नमस्कार! फॉर अ चेंज आज मी कलर्ड पेन्सिल स्केच अपलोड करत नाहीये.
मांजरं माझा वीक पॉईंट. जुन्या मायबोलीवर मांजरांवर थोडंफार लिहिलंही होतं. लहानपणी आसपास मांजरं असण्याची कायम सवय. आता मांजरं नाहीत माझ्याकडे गेली अनेक वर्ष, पण तात्पुरत्या संपर्कात येणार्या मांजरांशी तरीही सूर जुळतात अद्यापही. नुकत्याच पाहिलेल्या काही देखण्या मांजरांना माझ्या नवीन कॅमेर्यात कैद करायचा मोह आवरला नाही.
उदाहरणार्थ हे पहा: ब्राऊन डोळ्याचे हे मांजर.
हे एकच मांजर आहे की! अॅन ऑड आइड कॅट!! ही जेनेटीक कंडीशन आहे म्हणे. पण दुर्मिळ.
लायब्ररीत जात असताना ओझरतंच एक देखणं पांढरं-सोनेरी मांजर दिसलं. काही सेकंदांच्या त्या दृष्टीभेटीतच मांजराचे दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असल्याचं जाणवलं. पटकन मागे वळून पाहिलं तर तेवढ्यात बेटं गायबही झालं. नंतर येताजाता तिथल्या एका दुकानात बर्याच गबदुल मांजरांचा मुक्काम असल्याचं पाहिलं. तेव्हा ठरवलं एकदा प्रत्यक्ष भेट देऊन शोधून काढू त्याला. त्यानुसार त्या मांजराचा पत्ता लागलाच. मग काय मी कॅमेरा घेऊन लगेच हजर झाले तिथे.
दुकानदाराची परवानगी घेऊन फोटोसेशन चालू तर केलं. पण हे बोकोबा भलतेच लाजाळू निघाले. बघावं तेव्हा मान फिरवणे, डोळेच मिटून घेणे वगैरे प्रकार चालू झाले. मग शेवटी मालकांनी थोडा खाऊ दिला:
तेवढ्यात काहीतरी चाहूल लागली म्हणून मान वर झाली आणि त्या निळ्या आणि ब्राऊन डोळ्यात मी हरवून गेले लिट्रली.
मध्येमध्ये वर उडणार्या कावळे चिमण्यांवर आम्ही लक्ष ठेवून होतो बरं!
पण तिकडची बाकीची मांजर पण काय कमी नव्हती. काय एकेकाचे रंग आणि आरस्पानी डोळे!
त्या दुकानदाराकडे अशी जवळपास दहा मांजरं आहेत. सर्व देखणी, सुदृढ आणि स्वच्छ. त्या सर्व मांजरांची ऑपरेशन्स करुन घेतली आहेत त्यांनी. (त्याची खूण म्हणून कानाच्या टोकाचा तुकडा पाडला आहे. फोटोतही दिसतोय.)
ऑड आइड बोकाबांना दुकानदार 'वैटी' 'वैटी' असं हाक मारत होते. ते व्हाइटी (व्हाईट रंंगामुळे) असावं असं मला वाटलं. व्हाइटीबुवांनी नंतर मस्त पोजेस दिल्या. त्यांना या क्लिकक्लिकाटाची सवय असणार. बरेच मांजर फॅन्स फोटो काढून गेलेत.
मला फोटोग्राफीचा जराही गंध नाही पण माझ्या सध्याच्या नवीन कॅमेर्यातून फोटो काढणे हा सध्या जणू छंदच झाला आहे. त्यामुळे या फोटोंमध्ये प्रकाश चित्रणाच्या चुका असल्यास पदरात घ्या. आय होप तुम्हालाही आवडली असतील ही मांजरं.
टारझन येडंय!!!
टारझन येडंय!!!
अतिशय सुंदर फोटो व लिखाणही.
अतिशय सुंदर फोटो व लिखाणही.
धन्यवाद सामो!
धन्यवाद सामो!
Pages