Submitted by फारएण्ड on 3 September, 2010 - 00:35
विविध देशांतील इमिग्रेशन, कस्टम्स वगैरेंच्या नियमाबद्दलची माहिती मिळवण्याकरिता हा धागा उघडलेला आहे. एखाद्या देशात जाताना काय नेता येते, कोणत्या देशात्/विमानतळावर ट्रान्झिट व्हिसा लागतो ई. गोष्टींबद्दल येथे माहिती द्यावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मधूमेहाची औषधाबाबतीत: माझे
मधूमेहाची औषधाबाबतीत:
माझे सासरे, डॉक्टरची चिठठी घेवून यायचे. फ्कत विमानातला डोस घ्यायचे बरोबर चेक ईन मध्ये.
आणि काहि रीपोर्ट्स कॉपी कॅरी करायचे. जर काहि बर- वाईट झाले तर डॉक्टर भेटलाच विमानात तर त्याला बॅगग्राँउड माहिती असावा म्हणून. हे सर्व आम्हीच त्यांना सांगायचो. आणि ते आमचे नीट एकायचे (हे आमचे नशीब).
शक्यतो, आई वडीलांना कमीत कमी सामान आणायला सांगा.
जवळ आपल्या नावाची आणि शारीरीक आजाराची माहिती असलेली कॉपी ठेवा.
मिनिमम ईंग्लिश मध्ये बोलता येत नसेल तर शिकवा काही रोजचे प्रश्ण.
(एकाची आई ब्राम्हण होती आणि ती पुर्ण प्रवासात तिला काहीच बोलता येत न्हवते आणि काही बाही देतील म्हणून पाणी पिवून राहिली. अश्यांची मुलं इतकी मुर्ख का वागतात तेच कळत नाही.
तिला आधीच नीट समजावून सांगितले असते की, आई तुला चालेल तेच जेवण असेल ते खा.
थोडं फार ईंग्लिश सुद्धा शिकवत नाहीत.
तेव्हा हा मुर्ख मुलांचा प्रॉबलेम आहे.
धन्यवाद. कळवते त्यांना तसं.
धन्यवाद. कळवते त्यांना तसं. प्रवासाची काळजी नाही. आधी येवुन गेले आहेत. पण यावेळेस मला हापुस खायला घालायची जबरदस्त ईच्छा होती त्यांना म्ह्णुन विचारले. मी sprouts, Costco चे आंबे खाउन समाधानी आहे
मी sprouts, Costco चे आंबे
मी sprouts, Costco चे आंबे खाउन समाधानी आहे >> +१
हापूस मिळत नाही ते खरयं. पण मी आई बाबांना बजावून सांगितले होते काही फळं, लोणची आणू नका म्हणून. उगीच तिथे इमिग्रेशन ला कटकट नको. आणि फ्लाईट मध्ये आधीच इंडीयन व्हेजिटेरियन जेवण मागितले होते.
झंपी तुमचा त्रागा थोडा बरोबरच आहे.
झंपी, +१११ दोनदा अमेरिकेत
झंपी, +१११ दोनदा अमेरिकेत येताना शेजारी ज्ये. ना. होते आणि दोन्ही वेळा त्यांना इंग्रजी बोलता येत नव्हते. यथाशक्ती मदत केली मी पण अशावेळी मनात विचार येतो की थोडी पूर्वतयारी हवी. भारत-अमेरिका प्रवास बराच लांबलचक आणि कंटाळवाणा असतो. त्यात ज्ये.ना. साठी customs चे form भरणे वगैरे गोष्टी जितक्या सोप्प्या करता येतील तितक्या बऱ्या. मी ज्यांना मदत केली त्यांना form वर काय भरायचे आहे तेही माहिती नव्हते आणि आजोबांचे हात इतके थरथरत होते की त्यांना नीट लिहिताही येत नव्हते
मला जाम वाईट वाटलं!
राया, कृपया गैरसमज नसावा. तुमच्या पोस्टमुळे हे दोन प्रसंग आठवले इतकंच!
इथले आंबे खा... उगाच
इथले आंबे खा... उगाच आईवडिलांना संकटात टा़कू नये..
कित्येकदा ज्याना एकादी पिशवी उचलता येत नाही असे जेष्ठ नागरीक दगड भरलेल्या हॅण्डबॅगा घेऊन जाताना/येताना दिसतात. एकादा चांगला सहप्रवासी भेटला तर मदत करतो(आणि मनातून शिव्या घालतो) पण फार फरफट होते.. त्यांची मुले/नातेवाईक काय विचार करून त्याना असल्या बॅगा देतात कळत नाही... विषयांतराबद्दल क्षमस्व...
कित्येकांना आणि वर फुशारक्या
कित्येकांना आणि वर फुशारक्या मारताना ऐकलंय आम्ही बॅगेत हे घेऊन आलो, ते घेऊन आलो कोणी पकडलं नाही वगैरे वगैरे... कीव करावीशी वाटते अशा लोकांची
गोगा, नको नको म्हटलं तरी
गोगा, नको नको म्हटलं तरी हॅन्डबॅगेतच दगडच भरून न्यायचा हट्टच करणारे ज्येना पाहण्यात आहेत. उगाच मुला-नातेवाइकांना शिव्या घालू नका. असे हट्टी ज्येना आपल्या फ्यामिलीत नाहीत याचं समाधान माना.
चुकलेच.. हट्टी आईवडिल हा
चुकलेच.. हट्टी आईवडिल हा विचार मनाला शिवला नाही. ...
आमच्याकडे एका ज्येनाने १० पाऊंडचा कपड्यांचा साबण, पाण्याच्या २४ बाटल्या, जुनी भांडी, इत्यादी बॅगेतून नेण्याचा प्रयत्न केलेला पाहिला आहे..
अवांतरः इथे आलेल्या एकाच्या
अवांतरः
इथे आलेल्या एकाच्या आईवडिलांनी ट्रॉपिकाना ज्यूसच्या, कोकच्या रिकाम्या मोठ्या मोठ्या बाटल्या बॅगेत भरण्याचा सपाटा लावला होता. का तर भारतात प्यायचे पाणी भरून ठेवायला.
(कोणाच्या आईवडिलांना दुखवायचा हेतू नाही. पण त्यांनी हट्टाने नेल्याच थोड्याफार तरी)
भारतातून येणारे किंवा
भारतातून येणारे किंवा अमेरिकेतून बोलावणारे, कुणीही असो, 'चलता है' अॅटिट्यूड वाले असले, तर अडचणीचे प्रसंग जास्त उद्भवतात. आहेत ते नियम पाळावे आणी स्वतःचं आणी ईतरांचं जगणं सुसह्य करावं असं मला वाटतं.
हापूस ऑनलाईन मिळतात असं मला वाटतं. आणी पाठवणार्या कंपन्या कस्टम्स क्लिअरन्स वगैरे करून पाठवतात.
हापूस बाजारात सुध्दा मिळू
हापूस बाजारात सुध्दा मिळू लागले आहेत. पण पेट्या महाग, आणि बर्याच वेळा आतले बहुतेक आंबे कच्चे , डागाळलेले आणि खराब निघतात, त्यामुळे विकत घेणे थांबवले आहे..
अंजली_१२, अवांतर पोस्ट आवडली
अंजली_१२, अवांतर पोस्ट आवडली नाही. त्यांनी जे काय नेलं ते त्यांच्या सामानात, त्यांच्या हाताने, कुठलाही नियम न मोडता. मला जजमेंटल वाटली पोस्ट. क्षमस्व.
अमेरिकेतल्यांना बाकी फळे
अमेरिकेतल्यांना बाकी फळे अत्युच्च दर्जाची मिळतात ना... मग बास झाले ना, आंबे राहूदेत ना देशबांधवांसाठी. किती तो अप्पलपोटेपणा..;) दिवे..दिवे
लहानपणी जसे आम्ही आंबे खाताना
राया, रसाची साठं, वड्या किंवा
राया, रसाची साठं, वड्या किंवा तत्सम काहीतरी करून आणू शकतील.
गुड आयडिया, सांगते त्यांना
गुड आयडिया, सांगते त्यांना तसं,.
>>रसाची साठं, वड्या किंवा
>>रसाची साठं, वड्या किंवा तत्सम काहीतरी करून आणू शकतील.
अनुमोदन!
महिनाभरापूर्वी भारतातून आल्यावर घरी ब्यागा उघडल्या. TSAची 'ब्याग उघडून बघण्यात आली आहे'ची चिठ्ठी सापडली. या ब्यागेत सगळे खाण्याचे पदार्थ होते. कुटलेले मसाले, आंबाबर्फी, काजूकथली (आणि तत्सम मिठाया), बाकरवड्या, शेव, कोरड्या चटण्या असं सटरफटर होतं. पण काही प्रॉब्लेम आला नाही.
इमिग्रेशन ऑफिसर मात्रं तांदूळ, फळं, ग्रेन्स, इतर बिया, अख्खे मसाले, झाडं-पाला यांच्याबद्दल स्पेसिफिकली विचारते/तो.
तेही आता तरबेज झाले असावेत. 'मुलीच्या बाळंतपणासाठी आलो आहोत' असं सांगणार्या ओळखीतल्या ३-४ आयांच्या ब्यागा कस्टम्स्मध्ये उघडल्या. बाळंतशोपा, वावडिंग, डिंक सगळं फेकलं.
भारतातून खायचं सामान आणण्यापूर्वी हे वाचून घ्या:
https://help.cbp.gov/app/answers/detail/a_id/82/~/travelers-bringing-foo...
भारतात नवा आयफोन ७ नेणे
भारतात नवा आयफोन ७ नेणे स्वस्त पडेल का ? किती ड्युटी पडेल कुठे कळेल? असा कोणता नियम आहे का ज्यात ड्युटी नाही पडणार?
फोन पॉकेट मध्ये ठेव , कसलीही
फोन पॉकेट मध्ये ठेव , कसलीही डयूटी पडणार नाही .
पण वापरातले २ असतील आधीच....
पण वापरातले २ असतील आधीच.... एक स्वतःचा, कन्येजवळ तिचा.... मग?
मुलीचा मुलीकड़े दे , तूझे २
मुलीचा मुलीकड़े दे , तूझे २ तुझ्याकड़े .
माझ्याकड़े नेहमी माझे वापरात असलेले २ फोन असतात , मला कधीही प्रॉब्लम आला नाही . दोन्ही फोन वापरात असलेले ठेव् worst case सिनारियो साठी.
>>भारतात नवा आयफोन ७ नेणे
>>भारतात नवा आयफोन ७ नेणे स्वस्त पडेल का ? <<
पुर्वि किंमतीत फरक होता पण आता भारतातच आय्फोन बनवत असल्याने जास्त फरक नसावा (असु नये). दुसरी महत्वाची बाब म्हणजे वॉरंटी. आता कल्पना नाहि पण १-२ वर्षांपुर्वि इथे घेतलेल्या आय्फोनची वॉरंटी भारतात ऑनर करत नव्हते. याची खात्री करुन घ्या...
धन्यवाद श्री, राज. चौकशी करत
धन्यवाद श्री, राज. चौकशी करत आहे.
भारताने सगळे टुरिस्ट विसा १५
भारताने सगळे टुरिस्ट विसा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केलेत.
ओसिआय देखील स्थगित केले आहे.
ओसिआय देखील स्थगित केले आहे.
ओसिआय देखील स्थगित केले आहे. > ओसिआय वाल्यांची एन्ट्री पण बंद असे असावे ते.... मी भारतात आहे..ओसिआय वर
जे भारतात आहेत अश्या परदेशी
जे भारतात आहेत अश्या परदेशी नागरिकासाठी हा नियम नाही. पण जर काही कारणानी देशा बाहेर गेला तर परत येता येणार नाही. सिनिमात दाखवतात तसी चुकुन लॅड बॉर्डर क्रॉस केली तरिही १ महिना परत येता येणार नाही.
आणि भारतीय नागरिक असून काही
आणि भारतीय नागरिक असून काही दिवसांकरता परदेशी जावे लागले तर हा नियम लागू होतो का?
>> ओसिआय वाल्यांची एन्ट्री पण
>> ओसिआय वाल्यांची एन्ट्री पण बंद असे असावे ते..>> हो तसेच आहे. पत्रकात तारखा दिल्या आहेत.
प्राचीन, त्याच पत्रकात भारतीयांसाठी नियम लिहिलेत.
>>> आणि भारतीय नागरिक असून
>>> आणि भारतीय नागरिक असून काही दिवसांकरता परदेशी जावे लागले तर हा नियम लागू होतो का?<<<<
हेच विचारायचे होते.
भारतीय नागरिक आपल्या
भारतीय नागरिक आपल्या तब्येतीची जोखिम घेउन कधीही जाउ शकतात. त्याना कधीच बंदी येणार नाही. आणि जरी कुठल्या सरकारनी बंदी आणली तर कोर्ट एका दिवसात ती बंदी उठवेल. आपल्या घरात परत यायला बंदी कसली?
पण परत आल्यावर १४ दिवस आयसोलेट केले जाण्याची शक्यता आहे. विमान सेवा बंद झाल्यास काही दिवस परदेशात अडकुन पडण्याची शक्यता आहे.
Pages