त्याग भाग ( १ते ५

Submitted by Swamini Chougule on 4 December, 2019 - 11:31

भाग १

अनिकेत बस स्टॉप वर उभा होता त्याच ऑफिस सुटायल आणखीन वेळ होता पन त्याला ऑफिस च्या कामा निमित्त एके ठिकाणी जायचे होते. म्हणून तो बस स्टॉप वर आला होता. पन तो मनगटावरील घड्याळात सारख- सारख पाहत होता आणि रस्त्याकड पाहत उभा होता. कदाचित तो कोणाची तरी वाट पाहत असावा. तेवढ्यात बस आली आणि तो बस मध्ये चढणार एवढ्यात मागून कोणी तरी त्याला आवाज दिला.

" अनिकेत अरे थांब"

अनिकेत ने मागे वळून पाहिले ती अविका होती जीची अनिकेत इतका वेळ वाट पाहत होता तीच ती . अनिकेत थोडा नाराजीनेच तीला पाहत तसाच उभा राहिला आता अविका त्याच्या जवळ आली होती आणि ती बोलू लागली,

" sorry अनिकेत मला यायला उशीर झाला पन काय करनार आज काम खूप होते ऑफिस मध्ये आणि ते टाळता ही येणे शक्य नव्हते I am sorry "

आता अनिकेत थोडा नाराजीच्या सूरातच बोलू लागला,

" काय करनार तुलाच काम असतात, ऑफिस असते मी काय रिकामटेकडा मला कुठे काम असतात."

अनिकेत च्या अशा बोलन्याने अविकाचा गोरा चेहरा पार उतरला व ती बोलू लागली.

"sorry म्हणाले ना मी किती कुचक बोलशील आणि आता भांडनार आहेस का तू ? मला सांग भांडनार असशील तर मी निघते ."

अविकाच्या अशा बोलण्याने अनिकेत थोडा वरमला आणि घड्याळ पाहून तीला म्हणाला,

" थांब तुझ नेहमीचेच आहे हे ; मला ऑफिसच्या कामा निमित्त एके ठिकाणी जायचाय पन अजून आर्धा तास आहे आपन समोर coffee shop तेथे जावून बोलू चल , " तशी अविका ची कळी खुलली आणि तीने नुसती मान हलवून होकार दर्शवला आणि त्याचा हात हातात घेउन ती आणि अनिकेत coffee shop कडे निघाले तेथे गेल्यावर अनिकेत ने दोन coffee order केल्या आणि ते गप्पा मारत coffee घेऊन निघाले . अनिकेत ने घड्याळ पाहिले आणि अविका ला बस स्टॉप वर सोडले आणि तो बस ने त्याच्या कामासाठी निघाला अविका ने बस ची वाट न पाहता रिक्षा ने घरी गेली.

ईकडे अनिकेत बस मध्ये बसला आणि त्याचे विचार चक्र सुरू झाले तो दोन वर्षे माग गेला. त्याला सगळे आठवू लागले.

अनिकेत आणि अविका ची भेट अशीच एका बस मध्ये झाली होती. बस मध्ये खूप गर्दी होती आणि दोघे ही बसण्यासाठी जागा शोधत होते. दोघांची ही नजर एकाच रिकाम्या सीटकडे गेली आणि दोघे ही एकदाच त्या सीटकडे धावले पन तेथे कोण बसनार ह्या कारणावरून दोघांन मध्ये भांडण लागले. अनिकेत म्हणाला , " मी आधी सीट पाहिली म्हणून मीच सीटवर बसणार"

अविका ," पन मी पहिल्यांदा सीटपाशी आले ही सीट माझी आहे"

यातच दोघांचा वाद लागला आणि तेव्हढ्यात एक आजी येवून सीटवर बसल्या मग काय दोघांना ही आपला प्रवास उभ राहूनच करावा लागला.

अविका पंचवीशीतली तरुणी होती आणि अनिकेत आठ्ठवीस वर्षांचा होता तेव्हा

दोघांच्या ही ऑफिस ची वेळ एकच होती आणि ते दोघे एकाच बस ने जात असत . भांडनानी झालेली ओळख मैत्रीत कधी बदलली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही कळले नाही आणि आता ते दोघे दोन वर्षांपासून रिलेशनशिप मधे होते.

ईतक्यात कंडक्टर ने बेल वाजवली आणि अनिकेत तंद्रीतून जागा झाला . त्याचा स्टॉप आला होता तो बस मधून स्वतःशीच हसत बाहेर पडला.

अविका दिसायला सालस होती . गोरीपान केसांचा स्टेप कट आणि गोल चेहर्याची ,गुंडगुळ्या आंगाची थोडी स्थूल तरी ती स्थूलता तीला शोभून दिसायची. अनिकेत सावळ्या रंगाचा नाकी -डोळे नीटस उंचापुरा चरचौघात उठून दिसनारा तरुण होता. अविका उच्च मध्यम वर्गीय घरातली होती. तीच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि ती स्वतः आता चांगले कमावत होती घरात तीचे आई -बाबा व एक भाऊ होता. तोही एका कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर होता. बाबा रिटायर्ड ऑफिसर एकूण काय तीला कोणत्याही गोष्टी ची कमी नव्हती ती सूखवस्तू कुटूंबातली मुलगी होती.

अनिकेत ची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती त्याला चार बहीनी व तो एकटाच मुलगा होता . वडील शेती करत चार ही बहीनींची लग्न झालेली . अनिकेत इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरी निमित्त नागपूरला आला होता. त्याला चांगला job मिळाला होता .त्याला नागपूरात येउन चार वर्षे झाली होती. आता तो नागपूर ला चांगला स्थिरावला होता . तो त्याच्या आई -बाबांना नागपूरात घेउन येण्याचा व अविकाशी लग्न करण्याच्या विचारात होता.

अनिकेत आणि अविकाची अशी धावती भेट आठोड्यातून चार - पाच वेळा ठरलेली असायची. रविवारी मात्र ते दोघे मिळून फिरायला जायचे.

एकूण काय अविका आणि अनिकेतच्या आयुष्यात सगळ अलबेल होत .त्यांचे छान चालले होते पन नियतीच्या मनात काही वेगळच होते............

(क्रमशः)

भाग२

अन्विकाच्या आई बाबांनी आता अन्विका साठी स्थळे पाहूयच ठरवलं आणि त्यांनी त्यांचा निर्णय अन्विका ला ऑफिस मधून गेल्या गेल्या सांगितलं.

अन्विका चे बाबा ,"अन्विका आम्ही दोघांनी तुझ्या लग्नासाठी स्थळें पहायचे ठरवले आहे . असं ही तू आता अठ्ठावीस वर्षांची झालीस .खर तर हा निर्णय घ्यायला जरा उशीरच झाला पण कही हरकत नाही.येत्या वर्ष भरात तुझं लग्न होईल. आम्ही उद्याच एका म्यारेग ब्युरो मध्ये तुझं नाव नोंद करून येवू ,पाहू त्यांच्या कडे चांगली स्थळे आहेत का ते,ऐकतेस ना ?कधी पासून मी एकटाच बडबडतोय "

अन्विका इतका वेळ तिच्या बाबांचं बोलणं शांतपणे ऐकत होती . ती आता बोलू लागली ,

"ऐकतेय तुमचं मी बाबा ,पण एव्हढी काय घाई आहे ?थांबा थोडे दिवस मग लग्ना बद्दल विचार करू"

इतका वेळ दोघा बाप- लेकीचं बोलणं ऐकत असलेली अन्विका ची आई आता मधे पडली.

आई " काय बोलतेस अन्विका तुझं वय अठ्ठावीस झालं आणि घाई काय विचारतेस ?चांगला मुलगा मिळू पर्यंत दोन वर्षे अशी निघून जातील आणि तू तीस वर्षांची होशील ; काय घाई झाली म्हणतेस"

अन्विका " मला आत्ताच लग्न नाही करायचं so don't force me"

असे बोलून अन्विका पाय आपटत तिच्या रुम मधे निघून गेली .अन्विका चे आई - बाबा तिच्या कडे पाहतच राहीले .लग्नाचा विषय काढल्यावर अन्विका अशी वागेल याची त्यांना काल्पना नव्हती.

अन्विका रूम मध्ये गेली पर्स टाकली आणि फ्रेश झाली. आता तिला जरा बरं वाटलं .मग तिने अनिकेतला फोन लावला ,

अन्विका , "हॅलो, अनिकेत मी बोलतेय

अनिकेत , " काय? आज चक्क तू मला इतक्या लवकर फोन केलास का? आज खूप आठवण येतेय माझी ; दोन तासा पूर्वी तर भेटलोत आपण "

( असे म्हणून अनिकेत हसू लागला)

आता अन्विका जाम चिडली " कर माझी चेष्टा कर ,तुला कुठल्याही गोष्टी चे गांभिर्य नाही"

तिचा चिडका आवाज अनिकेत ने ओळखला

अनिकेत ," अग हो हो एवढं चिडायला काय झालं तुला?

अन्विका ," आई - बाबा माझ्या साठी स्थळे पाहतायत"

अनिकेत ,' काय? अनिकेत जागेवरून उडालाच

अन्विका ," तू मला उद्या आपल्या नेहमीच्या कॉफी

शॉप मध्ये भेट ;आपण या विषयावर बोलू ओक बाय "

अनिकेत ," ओक बाय पण ते three magical words बोल ना एकदा "

अन्विका , " मला इथे टेन्शन आलाय आणि तुला रोमांस सुचतोय " अन्विका जरा रागातच बोलली

अनिकेत ," ठीक आहे नको बोलुस ; तुला माझ्या प्रेमाची कदरच नाही ; लेकिन हमारे जैसा आशिक तुम्हें दूसरा नहीं मिलेगा मेरी जाना ; हम मजनू के खानदान से ताल्लुक रखते हैं ।" असे म्हणून अनिकेत हसू लागला

अन्विका ," हा हमें मालूम है जनाब लेकिन हम भी लैला के खानदान से हैं; मेरी जान I love you"

अन्विका च टेन्शन जरा कमी झालं होतं अनिकेतशी बोलल्यावर

अनिकेत ," हाय इसी अदा पे तो हम फ़ना हो गये मेरी जान I love you too ok by आणि टेन्शन घेऊ नकोस , उद्या आपण यातून नक्की काही तरी मार्ग काढू , ok good knight जान स्वप्नात नक्की ये माझ्या "

अन्विका ," ok by तुला बोलून टेन्शन कमी झालं माझं

अशा ही क्षणी तूला रोम्यांस कसा सुचतो देव जाणे "

अनिकेत ," हम तो ऐसे ही है by "

अन्विका ," स्वतःचीच तारीफ करून झाली असेल तर ठेवते फोन मी by "

आणि अन्विका ला आई ने जेवायला हाक मारली

असे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन जीव सुखी जीवनाची स्वप्ने पाहत होते पण त्यांना काय माहीती होत की क्रूर नियती त्यांच्या सुखस्वप्नांन चा घास घ्यायला बसली आहे

( क्रमशः)

भाग ३

दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर ते दोघे ठरलेल्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये भेटले ,अन्विका अगोदरच कॉफी शॉप मध्ये बसून अनिकेतची वाट पाहत होती. तिला अनिकेत दारातून आत येतांना दिसला. बाहेर पाऊस पडत होता हवेत गारवा होता .

अनिकेत ," अरे अन्विका तू आज चक्क लवकर येऊन माझी वाट पाहतेस ! किती छान "

अन्विका , " हो का ? तुला छानच वाटत असेल ना "

( ती जरा नाराजीने म्हणाली )

अनिकेत , " बर तू काय घेणार ते सांग ऑर्डर करतो "

अन्विका , " काही गरज नाही मी दोन हॉट कॉफीची ऑर्डर दिली आहे आत्ताच आणि किती भिजलास तू तुला छत्री आणता येत नाही बरोबर"

अनिकेत , " बर ते राहू दे ऐक मी एक निर्णय घेतलाय आपण दोघे लग्न करू "

अन्विका , " काय ? ( अन्विका जवळ जवळ किंचाळली त्यामुळे कॉपी शॉप मधले बाकीचे लोक तिच्या कडे पाहू लागले )

अनिकेत , " ओरडतेस काय ? जरा हळू बोल "

अन्विका , " मग काय करू ? हे बघ मी तुझ्या बरोबर पळून वगैरे येणार नाही "

अनिकेत , " मी काय म्हणतोय ते तर ऐक , आज घरी गेल्यावर तुझ्या आई बाबांना विश्वासात घेऊन आपल्या बद्दल सांगून टाक ते काय म्हणतात ते आपण पाहू मग पुढेच ठरवू काय करायचं ते , माझ्या घरून विरोध होणार नाही पण तुझ्या घरून होऊ शकतो हे तुला ही माहिती आहे "

अन्विका , " हो मला त्याची कल्पना आहे पण मी आज धाडस करून आई - बाबांना आपल्या बद्दल सांगते .मग पाहू काय म्हणतात ते .

अनिकेत ," बर , मग तू आज सांग घरी मग पाहू ,कॉफ घे आपण निघू "

अन्विका ने होकारार्थी मान हलवली दोघांनी कॉफी घेतली आणि ते घरी जायला निघाले .

अन्विका घरी आली आणि संध्याकाळी तिने जेवताना तिचा आणि अनिकेत चा विषय काढला . आई - बाबांना आणि भावाला तिने तिच्या व अनिकेत बद्दल सगळे सांगितले . तसच अनिकेत ची सगळी माहिती त्यांना सांगितली.

आई - बाबा आणि तिच्या भावाला हे सर्व अकल्पित होते . त्या मुळे ते स्तब्ध झाले .थोडया वेळाने ते सावरले आणि बाबा बोलू लागले.

बाबा ," दोन वर्षां पासून हे सगळं सुरू आहे तुझं आणि तू हे आम्हांला आत्ता सांगतेस ?ते ही आम्हीं तुझ्या लग्नाचा विषय काढल्यावर"

( बाबांचा आवाज आता चढला होता ते रागाने लालबुंद झाले होते.)

अन्विका ," बाबा माझं ऐकून तरी घ्या " ( अन्विका आर्जव करून बोलत होती)

बाबा , " काही बोलू नकोस ,तो मुलगा कुठला ? कोण कोणत्या धर्माचा ? वर तूच म्हणतेस त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे . तू आपल्या सुखवस्तू कुटुंबात वाढलेली .तुझ्या साठी आम्हीं खूप मोठी स्वप्ने पाहिलेली पण तू ती धुळीस मिळवलीस . मला हे नाते मान्य नाही विसरून जा त्याला " अन्विका , " ते शक्य नाही " (अन्विका ठामपणे म्हणाली)

आई , " चांगले पांग फेडलेस पोरी आमचे "

(अस म्हणून रडू लागली)

अन्विकाच्या घरून तिच्या प्रेमाला विरोध होणार हे अन्विका आणि अनिकेत दोघांना ही माहिती होते .तशी कल्पना होती दोघांना . घडलेला प्रकार अन्विकाने रूम मध्ये गेल्यावर अनिकेतला फोन करून सांगितला व ती रडू लागली .अनिकेत फोन वर अन्विकाला समजावत होता.

अनिकेत ," रडू नकोस अन्विका आपल्याला या गोष्टी ची कल्पना होती . तू धीर सोडू नकोस मी उद्या तुझ्या बरोबर येईन तुझ्या घरी तुला मागणी घालायला"

अन्विका, " तुझा अपमान करतील बाबा;ते खूप चिडलेत , आता नको , बाबांचा राग शांत झाला की मग एक दिवस तुला मी घरी घेऊन जाईल .आपण उद्या नेहमीच्या ठिकाणी भेटू "

अनिकेत , " ठीक आहे पण तू रडू नकोस ओक बाय काळजी घे good knight "

अन्विका , " by take care gn "

अन्विका सकाळ पासून ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. ती कोणाशीच एक शब्द सुध्दा बोलली नाही . ती ऑफिस साठी बाहेर पडणार तेव्हढ्यात बाबांनी तिला हाक मारली . ती काही ही उत्तर न देता थांबली .

बाबा , " हे बघ अनु बेटा तो मुलगा तुझ्या लायकीचा नाही तू त्याला विसर आणि आज पासून तू त्याला भेटायचं देखील नाही "

अन्विका काही ही उत्तर न देता ऑफिसला निघून गेली .

ऑफिस मध्ये गेल्यावर बॉस ने अन्विकाला बोलवून घेतले व अचानक तिच्या हातात ट्रॅव्हल च एक तिकीट दिल व सांगितले कि तिला दोन वाजता नाशिक ला जायचे आहे तेथे एक सेमिनार आहे

तो अटेंड करण्यासाठी कंपनी ची रिप्रेसिनटेटिव्ह बनून जायचे आहे . खर तर ते स्वतः जाणार होते .पण त्यांच्या आईची तब्बेत अचानक बिघडली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचे होते म्हणून त्यांनी अन्विकाला पाठवायचे ठरवले होते .बहुदा तिला रिक्वेस्ट केली होती

अन्विकाचा ना इलाज झाला. ती जायला तयार झाली नाशिकला . ती आता नाशिकला जाण्यासाठी तयारी करण्यासाठी घरी निघाली . तिने जाता जाता अनिकेतला

म्यासेज टाकला कि आज भेटायला जमणार नाही आपण परवा भेटू मला अचानक कामा निमित्ताने नाशिकला जावं लागतय.

ती घरी गेली .तिने ब्याग पॅक केली.आईला सांगितले ती कामा निमित्ताने नाशिकला जातेय

आई , " अचानक अस नाशिकला जायला कसं सांगितलं तुला तू नाही का नाही म्हणालीस बॉसला तुझ्या?

अन्विका , " अग आई बॉस चा प्रॉब्लेम झालाय आणि चोवीस तासांचा तर प्रश्न आहे . तू बाबांना आल्यावर त्यांना ही सांग "

अन्विका बस स्टँड वर गेली आणि बस मध्ये जावून बसली. अन्विका निघाली होती नाशिकला पण नियतीने तिच्या साठी भलतच ठिकाण योजल होत

क्रमशः

भाग ४

चार दिवस झाले तरी अन्विकाचा पत्ता नव्हता . ती नाशिक वरून परत आलीच नव्हती . अन्विकाचे

आई -बाबा काळजीत होते . तिच्या शोधात होते . ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या बाबांना कळले की अन्विका सेमिनार मध्ये पोहचलीच नाही ,बरं तिचा फोन ही बंद होता बाबांनी व भावाने पोलीसात तक्रार केली

जेंव्हा बाबांना कळले की ती सेमिनार मध्ये गेली नाही तेंव्हा ते मटकन खाली बसले . त्यांना वाटले की आपल्या लेकीने आपली फसवले कदाचित ती त्या मुला बरोबर पळून गेली . या गोष्टीची खात्री करण्यासाठी त्यांनी अन्विकाची रूम तपासून पाहिले . त्यांना तेथे अनिकेतच्या घरचा पत्ता मिळाला . ते तडक पोलीस घेऊन

अनिकेतच्या घरी गेले .

इकडे अनिकेत ही बेचैन होता . अनिकेतने तिचा मेसेज वाचून चार दिवस झाले होते.

अन्विकाचा फोन पण बंद होता. अनिकेत तिच्या ऑफिस मध्ये ही जाऊन आला होता पण जितकी माहिती तिच्या कुटुंबाला ऑफिस मधून मिळाली तितकीच अनिकेतला मिळाली होती . अनिकेतला हा प्रश्न पडला होता की ती नाशिकला नाही गेली तर कोठे गेली. या विचारात तो दोन रात्री नीट झोपला ही नव्हता . त्याने ऑफिस मधून सुट्टी घेतली होती . अनिकेत त्याच्या परीने अन्विकाला शोधण्याचा प्रयत्न करत होता . तो या सगळ्या विचारात असतानाच त्याच्या दारावरील बेल वाजली . अनिकेतने दार उघडले तर समोर पोलीस आणि अन्विकाचे बाबा व भाऊ उभे होते.

पोलीस , “ Mr . अनिकेत भोसले आपणच का ?”

अनिकेत ,” हो मीच “

बाबा , “ माझी मुलगी अन्विका कुठे आहे ? ती तुझ्याकडेच आली आहे ना ? कुठे आहे ती बोलावं तिला “

अनिकेत , “ हे पहा अंकल अन्विका माझ्याकडे नाही आली . मी ही चार दिवसा पासून तिचाच शोध घेतोय “

बाबा , “ इंस्पेक्टर साहेब हा खोटे बोलतोय अटक करा याला; झडती घ्या याच्या घराची आणि तुमचा पोलीसी

खाक्या दाखवा याला मग पटापट बोलेल हा माझी मुलगी कुठे आहे ?( अनविकाचे बाबा त्वेषाने बोलत होते)

पोलीस , “ Mr मोहिते थांबा जरा ; घ्या रे याच्या घराची झडती .”

हवालदार , “ साहेब घरात कोणी नाही “

बाबा , “ बोल माझी मुलगी कुठ आहे ?”

अनिकेत , “ खरंच मला माहिती नाही .मला ही तिची काळजी वाटतेय अंकल”

पोलीस , “ Mr भोसले जो पर्यंत अन्विका मोहिते सापडत नाही तो पर्यंत तुम्ही हे शहर सोडू शकणार नाही .

बाबा , “ साहेब यानेच लपवलंय मा‍झ्या मुलीला “

पोलीस ,” सध्या आपल्या कडे याच्या विरुद्ध काही प्रूफ नाही. त्यामुळे आपण याला अटक करू शकत नाही “

बाबा ,” पण “

अद्वैत ( अन्विकाचा भाऊ) ,” बाबा चला , याला नाही माहिती अन्विका दि कोठे आहे ते “

अन्विकाचे बाबा , भाऊ व पोलीस अनिकेतच्या घरातून निघून गेले .पण अनिकेतला अन्विकाची खूप काळजी वाटत होती .

आता अन्विकाला गायब होऊन सहा महिने होत आले होते .पण पोलीसांना अन्विकाचा पत्ता लागत नव्हता . अन्विकाचे बाबा , भाऊ सारखे पोलीस ठाण्याच्या चकरा मारत होते . जस-जसा एक -एक दिवस जात होते तशी अन्विका विषयीची काळजी वाढत होती . अन्विकाची आई तिच्या काळजीने आजारी पडली होती .

अन्विका कुठे व कशी आणि का ? गायब झाली होती हे तर कोडेच होते

भाग ५

अन्विका गायब झाल्या पासून अनिकेतला ही अन्न गोड लागत नव्हते. तो त्याच्या परीने अन्विकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता . त्याने अन्विकचा फोटो फेसबुकवर अपलोड केला होता आणि तिचा पत्ता सांगणार्‍याला किंवा तिला घेऊन येणार्‍याला 50000 चे बक्षीस ठेवले होते .

एक दिवस त्याला फेसबुकवर एक मेसेज आला तो अन्विका बद्दलचा होता . एका व्यक्तीने नाशिक मधून त्याला मेसेज केला होता. त्याने लिहिले होते की त्याने अन्विकाला रेड लाईट एरिआ मध्ये पाहीले होते . तिचा फोटो ही त्याने अनिकेतला पाठवला होता . ती जिथे होती ,तिथला पत्ता ही पाठवला होता.

अनिकेतचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की फोटोतील मुलगी त्याची अन्विकाच आहे . ती वेगळ्याच अवतारात होती ,भडक मेकअप ,विचित्र कपडे पण ती अन्विकाच होती . तो उठला तडक अन्विकाच्या घरी गेला . त्याने बेल वाजवली; दार अव्दैतने उघडले .

अव्दैत आश्चर्याने म्हणाला , “ अनिकेत तू इथे !”

अन्विकाचे बाबा आतून म्हणाले कोण आहे अव्दैत ? पण अव्दैत काहीच बोलला नाही . बाबा दाराकडे आले आणि अनिकेतला पाहताच त्यांचा पारा चढला .

बाबा , “ तू इथे ! आला तसा परत चालता हो इथून तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची ?”

अनिकेत , “ अंकल ऐकून तर घ्याल का माझे ? अन्विकाचा पत्ता लागला “

बाबा आणि अव्दैत एकदम ओरडले , “खरंच “

अनिकेत ,” मी फेसबुकवर अन्विकाचा फोटो अपलोड केला होता चार महिन्या पूर्वी, आज एका व्यक्तीचा मेसेज आला होता

की त्याने तिचा फोटो आणि पत्ता पण पाठवला आहे .ती नाशिक मध्येच आहे पण ......” ( अनिकेत बोलायचा

थांबला )

बाबा , “ पण काय ?अनिकेत बोल ना ! “

अनिकेत , “ ती रेड लाईट एरिआ मध्ये सापडलीय.”

हे ऐकून अन्विकाचे बाबा आणि अव्दैतच्या पाया खालील जमीनच सरकली . त्यांच्या डोक्यात कोणी तरी तीव्र आघात केलाय असे ते सुन्न झाले . पण अनिकेत पूर्ण भानात होता . तो म्हणाला मी उद्याच नाशिकला जातोय आणि पोलीसांना ही सूचना दिली आहे ते आपल्याला पूर्ण मदत करतील . अस बोलून अनिकेत त्यांच्या उत्तराची वाटही न पाहता निघला सुद्धा .तरी अन्विकाचे बाबा व अव्दैत त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहताच राहिली . पण अन्विका बद्दलची ही माहिती ऐकून त्यांना काही सूचना नव्हते . ते सुन्न झाले होते . अन्विकाची आई हे सगळे ऐकून हादरली होती.

अनिकेत नाशिकला जायला निघला . त्याच्या बरोबर नागपूरचे पोलीस साध्या वेषात निघले होते . अनिकेत नाशिकला पोहचला व त्याने पोलीसांना लॉजवरच थांबायला सांगीतले. तो म्हणाला की तो स्वत: त्या एरियात कस्टमर होऊन जातो आणि अन्विकाचा शोध घेतो मग आपण पुढचं ठरवू . त्याच बोलणं इन्स्पेक्टर जाधवला पटलं होत . इंस्पेक्टर जाधवने त्याच्या म्हणण्याला होकार दर्शवला .

अनिकेत त्या व्यक्तीने पाठवलेल्या पत्त्यावर म्हणजेच नाशिक मधील रेड लाईट एरिआत पोहचला . आणि इकडे तिकडे फिरू लागला . तेथे छोट्या -छोट्या गल्ल्या होत्या व दोन मजली घरे (घरे कसली दुकाने )

दिसत होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला चित्र विचित्र कपडे घातलेल्या आणि भडक मेकअप मुली बायका त्याला दिसत होत्या . तो जस – जसा पुढे जाईल तस -तसा प्रत्येक बाई त्याला अडवत होती त्याच्या अंगाला झटत होती .अश्लील चाळे करून त्याला स्वतः बरोबर येण्यासाठी गळ घालत होती . पण अनिकेतचे डोळे अन्विकाला शोधत होते. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने त्याला फक्त एरिआचा पत्ता दिला होता . पण नेमके ठिकाण किंवा नेमकी कोणती बिल्डींग ,घर सांगीतले नव्हते .

अनिकेतची नजर भिरभिरत होती . आता त्याने प्रत्येक घरात जाऊन अन्विकाचा शोध घ्यायचं ठरवलं.

अन्विका खरच तेथे होती का ? पण ती तर कामानिमित्त घरातून निघाली पण मग इथे कशी पोहचली असेल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users