Submitted by maitreyee on 13 October, 2018 - 10:58
'अंधाधुन'पाहिला काल.
मला आवडला. एक प्रेडिक्टेबल नसलेला स्मार्ट थ्रिलर + डार्क कॉमेडी बघितल्याची मजा आली.
आयुष्मान चे सिनेमे बहुतेक आवडतात. तब्बू हे सरप्राइज होतं माझ्यासाठी. ती दिसलीय सुरेख आणि काम पण जबरी केले आहे. तिला रोल पण भारी मिळाला आहे.
लूपहोल्स यातही आहेत काही. काही गोष्टी प्रेक्षकांना इंटरप्रेट करायला सोडलेल्या आहेत. त्यावर गप्पा मारायला हा धागा. कोणी काढला नाही म्हणून मीच काढला शीर्षकातच सावधगिरीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे इथे स्पॉयलर आले तरी हरकत नसावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सोमवारचे तिकीट काढलंय.
सोमवारचे तिकीट काढलंय. त्यानंतर लिहिता येईल.
आजच पाहीला. एकदम भारी मुव्ही.
आजच पाहीला. एकदम भारी मुव्ही.
सुरूवातीचा सश्याचा प्रसंग क्लायमॅक्स ला चपखलपणे बसवलायं.
प्रत्येकाला त्याच्या वाईट वागणूकीच फळ मिळतेचं , आकाश ला पण थोडा काळ का होइना अंधत्व येतचं.
https://www.reddit.com/r
https://www.reddit.com/r/bollywood/comments/9lor7u/spoiler_andhadhun_end...
ही चर्चा पण वाचून घ्या एकदा, म्हणजे रिपीटिशन नाही होणार
बाप रे तिकडे लोकांनी फारच कीस
बाप रे तिकडे लोकांनी फारच कीस पाडलाय ! मला ती एकच डोळावाली थिअरी नाही झेपली.
"What is life? It depends on the Liver" ?? हे वाक्य बघितलेलं आठवत नाही मला! मिसलं की काय? सुरुवातीला होतं?
मला पण नाही आठवत ते वाक्य. मे
मला पण नाही आठवत ते वाक्य. मे बी डॉक तबूला डिकीत टाकून लिव्हर काढायच्या गोश्टी करत असतो तेव्हा असेल.
सुरुवातीला होतं? >>>> सुरूवात बडी लंबी कहानी है अशी काहीशी आहे ना!
सुरुवातीला आहे. लिहिलेलं आहे.
सुरुवातीला आहे. लिहिलेलं आहे.
टाईटल नंतर येतंय डिस्क्लेमर
टाईटल नंतर येतंय डिस्क्लेमर सारखं
शीर्षकात स्पॉयलर्स वाचून
शीर्षकात स्पॉयलर्स वाचून अपेक्षेने आलेलो.... पण अजून तसले काहीच नाहीये ईथे
ट्रेलर पाहता चित्रपट पाहणे माझ्याच्याने होणार नाही. त्यामुळे स्टोरी वाचायला ईथे आलेलो.. येऊ देत स्पॉयलर्स
"What is life? It depends on
"What is life? It depends on the Liver" ?? >> डॉ स्वामी आकाशला बोलतो हे वाक्य.. तब्बुच्या बॉडीपार्ट्सचं डिल करायच हे सांगत असताना.. मस्त वाक्य आहे.. आवडल मला..
आकाश त्याला बॉल लागून ऑप्टीक
आकाश त्याला बॉल लागून ऑप्टीक नर्व्ह डॅमेज होऊन दृष्टी गेल्याचे सांगतो. पण बॉल लागून दोन्ही ऑप्टीक नर्व्ह्स कश्याकाय डॅमेज होऊ शकतात? हा प्रश्न पडून कोणी त्याला खोलात का नाही विचारले?
तो लेन्स वापरत असतो ना? मग सोफी भेटल्यावर लेन्स वापरणे बंद का करतो?
आकाश त्याला बॉल लागून ऑप्टीक
आकाश त्याला बॉल लागून ऑप्टीक नर्व्ह डॅमेज होऊन दृष्टी गेल्याचे सांगतो. पण बॉल लागून दोन्ही ऑप्टीक नर्व्ह्स कश्याकाय डॅमेज होऊ शकतात? हा प्रश्न पडून कोणी त्याला खोलात का नाही विचारले?>> हे त्यानी असं किती लोकांना सांगितल असत..
तो लेन्स वापरत असतो ना? मग सोफी भेटल्यावर लेन्स वापरणे बंद का करतो?>> कारण त्याला ती आवडते..
सगळी कथा आकाशच्या 'नजरेतून'
सगळी कथा आकाशच्या 'नजरेतून' आहे किंवा तो सांगत आहे. शेवटच्या दृष्यात त्याला दिसत असल्याचे कळते. मग ही कथा खरंच खरी असेल? अनेक गोष्टी तो रचूनही सांगत असेल. त्यासाठी अनिल धवनचा खून आणि सिम्मी गायब होणे या सत्य घटनांचा आधार घेतला असू शकेल. किंवा सिम्मीचे अवयव काढून घेण्यासाठी डॉ. स्वामीला साथ दिली असेल. अनेक शक्यता आहेत, प्रेक्षकांवर इंटरप्रीटेशन सोडल्यानं कल्पनाशक्तीला बराच वाव आहे .
बरीचशी कथा आकाशच्या नजरेतून
बरीचशी कथा आकाशच्या नजरेतून असली तरी बरेच प्रसंग असेही आहेत ज्यात आकाश नाहीये किंवा आंधळेपण (?) आल्याने त्याला दिसत नाहीये(पुन्हा एकदा?). ते दिग्दर्शकाच्या नजरेतून समजायचे की आकाश च्या थापा हाही प्रश्न आहेच.
ते दिग्दर्शकाच्या नजरेतून
ते दिग्दर्शकाच्या नजरेतून समजायचे की आकाश च्या थापा हाही प्रश्न आहेच.>>> पण मुळात कथा आकाशच सांगतोय ना? त्यामुळे बर्याच प्रसंगात तो नसला तरी काहीही गोष्ट तयार करून सांगू शकतो की. सत्य घटना पाहिल्या तर दोनच - अनिल धवनचा खून आणि सिम्मीचं गायब होणं. सिम्मीनं त्याला आंधळा केल्या नंतर राधिका आपटेला फोन करतो मदतीसाठी पण काहीही ऐकून न घेता ती त्याला झिडकारते. त्यामुळे तिला नक्की काय घडलंय याचा पत्ता नाहीये.
शेवटी तो एकटाच असताना सिम्मी
शेवटी आकाश एकटाच असताना सिम्मी त्याला मारण्याचा प्रयत्न करते आणि त्या सश्यामुळे गडबड होते हे त्याला कसं कळणार?
तो प्रसंग जरा अ आणि अ वाटतो. तिथे थोडं योग्य स्पष्टीकरण दिलं असतं तर हा सगळ्या थापा मारतोय असा संशय कमी आला असता.
आता हे गृहीत धरावं लागेल की जो माणूस त्या सश्याला गोळ्या मारत होता त्याने ते बघितले आणि आकाशला मदत केली.
ती सशाची कथा थाप वाटते.
ती सशाची कथा थाप वाटते. आकाशने डॉक्टरला साथ दिली असणार आणि डोळे पुन्हा चांगले झाले तरी आंधळेपणाचे नाटक चालू ठेवले असणार.
दुसराही खून होताना तो समोर बघून हसायला आले.
मलाही खूप आवडला, फार सुंदर
मलाही खूप आवडला, फार सुंदर वातावरण निर्मिती, चित्रहार छायागीतला लागायची त्या गाण्यांची बॅक्ग्रॅउंड आणि पुण्यात घडणारी पुण्याच्या रस्त्यावरची कथा
आयुष्यमान, तब्बु, राधिका आणि छोट्या रोल्स्मधली सगळी कॅरॅक्टर्स खूप सुरेख अभिनय करतात.
सैराट मधली हैदराबादी अक्का , फँड्री मधली जब्याची आई यातही छान शोभली आहे.
बेस्ट सीन : आयुष्यमान पहिल्यांदा तब्बुकडे येतो तो, कमाल जमलाय तो सीन आणि पियानोच्या बदलत्या ट्युन्स !
शेवटाचा मला लागलेला अर्थ :
शेवटी कॅफेमधे त्याची स्टिक दाखवली आहे, रॅबिट हेड हँडलवाली, याचा अर्थ ती सश्याची स्टोरी त्याने रचलेली !
तब्बुचा शेवट तिथेच संपतो जिथे ते वाक्य डॉ कडून ‘व्हॉट इज लाइफ ? लिव्हर’ परत परत येतं.
तिथून पुढची गोष्ट त्याने रचलेली, जसे आधी क्रिकेटच्या बॉलची रचलेली असते.
मधेच एकदा तो रिक्शावाला इस्माइल मरतो आणि डॉ त्याच्या बायकोला म्हणते कि तुम्ही याचे ऑर्गन डोनेट करु शकता तेंव्हा वाटलं याचे डोळे मिळणार आयुष्यमानला पण तसं होत नाही.
थोड्या सिली मिस्टेक्स : आयुष्यमान खरा अंधळा होतो , एका रात्री तब्बुचा पोलिस बॉफ्रे याच्यावर रात्री अॅटॅक करतो घरात घुसून , तेंव्हा हा प्रभात रोड गल्ली नं ४ च्या त्याच्या बिक्डींगमधून पळून बाहेर पडतो खाली उतरतो तो थेट लक्ष्मी रोडच्या विश्रामबाग्वाड्याजवळच्या चितळे बंधुपाशी आवतरतो
तसेच त्या पोलिसाची बायको अश्विनी कलसेकर मराठी बोलताना दाखबलीये, पण मधेच करवा चौथची धमकी ( हा लुपहोल खास फारेंड साठी )
पहिला तसा असंबंध वाटणारा सीन
पहिला तसा इतर घटनांशी काहीही संबंध नसणारा सीन ज्या पद्धतीने शेवटाला जोडलाय ते जाम आवडलं. सिनेमाभर पियानोचा वापर अप्रतीम! श्रीराम राघवन सिनेमांची खासियत म्हणजे गुंतागुंत, तरी खिळवून ठेवणारं सादरीकरण. एक हसीना थी, जॉनी गद्दार आणि बदलापूर पण या मुळे आवडतात.
थोड्या सिली मिस्टेक्स : >>> प्रभात रोडवरुन थेट विश्रामबाग वाडा आणि करवा चौथ या दोन्ही मिस्टेक खर्या पुणेकराला लगेचच कळून येतात .. तरीही त्या मन्नूची बोलण्याची ढब अमराठी असल्याने, मराठी अश्विनी तिच्या नॉर्थ इंडीयन सासरची प्रथा म्हणून करवाचौथ का वास्ता देते असा अर्थ लावून घेतला !
याचा अर्थ ती सश्याची स्टोरी त्याने रचलेली !>>> मी लावलेला अर्थ- सश्याला मारायला गोळी मारणारा मनुष्य आकाशला मदत करतो. आकाश डोळ्याचं ऑपरेशन करुन परदेशी जातो. ज्या सश्याने त्याचे प्राण वाचवले (!) त्याची आठवण म्हणून त्या काठीची मूठ सश्याची!
अर्थात सिनेमाभर सगळेच मान्यवर खोटंच खोटं बोलत वागत असल्याने अनेक अर्थ काढायला वाव आहे..
आकाश पेडा खाके येडा होने के बाद.. ती मांजर येऊन दूध पिऊन जाते त्यामागे काही अर्थ होता की असाच होता तो सीन समजलं नाही..
ज्या सश्याने त्याचे प्राण
ज्या सश्याने त्याचे प्राण वाचवले (!) त्याची आठवण म्हणून त्या काठीची मूठ सश्याची! >>>>> येस सेम. मलाही असच वाटलं. पण मग जर तब्बूला त्या डॉक्टरने मारलं असेल खरच लिव्हरसाठी तर तो सश्याच्या सिन खोटाच होता. मग ती काठी दाखवायची काय गरज?
मैत्रेयी, ते लिव्हरचं वाक्य आहे सुरुवातीला. पडद्यावर दाखवलं आहे.
आयुष्यमान पहिल्यांदा तब्बुकडे येतो तो, कमाल जमलाय तो सीन आणि पियानोच्या बदलत्या ट्युन्स ! >>>> हो त्या वेळचा तो पियानो खूप अंगावर येतो. पण एकूणातच पियानोचे पिसेस सुंदर आहेत. तो इन्स्पेक्टर प्रेत घेऊन गेल्यानंतर तब्बू सगळा ताण असहय्य होऊन आवाज न करता रडून घेते ते पण भारी घेतलय.
मला एकंदरीतच होत ऑर्गन्स चोराचोरीचा प्लॉट मिसफिट वाटला. म्हणजे शेवटाकडे आणण्यासाठी तो मार्ग का निवडला असं वाटलं.
वरच्या लिंकमध्ये फारच कीस पाडलाय. ती एका डोळ्याने अंधाळा वाली थिअरी खूप पटली नाही.
What is life? It depends on
What is life? It depends on the Liver" ??>>>>>>>>> सुरुवातीला पण येतं लिहुन.
तो लेन्स वापरत असतो ना? मग सोफी भेटल्यावर लेन्स वापरणे बंद का करतो?>> >> एकदा सोफी त्याला घ्यायला येताना तो लेन्स घालत नाही. खाली येतो तिच्यासमोर आणि पक्षी त्याच्या गॉगल वर शिटतो. सोफी क्षणात त्याचा गॉगल काढुन धुवायला घेते. आणि त्याचे डोळे तिला दिसतात.
तेव्हा ती तुझे डोळे तर अगदी नॉरमल दिसतात असंही बोलते. तिथुन मग लेन्स घालत नाही तो.
तो जेव्हा पर्सनल कन्सर्ट साठी तब्बुच्या घरी जातो तो सीन सॉल्लिड आहे.
पियानो वाजवताना त्याला प्रमोदचं प्रेत दिसतं. तेव्हा तो वाजवणं थाम्बवतो. पण अजिबात जास्त रीअॅक्ट न होता. टेन्शन मधे असलेल्या आणि आधीच पुर्ण आंधळा आहे अशी खात्री केलेल्या तब्बुच्या लक्षात येत नाही. तो लगेच बाथरुम ची चौकशी करतो. बाथरुम मधे अचानक उभा दिसलेल्या माण्साला बघुनही तो दचकत नाही. अगदी आंधळ्याचीच अॅक्टींग कंटिन्यु करतो. मग बाहेर येताना प्रमोदचं प्रेत वैगेरे सगळं बघुन घेतो. घाबरलेला असुनही ते न दाखवता पियानो वाजवत रहातो. समोर हे दोघं प्रेत हलवणं, रक्त पुसणं वैअगेरे करत असताना सुध्धा. कमाल सीन आहे तो.
तसाच कमाल सीन आहे जेव्हा तब्बु त्याच्या घरी येते आणि तो आंधळा आहे का नाही ते बघण्यासाठी तो कॉफी करत असताना एक स्केअरी मास्क घालुन त्याच्या मागे बसुन रहाते. आपणही असं अचानक कुणी मागे फिरल्यावर दिसलं तर दचकु पण हा ते ही निभाउन नेतो.
मग ती काठी दाखवायची काय गरज?
मग ती काठी दाखवायची काय गरज?
<
त्यावेळी त्याला जी थाप सुचते ती त्या काठीमुळे असा मी अर्थ घेतला, अर्थात शेवट ऑडीयन्सवर सोडल्याने स्कोप आहे दुसरा अर्थ काढणेही.
मुळात तो सश्याच्या किश्याच्यावेळी जर रो खरा अंधळा असतो, रस्त्यावर इतर कोणीही नसतं तर तब्बुच्या अॅक्सिडेन्ट कसा झाला , तिथे ससा आला हे , हायवे वरची पुणे ३२ किमी ची पाटी कशी वाचली असती त्यानी ?
म्हणून जर सशाची गोष्ट खरी मानायची तर एक तर तो त्यावेळीही अंधळा नसतो किंवा मग सशाची गोष्ट खोटी या २ ऑप्शन्स माझ्या मनात आल्या, त्यातली दुसरी पटली.
मुळात तो त्यावेळी जर खरा
मुळात तो त्यावेळी जर खरा अंधळा असतो, रस्त्यावर इतर कोणीही नसतं तर तब्बुच्या अॅक्सिडेन्ट कसा झाला , तिथे ससा आला हे , हायवे वरची पुणे ३२ किमी ची पाटी कशी वाचली असती त्यानी ?>> गोळी मारल्याने ससा बिथरला, उडी मारल्यावर कारवर येऊन आदळला, त्यामुळे सिम्मीचा गाडीवरचा ताबा सुटून अपघात झाला, गाडी पेटली. हे सगळं त्या बंदूकवाल्याने पाहून तिथेच थांबलेल्या आकाशला सांगितलं आणि पुढे जायला मदत पण केली असा मी अर्थ लावला..
मुळात तो सश्याच्या
मुळात तो सश्याच्या किश्याच्यावेळी जर रो खरा अंधळा असतो, रस्त्यावर इतर कोणीही नसतं तर तब्बुच्या अॅक्सिडेन्ट कसा झाला , तिथे ससा आला हे , हायवे वरची पुणे ३२ किमी ची पाटी कशी वाचली असती त्यानी ?
>>
अपघात झाल्यावर जमलेल्या लोकांनी, पोलिसांनी त्याला सांगितले असेल.
पण त्यावेळी तो सोडून
पण त्यावेळी तो सोडून रस्त्यावर इतर कोणीही नसतं, शिकारी बराच लांब असतो.
ससा समोर पडल्याने तब्बुचा तोल जाऊन गाडी लगेच पेट घेते, लोकं कधी जमणार आणि कसे सांगणार त्याला हा सीन ?
त्यातून तसं असेल तर त्याने ऑपरेशन कुठल्या पैश्यानी केलं ?
अपघात झाल्यानंतरही, अपघात
अपघात झाल्यानंतरही, अपघात घडतेवेळी नक्की काय कसे झाले ते कळतेच की.
असा अपघात झाल्यानंतर प्रत्यक्ष तिथे नसले तरी लोकं जमतातच. आगीचा लोळ दिसला असेल दुरुन.
हे असे झाले हा तर्क सोफीसाठी आहे.
आपल्याला माहितीच आहे की असे न होता त्याने सिमिचेच डोळे काढले.
मला त्यानंतर पुढे 'मग मी बसने
मला त्यानंतर पुढे 'मग मी बसने मुंबईला गेलो आणि एका फ्रेन्डच्या मदतीने लंडनला' हे इतकं सहजतेने सांगतो ते खटकलं. फ्लिम्जी म्हणतो तसं होतं ते. इतकं सहज लंडनला गेला आणि तिथे युरोपमधल्या कुठल्यातरी देशात स्वतःचे पिआनो कॉन्सर्ट्स करण्याइतकी मजल मारली, हे सगळं झालं कसं?
आकाशच्या निवेदनातून स्टोरी सुरू झाली असली तरी ती शेवटपर्यंत त्याच्या नजरेतून नसेलही. मला वाटतं इन्टर्व्हलपर्यंतच गोष्ट आकाशची आहे. नंतरच्या फक्त घटना आहेत.
आपल्याला माहितीच आहे की असे न होता त्याने सिमिचेच डोळे काढले.>> हो? हे माहितेय आपल्याला? कसं?
(No subject)
इतकं सहज लंडनला गेला आणि तिथे
इतकं सहज लंडनला गेला आणि तिथे युरोपमधल्या कुठल्यातरी देशात स्वतःचे पिआनो कॉन्सर्ट्स करण्याइतकी मजल मारली, हे सगळं झालं कसं?
>>
डॉक्टराने लिवर विकुन आलेल्या पैशातुन थोडे पैसे दिले असतील त्याला!
ओके, सो तब्बूचं पुढे काय झालं
ओके, सो तब्बूचं पुढे काय झालं हे लपवण्याकरता आकाशने सशाचा सीन रचला, तब्बूला मारून तिची लिव्हर डॉक्टरने विकली, आकाशचा कॉर्निआ ट्रान्सप्लान्ट केला, त्यालाही थोडे पैसे दिले हे सगळं खरं मानलं तर नंतर युरोपमध्ये आंधळ्याचं नाटक का कन्टिन्यु केलं? तिथे तर नव्याने सुरूवात करता आलीच असती त्याला.
रॅबिट स्टोरी खोटी असेल, तर त्या हॅन्डलची काठी आपली उगाचंच दाखवली आहे दिग्दर्शकाने आपल्यासारख्यांना घोळात घ्यायला
पण रॅबिट स्टोरी खरी का खोटी याचं कन्क्लुजिव प्रूफच नाहीये कुठे. सगळाच इन्टरप्रिटेशनचा मामला!
मी तर म्हणते तब्बु ने दिलेली
मी तर म्हणते तब्बु ने दिलेली बर्फी खाऊनही तो डोळस राहिला.
शेवटी डॉक्टरने तब्बुचे अवयव विकून त्यातले थोडे पैसे देऊन आकाश ला लंडन ला पाठवले, का? कारण तब्बु याच्यामुळेच स्वामी ला मिळते अॅज अ गिर्हाईक.
आणि सशा मुळे आपल्याला तब्बु कशी मेली याची स्टोरी सुचली म्हणून ती सशाची मूठ. बाकी सब झूठ.
आणि लंडन मध्ये पण आंधळा राहण्याचं कारण म्हणजे तो अस समजत असतो की तो एक प्रयोग आहे आणि आपण अंध आहोत असं कल्पून केलेल्या रचना जास्त प्रभावी असतील, किंवा त्याला आतून चांगल्या उर्मी येत असतील धून बनवायला.. पण माझ्या मते आंधळ्याचं नाटक करायला जास्त कॉन्शस हवा.. सर्व लक्ष तिकडे लागले तर धून कधी बनवणार?
Pages