शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:
यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी
तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.
आई वापरते असे मराठवाड्यातले
आई वापरते असे मराठवाड्यातले काही शब्द:
किवंडा- बहिरा (किवंडा झालायंस काय मुडद्या, कितीवेळ निजून राहशील, सूर्य डोंबल्यावर आलाव.)
चुंगडं- पोतं (चांगली २ चुंगडी जवारी आणताव आता)
वडिलांच्या बोलण्यात येणारे शब्द:
येरवाळी- लवकर, सकाळी सकाळी
बेलाशक- निश्चिंतपणे
मावळण- आत्या
त्यामुळे ' शिरां पडो घरावर '
त्यामुळे ' शिरां पडो घरावर ' अशी मूळ शापवाणी असावी.>>>>> भाऊ, धन्यवाद! नक्की अर्थ माहित नव्हता,तो कळला.
तुझे तळपट होवो(म्हणजे माहित नाही) याच्याशी साधर्म्य आहे.
अरे वा! मजा आली एक-एक शब्द
अरे वा! मजा आली एक-एक शब्द वाचायला.
भातगोटा - तांदूळ निवडताना त्यात आख्ख्या साळीचा दाणा दिसला तर काढून टाकतात, तो
कुंडा - लहान bowl (तळव्यावर पेलता येण्याजोगा)
तसराळं - मोठा, पसरट कुंडा (हा एका तळव्यावर धरता येत नाही)
पाईप - ट्यूबलाईट
गोळा - बल्ब
हौरी - तीळ
हौरी - तीळ
ममई - मुंबई
ढवळा - पांढरा
बांडा - ???
कांबळ - घोंगडी
कोंगाडी - कन्नड
दिवटी - एक प्रकारचा उभट दिवा
आवताण - निमंत्रण ........ उदा. - पुढाऱ्यांकडून मिळालेली आश्वासने हि लबाड घरची आवताण असतात
बाजारबुणगे - बिनकामाचे लोक (मूळ शब्द बाजारभुणगे याचा खरा अर्थ वेगळा आहे तसा ) ......... उदा.- सध्या आपल्याकडं येडा म्हमद्या आणि त्याच्या बाजारबुणग्यांचं राज्य आहे
झुंझुरका - उजाडताना
झुंझुरका - उजाडताना
बांडा-तांबडा
स्टंट- राजकीय स्टंट म्हणून ग्रामस्त वापरतात
विंदिरा गांधी - इंदिरा गांधी
पाटलोन- पॅंट
लेंगा- पायजमा
बाडबिस्तारा- सामानसुमान
लवाजमा - वस्तु + माणसे, जामानिमा
बुशकोट- बूशर्ट
मसराई धोतर- तलम धोतर
कोशा- सिल्क कॉटन मिक्स मुंडासे
गुंडी - बटन
बरबाट- मटन
आवातनं- आमंत्रण
टमटम- मोटार
बस्ता बांधणे - विवाहाचे कपडे खरेदी
काट्यांचा फास - बाभळ डहाळून एकत्रित ठेवले ल्या फांद्या
बर्ची - कु-हाड
कालवण - पातळ भाजी
धोंड्याचा महिना - अधिक मास
बुरुड, कैकाडी- टोपल्या विणणारे
कोशाचं कापड असतं आमच्या
कोशाचं कापड असतं आमच्या भंडारा जिल्ह्य़ात निर्मिती होते. अळी च्या कोशापासून धागा तयार करतात.
कोशाचं कापड असतं आमच्या
कोशाचं कापड असतं आमच्या भंडारा जिल्ह्य़ात निर्मिती होते. अळी च्या कोशा वपासून धागा तयार करतात.>>>
हे रेशीम असावे...
अर्र्र्र मी लै एक्सपर्ट
अर्र्र्र मी लै एक्सपर्ट हाय त्याच्यात
शिरां पडो तुझ्या तोंडार...
शिरां पडो तुझ्या तोंडार... असं म्हणतात.. इथे तोंडात नाहि अर्थ होत तोंडावर असा होतो.. काट्याकुट्याची शिरटां असली कि जखमा होणारच ना..
झिल - मुलगा
बाव - विहिर
खॉट लावना - पाय लागणे.. इथे एक म्हण आहे... रोजचा पावना खॉट लावना
शहरी बोली भाषा का नसते? हा
शहरी बोली भाषा का नसते? हा अन्याय आहे.
येऊद्या शहरी सुध्दा.
येऊद्या शहरी सुध्दा.
तौसा=काकडी
तौसा=काकडी
(इतभर तौसा नी हातभर बी)
*शिरा पडो मेल्या तुज्या
*शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार" असाच नॉर्मली वापरला जातो ना हा वाक्प्रचार?* - आ.रा.रा, , ' शिरां पडो घरावर ' मूळ वाक्प्रचार असावा ( व मलाही तसंच वाटतं ) व नंतर त्याचा वापर व्यापक होत गेला असावा.
नदी व खाडी ( नदीचा समुद्रानजीकचा भाग जिथं पाणी खारट असतं ) हीं कोकणाची प्रादेशिक वैशिषठयं. त्या संदर्भातील कांही शब्द -
भाट - नदी/खाडीच्या पात्रात मधेच असणारा अतिशय उथळ पाण्याचा किंवा पाण्यावर आलेल्या जमिनीचा भाग;
कोंड - नदीच्या पात्रात मधेच असलेला अतिशय खोल पाण्याचा भाग;
साण - होड्या कांठावर लावण्याची सोईची जागा;
उलांडी - लाटा किंवा वारा यामुळे होडी हेलकावूं नये म्हणून पाण्यात समांतर असा होडीला जोडलेला लाकडाचा ओंडका.
माझी आज्जी प्लॅस्टिकच्या
माझी आज्जी प्लॅस्टिकच्या कागदाला मेणकागद म्हणायची आणि जिन्याला दादर!
विंदिरा गांधी - इंदिरा गांधी
विंदिरा गांधी - इंदिरा गांधी >>> हाहाहाहाहा.. ही हाईट आहे! केवळ उच्चार वेगळे केल्याने ते ग्रामीण बोली भाषेतले शब्द ठरत असतील तर माझ्या आजीचे -
मिशन = मशीन
गोर्मेंट = गव्हर्नमेंट
लायसन = लायसन्स
अमोशा = अमावास्या
पोर्णिमा = पौर्णिमा
हे देखिल ग्रामीण बोली शब्द ठरावेत.
(ता.क. तुमचे बाकीचे बरेच शब्द वेगळे आहेत, त्यामुळे कृपया पर्सनली घेऊ नये; ह. घ्या.)
बर्ची - कु-हाड >> खरं म्हणजे
बर्ची - कु-हाड >> खरं म्हणजे बर्ची नावाचं एक वेगळं हत्यार आहे, कुर्हाडीच्याच उंचीचं.
माझी आज्जी प्लॅस्टिकच्या
माझी आज्जी प्लॅस्टिकच्या कागदाला मेणकागद म्हणायची आणि जिन्याला दादर!>> माझी आज्जी मेनकापड म्हणते..
भिंतीला ->दिवाल
भरपूर शब्द आहे. .निवांत लिहिते
शिरा पडो हा वाक्प्रचार विविध
शिरा पडो हा वाक्प्रचार विविध अर्थांनी वापरला जातो
1. गावात कोणी परड्यातली भाजीं चोरुन नेली, गाडी चुकीची चालवून कुंपण उध्वस्त केले/गुरे सोडून पीक खाल्ले की रागात 'शिरा पडली मेल्यांच्या तोंडार, फटकी भरो मेल्यांक' असा उद्धार केला जातो.
2. नातवंडासाठी लाडू करून आजी भेटायला येते आणि 'शिराSSSS पडो, लाडू रवलेच मरे हाडुचे!' अशी हळहळ व्यक्त करते.
3. गप्पात रमलेली गृहिणी जळलेल्या दुधाचा वास आल्यावर 'शिरा पडली, दुद ठेयलय चुलीर त्या लक्षातच नाय मगो' म्हणत स्वतःलाच टपली मारते.
4. आमच्या इथल्या घरात शिरा पडो वरील तिन्ही अर्थात वापरायच्या वेळा येत राहतात अधून मधून.
झी आज्जी प्लॅस्टिकच्या
झी आज्जी प्लॅस्टिकच्या कागदाला मेणकागद म्हणायची >> आमची आजी मेणकापड म्हणे.
वरचे बरेच शब्द माहित आहेत. बाळपण खेड्यात गेल्याने. एखादा नवा आठवला की लिहीन.
शिरा पडो वर खूप काथ्याकूट
शिरा पडो वर खूप काथ्याकूट झाला की... वाचलेच नाही वरचे.
माझ्या लेकीला लहानपणी तोंडात शिरा पडणे ह्या गोड घटनेबद्दल आज्जी किंवा आई अशा सुरात का बोलताहेत हे कळायचे नाही, ती गोंधळून आमच्या तोंडाकडे टकमका बघायची.
कामाय - वगैरे
मीया, बल्ल्या, सूनल्याकामाय जत्रेक गेल्लव...
मात्र करणे - वाया घालवणे
मात्र करणे - वाया घालवणे
ह्यावरुन एकदा गंमत झालेली. मामाच्या गावाला गेलेलो. माझी धाकटी बहिण ( वय ५/६ वर्षे) मामेबहिणीबरोबर कप्डे धुत होती. म्हणजे उगीच पाण्यात घाल, काढ करत होती. साबण हातात आला , तसा तिने एकच कपडा घेवून त्याला मनसोक्त साबण लावायला सुरुवात केली. मामेबहिण तिला म्हणाली, 'साबण मात्र करु नकोस.' झालं, ती रागारागाणे बाहेरच्या रुममधे, सगळे गप्पा मारत बसले होते, तिथे गेली आणि रडवेल्या आवाजात सांगू लागली की,
'मंगलताई मला 'माकड' म्हणाली. "
खरे काय ते कळल्यावर सगळेच हसत बसले
टरकी = तिरळी
टरकी = तिरळी
क्युन्डा/किवंडा = बहिरा
बांग्या/बांगं- तिरळा
बांग्या/बांगं- तिरळा
एखाद्या वस्तूला भर बाजारात
एखाद्या वस्तूला भर बाजारात योग्य भाव न मिळाल्यास ती घरी परतून नेण्याऐवजी बाजार उठल्यानंतर थोडा कमी भाव जरी मिळाला तरी तो स्वीकारणे याला गेला बाजार... म्हणत असावेत.
"शिरा पडो" बहुधा कुठल्यातरी
"शिरा पडो" बहुधा कुठल्यातरी रोगावरून आल्याची शक्यता आहे. ग्रामीण बोलीभाषेत सहसा राग शापवाणी उच्चारून व्यक्त करायची पद्धत होती.
याचे अनेक प्रकार आहेत
तुला आली पटकी
तुला मरी बसली
तुला लावगरा झाला
याचं अजून कठोर रूप म्हणजे "तुझा मुडदा बशीवला मसनात" हि खरे तर महाराष्ट्राची आद्य शिव्यांपैकी एक असेल. दहनाच्या आधी बसून पुरायची पद्धत होती. महाराष्ट्रात अजूनही काही जातीत शिल्लक आहे. "माती झाली" चा संदर्भ मेला आणि पुरल्याने माती झाली असा आहे.
शिरां पडो घरावर अशी मुळ म्हण
शिरां पडो घरावर अशी मुळ म्हण आहे. तोंडार वगैरे बिलकुलच नाही. तुझ्या घरास आग लागो असा अर्थ.
आमच्या इकडे मल्टीकलचर आहे.
काही कोकणातले शब्द,
मोप हाय- भरपूर आहे.
सबूर धर - धीर धर
शीक हाय- आजारी आहे.
मावळण - आत्या
हुदणा- गोंधळ
नेसण- साडी, वस्त्र
अजुन मोप आहेत..
बाकी ग्रामीण भागातल्या
बाकी ग्रामीण भागातल्या लोंकाच्या विविध व्यवसायाच्या संदर्भात येणारे शेकडो शब्द आहेत. रोजच्या आयुष्यातील घटना, भौगोलिक स्ट्रक्चर, हवामान विषयी, असंख्य वेगवेगळे शब्द आहेत. आणि एकाच शब्दाचे बरेच नुआन्स देखील आहेत. यातही जातीनुसार लोक वेगवेगळे शब्द वापरतात.
यात परत प्रत्येक भागात थोडा फार फरक आहे. माझ्या पाहण्यात खेड, कोतुळ, पारनेर ह्या त्रिकोणी भागात एक बोली आहे.
झंपी "शिरां पडो" चा अर्थ "आग
झंपी "शिरां पडो" चा अर्थ "आग लागो" ह्यापेक्षा घरावर काहीतरी आपत्ती येऊ दे असा असावा. शीतळा पडो याचा पण शिरां पडो झाला असं वाटतंय. देवी आल्यावर अंगाची असह्य आग होते. आजकाल देवी राहिल्या नाही त्यामुळे तो संदर्भ लगेच लागत नाही. अजून माहीती मिळाल्यास नक्की सांगा.
फापलने - भटकने
फापलने - भटकने
ववांडा - दुरच्या रस्त्याने जावे लागणे.
उतारा - ओवाळून टाकलेला पदार्थ
उतारा - ओवाळून टाकलेला पदार्थ
उतारा - एखाद्या रोगावरचे औषध
उतारा -धान्य पेरल्यानंतर बियानांचे अंकुरण्याचे प्रमाण
उतारा - जमिनी संदर्भातले कागदपतत्र (सातबाराचा उतारा)
उतारा - जो कधी कधी काहीजनांना सकाळी सकाळी लागतो
Pages