दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळदी-कुंकू बदक, प्लवा बदक
मी मागे सांगीतले होते की हे बदक एका पायावर उभे राहून, पंखात मान घालून झोपते. ही सगळी बदके निवांत झोपलेली आहेत. मी बराच वेळ तेथे होतो पण त्यांची थोडीही हालचाल झाली नाही. अशा अवस्थेत झोपलेले असताना मी काही बदकांचे डोळे उघडे असलेले पाहिले आहेत. (बाजूला टिटवी व तुतवार)

Spot-billed Duck (Anas poecilorhyncha)
Pune (Yerwada)
29 Dec (11:00 am)

चक्रवाक
मी या चक्रवाकला जेंव्हा सुरवातीला पाहीले तेंव्हा ते पार्श्वभाग वर करुन पाण्यात अन्न शोधत होते. त्या दिवशी मी त्यांचे डोके पहाण्यासाठी धडपडत होतो पण ते सारखे त्यांचा पार्श्वभागच दाखवत होते. त्यादिवसानंतर मी अनेक चक्रवाक पाहीले पण मला ती त्यांची पोझ काही पहायला मिळाली नाही. सोशल मिडीयावर चक्रवाकचे इतके फोटो येत आहेत, पण त्यातही मी पाहीलेल्या पोझचा एकही फोटो नाही. गुगलवरही फक्त एखादा फोटो दिसतोय. म्हणजे मला जरा स्पेशल इव्हेंट पहायला मिळाला की काय ते समजेना. Happy
मला वाटते नर हा मादीपेक्षा जरा मोठा असतो व त्याचा रंगही जरा ब्राईट असतो. येथे मादीचा रंग जरा फिका असलेला दिसतोय.

विषय निघालाच आहे तर तो upside down पोझमधला चक्रवाकांचा फोटो येथे देतो आहे. या अगोदरही मी या धाग्यावर किंवा निग या धाग्यावर हा फोटो दिला आहे.

टिबूकली
आज ही टिबूकली लोहगाव रोडला दिसली. पण तिला व्यवस्थित पहाता आले नाही. कारण वर दिलेला एक प्रसंग.

Little Grebe (Tachybaptus ruficollis)
Pune (Lohgaon)
29 Dec (10:00 am)

काळ्या डोक्याची शराटी
मी या शराटीला पहायचा खुप प्रयत्न केला पण ती नेहमी नदीच्या दुसऱ्या काठावर बसलेली असायची. आज मला जायला बराच उशीर झाला होता. या शराट्यांचे खाणे झाले होते व त्या नदीच्या मधल्या बेटावर येऊन पंख साफ करत होत्या. काही विश्रांती घेत होत्या. आज त्यांचे भरपुर फोटो काढता आहे. खाणे झाल्यामुळे मला ते चिखलातून अन्न कसे बाहेर काढतात व नक्की काय खातात हे पाहता आले नाही. पुन्हा केंव्हा तरी योग येईलच.
मला वाटत होते की उंच पाय असलेले पक्षी शक्यतो विश्रांती घेताना एका पायावर उभे राहतात. मात्र आज या शराट्यांना मी पंख साफ करताना पाहीले, जांभई देताना पाहीले पण ते एका पायावरच उभे राहून. मी मित्रांना विचारले, नेटवर शोधले पण या सर्व पक्षांचे एका पायावर उभे राहण्याचे नक्की कारण समजले नाही. काही म्हणतात की शरीर उबदार ठेवण्यासाठी ते एक पाय दुमडून घेतात पण ऐन उन्हाळ्यातही ते असेच पाय वर घेतात. काहीजण म्हणतात की एका पायावर त्यांना आरामदायक वाटते. मलाही हेच कारण योग्य वाटते.

Black-headed ibis (Threskiornis melanocephalus)
Pune (Yerwada)
29 Dec (10:30 to 11:30 am)
1.

2.

3. हे तर मला एखाद्या शिल्पासारखे वाटले. Happy

आज मोठा पाणकावळा, घार, चित्रबलाक, मोर शराटी, धोबी हे नेहमीचे पक्षी भरपुर होते.
चित्रबलाक (Painted Stork)

मोठा पाणकावळा (Great Cormorant)

एक थोडासा वेगळा दृष्टिकोन--

कोणत्याही प्राण्याचा डोळा आणि त्यातील बाहुली(IRIS) मोठी असेल तर तो प्राणी किंवा पक्षी निरागस निष्पाप दिसतो.

याउलट डोळा लहान असेल किंवा डोळ्यातील बाहुली (IRIS) लहान असेल तर तो प्राणी किंवा पक्षी लबाड किंवा रागावलेला दिसतो.

हीच स्थिती लहान मुले किंवा कुत्र्याची / मांजराची पिल्ले/ हरणाचे पाडस किंवा वाघ सिंहांचे छावे यात दिसेल. त्यांचे डोळे शरीराच्या मानाने मोठे असतात आणि डोळ्याच्या बाहुल्या विस्फारलेल्या असतात त्यामुळे ती सर्व फार छान/ गोंडस / CUTE दिसतात.

आता या धाग्यातील अनेक पक्षांची अनेक सुंदर प्रकाशचित्रे पहा. त्यातील छोटे पक्षी त्यांचे डोळे मोठे असल्याने छान/ गोंडस / CUTE दिसतात (उदा. वरच फोटो असलेला चक्रवाक).

आणि ज्या पक्षांच्या बाहुल्या लहान आहेत आणि त्या भोवती पांढरे वर्तुळ आहे ते लबाड किंवा रागावलेले दिसतात (उदा पोपट ).

खरे सर छान निरीक्षण:)
शाली जी चित्रबलाका चा फोटो अप्रतिम आलाय..सगळेच फोटो मस्त...

सुबोध खरे, तुम्ही म्हणता ते खरे आहे. बरेचदा मानवी भावांचा आरोप केला की पक्ष्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दिसतात. मला तारवाली भिंगरी (Wire-tailed Swallow) ही मिश्किल हसते आहे असेच वाटते नेहमी. स्ट्रॉबेरी फिंच नेहमी चिडलेली दिसते. पक्षी प्राणीही आपल्याविषयी असेच समज करुन घेत असतील. चिडलेल्या कत्र्याकडे पाहून हसले तर तो नक्की हल्ला करतो. कारण दात दाखवणे म्हणजे आव्हान देणे असा अर्थ असतो त्यांच्यात. Lol

सिद्धि, वेडोबा, देवकी धन्यवाद!
देवकी, हो तो चक्रवाक मलाही खुप आनंदी आणि समाधानी (?) चेहऱ्याचा वाटतो नेहमी.
थँक्यू ऋतुराज!

मागच्याच नोंदीत मी पक्ष्यांच्या पाय मुडपून बसण्याविषयी लिहिले होते. सकाळी आठवले की फक्त लांब पायाचेच पक्षी असे बसत नाहीत तर मी या अगोदर शिक्रा, गांधारी या पक्ष्यांनाही पाय दुमडून बसलेले पाहीले आहे. लांब पाय असलेल्या पक्ष्यांचे दुमडलेले पाय लक्षात येतात पण लहान पक्ष्यांचा दुमडलेला पाय पोटाजवळ असतो व तो पिसांमुळे दिसत नाही. सुरवातीला खाटीकच्या पोटावर मला नेहमी टोकदार भाग दिसायचा. सर्च करुनही त्याचे उत्तर मला मिळाले नव्हते. एक दिवस त्याने तो पाय लांब करुन आळस दिला तेंव्हा समजले की तो दुमडलेला पाय आहे.
आज मी सुगरणीलाही पाय दुमडून ज्वारीच्या कणसावर बसलेले पाहीले. तिन चार सुगरणींनी असेच पाय दुमडले होते. इतक्या लहान आकाराच्या पक्ष्यांना पाय दुमडायचे काय कारण असावे? आणि सध्या फक्त मादी सुगरणींचाच थवा कसा काय दिसतोय? नर वेगळा थवा करुन राहत असतील तर त्यांचा थवा का दिसत नाही? की प्लुमेजमुळे नराचे डोके पिवळे होते व नॉन ब्रिडिंग नर व मादी यांच्यात काही फरक नसतो का? उत्तरे शोधावी लागतील.

पाय दुमडून बसलेली सुगरण.

आजकाल सुगरणीदेखील विजेच्या तारांचा उपयोग बसण्यासाठी करताना दिसतात. त्यांच्याही सवयी परिसरानुसार बदलत असणार.

लांब शेपटीचा खाटीक
सध्या हे खाटीक बरेचसे कमी झाले आहेत. त्यांची जागा आता गांधारीने (Bay-backed Shrike) घेतलेली दिसते. सुरवातीला गांधारीचे फार क्वचित दर्शन व्हायचे व खाटीक मात्र प्रत्येक झाडावर, तारेवर बसलेला असायचा. आता हे प्रमाण उलट झाले आहे. गांधारींच्या पाठीही पहिल्यापेक्षा जास्त गडद दिसत आहेत. कदाचीत तरुण पिढी असावी.

Long-tailed Shrike ( Lanius schach)
Pune (Devrai)
31 Dec (7:00 am)

डोमकावळा
आजकाल आजूबाजूला दिसणारे हे डोमकावळे माणसांना अजिबात घाबरत नाहीत. त्यांच्या अगदी शेजारून गेलो तरी अगदी नाईलाज असल्यासारखे दोन उड्या मारुन जरा बाजूला सरकतात इतकेच. हा कावळा दिसायला अजिबातच देखना नाही. गावकावळा मात्र लक्षपुर्वक पाहीला तर छान दिसतो. त्याची काळी आणि राखी रंगसंगती व निटनेटके बसवलेले केस सुंदर दिसतात. या डोमकावळ्याचे डोकेही जरा मोठे असते. त्याची चोचही डोक्याच्या मानाने जरा मोठी असते व त्यात भरपुर ताकद असते. मी लहानपणी शाळेतून घरी येत असताना अचानक दोन कावळ्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. त्यातल्या एकाने जोरात माझ्या डोक्यावर चोच मारली होती. अक्षरशः शर्ट रक्ताने भरला होता.

Jungle Crow (Corvus macrorhynchos)
Pune (Devrai)
31 Dec (7:00 am)

याला ओरडताना पाहीले की मला वाटते की तो म्हणत असावा...
आम्ही काय कुणाचे खातो रे
तो राम आम्हाला देतो रे.
.............. Lol

आज दोन कंठवाले पोपट बांबूच्या बेटावर खुप निवांत उन्हं खात बसले होते. मात्र खुप अंतर ठेवून बसले होते.
सकाळी सकाळी भांडण? पक्ष्यांची भाषा येत असती तर त्यांचा रुसवा काढला असता. Lol
Rose-ringed parakeet
Pune (Devrai)
31 Dec (8:00 am)

.

काळा गोविंद
हा माझा नेहमीचा मित्र. हा नाही दिसला तर मॉर्निंग वॉक पुर्ण होत नाही माझा. आज देवराईच्या पलिकडील शेतात मेंढरांचा वाडा पडला होता. त्यांची घोडी तेथेच चरत होती. त्यामुळे आज म्हशींच्या पाठीवर बसुन फिरायच्या ऐवजी या काळा गोविंदाची घोड्यावरुन शिकार सुरु होती.

Black Drongo (Dicrurus macrocercus)
Pune
31 Dec (8:30 am)

गप्पीदास
Siberian Stonechat (Female)
Pune (Devrai)
31 Dec (7:30 am)

मस्त!!

(कोणास क्रेस्टेड हॉक ईगल बघायचा असेल तर व्हॅलीत आलाय, गुरुदत्त हॉटेलच्या समोरच्या झाडावर वस्ती केलीय त्याने Wink

अन व्हॅलीत सकाळी 7 30 कडे गेलात तर शिक्रा अन पराडाईज फ्लायकॅचर दिसण्याचे चान्सेस भरपूर आहेत))

गेल्या 7-8 दिवसात धागा वाचुन काढला. काही पक्षांचे फोटो तर खुपच गोडुले आलेत..
आमच्या खिडकीत ऑक्टोबर-नोव्हेंबर मधे पक्ष्यांनी घरटं बनवायला सुरवात केलेली. डिसेंबर मधे दोनाची एकदम सहा दिसली पण नेमक कुणी केलय ते नाही कळालं..

धन्यवाद रॉनी! मी दोन दिवसात व्हॅलीमध्ये जाणार आहे. हे हॉटेल नाही सापडले तर तुम्हाला मेसेज करेन. माझा मोबाई नंबर 98223 28882 आहे. तुमचा नंबर दिलात तर संपर्क करणे सोपे होईल. किंवा तुम्ही सोबत आलात तर आपली ओळखही होईल. मी अजून पॅराडाईज फ्लायकॅचर पाहीला नाहीए.

थॅंक्यू मन्या!
पक्ष्यांचे वर्णन केलेस तर कोणता पक्षी आहे हे सांगता येईल.

अप्पा, तुम्ही निग धाग्यावर दिलेला ठिपक्यांची मनोली सारखा जवळपास दिसत होता.. पण मी प्रत्यक्षात मनोली याआधी पाहिली नाहीये.
पक्ष्याचा आकार चिमणीपेक्षा किंचित छोटा होता आणि तपकिरी रंग होता.नर आणि मादी दोघांच्या पोटावर मनोली सारखीच डिजाइन होती. पण पिलांच्या पोटावर मात्र ती नव्हती..
सध्यातरी इतकच आठवतंय.

आत्ता थोडीफार जालावर शोधाशोध केल्यावर हे सापडल. पण जालावर दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांचा ब्रिडींगचा काळ साधारण जुन-ऑगस्ट असा आहे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Scaly-breasted_munia

मन्या ती ठिपकेवाली मुनीयाच असणार. तिची पिल्ले सिल्व्हर बिल सारखी दिसतात. जरा गडद तपकीरी असतात. छातीवर काहीही ठिपके नसतात. आजकाल या मुनिया बाल्कनीत घरटे करुन राहतात.
ब्रिडिंगचा काळ मी बदलताना पहिलाय खुपदा. त्यामुळे त्याच काळात ते घरटे बांधतील असे नाही.

मुनिया च असावा.. ब्रिडींगमधे पक्ष्यांचा रंग थोडाफार बदलत असेल..

ते जोडप आता कधीतरी संध्याकाळी एखाद दुसरी फेरी मारत.. जमलच तर फोटो काढुन पोस्ट करेल इथे! Happy

Pages