एग्झॅम माझी चालू होती, बर का वैशूमावशी
अभ्यासातनं मला नवती फुरसत म्हणुन कशी !
तश्शी, जशी आर्या होती बिझी, नाइ का तेव्हा ?
सांगा मं मी तुमच्याशी बोलणार होते केव्हा?
संपत आली आता, उद्या पेपर आहे लास्ट
उद्यानंतर असेन फ्री बोलायला बिन्धास्त
काल होता बर का माझा ड्रॉइंगचा पेपर
काढाय्चे होते शीवाजीम्हाराज घोड्यावर
तेवढे काढुन आणखिनपण काढला एक किल्ला
झेंडा सुध्दा काढुन त्याच्या रूफवर ठेवला
म्हाराजांना फायटिंगला जायची होती घाई
म्हणुन दारात उभ्या केल्या म्हाराजांच्या आई
म्हाराजांच्या तोंडापुढं काढला फुगा मोठा
आणि मग फुग्यात लिहलं "मासाहेब, टाटा"
निशा मॅडम हसल्या, म्हटल्या, "लव्हली, इट्स फाईन"
आउट ऑफ टेन, मार्क त्यांनी मला दिले नाईन
आईईग्ग! आहे आरिथ्मॅटिक पेपर अजून बाकी,
आजोबांच्या मते मला झीरो मार्क नक्की
पेपरमध्धे सम्स नकोत यायला म्हणजे झालं
एवढ्यासाठी गॉडला मी आइस्क्रीम प्रॉमिस केलं
-तुमची बनुताई
कित्ती मस्त आणि गोड चित्र तर
कित्ती मस्त आणि गोड
चित्र तर एकदम झक्कास, मझ्या कडुन तर बनुताईला १० पैकी १०० मार्क
किती गो$$$$$$$$ड बनूताई,
किती गो$$$$$$$$ड बनूताई, कविता व चित्रसुद्धा
व्वा छानच आहे चित्र आणि
व्वा छानच आहे चित्र आणि कवितापन.....
वॉव ! माझ्याकडून बनुताईला १०
वॉव ! माझ्याकडून बनुताईला १० पैकी १० मार्क...वर एक मोठ्ठ चॉकलेट !
मुकुंददा कविता नेहमीप्रमाणे निरागस आणि स्वीट !
मां साहेबांना टाटा करणारे
मां साहेबांना टाटा करणारे महाराज खूप खूप मस्त!
कविता नेहेमी प्रमाणे गोड गोड. खूप आवडली.:)
बनू ताई कडून चॉकलेट मिळवायला म्हणून देव बप्पा नक्किच बिना सम्स चा अरिथ्मॅटिक पेपर काढायला लावणार निशा मॅडमना!!
मासाहेब टाटा गॉडला मी
मासाहेब टाटा
गॉडला मी आइस्क्रीम प्रॉमिस केलं
मजा आली वाचायला!
चित्र मस्त आहे. तो घोडा
चित्र मस्त आहे. तो घोडा गालातल्या गालात हसल्यासारखा वाटतोय
सहीच कवीता आणि चित्रपण ती माँ
सहीच कवीता आणि चित्रपण
ती माँ साहेब टाटाची आयडीया फार भारी आहे बनुताईची.
मस्त आहे. ) चित्र कोणी
मस्त आहे. :))
चित्र कोणी काढलंय? ते पण छान आहे.
ती माँ साहेब टाटाची आयडीया
ती माँ साहेब टाटाची आयडीया फार भारी आहे बनुताईची.>>>>> मोदक.
कविता अगदी गोड आहे. चित्र पण भारीच्चे.
कित्ती गोSSSSड आहेत बनुताईंचे
कित्ती गोSSSSड आहेत बनुताईंचे म्हाराज आणि कविता सुद्धा.
मस्त आहे कविता. चित्रही
मस्त आहे कविता. चित्रही सुरेख. "मासाहेब टाटा" एकदम सही.
आणखी येऊदेत.
"मासाहेब टाटा" आवडलं .
"मासाहेब टाटा" आवडलं .
कसल गोड लिहिलय. आणि चित्र पण
कसल गोड लिहिलय. आणि चित्र पण खुप क्युट एकदम.:)
खुप गोड ड्रॉईंग आहे, फारच
खुप गोड ड्रॉईंग आहे, फारच छान..!!!
गालातल्या गालात हसणारा घोडा
गालातल्या गालात हसणारा घोडा मस्त आहे
माझ्याकडून बनुताईला ही रंगपेटी बक्षिस
चित्र आणीए कविता दोन्ही छान ,
चित्र आणीए कविता दोन्ही छान , "मासाहेब टाटा" एकदम सही.
मासाहेब टाटा खासच. बनुताईंनी
मासाहेब टाटा खासच. बनुताईंनी काढलेल चित्र एकदम झक्कास आणि कविता पण गोड
किती गोड! 'मासाहेब टाटा' एकदम
किती गोड! 'मासाहेब टाटा' एकदम ऑरिजिनल! क्यूट आहे बनुताई!
कसली सही आहे ही बनूताई.....
कसली सही आहे ही बनूताई..... मस्तंच एकदम.
खूप क्यूट गाणे आणि चित्र..
खूप क्यूट गाणे आणि चित्र.. फारच आवडले
मासाहेब टाटा >>>>
लय भारी...
लय भारी...
मासाहेब टाटा >>> या आयडिया
मासाहेब टाटा >>>
या आयडिया लहान मुलांच्या डोक्यातूनच निघू शकतात. एकदम ओरिजिनल! मस्त आहे चित्र आणि कविता, दोन्हीना १० पैकी १०.
फारच छान....
फारच छान....
वा फारच छान. चित्र तर
वा फारच छान.
चित्र तर अतिउतकृषट.
सिध्दार्थ.
मासाहेब टाटा, हळुच हसणारा
मासाहेब टाटा, हळुच हसणारा घोडा, किल्ल्याच्या दारात एक हात कमरेवर घेऊन उभ्या मासाहेब, ते चार दिशांना उडणारे चार पक्षी... संपूर्णं चित्रं आणि कविता एकदम झक्कास.
मी प्रिंट करून ठेवणार चित्रं!
मस्तच. कित्ती गोड आहे ही
मस्तच. कित्ती गोड आहे ही बनुताई. कविता पण बनुताईंइतकीच गोड. फार्फार आवडली.
चित्राला खळखळाट.
बनुताईला तर तीट लावाच पण कवितेला एक तीट लावते.
कवितेला एक निरागस रिदम आहे. फक्त पुढच्या ओळीत तो गंडलाय.
>> काढाय्चे होते शीवाजीम्हाराज घोड्यावर
तिथं "काढाय्चे होते 'त्यात' शीवाजीम्हाराज घोड्यावर" असं केलं तर मिटर ठीक होतोय बहुतेक.
खूप गोड आहे कविता अन चित्रपण
खूप गोड आहे कविता अन चित्रपण आवडले.
सगळ्या मावश्या, काक्या,
सगळ्या मावश्या, काक्या, आत्या, काका, मामा मंडळीना,
खूप खूप धन्यवाद.
-बनुताई, बाबा, आई आणि आजोबा.
लहान मुलीचे कल्पनाविश्व अचूक
लहान मुलीचे कल्पनाविश्व अचूक रेखाटलेय...
सुंदर कविता
Pages