भारतातुन परदेशात जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता ?

Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39

भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवदासमधल्या दिव्यासारखे, कमीत कमी वाटी तरी, चातुर्मासिय कहाण्या>> Lol

विकत दही मिळतं म्हणून विरजण लावायचं नाही म्हणणाऱ्यांसाठी माझ्याकडे एक निबंध तयार आहे.
पण योग्य व्यासपीठाच्या शोधात आहे.>>> दही-विरजण-कोणाला किती काम पडते यावर इतकी चर्चा झालीच आहे तर येऊ दे निबंध Happy

परदेशात परतायच्या तीन दिवस आधी एका अत्यंत स्वच्छ हातरुमाल किंवा तत्सम फडक्याचा पाव भाग ताज्या दह्यात बुडवायचा आणि तो पंख्यावर किंवा उन्हात लवकरात लवकर वाळवायचा. दमट राहाता नये. हा रुमाल स्वच्छ आणि कोरड्या डबीत भरून आपल्याबरोबर न्यायचा. परदेशात घरी पोचल्यावर थोडेसे दूध उकळून कोमट करून त्यात रुमालाचा दह्यात बुडवलेला कोपरा बुडवायचा. दूध चांगले ढवळून उबदार जागी ठेवून दही जमण्याची वाट पाहायची. पहिल्यांदा दही हवे तसे घट्ट जमत नाही. पण या दह्याच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीनंतरच्या विरजणाने लावलेले दही छान कवडीसारखे बनते.

<< कुणाचा विश्वास बसणार नाही पण आमच्या शेजारच्यांचे एक नातेवाईक पुण्यातल्या आरती संस्थेची चूल / शेगडी घेऊन गेले कुठल्या तरी फॉरेनला. बहुतेक कॅनडा. कॅनडात शेगडी किंवा चूल पेटवायला परवानगी असेल का ? >>

--------- कॅनडात शेगडी किंवा चूल यांना परवानगी संदर्भात प्रत्येक शहरांचे नियम (city bylaws) वेगळे आहेत पण शेवटी जिवाची / मालमत्तेची सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य आहे.

उन्हाळ्यात (साधारण २- ३ महिन्यांचा काळ असतो) बहुतेक ठिकाणी बाहेर/ मोकळ्या जागेत बारबेक्यू करतात. इंधनासाठी प्रोपेन गॅस अथवा लाकूड, कोळसा वापरतात. काही हौशी लोक, मागच्या अंगणात, स्वत: ची अशी जमिनीवर स्थिर अशी fire pit तयार करतात. काय इंधन जाळायचे, कोणत्या वेळात fire pit चा वापर करायचा याचे नियम प्रत्येक गावात वेगळे आहेत, आमच्या कडे दुपारी दोन ते रात्री अकरा पर्यंत fire pit वापरायला परवानगी आहे. कुणी तक्रार केली तरच कारवाई करणार, अन्यथा नाही.
https://www.saskatoon.ca/services-residents/fire-emergency/public-educat...

विषयांतर झाले असेल तर क्षमस्व.

घरामागे मोकळे अंगण , पॅटिओ किंवा तत्सम प्रकार असेल छोट्या प्रमाणात भाजणे, बार्बेक्यू, निखाऱ्यावर धुमसवणे यासाठी आर्तीची स्मोक्लेस चूल बरी पडते.

हीरा यांच्या प्रतिसादामुळे,एका जुन्या माबोकराची(दिनेशदा) आठवण झाली.दही,गाळणीत ठेवून गाळणी फ्रीझमधे ठेवायचे.परत जाताना, दह्याची पावडर न्यायचे.कुठल्यातरी धाग्यावर वाचलेले आठवते.

इथे लोक परदेश म्हणजे फक्त अमेरिकाच अशा सन्कुचित वृत्तीनेच कालिहित आहेत. किती पायापुरते पहावे माणसाने बरे ?

मी मागील वर्षी माझ्या नवर्याला नोर्वे (Oslo) ला जाताना 2-3 वेलेस तूप आणि बाकरवड़ी दिले .
मी (एकदाच) गेले तेव्हाही तूप सुके खोबरे तांदूळ चे पीठ खोबर्रयाच्या घरी बनवलेल्या वड्या बाकरवड्या पारले बिस्किट व औषधे (विटामिन ड , multivitamins, paracetamol etc ) घेऊन गेले होते.
दरवेलेस लिस्ट बनवलेली असे.

दगडी जातं कुणी नेलं आहे का परदेशात ? किंवा दगडी उखळ, खलबत्ता वगैरे ?
त्याची चवच भारी.
भारतात दगडी जात्याची घरघंटी पण मिळते. पण तिला ठराविक काळाने (साधारण चार वर्षे - वापरवार) टाके पाडून घ्यावे लागतात. ते ही आपल्यालाच करावे लागेल.

पीठ खोबर्रयाच्या घरी बनवलेल्या वड्या बाकरवड्या पारले बिस्किट व औषधे (विटामिन ड , multivitamins, paracetamol etc ) घेऊन गेले होते.
दरवेलेस लिस्ट बनवलेली असे.
माफ करा पण पार्ले बिस्कीट आता पुर्वीसारखे टेस्टी, आवर्जून खाण्यासारखं राहिले आहे काय? आता इतकी व्हरायटी उपलब्ध आहे की पार्ले फार गुळचट, ठिसुळ वाटतात. चहात तर चिखलच होतो.

इथे लोक परदेश म्हणजे फक्त अमेरिकाच अशा सन्कुचित वृत्तीनेच कालिहित आहेत. किती पायापुरते पहावे माणसाने बरे ? >>> बांग्ला देश, पाकिस्तान, इराण, इराक, सीरीया, मालदीव, अफगाणिस्तान इथेही जावे माणसाने.

खानसाहेब,

भारतात असताना (घर का खाना खानार्या) त्याने पार्ले जीआवडीने खाल्ल्याचे मलाही आठवत नाही.
तिथे राहिल्यावर चवीत बदल झाला असेल असे वाटते. म्हणून दुर्लक्ष केले.

आणि हेच जपानी माणसाला रोज वरणभात खा म्हटलं तर तो वेडा होईल.>>>
भारतीय माणुस सुद्धा होईल.

वरण भात

तुम्हाला १०-१२ दिवस कुठे बाहेरगावी गेल्यावर जर कधी एकदा "वरणभात" खातोय असे होत असेल तर समजा की तुम्ही पक्के महाराष्ट्रीयन आहात!पॉप्युलर महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थात पुरणपोळीचा नंबर जरी वर असला तरी पुरणपोळीचा बेत केल्यावर आपण म्हणतो "आज पुरणा वरणाचा स्वयंपाक आहे".

सुवासिक आंबेमोहोर तांदळाचा वाफाळता मऊ भात.. त्यावर तुरीच्या डाळीचे घट्ट गोडसर साधे वरण ! भात मऊ असावा. वरण एकजीव घोटलेले असावे. पाणी आणि डाळ वेगळी नसावी. तूप रवाळ आणि साजूक असावे! यात चवीपुरते मीठ आणि लिंबू पिळून कालवले की एक अजरामर डिश तयार होते. वरण भात! ते कालवण्याचीपण एक कला आहे. वरण लिंबू मीठ तूप सगळीकडे समान पसरायला हवे. भात फार घट्ट किंवा फार सैलसर नको. तर असा अद्वितीय वरणभात खाल्ला की ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.
आपण हल्ली चौरस आहार, वन डिश मिल वगैरेंच्या गोष्टी करतो. तुम्हाला सांगते, वरणभातासारखे दुसरी चौरस आहाराचे वन डिश मिल नाही! भातातून कार्ब्ज, वरणातून प्रोटीन, लिंबातून व्हिटॅमिन आणि तुपातून फॅट्स मिळतात! वन डिश मील शोधणाऱ्या माणसाला अजून काय हवे? हे म्हणजे काखेत कळसा अन गावाला वळसा अशातला प्रकार झाला!

आपल्याकडे देवाच्या नैवेद्याला ताटात बाकी कुठला पदार्थ कमी जास्त असला तरी वरण भात लागतोच! भाताची सुबक मूद आणि त्यावर वरण तूप आणि तुळशीपत्र ठेवले की त्या नैवेद्याने देवही प्रसन्न होतो!
जेवणाची पंगत देखील वरण भाताने सुरू होते. डावी उजवी बाजू वाढून झाल्यावर भात येतो. मागोमाग वरण आणि एकदा त्यावर तूप पडले की "वदनी कवळ घेता" या श्लोकाने पंगत सुरू होते.

लहान मूल दूध प्यायच्या स्टेजमधून सॉलिड खाण्याच्या स्टेजमध्ये आले की त्याला आपण त्यांना वरण भात द्यायला सुरुवात करतो. कोणी आजारी असेल किंवा
आजारातून उठले असेल तर त्यांनाही आपण वरण भात देतो. म्हणारपणी अन्न नीट चावून खाता येत नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे वरणभात असतो!

माझी मुलगी मला सांगते," मम्मा तू आजीकडून वरण शिकून घे. आजीचा वरण भात यंमी असतो." आणि मलाही "सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी" सारखे वाटते. खरेच आईसारखे वरण काही जमत नाही आपल्याला . त्याची चवच वेगळी .त्यातली आपुलकी माया प्रेम ममता तर अफलातूनच

आपल्यापैकी बहुतेक लोकांचे वरणभात हे कम्फर्ट फूड असते! म्हणजे जे खाल्ल्यावर पोटच नाही तर आत्मा तृप्त होतो!

माझा तर नक्कीच होते. तुमचा होतो का?

>>वरणभाताचे पंखे बघा.

ये अबी बी चलरा?! मै अंटा र्क्टिका जाको पेंग्विना देक को बिर्यानी खाको वापिस मुंबई आगई पसीना पोचनेको.

एक अरे मतलब ज्यांना जे न्यायचे ते नेउ दे. धागाकर्त्या वहिनींनी भार तात नवीन काय घेउन जाण्याजोगे हे कळायला धागा काढलेला आहे. भारतात आता उत्तम प्रकारचे लेटेस्ट डिझाइनचे रेडिमेड कपडे, इंडोवेस्टर्न, भारतीय शरीरयष्टीला शोभून दिसेल असे वेस्टर्न वेअर जे पर देशात ऑफिसात घालता येते, उत्तम प्रका रच्या डिझायनर( महाग नव्हे) साड्या व बिलोज. खरेच पिंट्रेस्ट वर साड्या ब्लाउजची व्हरायटी बघितली तर मन थक्क होते. साध्या कॉटन साड्या व सूट पण काय एलिगंट दिसतात.

झालस्त र नव्या पद्धतीचे दागिने क्रोकरी, हे ते फार मस्त मिळते, डॉलर युरो मध्ये ह्याची किंमत फार कमी वाट्ते.

हैद्राबाद साइडला घराचे पूर्ण पड्दे, मापे देउन शिवून घेतात, तसेच जित्के बेड त्याचे बेड लिनन इथून बनवून नेतात. अमेरिकन साई जच्या शॅम्स
ची कव्हरे शिवून देणार एक शिं पी अमीर पेट मध्ये आहे.

हर प्रकारचे एक्स्क्लुझीव मसाले लोणची, पापड वाळवण, ह्या ची आपल्या देशात इतकी लयलूट आहे कि नेता किती नेउ दो कराने दो ब्यागाने असे वाट्ते.

दुबई सौदी मध्ये लग्न असले तर दुल्ह्याचा सेहरा जो फ्रेश मोग र्‍याच्या फुलांचा बनलेला असतो तो ही जातो इथून पक्षी हैद्रा बादेतून असे ऐकले होते.
तुम्ही मला सांगा, पूना बेकरीतून खारी नेली प्रेमाने बॅगेत रॅप करून वगैरे आणि मग इतका भला मोठा बोअरिन्ग प्रवास, कम्यु ट करून घरी पोहोचल्यावर ड्युटी जॉ इन करायच्या आधी एक कप गरम चहा व खारी खाण्यातली मज्जा काय न्यारी असेल. होकिनाइ.

Pages