Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"पेढे घेवा पेढे.. काशीक झील
"पेढे घेवा पेढे.. दत्ताक झील झालां..!" असे म्हणत वच्छी आनंदाने गावभर पेढे वाटत होती काल.
शनिवारच्या भागात काय झालं
शनिवारच्या भागात काय झालं कुणीतरी सांगा ना plz. माझं मिसलं. दत्ताला झिलासकट घराबाहेर काढलं का अण्णांनी?
नाही, कारण सुंदरा उगवली ना
नाही, कारण सुंदरा उगवली ना तिथे ( पाटणकरीण ). आधी दत्ताने अण्णांना सांगीतले की तुम्ही मुलाला घरात नाही घेतले तर मी काहीही करेन, मग अण्णोबांनी लगेच बंदूक घेतली मारायला. तेवढ्यात मनात भरलेली सुंदरा उगवली. व तिने हस्तक्षेप करुन बाळाला घरात घ्यायला अण्णुकल्याला मजबूर केले. ( व्हिलनला मी काही पण नावे ठेवते)
भरीस भर म्हणजे त्य बाळाच्या चेहेर्यावर जन्मखूण आहे म्हणे, जशी काशीला होती.
हायला! पहिल्या/ कि दुसऱ्या
हायला! पहिल्या/ कि दुसऱ्या भागात दत्ताला फक्त एकच मुलगी दाखवली होती. पूर्वा नावाची. ती अण्णांची फार लाडकी नात असते.
हा झील कुठनं आला आता??
दुसऱ्या भागात दत्ताला फक्त
दुसऱ्या भागात दत्ताला फक्त एकच मुलगी दाखवली होती. पूर्वा नावाची>>> निधी, गणेशाक इसरलंस काय गे बाय.
नाही गं निधी. पूर्वा धाकटी
नाही गं निधी. पूर्वा धाकटी मुलगी असते दत्ताची. आणी गणोबा मोठे. पण गणोबा काही शिकत नाही, उनाडक्या करत एका मांत्रिकाच्या नादी लागुन कायम दत्ताचे फटके खातो. मुलगी मात्र समजुतदार असते, अभ्यासु असते.
मांत्रिक म्हंजे तां वच्छीचो
मांत्रिक म्हंजे तां वच्छीचो घरी येतां तांच ना..??
बहुतेक तोच असावा. कारण गणेश
बहुतेक तोच असावा. कारण गणेश जेव्हा १७-१८ वर्षाचा असतो तेव्हा तो मांत्रिक वयस्कर, उजडा चमन दाखवलाय.
अरे देवा!! होय होय गणेशाक
अरे देवा!! होय होय गणेशाक इसारलंयचं मी. माका पूर्वाच चांगला लक्षात रवला. गोड दिसायचा.
धन्यवाद रश्मी ...
नाही, कारण सुंदरा उगवली ना तिथे ( पाटणकरीण ). आधी दत्ताने अण्णांना सांगीतले की तुम्ही मुलाला घरात नाही घेतले तर मी काहीही करेन, मग अण्णोबांनी लगेच बंदूक घेतली मारायला. तेवढ्यात मनात भरलेली सुंदरा उगवली. व तिने हस्तक्षेप करुन बाळाला घरात घ्यायला अण्णुकल्याला मजबूर केले. ( व्हिलनला मी काही पण नावे ठेवते)
भरीस भर म्हणजे त्य बाळाच्या चेहेर्यावर जन्मखूण आहे म्हणे, जशी काशीला होती.>> धन्यवाद रश्मी ...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=_tanV4W0PIo&t=14s
वच्छीचो अॅक्टिंगिक तोड नाय.
वच्छीचो अॅक्टिंगिक तोड नाय. कालचो भागात तिकां माईवांगडा बोलतान बघुक काळीज पिळवटुन ईलो..!
कालचा भाग माई, सरिता अन
कालचा भाग माई, सरिता अन छायाने खाऊन टाकला.
आण्णाने सरिता-दत्ताला मुलासहीत दिवस मावळायच्या आत घर सोडायला सांगितलं होतं.. दत्ता लगेच बॅग भरुन तयार.. त्याअवरुन माईचं रडगाणं.. आण्णाला काय ब्लॅकमेल कर्तेय.. नानाला काय फितवतेय.. दत्ताला ब्लॅकमेल.. शेवटी छायाने मस्त झापलं दत्ताला अन सरिताला.
दत्ता बॅग घेऊन घराबाहेर गेला अन सरिता पोराला घेऊन उंबर्यातुन पाय बाहेर टाकणाअर तोच आण्णा जिन्यावरुन खाली उतरताना दिसतो.. अचानक उंबर्यावरचा पाय मागे घेऊन सरिता आण्णाकडे बघुन म्हणते - 'ह्या घरातुन पोराला आणि नवर्याला बाहेर घेऊन जायला मी काय वच्छी नाय.. आणि हे पोर पण काशी नाय.. माझा, पोराचा अन माझ्या नवर्याचा या घरावर हक्क आहे..!'.. झालं.... आण्णासहित सर्वांची बोलती बंद.. माईला दत्ता,सरिता, नातु घराबाहेर जाऊ शकणार नाही याचा आनंद आणि आणि आता आण्णा काय करेल याची धास्ती याची जबर भावमुद्रा चेहर्यावर दिसली.
आजच्या भागात छाया माईचे कान भरताना दिसणार आहे.. ती म्हणतेय की सरिता जे बोलली ते माईने आधीच करायला हवे होते.. सरिता सारखी बाई या घरत आली हे नशिब.. पण जी बाई आण्णाला निरुत्तर करु शकते ती माईच्या डोक्यावर पण मिर्यो वाटु शकणा..!
कालचा भाग जाम आवडला मला. काल
कालचा भाग जाम आवडला मला. काल कधी नव्हे ते छाया आवदली मला आणि सरिता तर एकदम,,,, जियो....
काय झापलं ना तिने दत्ता ला
काय झापलं तिने दत्ताक.. सरिताचो कवतिक पन केल्यान..!
काल वच्छीन सरिताच्या झीलाक
काल वच्छीन सरिताचो झीलाक डोळे भरुन पाह्यल्यान.
थंय पाटणकर कामासाठी बाहेर गेलो व्हयो आन हंयसर पाटणाकरणीन आण्णाक ग्रीन सिग्नल दिल्यान...
काल माई खंय दिसली नाय.. खंय गेली आसां..?? माई नसतां तं काय बरा वाटत नाय.. माई असां तं घर असां..!
बाळ गेलं दत्ताचं. दसर्
बाळ गेलं दत्ताचं. दसर्याच्याच दिवशी. काय मेले दळभद्री
काल माई खंय दिसली नाय..>>> +१ बाळ इतकं रडत असताना आजी तिथेच असायला हवी. असंही वाटलं.
अरे इलो रे इलो.... माधव इलो.
अरे इलो रे इलो.... माधव इलो.
बाळ गेलं दत्ताचं. दसर्
बाळ गेलं दत्ताचं. दसर्याच्याच दिवशी. काय मेले दळभद्री >> कवा..?? माका दिसलो कसा नाय..???
अरे इलो रे इलो.... माधव इलो.>> सोबत ठोकळीक आणतां काय तां पाहायचं
तां पोष्टमन लय बोअर करताव... उगाच माईक पिडत असतां...! तो स्वता:क माईचो माहेरचो मानुस समजतां का काय हे माका कळणां नाय..!
कवा..?? माका दिसलो कसा नाय..?
कवा..?? माका दिसलो कसा नाय..??? >>> बाळ तं माका पण नाय दिसणा. फक्त गोधडी दिसणा.
कालच्या एपिच्या शेवटी सारीता वच्चीने दिलेली साखळी मुलाला घालायला जाते तर बाळाकडे बघुन ओरडते. मग दत्ता माई धावत येतात आणि बाळ गेलं म्हणतात. आता गेलं म्हणजे काय ते आज कळेल.
मिस्टर बीन म्हणजेच माधव ४-५ रिकामे पॅक केलेले खोके घेउन येणार आहे आणि हातात एकावर एक ठेवलेले खोके पडणार आहेत. पडतानाच खोके रिकामे आहेत ते समजलं खरंतर)
गो बाय माजे... बाबु जातां काय
कालच्या एपिच्या शेवटी सारीता वच्चीने दिलेली साखळी मुलाला घालायला जाते तर बाळाकडे बघुन ओरडते. मग दत्ता माई धावत येतात आणि बाळ गेलं म्हणतात. आता गेलं म्हणजे काय ते आज कळेल.>> गो बाय माजे... बाबु जातां काय आज..?
नसां गेलो.. पाटणकर स्वतः कुंडली सांगुक ईलय.. कुंडली चांगली असां म्हणतले. मगे.. असां होउचा नाय.. बाळ गेलं म्हंजे गायब होऊक व्हयां.
गे बाय माजे ! कुठे गेलं ते
गे बाय माजे ! कुठे गेलं ते बाळ? या चांडाळ त्रिकुटाने तर पळवले / गायब केले नसेल ना? ( चांडाळ त्रिकुट म्हणजे अण्णुकला, टगु व रघु ) तशी पण अण्णांची नजर असतेच की त्या बाळावर. आता जर ते बाळ गायब झाले असेल तर दत्ता व सरीताला वच्छीचा संशय येऊ शकतो. आणी ते बाळ जर ढगात गेले असेल तर मग अण्णुकल्यानेच काहीतरी केले असे होऊ शकते.
पण हा पांडु काय डोक्यावर पडला आहे का? काहीही लिहीतो?
बाळ खरंच गेलेलं दाखवलं
बाळ खरंच गेलेलं दाखवलं त्याच्या बारशाच्या दिवशीच. वर कुणीतरी दसऱ्याच्या दिवशी का म्हणतंय माका कळला नाय . पण सारिताक असा लांबून कसा कळळा बाळ गेल्याचं? अण्णांन च त्याला मारलं पण कधी कसं हे नाय कळलं. असं दाखवायला नको होतं खरं खूपच अंगावर येतं.
हायला मीच ती. दसर्यच्या
हायला मीच ती. दसर्यच्या दिवशी कुठल्या धुंदकीत लिहिलं मी काय कळेचना मला
बारशाच्या दिवशीच.
कालचा एपिसोड सर्वात जास्त
कालचा एपिसोड सर्वात जास्त आवडला. माई कुठे दिसली नाय पण छायाच्या स्वभावातला एक पैलु दिसला. छाया वरुन काटेरी फणस असली तरी आतुन गोड गरा आहे असे वाटले. दत्ता-सरिताचे बाळ गेले हे अजुनही मनाला पटत नाही. वाईट झाले.
त्यांचे बाळ गेले म्हणुन आण्णाला केवढा आनंद झालाय. दत्ताला वाटले बाळ वच्छीच्या अंगार्यामुळे गेले म्हणुन तो तिला मारायला कोयता घेऊन बाहेर पडतो तो सीन तर अक्षरशः मस्त जमलाय. खरेतर वच्छीच्या अंगार्यामुळे काहिही झालेले नसते पण तरी तिलादेखील बाळ तिच्यामुळेच गेले असे वाटुन ती समुद्राच्या कड्यावर जीव द्यायला आलेली असते. (हे व्हीएफएक्स छान जमलंय..! ते बघताना मी देखील खाली समुद्रात पडतो की काय असे वाटुन गेले..! ) तिची अवस्था आणि बडबड ऐकुन दत्ता तिला मारत नाही.
उद्याच्या भागाची झलक दाखवताना माधव परत आलेला दाखवलाय.. त्याचं चुलीपुढे बसलेल्या माईचे मागुन येऊन डोळे झाकणं आणि माईने त्याला बरोब्बर ओळखणं खुप भावलं.. तो तिला म्हणतो देखील की तो घरातुन निघुन जाताना सुद्धा ती अशीच अश्रु गाळत होती आणि आता परत आलाय तरी सुद्धा अश्रु गाळतीय (तिला दुसरे कामच काय असते म्हणा ) आणि हे तिची सर्वांंवर असलेली माया म्हणुन तिचे डोळे असे कायम भरलेले असतात असंही म्हणतो. वर आता तिच्या प्रेमात नातु म्हणुन दत्ताचा मुलगा वाटेकरी आलाय हे बोलुन जातो (त्याला बाळ गेलंय हे माहित नसतं..!) त्यावेळी माईची अवस्था कशी झाली ते बघुन क्षणभर माझ्याही काळजात कालवाकालव झाली.. डोळ्याची कडा आपोआप ओलसर झाली
आजचा भाग आनंद-दु:ख यांच्या मिश्रणाने भरलेला असणार हे नक्की..!
अरे रे बाळ गेलं मला नाही बघव
अरे रे बाळ गेलं मला नाही बघव णार. वच्छीची अवस्था पण समजू शकते पण हे टोकाचे क्रौर्य वाट्ते. पाटण करीण काय डांबीस आहे. तो नवरा खरेच इतका भोळा आहे की नाटक करतो माहीत असून? सरिता बाळाला जी अंगाई म्हणत होती ती खूप गोड होती. बाळाला दूध वाटीत. मग माउ येते . मी सर्व एपिसोड बँक करून रविवारी बघते सलग. घरचेच लोक आले आहेत असे वाटते.
कालच्या एपिसोडात आनंद-दु:ख
कालच्या एपिसोडात आनंद-दु:ख हातात-हात घालुन आले नी गेले. माधव परत आला आणि आण्णाने त्याला घरातुन हाकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा माधवने ते घर वडिलोपर्जित असल्याने तिथुन हाकलणे आण्णाला शक्य नाहे त्याबाबत चे काही कागदपत्रे दाखवली.
आण्णाच्या अंगातली मस्ती माधव आज उतरवतो का हे पाहण्याची उत्सुकता आहे.
आता बोर होतय राखेचा..
आता बोर होतय राखेचा..
हो. मी अधीमधी बघते.
हो. मी अधीमधी बघते.
आमच्या मालवणी बाईंकडे टीव्ही
आमच्या मालवणी बाईंकडे टीव्ही नाही त्यामुळे सर्व एपिसोड मी लावले होते ते त्यांनी अगदी मन लावून बसून बघितले. होयतंर एकदम परफेक्ट जमले आहे कास्टला. माधव व पांडू छायाचा बॉय फ्रेंड कोण आहे ते संवाद एकदम भारी विनोदी जमला आहे.जरूर बघा. माधव स्वतःशी बोलतो तेव्हा पांडूला वाट्ते तो प्रश्न त्याला विचारतो आहे. व त्याला खरेच विचार्तो तेव्हा पांडू तुमचा तुम का म्हणून गप्प बसतो. जाम विनोदी जमला आहे तो भाग. माधवचे चाकरमानी असणे, मोबाईल बघणे, जॉगिन्ग ला जाणे, मुंबईच्या सवई एकदम परफेक्ट. हो हो.
Pages