लांबड कथा..

Submitted by मन्या ऽ on 8 April, 2020 - 13:17

लांबड कथा..

कोणतीही कथा वाचताना "यार! शेवट वेगळा हवा होता" किंवा "फारच ताणलीये राव कथा." असं वाटल असेल तर हा धागा तुमच्यासाठीच आहे.

तर लोक हो, महत्वाचं म्हणजे
या कथेला शेवट नसेल.

तेव्हा तुम्हाला हवे तसे ट्विस्ट कथेत टाका!
मग तो नवरसांचा विचार न करता टाकलात. तरीही चालेल.

नियम फक्त एकच ट्विस्ट टाकताना कथेची कंटीन्युटी ठेवा..
चला तर मग करुया लांबड कथेला सुरवात आपल्या पारंपारिक कथांच्या वर्ल्डफेमस ओळीने..

एक होत आटपाट नगर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत आपल्या दोन्ही हातांनी उचलून हडळीला राज्यात परत घेऊन येतात... बोकलतांनी वापरलेल्या अस्त्रामुळे हडळीला बोकलतांच्या जागी आशिक दिसत असतो... त्यामुळे ती ही खूश असतो... राज्यात त्यांच आगमन होताच लोक त्यांचावर फुलांचा वर्षाव करून दोघांच स्वागत करतात... तिकडे आशिक अजूनही आपण कशासाठी इथे आलोय याचा विचार करत बसतो... पण उत्तर सापडत नसत ..मग तो गपगुमान मंदीरातील प्रसाद तोंडात टाकत चालत निघतो... आणि काय आश्चर्य त्या सगळा घटनाक्रम घडाघडा आठवतो... कारण तो प्रसाद म्हणजै दुसरतिसर काही नसून असते आयुर्वेदीक शंखपुष्पी Proud ....

हे सर्व आठवून हडळीचा आशिक प्रचंड विलाप करतो. आता शेवटचा उपाय म्हणून तो नाशिकला प्रयाण करतो. तिथे सर्व त्याचे नाशिक ढोल वाजवून त्याचं स्वागत करतात. काही लोक तर ढोल वाजवताना त्याच्या टाळक्यातही काठ्या हाणतात.
आणि काय आश्चर्य, त्याला त्याचा ओरिजिनल पूर्वजन्म आठवतो आणि राक्षसमंदिरात दिसलेलं सगळं बोकलतच षडयंत्र असल्याचं लक्षात येत.

गम में डूबा हाडली का आशिकला नाशिक चिवड़ा पाहुन भूक अनावर होते.... पण ही भूक असते मानसिक तृप्तिची अर्थात चिवड़ा हां चकणा तर मिळाला पण प्यायला कुठले अपेय ह्या राज्यात मिळेल ह्याची चिंता त्याला भेड़सवत होती... इतक्यात त्याला दारु कशी प्यावी ह्याबाबत मायबोली संहितेत उल्लेख केलेले कटाप्पा वचन आठवले आणि मग... त्याचा शोध सुरु होतो चावी शिवाय कुलुप कसे उघडावे ह्याची मंत्रदीक्षा देणाऱ्या गुरुची कारण लॉक डाऊन मुळे सर्व राज्यात दारुची दुकाने बन्द असतात

हा आ ला आठवण येते आणी तो सुला च्या मागील दाराने आत घुसतो, आत काउंटर वर बसलेली व्यक्ति बघून हादरतो, कारण ती व्यक्ती म्हणजे साक्षात. .....

राजीव सामंत?
की संजीव पैठणकर?
कारण या दोघांनाच बघून सुलामध्ये कुणी सरप्राईज होऊ शकतं.
बाकी ऍक्टर नेतेमंडळी येतच असतात... Wink

ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची बायको संगीता असते. त्याला असं पाहून तिचा राग अनावर होतो.. एकतर किराणा दुकानं.. त्यात भल्या मोठ्या रांगा. हाच कमाईचा सिझन. आणि हा बाबा कुठे बोंबलत फिरत होता काय माहित. तिला वाटले बाहेर उंडागत फिरताना पाहून पोलिसांनी पकडून ठेवले असेल. तिझ्या जीवात जीव आला. तिकडे घरात कुरडई साठी गहू भिजायला घातले होते 3 दिवसा पासून. तेव्हा जे गायब झाला ते आता आलाय. बरेच झाले, रात्री चीक काढून घेईल आणि उद्या कुरडई झाल्या कि पापड लाटायला बसवेल. असं बडबडत त्याची बायको त्याच्याशी पुढील प्लॅनिंग करते..

नाही ते नाहीत, ती कदाचित असेल एखादी अज्ञातवासी व्यक्ती?
>>>
शक्यता असू शकते, कारण दारू न पिणारा असून सुलामध्ये सर्वात जास्त वेळ टाईमपास करणारा मी एकमेव व्यक्ती असेल Proud

सॉरी पाफा
मी ह्याबाबत ऋ च्या बाजूने
अपेय पानाचा
कट्टर विरोधी Happy

राजीव सामंत यांच्या आईचे नाव सुलभा, त्यावरून ठेवलंय "सुला."
पूर्ण नाव सुला वाईनयार्ड्स प्रायवेट लिमिटेड!

<<ती संगीता नसेल राधिका असेल मसाले कुटवणारी>> राधिका मसाले जिकडे तिकडे नाव होत आहे, म्हणून घरी हि राधिका बोलायला बोर होता. म्हणून हा आ तिझा नाव बदलून संगीता ठेवतो..

संगीता घरात बसून बसून १० किलोनी वजन वाढले म्हणून ते फार टेंशन मध्ये येते आणि अचानक लहानपणी केलेला एक खात्रीचा उपाय तिला आठवतो

दोरीवरच्या उड्या. खात्रीचा उपाय. नवर्याला १००० उड्या मारायला लावणे. त्याला आलेल्या घामाने आपल्या स्वतःच्या तळपायाला मालिश करणे. वजन निम्मे होते असा उपाय तीला आठवतो

पाफा Lol

वफहो असल्याने नवऱ्याला सर्व ट्रिक्स तोड़पाठ झालेल्या असतात त्यामुळे तो फक्त १ उड़ी मारून त्याची क्लिप रिप्लेवर ठेवतो आणि व्हाटस आप स्टेटस अपडेट करतो ...

तुझी माझी जोड़ी
झालीस कधी तू जाडी
घाबरू नकोस वेडी
मारतो मी दोरी उड़ी

असल्या तालबद्ध उड्या आपला नवरा सात जन्मात मारू शकत नाही हे चांगलंच माहिती असल्याने संगीता कावते व नवऱ्याला झोड झोड झोडपते...
नवरा म्हणतो, 'ये हडळ????'
म्हणून त्याला नाव पडलं हाडळीचा आशिक!

ते व्हॉट्सॅप स्टेटस बघते त्याची मांजर (मॅनेजर).
आज सकाळीच त्याने पोटात गडबड आहे तब्येत बरी नाही म्हणून wfh आणी Con call ला दांडी मारली असते.

हाडळीचा आशिक नावा मागे नक्की किती राज दडलेत ते कोणी सांगू शकत नाही.. कोणी म्हणे संगीता म्हणजे राधिका, तिझा नवरा गुरुवा शान्या नावाच्या हाडळीचा हातातील माकड झाला होता, आशिक झाला होता.. म्हणून त्याला हाडळीचा आशिक म्हणतात वगैरे

खुशादा, अज्ञा गाण्यांचा काय तो वापर! Lol

पार्श्वभागाचे संगीत>> :हहपुवा:

कथेत गहु-चिक, कुरडई-पापड आलंच शेवटी! Proud

धन्स अज्ञा! Happy
धन्स पाफा! Happy

Pages