नवीन मराठी म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

Submitted by Parichit on 20 December, 2018 - 01:07

घटनाच अशी घडली कि जीने एका नवीन मराठी म्हणीला जन्म दिला

म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

अर्थ: एखाद्याचे कितीही मोठे नाव आणि कर्तृत्व असले तरी त्याच्याहून श्रेष्ठ असलेला कोणीतरी त्याचा कचरा करतोच.

कधी वापरायची: समजा तुमच्या एखादया ऑफिसमधल्या सहकाऱ्याला अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? पण प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून ते तो करणार. मग त्याला घेऊन त्याचे दु:ख हलके करण्यासाठी म्हणून बीअर प्यायला न्या आणि पिता पिता सांगा...

"नको रे वाईट वाटून घेऊ इतके. आम्हाला माहित आहे प्रमोशन मिळाल्याने तू साहेब झाला आहेस. पण हे बघ काही झाले तरी म्हणतात ना 'अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी'. त्यामुळे चालायचेच. नको मनाला लावून घेऊस. क्लायेंट तुला आपल्या घरचाच आहेस असे समजतो. म्हणून तर तुला पाणी भरायला बोलावले ना"

असे म्हटल्यावर त्याचे दु:ख नक्की हलके होणार म्हणजे होणार.

तर हे एक उदाहरण झाले. हि म्हण अशा अनेक प्रसंगी वापरता येईल. आता या म्हणी मागची घटना काय यावर जरा विचार करू.

घटना: काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुलोत्पन्न कन्या इशा अंबानी हिच्या शाही विवाह प्रसंगी झालेल्या मेजवानी प्रसंगी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वगैरे हे वाढप्याचे काम करत असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. बाकी सुपर डुपर हिरो हिरोईन मंडळींना अंबानींनी नाचून उपस्थितांचे मनोरंजन करायच्या कामाला लावले होते. ह्या प्रकाराची सोशल मिडीयावर खूपच चर्चा रंगली. याचे समर्थन करणारे म्हणाले "वाढप्याचे काम मुलीच्या घरचे आनंदाने करतात. अंबानी हे या दिग्गज कलाकारांना घरच्यासारखेच समजतात. म्हणून त्यांनी वाढप्याचे काम केले तर बिघडले कुठे?"

पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरांना प्रश्न पडतात कि हे सगळे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. जनतेमध्ये यांनी खूप आदर कमावला आहे. यांना इतके मिंधे बनायची काय गरज आहे. अशी कोणती मजबुरी असते यांची कि ह्यांना हि कामे करावी लागतात. जी जनता यांचा आदर करते त्यांचा सुद्धा हा अवमानच नाही का. बर "घरच्यासारखे समजतात" हे लॉजिक असेल तर अंबानी यांनी मोदी किंवा राहुल गांधी किंवा इतर मोठ्या नेत्याला घरचे समजून कामाला का नाही लावले. किंवा अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत.

भारतात एखादा/दी कलाकार कितीही जेष्ठ श्रेष्ठ असेल आणि लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले असले तरी उद्योगपती राजकारणी बिल्डर डॉन इत्यादी लोकांच्या मते त्यांना फार आदर नसतो हेच अनेकदा दिसून आले आहे. कारण अशा घटना आधी पण घडल्या आहेत.

१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.

तर मंडळी तुमचे काय मत आहे यावर?

765448-00-ambanis.jpg

Group content visibility: 
Use group defaults

यात शाहरूख दुसरा आहे याचा मला एक भारतीय म्हणून अभिमान आहे .! >> सगळ्यांनीच अभिमान बाळगावा अशी बाब आहे ही... पण बहुतांश लोक (लुजर्स) अभिमान दाखवणे सोडून जळाऊपणा करतात.

मेरठ मधे सुरु झालेली बऊवा ची प्रेमकहाणी आधी मुंबई मग अमेरिका व तिथून थेट मंगळ ग्रहावर संपते. >>> WoW!!!
खूप ईंट्रेस्टिंग वाटत आहे... बघायलाच हवा.

याचा मला पृथ्वीकर मानव म्हणून अभिमान आहे. >> तुम्हाला अभिमान असल्याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. गर्व से कहो हम अभिमानी है!

दुसऱ्या एका यादीत शाहरुख पहिला आहे.
अभिमान दुप्पट करा.
>>>>>

मी म्हटले मला एक भारतीय म्हणून अभिमान आहे.
जसा अभिमान जगातील सर्वोत्तम फलंदाज सचिन आणि आता कोहलीचा आहे.
दुसरी लिस्ट भारतीयांचीच असल्याने एक भारतीय म्हणून कसा अभिमान बाळगू.? पण येस्स शाहरूखचा चाहता आणि एक मुंबईकर म्हणून अभिमान राहील !

येनीवेज. इन्फिनिटीचे दुप्पट काय होते?

मेरठ मधे सुरु झालेली बऊवा ची प्रेमकहाणी आधी मुंबई मग अमेरिका व तिथून थेट मंगळ ग्रहावर संपते.
>>>>
धिस ईज माईन्ड बॉबलिंग गाईज.. अमेरीका म्हणजे नासा.. तिथून यानातून मंगळ.. पोरीला मंगळ असतो का पत्रिकेत? शाहरूख त्यावर अशी मात करतो??

बाई दवे व्हाई नासा? व्हाई नॉट आपले इस्रो..? इस्रोचे मंगळयान स्वस्तातही पडते ना...

ओह येस्स.. शाहरूखला काय पैश्याची कमी आहे. जगातला दुसरा श्रीमंत कलाकार आहे तो.. कश्याला स्वस्तातले काम करतोय Happy

√√√

शाहरूखला मोठे त्याच्या चाहत्यांपेक्षा जास्त त्याच्या टिकाकारांनी केले आहे.
शाहरूखचे चाहते हा कमालीचा बुद्धीजीवी वर्ग आहे. तो त्याचे चित्रपट तेव्हाच बघतो जेव्हा ते चांगले असतात आणि जेव्हा त्यांना त्याची अदाकारी भावते तेव्हाच ते त्याला डोक्यावर उचलून घेतात.

शाहरूखचे टिकाकार मात्र त्याचा फालतू चित्रपटही न चुकता पाहतात. कारण शाहरूखवर टिका करताना त्यांना आणखी एक चित्रपट आपल्या लिस्टीत हवा असतो.
हां. आता चित्रपट न पाहताच टिका करणारे आंधळे टिकाकार सगळीकडेच असतात. त्यांना यातून वगळूया.

या लेखाच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास, शाहरूख धनिकपुत्रांच्या लग्नात नाचतो ही न्यूज त्याचे चाहते ऐकतात आणि पुढे जातात.
टिकाकार मात्र तिथेच रेंगाळतात. कसा नाचला, कुठे नाचला, किती नाचला, मानधन किती घेतले, वगैरे सारी पाळेमुळे खणत बसतात Happy

बाकी एका 'देशद्रोही' नटाचा सिनेमा पहायला 'देशभक्त' गेले हे वाचुन माझा कंठ 'रुद्ध' झाला आहे! तो देशद्रोही आहे हे तुम्हाला त्याने येऊन सान्गीतल आहे का ? कि तुम्हाला विचारुनच तो देशद्रोह करतो..

या लेखाच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास, शाहरूख धनिकपुत्रांच्या लग्नात नाचतो ही न्यूज त्याचे चाहते ऐकतात आणि पुढे जातात.
टिकाकार मात्र तिथेच रेंगाळतात. कसा नाचला, कुठे नाचला, किती नाचला, मानधन किती घेतले, वगैरे सारी पाळेमुळे खणत बसतात Happy>>>>> हो तसच इथे अमिताभबद्दल चालल आहे.

टिकाकार मात्र तिथेच रेंगाळतात. कसा प्रतिसाद दिला , कुठल्या / कोणाच्या धाग्यावर दिला , किती वेळा दिला , अटेन्शन किती घेतले, वगैरे सारी पाळेमुळे खणत बसतात >>>>> हे असंच इथे ऋ बद्दलसुद्धा चालू आहे.

या धाग्याला 'बडवणार्‍या' माबोकरांसाठी एजोटाझापा.

हायझेनबर्ग व ऋण्म्या यांचे अहोऽ रुपं अहोऽ ध्वनी: पाहून ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय असा संशय बळावत चाल्लाय.

हायझेनबर्ग व ऋण्म्या यांचे अहोऽ रुपं अहोऽ ध्वनी: पाहून ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय असा संशय बळावत चाल्लाय.>> +११११११११११११११११११११११११११११११११११
माझाही Lol

काही असो...

> निरर्थक धाग्याद्वारे उगीच वादग्रस्त विधान / मुक्ताफळ उधळून प्रतिसाद वाढवत राहणे ---- ह्यसाठी होता हां अट्टाहास Proud
> Submitted by डूडायडू on 20 December, 2018 - 23:56

निदान या गैरसमजाला तरी तडा गेलाय हे ही नसे थोडके. प्रतिक्रिया लिहिणार नव्हतो पण काही प्रातिनिधिक प्रतिसाद आलेत त्यांना उत्तर देणे भाग आहे

१. मी आणि माझ्यासारखे (म्हणे चाळीत राहणारे वगैरे) लोक अंबानी वर जळतात म्हणून असे धागे निघतात

असे ज्यांना वाटते त्यांनी एकदाही या धाग्यात टाटांचा उल्लेख केलेला नाही. मी जळत असेन ना तर टाटांवर जळतो. कारण कितीही संपत्ती मिळवली तरी त्या माणसाची उंची कधी मला गाठता येणार नाही. याबाबत अंबानी आणि मी मात्र अजून एकाच पातळीवर आहोत. कारण टाटांना असली थिल्लर थेरं करायची गरज कधी पडली नाही.

२. एकीकडे "असे काही नसते" "सगळे समान असतात" "बच्चन वाढपी झाला म्हणून काय छोटा होत नाही" वगैरे मुक्ताफळे उधळणाऱ्यानि दुसरीकडे मला "चाळीतला" ठरवून आपण "मोठे" आहोत याची मात्र जाणीव करून दिली तेंव्हा अंमळ मौज वाटली.

बाकी हायजॅकिंग चालू द्या.

दुसरीकडे मला "चाळीतला" ठरवून आपण "मोठे" आहोत याची मात्र जाणीव करून दिली...
>>>>

मी पुर्ण धागा (प्रतिसादस) वाचले नाहीत पण चाळीचा असा उल्लेख ज्यांनी केला असेल त्यांचा निषेध !

मी स्वत: दक्षिण मुंबईतील चाळीत लहानाचा मोठा झालो आहे. चाळ फक्त तुमची आर्थिक पातळी दर्शवते. विचारांनी छोटे किंवा मोठे असण्याचा याच्याशी काहीएक संबंध नाही.

खुद्द शाहरूख देखील काही बंगल्यात लहानाचा मोठा झाला नाही, तर तो त्याने कर्तुत्वाने कमावला आहे. अंबानीचा त्यापेक्षा मोठा असेना, पण शाहरूखलाही आपल्या बंगल्याचा अभिमानच असेल. हेच चाळकरयांनाही लागू. प्रत्येकाला कष्टाने कमावलेल्या पैश्यांचा आणि निवारयाचा अभिमानच असतो!

मी पुर्ण धागा (प्रतिसादस) वाचले नाहीत पण चाळीचा असा उल्लेख ज्यांनी केला असेल त्यांचा निषेध !

मी स्वत: दक्षिण मुंबईतील चाळीत लहानाचा मोठा झालो आहे. चाळ फक्त तुमची आर्थिक पातळी दर्शवते. विचारांनी छोटे किंवा मोठे असण्याचा याच्याशी काहीएक संबंध नाही.

खुद्द शाहरूख देखील काही बंगल्यात लहानाचा मोठा झाला नाही, तर तो त्याने कर्तुत्वाने कमावला आहे. अंबानीचा त्यापेक्षा मोठा असेना, पण शाहरूखलाही आपल्या बंगल्याचा अभिमानच असेल. हेच चाळकरयांनाही लागू. प्रत्येकाला कष्टाने कमावलेल्या पैश्यांचा आणि निवारयाचा अभिमानच असतो!>>> पूर्ण 100% अनुमोदन

> अंबानी ह्या सर्वांपेक्षा श्रीमंत आहे म्हणून इतर कमी श्रीमंत त्याचे नोकरच असतात असे समजणे ही टिपिकल चाळकरी सीने में जलनवाली विचारसरणी आहे.
> Submitted by हेला on 20 December, 2018 - 20:58

^^^ वाचा

ओके
मला ईतर चाळकरयांचा अनुभव नाही. पण आमचे चाळकरी हेला म्हणताहेत याच्या टोटल उलटे होते. चाळीतच कमालीची आर्थिक विषमता असलेले लोकं होते. पण बाकी कितीही तुंबाड भाडणे झाली तरी कधी आर्थिक निकषांवर एकमेकांबद्दल मत्सर दिसला नाही. कारण गरजा कमी होत्या. तसेच एकमेकांच्या मदतीनेच त्या पुर्ण केल्या जायच्या. जसे कोणाकडे फ्रिज आहे तर त्याचा मत्सर न करता त्याच्या फ्रिजचे थंड पाणी पिणे वा आपल्याकडे पाहुणे आले तर बर्फ मागायला जाणे, फोनवाल्याचा केअरऑफ नंबर देणे, शेजारयाकडे टीव्ही बघणे वगैरे वगैरे..

मत्सर आणि स्पर्धा ही शक्यतो फ्लॅटमध्ये आपापले दार बंद करून आपापले आयुष्य जगणारयांमध्ये जास्त दिसून येते. त्यांना आणखी मोठे घर मोठ्या गाडीची इर्ष्या असते. चाळीतले लोकं चाळीतच खुश अश्या स्वभावाची होती. अगदी जे मोठ्या घरात गेले ते रडत रडतच गेले हे अनुभवले आहे.

प्रत्येकाची मानसिकता तो कोणत्या विषयावर काय लेख लिहितो यातून दिसते... ह्या लेखकांची जळजळकारी मानसिकता दिसली. छोटे लोगोंकी छोटी सोच.

आमच्यात गावजेवान असत
कुनाच्या लग्नाच कुनाच्या उत्सवच कुनाच्या मयतीच
तवा आमि पोट्टे लोक वाढप्याच काम करितो
आये म्हणती वाडप्याचे काम करुन लयी पुण्य होत
तवा गावजेवनात वाडप्याच काम करुन आमी कुनाचे मिंधे होत नाई
वाडप्याच काम म्हन्जि वाईट साईट ह्यो उच्चनिच ठरविन्यचा अधिकार कुनाला कुनि दिला?

फक्त पैशाच्या मुद्द्यामुळे अंबानीला मोठा आणि अमिताभला लहान दाखवून देणारे त्यांना मात्र चाळकरी म्हटले तर तळमळले.. आणि लहानमोठ्याची गोष्ट स्वतःसोबत झाली तर गडबडले.

Pages