रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण हा आणि कोण आसा मध्ये काय फरक आहे? अण्णु आळीपाळीने दोन्ही प्रश्न विचारतोय. हेका शेवंता चावली का काय? आज त्याला रिकामी ट्रंक उचलता येत नाहिये. हे म्हणजे हनुमानाची शेपटी आणि भिमासारखं झालं. शोभा zombie सारखी चालतेय.

अरेच्चा! अण्णा आणि चोन्गटयाचं बोलणं ऐकायच्या आधीच पांडू घरामागच्या जमिनीतल्या पेटीबद्द्ल बोलतना 'पैश्याच्ं झाड' असा उल्लेख करत होता की. त्याने ती पेटी कधी उचलून आणली, का आणि ती पण एकट्याने?? भुयारात जाणार्या पहिल्या बॉडीचा मान शोभाच्या मृतदेहाला मिळाला. पहिल्या सिझनमध्ये विश्वासरावच्या सांगन्यावरुन पोलिस ते भुयार तपासतात तेव्हा तिथे खुप बॉडीज असतात म्हणे. माईचा चहा पिऊन पिऊन पाटणकरणीला पित्त होणार.

सोमवारपासूनच बघतेय, मला कळलं नाही की अण्णा सोंत्याला पैसे देतात तरी नंतर तो ती पेटी का शोधत असतो. पांडूला मागच्या अंगणात जी पेटी सापडते त्यात काय असतं. घटनांचा क्रम कळला नाही.

@ स्वप्ना_राज तुमच्या पोस्ती वाचून हसून हसून मरायची वेळ येते बघा Biggrin Biggrin Biggrin

@ चंपा : अहो, आण्णाने त्या पेटीत मेलेल्या शोभास ठेवलेले असते अन् त्या पेटीला नदीत बुडवून विल्हेवाट लावण्यासाठी चोंगट्या स सांगितलेले असते. चोंगट्याला ती पेटी जड झाल्यामुळे त्याने ती रानात तशीच लपवून आण्णाला खोटे सांगितलेले असते की पेटीची योग्य विल्हेवाट लावली म्हणून. त्याबद्दल अंनाने त्यास बक्षिसीही दिलेली असते.
आपण त्या पेटीची विल्हेवाट लावली नाही याबद्दल चोंगट्याला कसेतरी वाटत असते. शिवाय हे अन्नाला कळले तर ते जीव घेतील या भीतीने तो पळत रानात जातो (अण्णांच्या वाड्याच्या परसदारीचच शूटिंग आहे हे Proud ) आणि ती पेटी शोधायला लागतो पण पांडबा आधीच त्या पेटीलां खजिन्याची पेटी समजून केळीच्या बुडख्यात पुरून आलेला असतो. आता त्या पेटीला उकरून काढणारा पांडू उद्या रात्री आण्णाच्यां तावडीत सापडणार आहे.. त्याचं तिकीट आजिबात कन्फर्म होणार नाही ही जरी काळया दगडावरील रेघ असली तरी झाल्या प्रकारामुळे चोंगट्याचे तिकीट मात्र प्रीमियम तत्काल कन्फर्म होणार हे सांगण्यास देखील कुणा भविष्यावेत्त्याची गरज नाही. Wink

धन्यवाद डीजे. शोभाने चोरलेले (?) पैसे ती एका पेटीत ठेवते आणि ती पेटी अंगणात पुरून ठेवते अशी अमूल्य माहिती मला बहिणीच्या सासूने दिली म्हणून मला थोडा संभ्रम होता.

@ चंपा, तुमच्या बहिणीच्या सासूने पुरवलेली माहिती अगदी खरी आहे.. पण तो प्रसंग दुसरा होता. त्याचा गेल्या सोमवार पासून तुम्ही पाहत असलेल्या भागांशी काहीही संबंध नाही.
मागे एकदा शोभाने छोट्या लाकडी पेटीसहीत चोरलेले पैसे असेच केळीच्या मागे पुरलेले असतात जे पांडूने पाहिलेले असते. नंतर पांडूने ती पेटी खजिना समजून उकरून दुसरीकडे पुरलेली असते आणि कुठे पुरली तेच विसरलेला असतो Proud
त्या पेटीचा अजुन मागमूस लागलेला नाही.. लागेल की नाही तेही सांगता येणार नाही.
मस्त सिरीयल आहे.. रोज पाहत चला म्हणजे लिंक लागेल आपोआप. Bw

मनीमोहर, DJ Proud

>>मागे एकदा शोभाने छोट्या लाकडी पेटीसहीत चोरलेले पैसे असेच केळीच्या मागे पुरलेले असतात जे पांडूने पाहिलेले असते. नंतर पांडूने ती पेटी खजिना समजून उकरून दुसरीकडे पुरलेली असते आणि कुठे पुरली तेच विसरलेला असतो 

हे नव्हतं मला माहित. तरी मी विचार करतेय की त्या पेटीचं काय झालं. आणि मला वाटलं की अण्णा पेटीत खजिना आहे असं सांगतात म्हणून चोन्गटया ती परत शोधायला जातो. कारण एवीतेवी अण्णाने त्याला ती पाण्यातच फ़ेकायला सांगितलेली असते ना.

आणि मला वाटलं की अण्णा पेटीत खजिना आहे असं सांगतात म्हणून चोन्गटया ती परत शोधायला जातो. कारण एवीतेवी अण्णाने त्याला ती पाण्यातच फ़ेकायला सांगितलेली असते ना.>> तसं पण असु शकतं पण चोंगट्याचा एकंदर स्वभाव पाहता तो केलेली चुक निस्तरायला गेला असेल असं वाटतंय.

आज real horror show !
आज सगळी भुतं एकदम जागी झालीत ...

पांडू सॉलिड मार खाणार आता ...
अण्णा भुयारात !!!

आण्णा ज्या भुयारात गेला ते भुयार अत्यंत खोटे वाटत आहे. कथेची गरज म्हणुन भुयारा ऐवजी दुसरे काहीतरी दाखवायला हवे होते.. आधीपासुन ही सिरिअल ओरिगिनल लोकेशन् मुळे इतकी रीअल वाटत असताना ह्या खोट्या भुयारामुळे अगदी रसभंग झाल्या सारखे वाटले. निदान खरे भुयार तरी तयार करायचे होते.. वाड्याच्या आसपास कितीतरी जागा उपलब्ध आहे. Uhoh

काल मळक्या अवतारात अण्णा माईसमोर उभा राहिलेला पाहून 'पोरिपो' किंवा 'दाग अच्छे है' असं म्हणत माई वॉशिंग पावडरची पिशवी समोर धरतत का काय असं वाटलं क्षणभर. अण्णाने मारलेल्या लोकांच्या भुतांची टीम येत्या आयपीएलमध्ये उतरवायला हरकत नाही. झपाटणारे झोटीन्ग किंवा भन्नाट भुतावळ अश्या काहितरी नावाने.

काल मळक्या अवतारात अण्णा माईसमोर उभा राहिलेला पाहून 'पोरिपो' किंवा 'दाग अच्छे है' असं म्हणत माई वॉशिंग पावडरची पिशवी समोर धरतत का काय असं वाटलं क्षणभर. अण्णाने मारलेल्या लोकांच्या भुतांची टीम येत्या आयपीएलमध्ये उतरवायला हरकत नाही. झपाटणारे झोटीन्ग किंवा भन्नाट भुतावळ अश्या काहितरी नावाने.
>>>
Lol
आण्णुकल्याचे आकरा! (माझीही भर!)

सरिता रॉक्स बॉस!! पाटणकरणीची हवा काढून घेतलीन तिने. मजा आ गया.

पाटणकरणीने चोन्गटयाला शोभाच्या खुनाबद्दल सांगितलं तर ती स्वत:चं आणि चोन्गटयाचं दोघांची कलमं लावायला कारणीभूत होणार.

भुतं अचानक मधे च कशी उपटली? इतके दिवस का दिसली नाहीत...
शेवंता अण्णा वरती वस्सकन ओरडते ते बघून अण्णा डोळे गरागरा फिरवतात जाम फनी होतं ते...

रच्याकने , त्या आबांना मी personally ओळखते . आमचे नातेवाईक आहेत. या आधीही त्यानी काही चित्रपटात /मालिकेत काम केल आहे .

गाव गाता गजाली मध्ये होते आणि अजय देवगणच्या द्रिश्यम मध्ये . बस कंडक्टर होते.

आण्णाने भुतांच्या भुयारात पाऊल ठेवले म्हटल्यावर सगळी भुते उपटणारच ना..??
मला आठवतं त्याप्रमाणे भिवरीचं केळीच्या बागेच्या मागे आंब्याचं कलम लावलं होतं (पण मी तिथे जाऊन आलो तेव्हा तिथं कोणतंच आंब्याचं झाड दॄष्टीस पडलं नाही Uhoh )
शिवाय काशीस रीतसर अग्नी दिलेला असणार.. त्याला भुयारात ठेवण्याचं काहीच कारण दिसत नाही तरी तो तिथे आला होता.
सदाचा आणि पाटणकराचा देखील रीतसर अग्नीसंस्कार झाला होता..
काय माहीत.. कदाचित सर्व भुतावळींनी स्टँडप कॉल जॉईन करुन आण्णाला सर्प्राईज विजिट द्यायचं ठरवलं असणार. Proud

@ स्वस्ति, आबांना मी personally ओळखते . आमचे नातेवाईक आहेत. या आधीही त्यानी काही चित्रपटात /मालिकेत काम केल आहे .>> अरे वा.. मी भेटलो त्यांना गेल्या पंधरवड्यात.. स्वभावाने पण छान आहेत.. कामाची दगदग असतानाही आम्ही त्यांच्या शुटिंगच्या घरी गेलो तेव्हा आपुलकीने भेटले, बोलले.

आमचे नातेवाईक आहेत. या>> अरे वा आम्हा ला आबा वच्छी कपल आवड ते. पूर्वी काशी जिवंत असताना वच्छी एकदा शिरवाळ्या करते ते आबा चाटून पुसून खातात तो शॉट मला अजून लक्षात आहे. अगदी साध्या माण्साआ चे बरोबर पोर्ट्रेयल केले आहे. त्यांना जरूर सांगा.
शेवंता काल विसरते का ती वाड्यात आहे? हरी नाईकच्या मागे मागे लिंबूसरबत करायला जाते. सरिता जबरदस्त डिफेन्स. राखेचा व न मध्ये ती जशी किचन मध्ये कोणाला फिरकू देत नाही त्याचे मूळ इथे आहे. अभिरामाच्या बायकोला पण हाकलते.

अगदी अगदी. टायटल सॉन्ग पण एकदम भारी आहे. ते फारसे अ‍ॅप वर ऐकायला भेटत नाही.
ट्रीटमेंट एकदम फर्स्ट क्लास. राखेचा वन शेवटाला गळपटले होते. पण मला ते कपाटातले सर्व दागिने एकदा बघायचे होते. एक एक करून.

निदान खरे भुयार तरी तयार करायचे होते.. वाड्याच्या आसपास कितीतरी जागा उपलब्ध आहे. Uhoh >>>>> ती काय प्रोड्युसरच्या मालकीची आहे.

राखेचा १ पेक्षा राखेचा २ जबरदस्त पॉलिशड आहे >>> असं असेल तर त्याचं श्रेय माबोकरांना आणि त्यांना पहिल्या भागाबद्दल इथे तिथे ज्यांनी ज्यांनी तुम्ही कसे चुकलात, कथानक कसं होतं, कशाचा कशाला मेळ नव्हता हे सांगणाऱ्या सर्वांना जातं. इथे स्वप्ना राज यांनी तर पहिल्या भागात व्यवस्थित काय काय चुकलं, अनेक प्रश्नाची उत्तरं कशी मिळाली नाहीत, हे बरेचदा लिहिलेलं. अजूनही बऱ्याच जणांनी लिहिलेलं पण मला स्वप्ना याचं जास्त आठवतंय.

असं सर्व वाचून हा भाग इतका सुधारलेला असू शकतो Wink .

>>भुतं अचानक मधे च कशी उपटली? इतके दिवस का दिसली नाहीत

मला वाटतं एक पाटणकर सोडला तर बाकी भुतं म्हणजे अण्णाच्या मनचे खेळ आहेत. पाटणकरचं भूत आहे असं मी म्हणते कारण त्याच्या घरच्या बेडवरचं कव्हर आपोआप सरळ झालेलं दाखवलंय. बाकीची भूतं खरोखर असती तर त्यांनी आण्णाला जिवंत ठेवलं नसतं.

>>अजूनही बऱ्याच जणांनी लिहिलेलं पण मला स्वप्ना याचं जास्त आठवतंय.

धन्यवाद! दुसर्‍याच्या चुका काढणं नेहमी सोपं असतंय हो. Happy पण मला वाटत नाही ते लोक इथलं काही वाचत वगैरे असतील असं. आपल्याला आप्लं असं वाटतं.

>>आबांना मी personally ओळखते . आमचे नातेवाईक आहेत.

अरे वा! खूप छान अभिनय केलाय त्यांनी असं सांगा त्यांना जरूर. वाईट वाटतं त्यांच्याकडे पाहून.

बाकी शेवंता मरेल तो एपिसोड मी अगदी डोळ्यांत प्राण आणून पहाणार आहे. डोक्यात गेलेय जाम महामाया. लग्नाची बायको राहिली बाजूला. हीच पुढेपुढे करतेय. आणि तरी माठ माईच्या डोक्यात प्रकाश पडत नाहिये. डोकं आहे का ब्लॅकहोल???

Pages