साम दाम दंड भेद

Submitted by राजेंद्र देवी on 7 July, 2019 - 09:50

साम दाम दंड भेद

आमच्या घामाला दाम नाही
हे रामा, आता जगण्यात राम नाही

किती हि कष्ट केले तरी
कनवटीला छदाम नाही
नियतीला पण काही ना वाटे
परिस्थितीशी साम नाही

अहोरात्र धडपडतो पण
वेदनेला बाम नाही
भरल्या गोकुळात भरकटतो
भेटत अजून श्याम नाही

गतजन्मीच्या कर्माचा दंड हा
ह्यात काही भेद नाही
जगण्याशिवाय तरी आता
या जगात दुसरे काम नाही

राजेंद्र देवी

विषय: काव्यलेखनहितगुज ग्रूप

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!