रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरिता ला उलट्या होताहेत म्हणजे काशीच बहुधा तिच्या पोटी पुनर्जन्म घेणार . कारण पहिल्या सीझनमध्ये दत्ताचा मुलगा देखील काशीसारखाच दिवसदिवस गायब असायचा ! आणि तो सतत काहीबाही विचित्र / देवादेवस्की करायचा !

कारण पहिल्या सीझनमध्ये दत्ताचा मुलगा देखील काशीसारखाच दिवसदिवस गायब असायचा ! आणि तो सतत काहीबाही विचित्र / देवादेवस्की करायचा !>> मला तर हे माहित्च नाही. कोण होता दत्ताच मुलगा..??

हा गणेश उर्फ गणोबा. काही शिक्षण नाही, काम धंदा करत नाही म्हणून दत्ताकडुन जाम मार खात असतो. घरचे आपल्याला काहीच किंमत् देत नाहीत म्हणून नाराज/ पंकज उदास रहातो. कुठल्यातरी मानमोड्या माणसाबरोबर हिंडत असतो.

सरिता-दत्ताक बाबु होऊचा आसंय. आण्णाक वाटुक असां की काशी पुनर्जन्म घेवुक नायकाच्या वाड्यात येतलंय. मगे आण्णा माईक सांगतां की सरिताचो काळजी घेवा.. तिका झील नको चेडु होऊक व्हया. स्त्री-पुरुष समानताचो जनक आण्णा नाईक पण असंय हे माका ठाऊक नव्हतां..! Proud

सरिता-दत्ताक बाबु होऊचा आसंय. आण्णाक वाटुक असां की काशी पुनर्जन्म घेवुक नायकाच्या वाड्यात येतलंय. मगे आण्णा माईक सांगतां की सरिताचो काळजी घेवा.. तिका झील नको चेडु होऊक व्हया. स्त्री-पुरुष समानताचो जनक आण्णा नाईक पण असंय हे माका ठाऊक नव्हतां..! >>>>>> Lol इथे सुद्दा पुनर्जन्म!

स्त्रीपुरुष समानता वगैरे नाही हो, किती झाले तरी दत्ता हा भिवरीचा मुलगा , अण्णा त्याला गडी म्हणूनच वागवतो.
मग झील झालो तर माधवाकच होवूदे आणि दत्ताक चेडु म्हणजे इस्टेटीचा वारस "ओरिजिनल " हवा , ही अण्णाची पॉलिसी आहे...

अन्ना लय डोकेबाज है ! उसको मामूली मत समझो !!!

त्रीपुरुष समानता वगैरे नाही हो, किती झाले तरी दत्ता हा भिवरीचा मुलगा , अण्णा त्याला गडी म्हणूनच वागवतो.
मग झील झालो तर माधवाकच होवूदे आणि दत्ताक चेडु म्हणजे इस्टेटीचा वारस "ओरिजिनल " हवा , ही अण्णाची पॉलिसी आहे...>> व्हय.. हे माकां डोस्क्यात कसा ईलो नाय..? Uhoh Proud

अति अवांतरः

व्हाट्सअप्प ला एक मस्त कविता आलीये. पोस्ट करतो.

।। बायल ती बायल आसता।।

बायल ती बायल आसता
तिच्या हातान तुजी फायल आसता
ती खूश आसल्यारच
तुज्या तोणार स्मायल आसता
म्हणून म्हणटात..
बायल ती बायल आसता

बायलेक परतें सांगप नासता
तिचें सगळें आयकप आसता
बायल केन्नाच चुकप शक्य नासता
वोग्गी आपली चूक मानप आसता
तूं लेन्डलायन फोन
ती स्मार्टफोन आसता
म्हणून म्हणटात..
बायल ती बायल आसता

बायलेक शोपिंगाक व्हरप आसता
हातान बॅगां धरप आसता
आपली बायल म्हऱ्यान आसतना
दुसऱ्या बायलांक पळोवप नासता
बायलेची नदर म्हळ्यार
लोंग रेन्ज मिसायल आसता
म्हणून म्हणटात..
बायल ती बायल आसता

बायल वाडटा तें जेवप आसता
उपकार मानून खावप आसता
आवयल्या जेवणाची तुस्त
बायले मुखार करप नासता
तिच्या हर बात मे स्वेग
हर अदा मे स्टायल आसता
म्हणून म्हणटात..
बायल ती बायल आसता

...शप्पत घेऊन सांगता ... हावे ही बरोवना.

भिवरी हे अण्णांचे पूर्वीचे एक आदिवासी प्रेमपात्र . ती मुलाला घेऊन अण्णाच्या घरी राहायला येते तेव्हा अण्णा तिला मारून कलम लावतो . दत्ता हा अण्णापासून झालेला तिचा मुलगा !

Rofl

भिवरीचे गाणे :- मी रात टाकली, मी कात टाकली
मी मोडक्या संसाराची बाय लाज टाकली
अंगात माझीया भिनलाय हा वारा
मी बाशिंदी मनमानी, कालवणात नहाली
मी रात टाकली...

अण्णाचे गाणे : बाय गो, बाय गो, फेणीची नाय गो
ताकातली वाईच आण तू जरा
रंगेल गडी मी , हाय का कुणी असा
दावीन मी इंगा येता जाता

माईचे गाणे:- घराचे सपान घेऊन हाती , चालले मी नायकांच्या भल्याच्या साठी
छाया हसं, माधव रडं, दत्ताला घेऊन हाती
दिलाचा दिलबर, झिपर्‍या हा मिशीवाला कुट्ट दिसेना मला
गं बाई बाई कुट्ट् दिसनां मला, शोधु कुटं, शोधु कुटं
दिसला गं बाई दिसला, दिसला गं बाई दिसला
मला बघुन अंगावर वसकला गं बाई हो..

शेवंता गातीय : - रात अकेली है, बुझ गये दीप
पाटणकर गेलो गावाक, झोप नाही मज एकटीक

माईचे गाणे:- घराचे सपान घेऊन हाती , चालले मी नायकांच्या भल्याच्या साठी
छाया हसं, माधव रडं, दत्ताला घेऊन हाती
दिलाचा दिलबर, झिपर्‍या हा मिशीवाला कुट्ट दिसेना मला
गं बाई बाई कुट्ट् दिसनां मला, शोधु कुटं, शोधु कुटं
दिसला गं बाई दिसला, दिसला गं बाई
मला बघुन अंगावर वसकला गं बाई हो.. >> Biggrin Biggrin

अण्णाचे गाणे : बाय गो, बाय गो, फेणीची नाय गो
ताकातली वाईच आण तू जरा
रंगेल गडी मी , हाय का कुणी असा
दावीन मी इंगा येता जाता >>>>>>>>>> हा हा हा हा हा हा

आजचा राखेचा एपिसोड सुपर रियलिस्टिक आहे . मी बेहद्द खूश आहे डायरेक्टर वर !
सरिता आणि दत्ता तिच्या आईबापाकडे जातात तो प्रसंग कोकणातील शब्दशः हजारो घरात १००% असाच घडतो
: हा सीझन FTII सारख्या इंस्टिट्यूट मध्ये अभ्यासासाठी ठेवावा ...

काही विशेष नव्हते, माझी सुरुवात गेली. अभिराम , माधवला काका बनणार असल्याची गोड बातमी देतो, म्हणून माधव पण त्यांना पत्र पाठवतो. दत्ता ते वाचुन दाखवतो. माधव त्यात सर्वांना सरीताची काळजी घ्यायला सांगतो. इकडे सरीताला आईची आठवण येऊन ती हळवी होते, म्हणून दत्ता तिला म्हणतो की बाहेर जाऊया. मग तिला तिच्या आई वडलांकडे घेऊन जातो. आधी सरीताने काहीतरी चूक केलीय असे दाखवत दत्ता तिला खोटे रागवतो, मग सरीताचे वडील घाबरतात, ते दत्ताच्या पाया पडणार तितक्यात दत्ता त्यांना ते आजोबा होणारेत असे सांगुन मी गंमत करत होतो असे सांगतो. सरीताचे आई बाप खुश होतात.

इकडे वच्छी आणी शोभा हळद कुटता कुटता अण्णाला शिव्या देतात. मग आबा भडकुन म्हणतात आता हे बंद करा. त्यातच ते बोलुन जातात की दत्ताला मूल होनारे. हे ऐकुन दोघी त्या मुलाचे वाईट करायचे ठरवतात, आणी तो मागचा मांत्रिक दाखवलाय, त्याला सुपारी देतात. ते उद्या आहे. अभिराम कडुन आबांना कळते दत्ताबद्दल. ( आबा- काशीचे वडील )

आबा वच्छी मला जाम आव ड तात. अण्णा व शेवं ताचा बंदुकी सोबत लव्हशीन भारी डेंजर होता. ही सरिता जास्त छान आहे. राखेचा वन मधली जरा जास्त आगाव वाटते. माईचे काम केलेली न टी कोण आहे? खूपच मस्त काम करते. अगदी आये वाट्ते तिचा आवाज ऐकायला तरी मी लावतेच लावते.

@ रश्मी.. धन्स...! Bw

@ अमा : माईचे काम केलेली न टी कोण आहे? >> शकुंतला नरे
खूपच मस्त काम करते. अगदी आये वाट्ते तिचा आवाज ऐकायला तरी मी लावतेच लावते.>> मी तर तिच्यासाठीच राखेचा-२ पहाणे सुरु केले.. पहिला भाग कधे-मधे पाहिला तेव्हा मला ती मला खुप छान अभिनय करताना दिसायची. एकदम लाघवी व्यकीमत्व आहे.

हो ना.. अगदी मलाही तसेच वाटते. त्यांचा हा गुण हेरुन शकुंतला नरेंना झी मराठी ने गेले १-१.५ वर्षं फुल टाईम काम दिलंय. राखेचा-१ मधे रोज दिसल्यानंतर त्या नकटीच्या लग्नात रोज दिसायच्या आणि न.ल.सा. नंतर राखेचा-२ मधेही रोज दिसत आहेत.

अगदी अगदी. मला पण माझी आईच आठवते. तशीच नौवारी साडी. वडिलांना दबून राहणे. किचन मध्ये विचार करत बसणे चुलीसमोर. मुलांची काळजी करणे. माई गोड आहे खूप. आण्ना कधी पण तिच्याशी सरळ बोलत नाही वर रूम मध्ये ती काही विचारायल आली तर हाकलून लावतो.
खरे तर सर्व पात्रे अगदी नॅचरल बोलतात सीरीअल मधल्यासारखे आरडून ड्रामा करून बोलत नाहीत. हा खूप रिलिफ आहे. पांडू दत्ता पण हळू खालच्या पट्टीत. छाया एक आहे आपली गजघंटा पण घरातली मुलगी आहे. चालून जातेय.

दत्त्ता भाउ म्हणतात ना जुळे झाले तर ते फार गोड.

Pages