमी प्रमाणेच आबा समोरच उभे होते. मी काही बोलण्याच्या आधीच त्यांनी मान डोलावली.
" मनू! गणेशला उद्या वेळेवर यायला सांग. आणि हो! दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखिल तो वर्गात पहिला आला पाहिजे, ती जबाबदारी तुझी. "
एवढं बोलून ते निघूनही गेले.
कदाचीत माझं आणि गौरीच जे बोलणं झालं ते त्यांनी ऐकल असाव. कदाचित परत एकदा त्यांना या गौरीची माझ्यासारखी मनू करायची नव्हती.
कदाचित तेव्हा अशीच एक संधी जर त्याला मिळाली असती तर? तो... तो...
' विसर मनू.... एवढी वर्ष झाली, पण तो अजूनही मनात तसाच आहे. स्वतःला जगापासून बंदीस्त करुन ठेवल मी, कोणाला आयुष्यात सामील करुन घेतल नाही. पण त्याला नाही विसरले, विसरता आलच नाही.
कुठे असेल तो? काय करत असेल? मी, मी आठवत असेन का त्याला? कदाचीत तो त्याच्या संसारात ही रमला असेल.'
मी माझ्याच विचारांत वाहत चालले होते. जुन्या कटू आठवणी उगाळत मुक अश्रू ढाळीत होते. अचानक जोराने विज कडाडली आणि क्षणात माझ्या मनात गोंधळ घालणाऱ्या सार्या विचारांची आहुती देऊन ती निघूनही गेली.
मला नको असणारा कपाशीचा पाऊस परत एकदा सुरु झाला होता, माझ्या मनात... आत... खोलवर… आणि बाहेर ही…
क्रमशः
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com
सुरुवात खूप छान आहे. येऊ दे
सुरुवात खूप छान आहे. येऊ दे पुढचे.
दुसर्या वर्गातल्या >> second
दुसर्या वर्गातल्या >> second standard OR another class? Confused...
बाकी सुरुवात छान आहे...
अप्रतिम सिद्धी
अप्रतिम सिद्धी
छान सुरुवात.. पुलेशु
छान सुरुवात.. पुलेशु
छान सुरुवात!
छान सुरुवात!
Apratim
Apratim
छान सुरुवात
छान सुरुवात
(अरेच्चा ही कोणती वात?)
रश्मी, पद्म, गौरी, मृणाली,
रश्मी, पद्म, गौरी, मृणाली, स्वाती, उर्मिला, किल्ली -
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
@ पद्म -
दुसर्या वर्गातल्या that means another class.... Not second standard
@किल्ली-
हि कापुस वात आहे गं.
सुरुवात छान झालीयं!!! पुढील
सुरुवात छान झालीयं!!! पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
छान आहे. कथा पूर्ण वाटतेय
छान आहे. कथा पूर्ण वाटतेय खरंतर, तरीही पुभाप्र
छान झाली सुरूवात पण बरेच
कथा पूर्ण वाटतेय खरंतर, तरीही पुभाप्र >>>+ १
पण बरेच टायपो आहेत.
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
नविन { शेवटचा भाग टाकला आहे. https://www.maayboli.com/node/77336 }
@ आसा
- टायपो सांगितले तर बर होईल.
कथा छान आहे वाचतेय
कथा छान आहे
वाचतेय
सुद्ध्या
सुद्ध्या
वैगरे
परिस्तिथी
समजुद्दार
मिट्टीन्ग
दोशी
प्रामाणकपणा
देखिल
बोलन
कदाचित
बंधीस्त
विज
धन्यवाद आसा....असेच
धन्यवाद आसा.बदल केला आहे...असेच मार्गदर्शन करत रहा.
पुलेशु
पुलेशु