Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बकाबका मिरच्या खायला लावल्या
बकाबका मिरच्या खायला लावल्या की त्याला >>>>>>>>> सलमान खान समजत असेल.
बादवे, एका प्रोमोत अण्णाला शेवन्तासमोर चक्क रडताना बघितल.
अण्णुच्या धोतरात तार्कर्लीचे
अण्णुच्या धोतरात तार्कर्लीचे खेकडे सोडायचे, जाम मज्जा येईल.
मला त्या दोघांचा रोमान्स
मला त्या दोघांचा रोमान्स पाहुन शिसारी येते.>>अनुमोदन सस्मित.
मालिका पाणीदार होत चालली
मालिका पाणीदार होत चालली आहे.
असेच सुरु राहिले तर कशासाठी बघावी असा प्रश्न पडेल
हो ना.. मला तरी तारकर्ली -
हो ना.. मला तरी तारकर्ली - देवबाग चां किनारा वाटला तो.. २ दिवस राहून आलो ना मी. आकेरीपासून तारकर्ली जवळ आहे शिवाय गोव्याईतकी गर्दी पण नसते. बघू खरं काय ते ३१ तारखेला कळेलच.
31 ला काय आहे.
31 ला काय आहे.
मला त्या दोघांचा रोमान्स
मला त्या दोघांचा रोमान्स पाहुन शिसारी येते.>>माझेही अनुमोदन सस्मित.
अण्णुच्या धोतरात तार्कर्लीचे
अण्णुच्या धोतरात तार्कर्लीचे खेकडे सोडायचे, जाम मज्जा येईल. Proud
Submitted by रश्मी.. on 27 December, 2019 - 07:37 >>>>>> nice idea रश्मी !!!!
आण्णा आणि शेवंता तार्कर्ली
आण्णा आणि शेवंता तार्कर्ली-देवबाग च्या समुद्र किनारी गाणं म्हणतानाचा टीझर काल सिरिअल च्या ब्रेक मधे दाखवला..! >>>>>>> कुठल गाणं? माझे राणी माझे मोगा का?
प्रोमो इतका बंडल वाटला त्या
प्रोमो इतका बंडल वाटला त्या समुद्रकिनाऱ्यावरचा, त्या दोघांना बघून मलाही शिसारी येते त्यामुळे ह्या सिरीयलच्या वाटेला कधी गेलेच नाही. तसंहि झी मराठी काढून टाकलंय पण झी 5 वर पण एखादा भाग बघावासा वाटला नाही.
ह्यातल्या पहिल्या सिझनमधली खून करणारी सून, सोनी मराठीवर आनंदी जग हे सारे मध्ये संग्राम समेळची आई दाखवली आहे.
१००० प्रतिसाद पूर्ण !
१००० प्रतिसाद पूर्ण ! अभिनन्दन !
आज महा एपिसोड आहे एक तासाचा
वच्छीला वेड लागलंय का.
वच्छीला वेड लागलंय का. शेवंताची चप्पल उचलली की नाही अण्णांनी. जाडजूड शेवंताला धावताना किती त्रास होत होता. ती मुंबईला जाणार होती ना.
चला हवा येऊ द्यामध्ये वच्छी किती छान दिसत होती, ओळखलं नाही पटकन तिला.
हो.. वच्छीला साधारण लो
हो.. वच्छीला साधारण लो कॅटेगरीतलं वेड लागलंय (माईला राखेचा १ मधे लागलं होतं तसंच... मेलेल्या माणासांचे भास होण्याचं..!) म्हणजे तिला फक्त शोभा तिच्या सोबत आहे असं वाटतंय इतकंच.. बाकी आबावर वस्स्कन ओरडणं वगैरे हरदासाचा गाडा मूळ पदावर आला आहे. तिला काल माईने वाड्यात नेली.
https://www.loksatta.com/manoranjan-news/year-end-2019-party-can-you-acc...
आण्णा आणि शेवंता महा एपिसोड मधे गोव्याला गेले.. कशातुन काय विचारता..? अहो, सिक्स सिटर रिक्षेतुन थेट गोव्यात...! आता बोला.. काही प्रश्न विचारायचे आहेत का आता..??
समुद्र किनारा देवबाग-तार्कर्लीचा नव्हता.. वेंगुर्ल्याचा असेल तर माहित नाही. गोव्याचा नक्कीच नव्हता.
कुठल्याशा देव़ळात देविपुढे मनातलं सगळं ओकुन पाटणकरीण आण्णाला तिच्या चपला हातात घ्यायला लावुन आकेरीत घरी परतली.. आणि ती गोव्यात (?) देवीच्या समोर मनातलं ओकत असताना आण्णाने लगोलग मार्केट गाठुन तिच्यासाठी गिफ्ट काय आणलं तर लालबुंद रंगाचा नाईट गाऊन..!
वच्छीचा टेंपो गेल्यासारखं
वच्छीचा टेंपो गेल्यासारखं वाटतंय.. ती कोणत्याही अँगलने वेडी वाटत नाही. तिला शोभा आसपास असल्याचा भास होतोय पण ते तसं तिला दाखवता येत नाही.
काल छाया कसली टरकलेली, मजा
काल छाया कसली टरकलेली, मजा वाटली खूप. आज मला वाटलं शेवंताच्या अंगावरच्या साडीला आग लागणार पण तसे काही झाले नाही. सोंत्या प्रपोज करतो की काय शेवंताला
ब्परवाचा भाग मिसला... आजच्या
परवाचा भाग मिसला... आजच्या भागा आधि झी५ वर पहायला हवे.
आज आण्णाला पाटणकरणीचं मुंबईल
आज आण्णाला पाटणकरणीचं मुंबईल जायचं तिकिट सापडणार बहुतेक.
एस.टी. चं तिकिट आहे तर माधव इन्ग्लिश मधे बोलुन ते बूक करत होता.. कहर आहे ना..? सावंतवाडीच्या स्टँड ला फोन केला होता की एस.टी.च्या टोल फ्री क्रमांकावर..??
अण्णा नवीन घर बान्धतोय
अण्णा नवीन घर बान्धतोय शेवन्ता साठी ! पण ती निघाली हुम्बय्स!
आजचा भाग खूप छान झाला, अत्यंत
आजचा भाग खूप छान झाला, अत्यंत उत्कंठावर्धक. माधव पाटणकरीन यांचा अभिनय मस्त. त्या दोघांच्या इतकच मलाही धडधडत होतं. पण तरी उद्या बहुतेक अण्णा पकडणारच यांना. :sad:
पाटणकरणीसाठी खूप वाईट वाटतंय....
हो ना... आज नक्कीच आण्णा तिला
हो ना... आज नक्कीच आण्णा तिला (की एस.टी. बसला ) पकडणार..
काल पाटणकरीण आण्णाच्या घरी शेवटचं भेटायला आलेली दाखवली तो क्षण खुप हुरहुर लावुन गेला.. ती सरिताशी समजुतीच्या स्वरात बोलताना, माधवशी उपकाराची भाषा बोलताना आणि माईशी गळाभेट घेऊन केलेल्या चुकांची माफी मागताना पाहिली तेव्हा कसतरीच झालं. आता तिला सुधारायचे आहे पण आण्णा सुधारु देत नाही अशी गत झाली. काहीही करुन ती आकेरीतुन सुटुन मुंबईस जावी (म्हणाजे इब्लिस नाटकाचे प्रयोग करण्यास वेळ मिळेल ) असं मनोमन वाटतं.
माधव पाटणकरीण बाईस सावंतवाडी स्टँड वर सावंतवाडी-चिपळूण-दादर बस मधे बसवताना दाखवला. प्रीकॅप मधे पाटणकरणीची बस स्टँडच्या बाहेर पडत असतानाच करकचुन ब्रेक दाबुन थांबलेली दाखवली. आता ती बस नक्की का थांबली हे आज कळेल.. आण्णानेच आडवली असणार यात शंका नाही.
ते सावंत वाडी चिपळून दादर
ते सावंत वाडी चिपळून दादर अशी अना उन्स मेंट होते ते इतके कसे तरी झाले. म्हणजे आपल्याला हे सर्व किती नॉर्मल आणि कोणासाठी तरी बिग स्ट्रगल फॉर सर्वा य वल असू शकते. कुठून गावातून ती आधीच अर्धवट फसवली गेलेली सुंदर बाई निघते. कुठे चिपळू ण कुठे दादर बिग बॅ ड मुंबई!!!!! असे फील्स आले. मला तर वाटले आण्णा आधीच बस मध्ये असतोय की काय.
हो हो अमा.. मलाही तसेच वाटले.
हो हो अमा.. मलाही तसेच वाटले.. आण्ण्या बस मधेच असेल असे अजुनही वाटतेय. आजचा भाग पहायची भिती वाटते.
इतके दिवस ही सिरिअल पाहिली कधीच त्या भुतांची आणि कुठल्याही सिन ची भिती वाटली नाही पण खरी भिती आज वाटतेय.
हो हो अमा.. मलाही तसेच वाटले.
हो हो अमा.. मलाही तसेच वाटले.. आण्ण्या बस मधेच असेल असे अजुनही वाटतेय. आजचा भाग पहायची भिती वाटते.
इतके दिवस ही सिरिअल पाहिली कधीच त्या भुतांची आणि कुठल्याही सिन ची भिती वाटली नाही पण खरी भिती आज वाटतेय. Uhoh >> अगदी अगदी मलाही अण्णा बसमध्ये असेल असे वाटले. आजच्या भागाची प्रचंड उत्सुकता वाटते आहे.
त्या शेवंताने आत्महत्या केली
त्या शेवंताने आत्महत्या केली ना, पहिल्या भागात उल्लेख होता, अण्णाला पोचवून तरी करायची किंवा न करता जेलात जायचं. त्या अण्णाला सर्वांनी सर्वाना पोचवून भरपूर जगायला मोकळं सोडलं खरंतर .
शेवंताचा यानेच खून केला असेल.
शेवंताची फार शोकांतिका आहे.
शेवंताची फार शोकांतिका आहे. ती शारिरिक संबंध, कपडॅ दागिने प्रॉपर्टीच्या मोहा पायी व आन्ना वर भाळून स्वतःचा संसार गमविते. नवरा जातो. वैधव्य किती अवघड. गोड मुलीचा सहवास गमविते शोभाच्या खुनात शामिल पार्टी. नवरा गेल्यावर इज्जतीत नोकरी करून लेकीला
वाढवले असते तर काय झाले असते. पण तरी ही त्याला नाचवण्याने जी पावर ट्रिप मिळते त्यासाठी तो मार्ग पण बंद होतो.
मग मुलगी दुरावली. आण्ण ने तिच्या भोवती जाळे कसत आणले आहे. तिचे स्वातंत्र्य पण गमविते. मग शेवटी गावात बोभाटा झाला की इज्जत पण हरवून शेवटी आत्महत्याच. व्हेरी बिग लर्निन्ग एक्स्पि रिअन्स धिस इज.
पाटणकरणीने कसेही करुन मुंबईला
पाटणकरणीने कसेही करुन मुंबईला सटकायला हवं..
आण्ण्या असा एकाएकी मेलेला नसायला हवा.. अभिरामच्या लग्नात त्याचा कोणीतरी विष/औषधाचा डोस देऊन मारलेला असावा (तो डोस वच्छीने दिलेला असेल तर भारी मज्जा..!!).. असल्या माणसाला सुखासुखी मेलेला नाहीत दाखवणार असं वाटतं.
माधवने पाटणकरणीच्या घरात
माधवने पाटणकरणीच्या घरात तिच्या समोरच आण्ण्याच्या काय सणसणीत कानफाड खाल्या.. बापरे.. अशा सणसणीत कानफाड मी प्रथमच पाहिल्या..
माधवास चांगल्या ४-५ कानफाड देऊन झाल्यावर पाटणकरीणने आण्ण्याला आडवत मानभावीपणे दम दिला की "हाण्णा, (ही बाई अधेमधे 'आ' चा उच्चार 'हा' काय करते कुणास ठाऊक..!) माधवच्या अंगाला हात लावाल तर खबरदार..! मी आजिबात खपवुन घेणार नाही हां..!"
स्वप्ना_राज आणि रश्मी.. वयनी
स्वप्ना_राज आणि रश्मी.. वयनी कुठं गेल्यात..? आज्काल फिरकत नाहीत.. स्वप्ना_राज यांच्या पोट धरुन हसवणार्या कमेंट्स मिस करतोय...
ही ही हीही. हो. पण त्याने
ही ही हीही. हो. पण त्याने तिची किती बारीक बारीक काळजी घेतली होती ते मला खुपच आवडले. बस लागली तर आवळा सुपारी आणि गोळ्या. पैसे, चार्ज केलेला, दोन नंबर लोड केलेला मोबाइल. जिथे जायचे तो पत्ता राहायची सोय. किती गोड परत मुंबई आहे ती कधी काय गरज पडेल माहीत नाही.... सो ट्रू.
मी एक मूल, दोन कुत्रे, मोठा ट्रक सामान फक्त एक जॉबचे प्रॉमिस एक रेंटेड फ्लॅट अशी मोठी मुव्ह एकटीने केली आहे त्यामुळे अश्या माधवाची व्हॅल्यु खूप वाटते. आजिबात सोपे नाही हे. पण शेवंताचे नशीब फुटके आहे. तिला वाट्ते ती रूल करते पण आपणच फसत फसत जाते.
@ अमा, तुम्ही म्हणता ते सगळे
@ अमा, तुम्ही म्हणता ते सगळे बरोबर आहे.. एकट्याने असा संसार शिफ्ट करायचा तर अंगी १२ हत्तींचं बळ (निदान मानसिक तरी) असायलाच लागतं.
पण त्याने तिची किती बारीक बारीक काळजी घेतली होती ते मला खुपच आवडले. बस लागली तर आवळा सुपारी आणि गोळ्या. पैसे, चार्ज केलेला, दोन नंबर लोड केलेला मोबाइल. जिथे जायचे तो पत्ता राहायची सोय. किती गोड परत मुंबई आहे ती कधी काय गरज पडेल माहीत नाही.... सो ट्रू.>> हो ना.. आपला माधव आहेच गुणी. (कुडतरकराचं पण किती बारीक लक्ष आहे पटकथा अन संवादांवर..!)
Pages