फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळी लाजलज्जा बासनात गुंडाळून ठेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण शेवटी मिळाला धत्तुरा

नंगा होके आया था अब घंटा लेके जायेगा... Rofl

भाजप समर्थकांनी अजूनही हार मानलेली नाही.
Let us do it Karnataka style असं म्हणताहेत.
याचे दोन अर्थ. एकेकट्या आमदारांना फोडायचं. दुसरं. डी के शिवकुमार यांना अटक केली तशी पवार काका पुतण्यांना करायची.

डी के शिवकुमार यांच्यावरून आठवलं. भाजपने कर्नाटक काँग्रेसचे पळवून आणलेले आमदार मुंबईतल्या हॉटेलात मुंबई पोलिसांच्या पहार्‍यातच ठेवले होते. तेव्हा इतर कोणालाही कशाहीवरून नावे ठेवताना भाजपने ते आधी केलेले नाही ना, हे तपासून बघत चला.

सगळी लाजलज्जा बासनात गुंडाळून ठेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण शेवटी मिळाला धत्तुरा>> वरून टग्याला क्लीन चिट देऊन भक्तांची पंचाईत केली ते तर चेरी ऑन केक Proud

आत्ता हाती बातमीनुसार अजित पवार हे अतिशय भ्रष्ट नेते आहेत. आणि रामदास आठवले सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी श्रीमती सुधा भालचंद्र सुळे
यांचा सुपुत्र श्री सदानंद सुळे यांचा
श्री शरद पवार यांच्या सुकन्या
श्रीमती सुप्रिया सुळे यांच्याशी शुभ विवाह झालेला आहे.

हि बातमी सार्वजनिक न्यासापासून कशी काळजीपूर्वकपणे लपवलेली आहे त्याचे दुवे जालावर सहजासहजी मिळत नाहीत हे पाहून आपल्याला लक्षात यावे.

http://archive.indianexpress.com/news/we-had-political-differences-but-o...

हे पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात साटेलोटे कसे असतात ते जनतेने ध्यानात घेणे आवश्यक आहे.

श्री शरद पवार शिवसेनेस का संपवणार नाही ?

किंवा

शिवसेना राष्ट्रवादी ला खड्ड्यात का घालणार नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षात अटक का झाली नाही? त्यात शिवसेनेचा हात होता का?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडलेली आहेत. कदाचित सामान्य जनतेस ती कधीही मिळणार नाहीत.

श्री अजित पवार हे काही केल्या मानायला तयार होत नव्हते.

शेवटी श्रीमती प्रतिभाताई पवार ( श्री शरद पवार यांच्या सौभाग्यवती) आणि

श्री सदानंद सुळे (श्री उद्धव ठाकरे यांचे आतेभाऊ आणि श्रीमती सुप्रिया सुळे यांचे श्रीमान) यांनी त्यांची समजूत काढल्यावर ते माघारी येण्यास तयार झाले.

महायुतीला बहुमत मिळाल्याच्या "दुसऱ्या दिवशी"च श्री उद्धव ठाकरे आम्हाला "दुसरा मार्ग" मोकळा आहे हे कसे काय म्हणाले याचा उगम इथे असू शकेल काय?

तेंव्हा हे सगळे साटेलोटेच आहेत.

यात श्री फडणवीस कुठेच बसत नाहीत.

आजचे त्यांचे (dying declaration) राजीनामा देतानाचे वक्तव्य "शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे कधीही ठरलेले नव्हते " हे याचेच द्योतक असेल काय?

अमित शहा शरद पवारांकडे तीन दिवसांचा चाणक्यगिरीचा क्रॅश कोर्स करणार आहेत असे समजते.

हाहाहा बेस्ट न्यूज आहे की.
शेवटी युनायटेड स्टेट्स ऑफ कोथरुडला स्थानिक आमदार नाकारणार्‍या महाराष्ट्र भाजपला सत्ताच नाकारण्यात आली.

बाजीराव-मस्तानीला दिल्लीदरबारी संधी मिळावी. तिथे मराठी बोलायची अजिबात गरज नसल्याने मराठीचा त्यांच्याकडून होणारा अपमानही थांबेल.

आज सकाळ पर्यंत ते उघडत होतं. मी हाच प्रतिसाद मिसळपाव वर टाकलेला आहे तेंव्हा मी स्वतः तो उघडला होता.

महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांनाही माहीत आहे ठाकरे पवार ह्यांचे साटेलोटे.

हि बातमी सार्वजनिक न्यासापासून कशी काळजीपूर्वकपणे लपवलेली आहे त्याचे दुवे जालावर सहजासहजी मिळत नाहीत हे पाहून आपल्याला लक्षात यावे.>>>

यात काय सिक्रेट आहे? हे सर्वांना माहित आहे की. इन फॅक्ट हे सगळेच राजकारणी एकमेकांचे पाहुणे आहेत.

लोकप्रतिनिधी स्वतःच्या डिग्र्या लपवतात आणि हे लोकांचे नातेसंबंध जालावर शोधायला निघाले. सगळच खाजगी जालावर टाकायला च हवे का?

महाराष्ट्राच्या राजकारणात साटेलोटे कसे असतात ते जनतेने ध्यानात घेणे आवश्यक आहे.

>>

शिवसेना भाजप युती इतके वर्ष होती तेव्हा का नाही फोडलं हे गुपित?
की आता शिव सेनेमुळे सत्ता गेली म्हणून सगळी बीलं शिवसेनेच्या नावावर फाडणार?
राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे कारवाई पासून वाचले, नाही का?

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे चुलते भाजपचे माजी संसदीय कामकाज मंत्री आणि उपाध्यक्ष प्रमोद महाजन यांचे मेहुणे आहेत. ही बातमी सार्वजनिक न्यासात आहे काय ?

श्रीमान राजू परुळेकर यांची स्व बाळासाहेब ठाकरे व शिवसेना बद्दलची पोस्ट वाचल्यावर सारे संभ्रम दूर झाले. .

>>श्री अजित पवार हे काही केल्या मानायला तयार होत नव्हते.
शेवटी श्रीमती प्रतिभाताई पवार ( श्री शरद पवार यांच्या सौभाग्यवती) आणि
श्री सदानंद सुळे (श्री उद्धव ठाकरे यांचे आतेभाऊ आणि श्रीमती सुप्रिया सुळे यांचे श्रीमान) यांनी त्यांची समजूत काढल्यावर ते माघारी येण्यास तयार झाले.<<

हाथीके खानेके दात अलग होते है, और दिखानेके अलग. हे लोकांना अजुनहि कळलेलं नाहि. बाकि, चाणक्यांची प्रतिक्रिया काय? चेकमेट अ‍ॅक्सेप्ट केला काय? Wink

ह्या लोकांना गेल्या एक आठवड्यात सत्तेसाठी जितका जीव काढलाय त्याच्या १% जरी पुढील ५ वर्षे जनतेची कामे करण्यात लावला तरी पुढच्या वेळी हि अशी परिस्थिती येणार नाही.

मी कोणत्याच पक्षाला सपोर्ट करत नाहीये. याही परिस्थितीत जर तुम्ही चार पैकी कोणत्याही पक्षाला सपोर्ट करत असाल तर तुमची नैतिकता शून्य आहे. महाराष्ट्र भाजपने तीळ खाऊन तीर्थ बुडवलं आहेच, पण बाकीचेही पक्ष स्वतःची सर्व तत्व गुंडाळून ठेऊन संपत्तीचं ओंगळवाण प्रदर्शनच करत आहेत.

मराठीपण हे मनात असायला हवं, समजा एखाद्याला मराठी भाषा बोलता येत नसेल पण तो मराठी असेल आणि स्वतःला मराठी समजत असेल तर तुम्ही कोण ठरवणारे की तो मराठी नाही म्हणून? इथे एक गोवन मैत्रीण आहे माझी, कोकणी मातृभाषा असलेली. तिनी व्यवस्थित मराठी बोलता येते, तिनी whatsapp group काढला मराठी इन --- अपार्टमेंट, मी तिला मराठीच समजते, ती स्वतः ला मराठी समजते. नवऱ्याच्या ऑफिकस पार्टीमध्ये सगळेजण आपापल्या प्रांताची गाणी गात होते, करिओकीवर. काही मराठी उभे राहिले त्यांच्याबरोबर एक तामिळ उभा राहिला आणि जोरदार जीवशिवाची बैलजोड, शूर आम्ही सरदार अशी गाणी सुरू केली त्याला मराठी म्हणणार नाही का? कधी नागपूरला जाऊन त्यांची मराठी ऐकली आहे का? वेगळी आहे आपल्यापेक्षा म्हणून ते मराठी नाहीत? कधी तीन-चार पिढया महाराष्ट्राबाहेर राहिल्येल्या लोकांची मराठी ऐकलीये? तुम्ही कोण शहाणे त्यांच्या भाषेच्या लकबिवरून त्यांचं मराठी असणं ठरवणारे?

बरं, आता दोन्ही बाजूने गालगुच्चे घेऊन झालेत तर एक बावळटासारखा प्रश्न विचारायचा आहे. दोन कॉ, शिवसेना ( एका हाटिलात ) तर भाजपा ( वेगळ्या हाटिलात ) अशा अनेक बैठका झाल्या. मग याचे जे बिल झाले ते कोणी भरले? पक्षाने? पक्षांना फंड पुरवणार्‍या उद्योजकांनी? आमदारांनी स्वतःच्या खर्चाने की मग सामान्य मतदाराच्या कराने?

मराठीपण हे मनात असायला हवं,
>>
भाषावार प्रांतरचना न करता, नुसते ते मनात ठेवुन नवे प्रांत तयार करता आले असते की? भाषावार प्रांतरचना का केली?
बिना-भाषावार प्रांतरचनेत, तंजवर, बडोदा, इंदुर, ग्वाल्हेर व इतर अनेक गावे. यांना "मराठी" ही अधिकृत ओळख मिळाली असती का?

समजा एखाद्याला मराठी भाषा बोलता येत नसेल पण तो मराठी असेल आणि स्वतःला मराठी समजत असेल तर तुम्ही कोण ठरवणारे की तो मराठी नाही म्हणून?
>>
भाषा हे त्या संस्कृतीचा / सभ्यतेचा अविभाज्य भाग असल्याने, नुसते मनात आहे पण आचरणात आणलेले नाही तेव्हा मराठी म्हणता येणार नाही.

इथे एक गोवन मैत्रीण आहे माझी,
>>
त्याचा इथे काय संबंध? "एक" गोवन मैत्रिण याचे स्टॅटिस्टीक्समधे मुल्य काय?

त्यांच्याबरोबर एक तामिळ उभा राहिला आणि जोरदार जीवशिवाची बैलजोड, शूर आम्ही सरदार अशी गाणी सुरू केली त्याला मराठी म्हणणार नाही का?
>>
नुसते स्वतःच्या मनोरंजनासाठी गाणी म्हणण्यापेक्षा या सर्व लोकांनी, ते काम करत असलेल्या महाराष्ट्रतील कार्यालय, दुकानं, सार्वजनिक जागा ई. ठिकाणी मराठीत व्यवहार केला, मराठी माणसाला मराठीत सेवा दिली, बँक, रेले, सरकारी कचेरी इथे स्वतःहुन नियम पाळून राजभाषेत काम केले, स्वतःच्य मुलांना मराठी बोलणे शिकवले तर तेव्हा आम्ही त्यांना खरे मराठी झाले असे म्हणु. अशी एखाद दुसरी गाणी आंतरजालावर जगभरातील कोणत्याही भाषेतील मिळतात.

कधी नागपूरला जाऊन त्यांची मराठी ऐकली आहे का? वेगळी आहे आपल्यापेक्षा म्हणून ते मराठी नाहीत?
>>
त्याचा इथे काय संबंध? इथे असे कोण म्हणाले?

कधी तीन-चार पिढया महाराष्ट्राबाहेर राहिल्येल्या लोकांची मराठी ऐकलीये? तुम्ही कोण शहाणे त्यांच्या भाषेच्या लकबिवरून त्यांचं मराठी असणं ठरवणारे?
>>
त्याचा इथे काय संबम्ध? असे वाक्य कोण म्हणाले इथे?

<याचे जे बिल झाले ते कोणी भरले?>

काही महिन्यां पूर्वी कर्नाटकातल्या काही काँग्रेस आमदारांना मुंबईतल्या हॉटेलात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवले होते. त्यांचे बिल ज्याने भरले त्यानेच.

जाता जाता, त्यातल्या एका आमदाराच्या नावे त्या काळात आणि पुढल्या दोन तीन आठवड्यांत त्याच्या खात्यात ५३ वेळा प्रत्येकी ९०+ रुपये जमा केले गेले होते.

आजचे त्यांचे (dying declaration) राजीनामा देतानाचे वक्तव्य "शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे कधीही ठरलेले नव्हते " हे याचेच द्योतक असेल काय? >> मग? पुढं काय?

मराठी भाषेची अनेक रुपं माहित आहेत व ती सर्वच आवडतात- ग्रामीण, खेड्यातील, कोकणी, वैदर्भीय, कोल्हापूरकडची, मराठवाड्यातील, मध्य प्रदेश इंदोर साईडची इत्यादी इत्यादी.
पण यातल्या कोणत्याच मराठीत निवास स्तान, गप्पा मरुन वगैरे शब्दप्रयोग केले जात नाहीत. आता बाईंनी इन्स्टावर पोस्ट टाकलीय-Thanks Maharashtra for memorable 5 years as your वाहिनी ! (वाहिनी बरं का- वहिनी नाही. )
अनेक राजकारण्यांच्या पत्नी,सुना या अमराठी आहेत. त्यांच्याकडून अपेक्षाच नाही. पण रानडे कुलोत्पन्न व्यक्तीला मराठी येत नाही तर मग हट्टाने चुकीचं मराठी बोलायचं कशाला? नागपूरलाच वाढला आहात ना...नॅशव्हिलमध्ये नाही ना? इथे आमची अमेरिकन मराठी पोरं तुलनेने खूप चांगलं मराठी बोलतात की मग.

>>आजचे त्यांचे (dying declaration) राजीनामा देतानाचे वक्तव्य "शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे कधीही ठरलेले नव्हते " हे याचेच द्योतक असेल काय? >> मग? पुढं काय?<<
अरे या माणसावर तुम्हि अजुन विश्वास दाखवतांय? राकाँ बरोबर सत्ता स्थापन करणार नाहि हे त्यांनी तीनदा हिंदी सिरियल सारखं ठणकावुन सांगीतलेलं. ती ऐतिहासीक भिष्मप्रतिज्ञा इतक्यात विसरलांत?..

शब्दाला जागले की ते. कुठे केली त्यांनी रा काँ बरोबर सत्ता स्थापना? नाही जमली,नाही जमली,नाही जमली.

Pages