रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी सरिता फक्त प्यायच्या पाण्यालाच घाबरतेय का आंघोळीच्या आणि इतर गोष्टींसाठी वापरायच्या पाण्यालाही? Proud कैच्या कै. काल तिच्या एक कानाखाली ठेवून द्यावीशी वाटली.

Lol

तुम्ही अन्जूडी का लिहिलं, फक्त अन्जू आहे माझा आयडी.

पांडगो सिक झालो का काय?? कोणी दुसर्यान आज्चो एपिसोड लिहिलेला दिसता. नारद त्रिखंड़ात संचार करतात तसा अण्णा तापामुळे मनातल्या मनात गावभर फिरुन आला. टोटल कैच्या कै एपिसोड. माईची जाम चीड आली. मरेना का म्हातारा तापात. कश्याला पाण्याच्या घडया ठेवत उश्याशी बसायचं ते. अश्या लोकाना असं वागवलं की त्याना माणसांची किंमत कळते. शेवंता मात्र गूढ होउन बसलेय. अण्णाची मदत घेऊन गावात जगण्यापेक्षा शहरात नणन्देच्या मदतीने कुठे मिळेल ते काम करून राहणं कोणीही स्वाभिमानी स्त्री पत्करेल. आता अण्णावर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत असं दाखवून त्याच्याकडून गुन्हा कबूल करुन घ्यायचा प्लान आहे का काय माहित. शेवन्ता घराचा दरवाजा सदोदित का उघडा ठेवते? आव जाव घर तुम्हारा. कधी चोन्गटया आत येतो तर कधी अण्णा. त्या गुरवाला पाटणकरने प्रसाद दिला पाहिजे. भारी स्वत:ला तिस्मारखां समजतो मेला.

स्वप्ना_राज, अहो पांडगा च.हा.ये. मधे गेलाय ना स्किट करायला.. त्यामुळे त्याच्या जागी नवीन मारुती बसवला असेल.. Proud

अण्णाची मदत घेऊन गावात जगण्यापेक्षा शहरात नणन्देच्या मदतीने कुठे मिळेल ते काम करून राहणं कोणीही स्वाभिमानी स्त्री पत्करेल.>> पण तिला कुठे स्वाभिमान आहे. पहिला दागिना पहिला नोटांचा गठ्ठा घ्यायच्या आधी हा विचार करायला हवा. ती फक्त संधिसाधू आहे. ते ही आता मध्यम वयीन. बाकी स्किल काही नाही. स्वाभिमानाने तर कुठे ही राहता येइल बदला पन घेता येइल
आता इथे पण अंधस्रद्धा चालू झाली बिनधास्त. पाण्याला नको म्हणते सरीता. हा कायतर भयंकर आसा म्हटले की झालेच.

सरिताक पाण्याचो भिती का वाटुक व्हया..? तिकां काय ते स्वप्नात दिसलां की तां बावीत बुडताहा.. मगे बाय माजे, त्या बावीचो पाणी नको पिऊ.. पण आकेरी ग्रामपंचायतनाच्या नळाचो पाणी पिऊक जमणा नाय का..?? Uhoh

डीज्जे ...

माझं नाव प्रकाश भिडे नसून रमेश भिडे आहे ...

माझ्यापूर्वी अजनबी यानीदेखील तुम्हाला मराठीत प्रतिसाद लिहिण्यासाठी विनन्ती केली होती पण तुम्ही सगळ्याना फाट्यावर मारुन आपलेच लंगडे घोडे दामटवताय अन मालवणीचा अपमान करताय ...

(व्याकरणात चुका असल्यास कृपया सांगावे Uhoh ) >>> साध्या मराठीत लिहा ना वाचायला अगदीच विचित्र वाटते तुमची मालवणी, व्याकरण तर बघायलाच नको ........ खऱ्या मालवणी भाषिकाला त्याच्या भाषेची अशी चिरफाड नाही सोसत. प्लीज _/\_

Submitted by Ajnabi on 11 September, 2019 - 02:22
Pages
« सुरुवात

इतका मुर्दाडपणा कशाला करताय ¿>> मालवणीसाठी Proud
भिडे,
तुका माझो मालवणी आवडत नशान तर माका काहिएक फरक पडणां नाय.. हळु-हळु सुधारतलो म्हणान तुमी सोडुन देऊ शकात.
माई म्हणता तसो कोकणी माणुस फणसा सारखा वरुन काट्यान भरलेलो अन भुतुर गर्‍यासारखो गोड असतलां त्यातलो प्रकार हाय काय..? Proud

डिजेंच्या मालवणीबद्दल नंतर. मी सध्या भन्नाट कोळीगीतांच्या लाईनी लिहीणार आहे. चाणाक्ष वाचकांनी ते ओळखुन मनातच गाणे म्हणावे.

झाडावर बसली शेवंता बाय,
अण्णाची जाम टराकली

क्रमशः.......

झाडावर बसली शेवंता बाय,
अण्णाची जाम टराकली
>>>>>
Rofl
सुरुवातच जबराट. पुढील गाण्याच्या प्रतीक्षेत!!!!!

कालचो भागात सरितान ढसाढसा तीन तांबे पाणी पिल्यान.. Uhoh (आता बरा "पानी नको.. नको पानी.." नाय केल्यान..)

थंयसर मसनात रघुकाकावांगडा बसुक आण्णान पाटणकराचो बंदोबस्त केल्यान. पाटणकराचो घरी जावान पाटणकरणीक मॉप पैसा दिल्यान.. पाटणकरणीन पण पैसा घेवाक हयगय नाय केली. सुसल्या मात्र मान वाकडी करुक शिकल्यान.. आण्णाचो वाड्यार मान वाकडी करुक उभो राहिल्यान.. आजचो भागात आण्णाच्या खोलीत धोंडो पडतले असा दाखवल्यान. माका तर वाटताहा तां धोंडो सुसल्यान टाकलो असान.

धन्यवाद अज्ञातवासी. Proud

आता दुसरे

नायकांच्या वाड्यामागुन एक चांद उगवला, चांद उगवला
नी अण्णा बघुक निगाला...

या गो वाड्यावरी नवरा कुणाचा येतो
शेवंता बायको माझी, अण्णाक सांगुन जातो

शेवंता संगतीनं माज्या तू येशील का? माज्या पिरतीची राणी तू होशील का?
अण्णा संगतीनं तुज्या मी येणार न्हाय, तुज्या पिरतीची राणी मी व्हणार नाय

माज्या अण्णाने सोडलीया दारु बाई माजे देव पावलाय

आणिन माई गो ताजा ताजा माई ताजा ताजा
सुरंगीचा हा गजरा ताजा

काल माईचं नवर्यासमोर अजीजीने वागणं पाहून जाम चिडचिड झाली. काय मूर्ख कणाहीन बाई आहे ही. माणसं पाळलेल्या कुत्र्याला पण जास्त प्रेमाने वागवत असतील असा नवरा वागवतो तिला. मरेना का मेला मसणात. कश्याला विचारतेस बाई. आय होप ह्यात काळजी किंवा प्रेम नसुन हा थेरडा खपला तर मुलगा सुनेच्या राज्यात आपल्याला किंमत नसेल हा स्वार्थ त्यामागे आहे. बाकी शेवन्ताचं काय चालल्ंय काही कळत नाही. हे आईचं असलं उदाहरण समोर असल्यावर सुशल्या कशी 'मोठी' होणार देवच जाणे. त्यातून तिचं ते 'बाळ' म्हणणं जाम नाटकी वाटतं. माझा एक मित्र म्हणतो अण्णाला मला काही काम मिळतं का बघा असं सांगून ती त्याला गिल्टी complex देऊन पैसे काढतेय त्याच्याकडून. मलाही त्यात तथ्य दिसतंय. कामच करायचं तर ते शहरात पण मिळेल, त्याचे जास्त पैसे मिळतील. का नाही गेली मग ती नणन्देसोबत?? आणि शिवणाच्या कामाबद्दल अण्णाला कशी माहिती असणार?

पाटणकरला बांधून घातल्यावर सरिता पाणी प्यायला लागली की काय?? 'भाकरी नको तर केक खा' च्या चालीवर 'पाणी नको तर कोक पी' असं सांगायला हवं होतं तिला. गुरवाला सरिता असं का करतेय ते विच्गारायचं सोडून अण्णाच्या खोलीत आणलं होतं माईने. अण्णा तिथे मोठा आव आणत होता पण पाटणकरच्या भूताला पाहून तंतरलीच की त्याची.

https://www.youtube.com/watch?v=unY_9aQ_VpU

डिजे, तुम्हाला तुमचे मालवणी आणखीन सुधरवायचे असेल तर ही वरची सिरीयल नक्कीच बघा. अगदी कहर आहे ही सिरीयल. मला फार आवडायची, म्हणून आता जुने भाग बघते. वैभव मांगलेला फु बाई फु तसेच कुशल बद्रिके व भाऊ कदम यांना चला हवा येऊ द्या मिळायच्या आधीची सिरीयल आहे. जमल्यास सगळे भाग यु ट्युब वर बघा.

धन्स रश्मी.. वयनी.. Bw
***********************************
कोकणाशी बादरायण संबंध नसलेल्या मला राखेचा-१ मधे मालवणी भाषा काहीही कळत नव्हती त्यामुळे सिरिअल मधे नेमकं काय सुरु आहे ते कळायला फार प्रॉब्लेम व्हायचा. तो भाग संपता संपता मला थोडं थोडं मालवणी कळु लागलं (नंतर समजलं ते अस्सल मालवणी बोलत नव्हते Uhoh ). त्यानंतर जेव्हा राखेचा-२ सुरु होणार म्हणुन प्रोमोज दिसु लागले तेव्हा मात्र मी डोळे-कान-मन एकाग्र करुन पहिल्या एपिसोड पासुन सिरिअल पाहु लागलो.. आणि आपसुक म्हणा किंवा प्रयत्नपुर्वक म्हणा पण आता मला ते काय बोलतात हे सगळं कळु लागलं आहे. Bw
नुसत्या भाषेमुळेच नाही पण लोकेशन, नेपथ्य, वेशभुषा, पात्रं, चित्रीकरण या सर्वांची मनावर एवढी मोहिनी पडली की मी अगदी तल्लीन होऊन ही मालिका पहातो.. त्यामुळे मी प्रयत्नपुर्वक आणि आवडीने शिकुन लिहित असलेल्या मालवणीत चुका झाल्या/होत असतील त्या सांभाळुन घ्याव्यात ही अपेक्षा Bw

कालचो भागात पाटणकरणीन सुशमाक बोर्डींगात पाठवल्यानी अन पाटणकराचो लांबचो आत्तेभाउ+वयनी तिकां भेटुक घरात ईल्यानी. तां दोघे आत्तेभाऊ+वयनी नसान साध्या कपड्यातलो पोलिस अन पोलिशीन व्हतां. पाटणकरचो मुडदो पडला त्याचो काय खबर मिळतांव का ते बघुक ईले व्हतां. हंयसर आण्णा नाईकार पण साध्या कपड्यातलो पोलिस नजर ठेवान असां. दत्ताक ह्या आधीच कळल्यान म्हणान त्याने बापाक सावध केल्यानी.
त्या रात्री पाटणाकरणीक बोक्यान भ्या दाखवल्यानी. त्याक घाबरान पाटणकरीन वाड्यार जातां. तिकां आण्णा गच्चीतुन बघता अन 'शेवंता' असां म्हणतान. तां ऐकुक पाण्याचो तांब्या ठेवाक ईलेला शोभाक तिचो घोवाचो 'शेवंता...शेवंता' म्हणतां तां आठवल्यानी.

आता आजचो भागात बोक्याक घाबरलेलां पाटणकरीण माईचो गळ्यात पडान रडलेलां दाखवल्यानी.. आज काय व्हईत तां माका बघुक मिळुचा नाय.. आजचो भागाचो अपडेट कुणीतरी लिवुक व्हया तां मी मोबाईलात वाचतलो.. Bw

Pages