नवीन मराठी म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

Submitted by Parichit on 20 December, 2018 - 01:07

घटनाच अशी घडली कि जीने एका नवीन मराठी म्हणीला जन्म दिला

म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

अर्थ: एखाद्याचे कितीही मोठे नाव आणि कर्तृत्व असले तरी त्याच्याहून श्रेष्ठ असलेला कोणीतरी त्याचा कचरा करतोच.

कधी वापरायची: समजा तुमच्या एखादया ऑफिसमधल्या सहकाऱ्याला अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? पण प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून ते तो करणार. मग त्याला घेऊन त्याचे दु:ख हलके करण्यासाठी म्हणून बीअर प्यायला न्या आणि पिता पिता सांगा...

"नको रे वाईट वाटून घेऊ इतके. आम्हाला माहित आहे प्रमोशन मिळाल्याने तू साहेब झाला आहेस. पण हे बघ काही झाले तरी म्हणतात ना 'अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी'. त्यामुळे चालायचेच. नको मनाला लावून घेऊस. क्लायेंट तुला आपल्या घरचाच आहेस असे समजतो. म्हणून तर तुला पाणी भरायला बोलावले ना"

असे म्हटल्यावर त्याचे दु:ख नक्की हलके होणार म्हणजे होणार.

तर हे एक उदाहरण झाले. हि म्हण अशा अनेक प्रसंगी वापरता येईल. आता या म्हणी मागची घटना काय यावर जरा विचार करू.

घटना: काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुलोत्पन्न कन्या इशा अंबानी हिच्या शाही विवाह प्रसंगी झालेल्या मेजवानी प्रसंगी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वगैरे हे वाढप्याचे काम करत असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. बाकी सुपर डुपर हिरो हिरोईन मंडळींना अंबानींनी नाचून उपस्थितांचे मनोरंजन करायच्या कामाला लावले होते. ह्या प्रकाराची सोशल मिडीयावर खूपच चर्चा रंगली. याचे समर्थन करणारे म्हणाले "वाढप्याचे काम मुलीच्या घरचे आनंदाने करतात. अंबानी हे या दिग्गज कलाकारांना घरच्यासारखेच समजतात. म्हणून त्यांनी वाढप्याचे काम केले तर बिघडले कुठे?"

पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरांना प्रश्न पडतात कि हे सगळे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. जनतेमध्ये यांनी खूप आदर कमावला आहे. यांना इतके मिंधे बनायची काय गरज आहे. अशी कोणती मजबुरी असते यांची कि ह्यांना हि कामे करावी लागतात. जी जनता यांचा आदर करते त्यांचा सुद्धा हा अवमानच नाही का. बर "घरच्यासारखे समजतात" हे लॉजिक असेल तर अंबानी यांनी मोदी किंवा राहुल गांधी किंवा इतर मोठ्या नेत्याला घरचे समजून कामाला का नाही लावले. किंवा अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत.

भारतात एखादा/दी कलाकार कितीही जेष्ठ श्रेष्ठ असेल आणि लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले असले तरी उद्योगपती राजकारणी बिल्डर डॉन इत्यादी लोकांच्या मते त्यांना फार आदर नसतो हेच अनेकदा दिसून आले आहे. कारण अशा घटना आधी पण घडल्या आहेत.

१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.

तर मंडळी तुमचे काय मत आहे यावर?

765448-00-ambanis.jpg

Group content visibility: 
Use group defaults

अमितव, गल्ली बरीच चुकतेय बहुतेक Lol Light 1
आनंदवनातल्या कुष्ठमुक्तांच्या सामुदायिक विवाहात पुलंनी मंगलाष्टके म्हटली होती हे मला नक्की माहित आहे. पुलंच्या बाबा आमटे यांच्यावरच्या लेखात तसं लिहिलं आहे त्यांनी. पण बाबा आमट्यांच्या लग्नापूर्वीपासून पुलं त्यांना ओळखत होते असं नाही वाटत.
कुसुमाग्रजांची ' संत' ही कविता त्यांनी बाबा आमट्यांना समोर ठेवून लिहिली आहे हेही नक्की! बाकी माहिती नाही.

. सस्मित यांना पळून जाण्यासाठी (आणि त्यांनाच काय मला सुद्धा) आधीचे मुद्दे कमी पडले असतील तर हे वाचून तर नक्कीच पळून जायची इच्छा होणार असा गर्भितअर्थ त्यात होता.>>>>>>> Lol अहो पण वाटलं असतं कुसुमाग्रजांना अक्षता लिहुया म्हणुन आणि लिहिल्या असत्या त्यांनी अक्षता तर आपल्याला फरक पडला असता? लगेच त्यांनी आत्मा विकला असं झालं असतं का? पहिले तर हे खरं आहे का? की असंच उदाहरणादाखल लिहिलंय?

किल्ली, आत्मा विकण्याची कन्सेप्ट भारीच वाटतेय वाचुनच Happy
जनरल्ली अशा विषयावर मी प्रतिसाद देत नाही, पण आज आत्म्याने द्ययला लावला>>>>> आत्म्याची ताकद किती आहे बघ. Happy

प्रतिसाद थोडक्यात लिहा अशी एक सूचना वर आली आहे तिला अनुमोदन. उगाच शब्दाला शब्द प्रत्युत्तर करणे अंतहीन आहे.

अज्ञातवासी यांच्या प्रतिसादातला एकच मुद्दा महत्वाचा वाटतोय म्हणून त्याला उत्तर देतोय:

> याच न्यायाने उद्या "पैसे मिळत असतील तर राष्ट्रपतीनी अंबानीच्या लग्नाच्या इवेन्ट म्यानेजर पदाची जबाबदारी घ्यावी असा मुद्दा आला तर त्याचेसुद्धा समर्थन कराल." >>>>>
> कन्सेप्ट क्लियर करा, राष्ट्रपती हे पद आहे, अमिताभ बच्चन हे पद नाही.
> Submitted by अज्ञातवासी on 10 January, 2019 - 00:23

इथे साहेब आपल्याच कन्सेप्ट क्लीअर नाहीत. नक्की काय तत्व आणि भूमिका आहे तुमची? पैसा मिळत असेल तर पद प्रतिष्ठा वय स्टेटस कश्शाकश्शाचा विचार करायची गरज नाही या भूमिकेचे समर्थन करणारे तुम्हीच ना? अहो मग राष्ट्रपती पदाची चिंता कधीपास्न करायला लागलात? सस्मित यांनी एक गोष्ट क्लीअर केली कि कुसुमाग्रज यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या कवीने पैशासाठी मंगलाष्टकं लिहायला हरकत नाही. आता इतका महान एखादा कवी प्रत्यक्ष असे काही करेल कि नाही हा इथे मुद्दा नाहीच. आपले इथिक्स काय आहेत आणि ते आपल्याला किती क्लीअर आहेत हे महत्वाचे. तसे तुम्ही सुद्धा एकदा "पैसे मिळत असतील तर राष्ट्रपतीनी अंबानीच्या लग्नाच्या इवेन्ट म्यानेजर पदाची जबाबदारी घ्यायला काय हरकत आहे" असे म्हणून टाका म्हणजे तुमचे सुद्धा कन्सेप्ट क्लीअर आहेत याची मला खात्री होईल आणि विषयच संपेल.

सहज आठवले. सध्याच्या आयटी इंजिनीअर्स पेक्षा जास्त पैसा मुंबईत काही भिकारी भिक मागून कमवतात असे पूर्वी कुठेतरी वाचले होते. इतका पैसा आहे या क्षेत्रात तर का हे क्षेत्र आजवर दुर्लक्षित राहिले असेल? विद्यापीठांतून भिक मागण्याचे पदवी पदव्युत्तर कोर्सेस सुरु करायला हरकत नाही. नाही का? तीच गोष्ट चोरीची. काय म्हणता अनएथिकल आहे? असू द्या न. कोण विचारतो मोरल एथिक्स पद प्रतिष्ठा एथिक्स यांना. सगळ्या भाकडकथा आहेत. पैशापुढे सगळे शून्य. आपले तत्व एकच: "फायदा होतोय ना? पैसा मिळतोय ना? करा"

आता या धाग्यावर माझा शेवटचा प्रतिसाद! मग मी पळून गेलो असं म्हटलं तरी चालेल!

पैसा मिळत असेल तर पद प्रतिष्ठा वय स्टेटस कश्शाकश्शाचा विचार करायची गरज नाही या भूमिकेचे समर्थन करणारे तुम्हीच ना? अहो मग राष्ट्रपती पदाची चिंता कधीपास्न करायला लागलात?>>>>>>
मी न केलेलं पाप कशाला माझ्या माथी मारताहेत! माझी कन्सेप्ट आधीपासूनच क्लियर आहे
"कलेपायी भणंग आयुष्य जगत बसण्यापेक्षा, तीच सोनं केलेलं अतिउत्तम." इथे कलेचं सोन म्हणतोय. कलेमूळे मिळणाऱ्या पैशाचा विचार चाललाय. इथे राष्ट्रपतींचा संबंध आलाच कुठे. साहेब कला पदाने मिळत नाही किंवा ते घटनासिद्ध पद नसते, की अमिताभ अभिनयाचा राष्ट्रपती, सचिन खेळाचा राष्ट्रपती होता, आता कोहलीला बनवा...
इथे शब्द कलेचा आहे. राष्ट्रपती जर समजा इव्हेंट मॅनेजमेंट मधून आले असतील घटनासिद्ध पदांच्या अधीन राहून त्यांना मर्यादा पाळाव्याच लागतील, पण त्यांच्या कार्यकाळनंतर त्यांना आपल्या व्यवसायात उतरण्याची इच्छा झाली तर बिघडलं कुठे? काहीही माझ्या तोंडी चिकटवू नका. असे डायलॉग फेकायला मी काही लाल्या वाटलो का अश्रूंची झाले फुले मधला, प्रोफेसर साहेब?

सहज आठवले. सध्याच्या आयटी इंजिनीअर्स पेक्षा जास्त पैसा मुंबईत काही भिकारी भिक मागून कमवतात असे पूर्वी कुठेतरी वाचले होते. इतका पैसा आहे या क्षेत्रात तर का हे क्षेत्र आजवर दुर्लक्षित राहिले असेल? विद्यापीठांतून भिक मागण्याचे पदवी पदव्युत्तर कोर्सेस सुरु करायला हरकत नाही. नाही का? तीच गोष्ट चोरीची. काय म्हणता अनएथिकल आहे? असू द्या न. कोण विचारतो मोरल एथिक्स पद प्रतिष्ठा एथिक्स यांना. सगळ्या भाकडकथा आहेत. पैशापुढे सगळे शून्य. आपले तत्व एकच: "फायदा होतोय ना? पैसा मिळतोय ना? करा">>>>
एक मिनिट, इथे मी कुणाच्या भीक मागण्याचं वा चोरी करण्याचं समर्थन केलंय? मागे तुम्ही जेव्हा प्रतिसाद बदलून 'तो मी नव्हेच' झालात ना, तेव्हाच मी लिहिलं, छपरी चाळे करू नका. हे असलं काहीही मी लिहिलेलं नाही, किंवा समर्थन केलं नाही. पुन्हा सांगतो छपरी चाळे करू नका. वाढणे, नाचणे, कविता लिहिणे, अक्षता लिहिणे, इव्हेंट मॅनेज करणे हे चोरी करणं अथवा भीक मागण होत का? काहीही बरळतायेत...

काही मुद्यांना उत्तर नसलं, तर 'इथे छोटे प्रतिसाद द्यावेत अशी सूचना आल्यामुळे' आणि 'अज्ञातवासी यांचा एकच मुद्दा महत्वाचा वाटल्यामुळे' अशी मल्लिनाथी करून सिलेक्टिव रायटिंग करू नका, याला 'गिरे तो भी टांग उपर' अशी म्हण आहे.
अजून एक निरीक्षण, मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी धनाजी दिसतायेत, तशा तुम्हाला सस्मित दिसतायेत वाटतं!

मी काय म्हणतोय आपण थोडी वाट पाहु.
आराध्याच्या लग्नात कोण कोण वाढपी येतेय ते पाहु. अंबानी दादा-वहिनी नक्कीच येतील.

> घटनासिद्ध पदांच्या अधीन राहून त्यांना मर्यादा पाळाव्याच लागतील

त्या मर्यादाचे नियम त्या पदासाठी नक्कीच माझ्यासारख्या "मुर्खांनी" बनवले असतील. कारण त्या पदाला स्टेटस आहे लोकांच्या मनात इज्जत आहे म्हणून. (बच्चन किंवा खान म्हणजे राष्ट्रपती असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण " स्टेटस आहे लोकांच्या मनात इज्जत आहे" हे त्यांना सुद्धा लागू पडते इतकाच माझा मुद्दा आहे). पण हे राष्ट्रपती पदाचे एथिकल नियम बनवणारे इथले प्रतिसादकर्ते असते तर त्यांनी नक्कीच "राष्ट्रपती असले म्हणून काय झालं...." वगैरे विचार केला असता आणि त्यांच्या परमप्रिय अंबानीं साहेबांनी लग्नात "sajjan ghot" च्या नावाखाली राष्ट्रपतींच्या हातात सुद्धा... ..... असो. पुढचे लिहित नाही. पण पोहोचली आपली विचारसरणी.

बाकी... छपरी चाळे करताहेत, उत्तर नसलं म्हणून सिलेक्टिव बोलताहेत, जळी स्थळी सस्मित वगैरे म्हणजे अक्षरशः काऽऽऽहीही म्हणजे काय अर्थच नाही त्याला असे बालिश पोकळ बिनबुडाचे हास्यस्पद आरोप करून मला प्रोवोक करण्याच्या प्रयत्नांचा माझ्यावर काहीएक परिणाम होणार नाही. आणि हो:

"एखादी वस्तू याचा अर्थ कला व त्या कलाकारांच्या कलेचं सोनं वगेरे करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा निव्वळ भ्रम आहे."

हे माझे वाक्य म्हणून सांगत आहेत. हे वाक्य मी कुठे लिहिले आहे हे जरा त्यांनी मला दाखवावेच. हे त्यांनी स्वत:च लिहलंय: Submitted by अज्ञातवासी on 9 January, 2019 - 20:06 या प्रतिसादात. अरे या वाक्याचा अर्थ सुद्धा मला लागत नाहीये. माझे मूळ वाक्य आहे:

"
जेंव्हा हे लोक कलाकारांना आपल्या खाजगी कामासाठी पैसे देतात तेंव्हा ते त्यांना व त्यांच्या कलेला 'विकत घेतात' इतकाच त्याचा अर्थ असतो. त्या कलाकारांच्या कलेचं सोनं वगेरे करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा निव्वळ भ्रम आहे.
Submitted by Parichit on 9 January, 2019 - 16:46
"

ह्यात वस्तू हा शब्द तरी आहे का कुठे? तो स्वत:च यांनी वापरलाय आणि मलाच विचारताहेत "कला ही वस्तू आहे की सेवा?" म्हणून.

जाउद्या. सर्वांचे अप्रोच आणि कन्सेप्ट कळल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे या धाग्यावर काही लिहिण्यात अर्थहीन आहे. म्हणून माझा सुद्धा हा या धाग्यावारचा हा शेवटचा प्रतिसाद.

घ्या लेटेस्ट न्यूज
ईंशा आणि विक्रांत सरंजामेंच्या लग्नात मराठीचा शाहरूख स्वप्निल नाचणार आहे अशी बातमी कानावर आलीय...

अमानवीय किस्सा झाला किल्लीचा>> Proud आत्मीय म्हणा
@ मानव पृथ्वीकर
आत्मा मानवाचा(तुमचा नाय, माझा , मीही मर्त्य मानवी आहे) आहे, सो अमानवीय नाही Lol

अवांतराबद्दल क्षमस्व

ईंशा आणि विक्रांत सरंजामेंच्या लग्नात मराठीचा शाहरूख स्वप्निल नाचणार आहे अशी बातमी कानावर आलीय...
> तो रात्रभर भिजून फुगलेला चणा काय नाचणार?

आमच्या नै आली कानावर
>>>
आमच्याकडे ती दिड लाखाची पत्रिका आलीय. त्यात लिव्हलेय तसे. खोटेच छापतील का सरंजामे

अजून एक निरीक्षण, मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी धनाजी दिसतायेत, तशा तुम्हाला सस्मित दिसतायेत वाटतं!>>>>>>
सस्मित, हुश्श काय करतेस हे वाचलं नाहीस का .... आज जाम बोअर होतंय !

मंजूताई Lol
अजून एक निरीक्षण, मोगलांना जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी संताजी धनाजी दिसतायेत, तशा तुम्हाला सस्मित दिसतायेत वाटतं!>>>>>> अर्र! हे वाचलंच नव्हतं मी. Lol
मोठमोठ्या पोस्ट ओलांडुन जायची सवय आहे ना. Happy

हे तुम्हांला कसं कळलं? ती तुमच्या ओळखीत आहे का?

ते तुम्हाला नाही कळणार .. मनघडन बाते मन कीबात म्हणून ऐसेचि ठोकोनि द्यावे आणि रेटोनि बोलावे अशी ती परंपरा आअहे.,, आणि परंपरेचे पायिक होणे हा सध्या आपला राष्ट्रीय उद्योग आहे .

ते तुम्हाला नाही कळणार .. मनघडन बाते मन कीबात म्हणून ऐसेचि ठोकोनि द्यावे आणि रेटोनि बोलावे अशी ती परंपरा आअहे.,, आणि परंपरेचे पायिक होणे हा सध्या आपला राष्ट्रीय उद्योग आहे .>>>>>

अहो, तुम्ही निदान इथले प्रतिसाद तरी वाचा. तुम्ही का इतरांसारखे मनघडण बाते ठोकताय.

आकाशच्या लग्नात कोण कोण वाढपी होते, काही कळलं का?
की मुलाकडची बाजू म्हणून ही ड्युटी नव्हती किंवा या धाग्याला घाबरून यावेळी ड्युटी लिवली नाही?

बच्चनजीं विषयी तुम्ही भलतेच पझेसिव्ह दिसताय. त्यांनी कुणाच्या लग्नात काय वाढायचं याचा निर्णय तुम्ही घेताय म्हणून लिहिलं.

Pages