Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ चंपा : हो.. चोंट्या छानच
@ चंपा : हो.. चोंट्या छानच अभिनय करतो. त्यात त्याची एक्झिट जवळ आली म्हणुन फुटेज जास्त मिळाल्याने आपण त्याच्यात अडकु लागलो आहोत. तुम्ही म्हणता तसं पोष्ट्या आणि चोंट्याची मोळी लवकरच बांधली जाणार. काही गरज होती का त्या पोष्ट्याला पाटणकरणीकडे कडमडायची पण नाही. जिथे-तिथे जाउन कडमडणारच. याची पत्रे त्याला आणि त्याची पत्रे याला असं करुन आक्खी हयात घालवली आणि आता रिटायरमेंटला टेकला तेव्हा कामाचा हुरुप आणतोय पोष्ट्या पाटणकरणीकडुन फुकट पत्रं सोर्ट करुन घेतली त्याने.
वच्छीने काढा मात्र योग्य रितीने केला होता पण कोळशाचं चाटण कशी काय घेऊन आली काय माहित. त्या सरिताच्या निदान तोंडाला ते काळं फासलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटुन गेलं मला.. काय ती सत्रांदा 'आये..आये.." ची आरडाओरड आणि काय ती ओव्हरअॅक्टींग. माईने तरी कशाला घरात ठेऊन घेतली असेल तिला काय माहीत. पहिलं बाळांतपण सासरी केलं होतं ना? मग आता दे ना माहेरी पाठवुन.. डोक्याला कटकट नुसती.
@ सुलु_८२ : आणि पिशाच्च?>> ते भूत-पिशाच्च जोडुन येतं असं माहित आहे. पिशाच्च योनीत जन्माला येणं हे पण ऐकलंय पण पुल्लिंगी म्हणुन त्याचा सेपरेट उल्लेख मी ऐकला नाही अजुन.
@ वेडोबा : तुम्ही म्हणाताय तसं ते आगरी समाजातलं जागुकाकींचं लिखाण वाचलेलं स्मरतंय मला. त्यांनी फोटोंसहीत साग्रसंगीत वडेपुराण अगदी निगुतीनं लिहिलं आहे.
तसेच वडे असतात त्या मालवण साईडला.. थोडा उन्नीस-बीस चा फरक असावा. मी दक्खनच्या पठारावरचा असल्याने कोकणातले बारकावे नाही सांगु शकणार. परंतु गेल्या ऑक्टोंबरात मालवण-सिंधुदुर्ग-तरकर्ली-देवबाग-आकेरी-सावंतवाडीच्या ट्रीप मधे एकदा कोंबडी+वडे आणि काळ्या वाटाण्याचं सांबार + वडे असं जेवण खाल्लेलं आहे. अतिशय भन्नाट असतात ते वडे. वेगळा प्रकार म्हणुन कायम स्मरणात रहातील.
सीरियल खूपच कंटाळवाणी होत
सीरियल खूपच कंटाळवाणी होत चालली आहे. पूर्वी खूप लक्षपूर्वक बघायचो. आता फक्त ऐकतो, बाकी फोनवर फेसबुक व्हाट्स प वगैरे चेक करता करता !
जरा स्लो चालू आहे म्हणा पण तो
जरा स्लो चालू आहे म्हणा पण तो वाडा, ते गाव, ती माणसं, ती पात्रं, ती भाषा सारं काही स्लोपणावर मात करतं
>> जरा स्लो चालू आहे म्हणा पण
>> जरा स्लो चालू आहे म्हणा पण तो वाडा, ते गाव, ती माणसं, ती पात्रं, ती भाषा सारं काही स्लोपणावर मात करतं<< अगदी बरोबर !!! सध्या सगळ्यात बेष्ट हीच शिरिल आसा
व्हय तर. माका तर ह्या शिरेल
अगदी बरोबर !!! सध्या सगळ्यात बेष्ट हीच शिरिल आसा Happy>> व्हय तर. ह्या शिरेल बघल्यावाचुन माका तर झोप येत नसताहा.
काल चोंट्या ताकाच्या गुत्त्यात गेला तर तिथे नेने वकील आणि रघु काकांनी त्याची पाटणकरणीने शिवलेल्या नव्या शर्टवरुन यथेच्च टर उडवली. त्यानंतर आण्णोबाने एंट्री घेतली व चोंट्याची मानहानी करुन त्याचा नवीन शर्ट काढायला लावुन पायदळी तुडवला. झाल्या प्रकाराने चोंट्या फार व्यथीत झाला.
इकडे वाड्यात माई तुळशीला प्रसन्न मुद्रेने पाणी घालताना दाखवली आणि घरात आबा वच्छीची जुगलबंदी. वच्छीच्या वेडावर पांघरुन घालत माईने तिला चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि आबाच्या डोक्यावर उपकाराची अजुन एक वीट रचली
तिकडे पाटणकरणीकडे २ इब्लिस गिर्हाईकं आली होती. त्यांनी तिला शर्ट शिवायला सांगण्याच्या बहाण्याने तिची मानहानी केली. दोघांनाही हाकलुन लावताना पाटणकरीण जाम वैतागली आणि रात्रभर पडवीच्या लोखंडी दाराला टेकुन तिथेच झोपली. आजच्या प्रेकॅपमधे ती रागावैतागात कपड्यांची बॅग भरुन आण्णाच्या वाड्यासमोर आलेली दखवली आणि वाड्यासमोर राहुन त्याला ललकारते असे दाखवले आहे.
या प्रकाराची लोकसत्ताने पण लागलीच दखल घेतली : https://www.loksatta.com/manoranjan-news/will-shevanta-get-entry-in-naik...
कालचा भाग खूप आवडला
कालचा भाग खूप आवडला सगळ्यांचाच अभिनय उच्च दर्जाचा होता. कधी नव्हे ती छायाचे कौतुक वाटले.अगदी योग्य वेळेला तिने प्रतिक्रिया दिली. माईनेही त्यामुळे रुद्रावतार धारण केला आणि तिने आण्णाचे पार माकड करून टाकले.
आज अपेक्षेप्रमाणे आण्णा उलटेल पाटणकर बाईची प्रतिक्रिया बघण्याची उत्सुकता वाढली
काल बॉम्बस्फोट झाला अण्णाच्या
काल बॉम्बस्फोट झाला अण्णाच्या वाड्यात ! अण्णा शेवंताचं लफडं आता वाड्याच्या उंबरठ्यात येवून ठेपलं !!!
शेवंताची आत्महत्या ¿
शेवंताची आत्महत्या ¿
रात्रीस खेळ चाले, &tv वर
रात्रीस खेळ चाले, &tv वर लागणार आहे "रात का हैं खेल सारा" या नावाने, पूर्ण गाणं हिंदी मध्ये दाखवला. 1st पार्ट दाखवणार आहेत.
कालचा भाग म्हणजे विस्फोट होता
कालचा भाग म्हणजे विस्फोट होता.
माईने रुद्र अवतारात एक घाव दोन तुकडे करुन ठेवले. वच्छी+आबाचा अवतार संपल्यात जमा आहे. झाल्याप्रकारात त्या दोघांना काही फुटेज असेल असे आता वाटत नाही तेव्हा आजच्या भागात ते मांगरात रहायला जातील असे वाटते.
पाटणकरीण एवढ्यात आत्महत्त्या करेल का..?
चोंट्या अन पोष्ट्या चा नंबर कधी लागेल काहीच कळात नाही.
कालचा व परवाचा भाग मस्त.
कालचा व परवाचा भाग मस्त. दागिने परत कपाटात गेले. अन्ना नाईक करून सवरून नामानिराळा.घु
वच्छी देव घेउन गेली का?
शेवंता व्हिक्टिम असल्याचे नाटक करते पण कोणतीही सिचुएशन स्वतःच्या फायद्यासाठी वळवण्याची हातोटी तिला आहे अपूर्वा हे छान अभिनयातून दाखवते. डोळ्यातले भाव, ओठ घट्ट करणे वगैरे. आता कधी मरणार?
वच्छी देव घेउन गेली का?>>
वच्छी देव घेउन गेली का?>> व्हय तर.. माका पण तसच वाटताहा. देवाक तिनेच नेला अशान. बाकीच्याक देव घेऊक जातलो पण वच्छीन देवाक नेल्यान
माईने देव गायब झाल्यावर पेटंट हंबरडा फोडला आणि प्रेकॅप मधे "ज्याने देव नेलेहा त्याक उभो चिरीन.. सौभाग्यवती इंदुमती हरी नाईक आसां मी" अशी धमकी पण दिली.
सौभाग्यवती इंदुमती हरी नाईक
सौभाग्यवती इंदुमती हरी नाईक आसां मी>>>>> खरं की काय???
राधिका गुरुनाथ सुभेदार आठवलं.
म्हणजे माई पण आता हातात बंदूक
म्हणजे माई पण आता हातात बंदूक धरून गोळीयो घालणार.
माईने आधी अडकवलेली बंदुक
माईने आधी अडकवलेली बंदुक काढुन हातात घेतली होती तेव्हा मला वाटलं आता आण्ण्याच्या छाताडावर रोखतेय की काय. पण झालं उलटंच.
तिने ती बंदुक आण्ण्याच्या हातात दिली आणि म्हणाली, "तिकां घरात घेउची असां तर माझो मुडदा वलांडुन येउक लागताहा.. घाला माका गोळ्यो..!" आण्णोबाचं कुत्रं करुन ठेवलं तिने कालच्या भागात. तिला काय गोळ्यो घालतोय आण्णा.
शेवंता बायच्या इब्लिस नाटकाचे
शेवंता बायच्या इब्लिस नाटकाचे प्रयोग सुरु झाले आहेत याचा अर्थ मालिकेतून निवृत्ती मिळाली असा धरला तर बहुतेक उद्याच्या शनिवारी शेवंता राम म्हणेल का?
बाकी पाटणकरणीची दया आली. बिचारीला आता घर देखील नाही. होते ते दागिने माईने घेतलेत. माधवाने देखील हात वर केलेत. नेने अन चोंगट्या किती अन कसं आधार देणारं कोण जाणे? दयनीय अवस्था
नेने आणि गुरव अण्णाला
नेने आणि गुरव अण्णाला शेवंताविरोधात आताच का भडकवतात? या आधी असं केले असते तर अण्णा आणि शेवंताचे प्रकरण पुढे गेले नसते ना?
काल शोभा भेटली आम्हाला.
काल शोभा भेटली आम्हाला. आमच्या इथे मालवणी जत्रोत्सव सुरु आहे . इथे आली होती. छान गोड मुलगी आहे. आम्ही तिच्यासोबत फोटो पण काढला.
काल शोभा भेटली म्हणजे तिचं
काल शोभा भेटली म्हणजे तिचं भूत दिसलं असं मला वाटलं छान, गर्दी असेल तिला भेटायला.
काल शोभा भेटली आम्हाला.
काल शोभा भेटली आम्हाला. आमच्या इथे मालवणी जत्रोत्सव सुरु आहे . इथे आली होती. छान गोड मुलगी आहे. आम्ही तिच्यासोबत फोटो पण काढला. Happy>> अरे वा.. . तिच्या इंस्टाग्राम वर फोटो पाहिले मी काल. तुम्ही पण इथे डकवा की तिच्या सोबतचा फोटो.
नको. मी चांगली नाही दिसतेय
नको. मी चांगली नाही दिसतेय त्या फोटोत
म्हणजे तिचं भूत दिसलं असं मला वाटलं>>>>>>>>> बापरे!
बाकी शनिवारी रात्री माईने
बाकी शनिवारी रात्री माईने तिचा पेटंट आरडा-ओरडा करुन आक्खा वाडा गदागदा हलवुन ठेवला.
पटणकरणीने रात्री वाड्यासमोरील पारावर झोपताना तुळशीपाशी माईने लावुन ठेवलेला दिवा उशाशी ठेऊन दिला. तिला तसे उघड्यावर झोपलेलं पाहुन आण्णोबा लगेच मध्यरात्री जिन्यावरुन उतरून तिच्याकडे जायला निघाला. मांजराच्या पावलाने येऊन वाड्याचा दरवाजा उघडणार इतक्यात माईने दिवाणखाण्यात पाय ठेवला आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त जरब बसवुन आण्णोबाला आल्या पावली जिन्यावरुन माघारी वरच्या खोलीत पाठवले. आण्णॉबावर विश्वास ठेवणे म्हणजे दारुगोळा भांडारात दिवा घेऊन फिरण्यासारखेच आहे हे हेरुन माई जिन्याच्या पहिल्या पयरीवरच बसुन झोपली. पहाटे तिला जाग आली तेव्हा तीने हळुच दरवाजा उघडुन बाहेर पाहिले तर पारावर पाटणकरीण नाही( ) . ते बघुन तिला हयसे वाटले आणि आन्हिकं आटोपुन तिने तुळशीला पाणी घालुन घरावर नसती आफत आणु नकोस म्हणुन साकडं घातलं.
पुन्हा घरात आल्यावर सगळ्या पोरांना आणि सुनेला बोलावुन घेतलं. सरिताला सांगुन सर्वांना च्याय प्याय्ला दिला, स्वतः पण पिली (हे असं पहिल्यांदाच घडलं ). सगळ्यांचा चहा पिऊन झाल्यावर पेटंट आरडा-ओरडा करुन सर्वांना रडायला लावलं. प्रसंग हलका करण्याचं काम छायाने केलंच. रडत रडत हसवण्याचा तो प्रसंग खुप छान जमला.
नेने वकिला करवी पाटणकरीण आण्णाच्या अडचणी वाढवुन ठेवेल असं वाटतंय. जरी इब्लीस नाटकांचे दौरे सुरु असले तरी तिचं काम इतक्यात संपायचं नाही. तिला पुर्ण आगतिक करुन जीव देण्याशिवाय पर्याय उरणार नाही तेव्हाच तिचं अवतार कार्य संपेल असं वाटतं. ह्या झोल-झमेल्यात चोंट्या आणि पोष्ट्याचं तिकीट कसं कन्फर्म होणार काय माहित.
चोंत्या आणि शेवंता चायनीज खात
चोंत्या आणि शेवंता चायनीज खात असतात तो भाग होता ना शनिवारी, हा भाग कधी झाला
शेवंताचे प्रयोग आता कोकणात (रत्नागिरी?)आहेत बहुतेक. गर्दी होईल नाटकाला.
चोंत्या आणि शेवंता चायनीज खात
चोंत्या आणि शेवंता चायनीज खात असतात तो भाग होता ना शनिवारी, हा भाग कधी झाला >> हो.. ते चायनीज खात असतात आणि त्यांना पाहुन लोकांची कुज्बुज सुरु होते. आण्णा सोबत फिरत असलेली बाई असा शिक्का मारुन ते बोलणारे लोक तिच्याबद्दल काहिबाही बोलतात. एवढंच झालं त्या सीनमधे.
काल माई फुल स्विंग मोड मधे..
काल माई फुल स्विंग मोड मधे.. आण्णाला माडीवर सकाळचा चहा नेऊन देताना दुपारी घरी जेवायला वेळेत या असा सज्जड दम दिला. ते जेवायला आल्याशिवाय घरात कुणालाही जेवण मिळणार नाही अशिही धमकी दिली. ते बोलणं कोडग्यासारखं ऐकुन घेत आण्णॉ ताकाच्या गुत्त्यावर जाउन आपली ही जी काय दशा झाली तिला पाटणकरीण जबाबदार आहे असे स्वतःशीच बडबडत राहिला. नंतर रागावैतागात पाटणकरणीच्या घरी जाऊन जोरजोरात दरवाजा ठोठावत हाका मारत राहिला तर आतुन एक जहांबाज बाई (नवीन भाडेकरु) बाहेर आली आणि आण्णाची सर्वांसमक्ष तिने जी हजामत केली की काही विचारु नका..!
मग आण्णा झुलत-झुलत वाड्यावर आला तर माई सोप्यात वाट बघत उभी. तिला पाहुन आधीच झुलणारा आण्णा पायरीवर जवळजवळ भेलकांडलाच. त्याला आधार देताना माईने पुन्हा एक फुल्टॉस टाकत आण्णाची विकेट घेतली. हातपाय धुवुन जेवायला बसा असं फर्मान सोडत ती घरात आली. छाया नेहमीप्रमाणे तिचं जेवण वाढुन घेत तिच्या खोलीत निघाली तेव्हा तिला माईने सर्वांसोबत तिथेच बसायला लावलं. आण्णा पण गपगुमान जेवायला बसला तेवढ्यात नाथा हातात पेढ्याचा बॉक्स घेऊन आला. माईने ते पेढे कुणी दिले म्हटल्यावर त्याने 'पाटणकर बाईंनी) असं सांगितल्यावर सर्वांचे घास अडकले. माईने इतरांना ताटावरुन न उठण्याची तकीद देऊन पेढ्याचा बॉक्स हिसकावत तरातरा अंगण गाठले... बघते तर काय पाटणकरणीने शेजारच्या घरात बस्तान बसवलंय..!!
पाटणकरणीने नेने वकिलांच्या मदतीने आण्णोबाच्या वाड्याच्या उजव्या बाजुलाच असलेल्या घरात मुक्काम हलवला आहे. ते घर नवीन बांधलेले/पुष्ट्याचे आहे जे आधी कधीच पाहिले नव्हते. कालच्या प्रेकॅप मधे आज माई पाटणकरणीचं वाट्टॉळं होईल म्हणुन शिव्या-शाप देताना दिसत होती. आण्णोबाने पाटणकरणीच्या घरचा रस्ता धरल्यावर त्याला रोखत "कुठं चाललात?" असं विचारल्यावर आण्णोबा, "मसनात..! येतंस..??" असं विचारतो.
बहुतेक आता पाटणकरीण शेर, माई सव्वाशेर अन आण्णा पावशेर असा मुकाबला पहायला मिळेल असं वाटतंय.
पाटणकरीण शेर, माई सव्वाशेर अन
पाटणकरीण शेर, माई सव्वाशेर अन आण्णा पावशेर
झी५ वर कालचा भाग काही केल्या
झी५ वर कालचा भाग काही केल्या दिसुन नाही राहिला नं भौ !!!
येईल.. येईल.. संध्यकाळपर्यंत.
येईल.. येईल.. संध्यकाळपर्यंत.
माईने अण्णांवर रॉकेल ओतले
माईने अण्णांवर रॉकेल ओतले असते तर अण्णा माईच्या परवानगीशिवाय बाथरूमलाही गेला नसता. पण छे! शेवंता मात्र मादक दिसते ते स्लीव्हलेस ब्लाउज ठेवणीतले आहेत का, दिसायचंय मादक आता रंगीत साड्या, परत कोणी त्रास दिला की पांढऱ्या साड्या. शेवंताचे आधीचे घर तरी कुठे महालासारखे होते, साधेच होते फक्त एक स्वयंपाकघर आणि पडवी जास्त होती. शिलाई मशीन कुठे गेली. छाया किती छान आहे, मस्त बोलते. सरिताचे डोके भारी चालते, बिचाऱ्या चोंत्याला भिजवून टाकलं.
मला DJ ना विचारायचंच होतं
मला DJ ना विचारायचंच होतं पाटणकरणीच्या घराबद्दल की असं घर खरंच आहे का? कारण इतके दिवस तर कधी दिसलं नाही. तुम्ही अकेरीला गेला होतात म्हणून विचारते.
Pages