चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Looks like Pirates of Caribbean + Troy inspired fancy dress parade !
Disappointed !

असं काय करताय राव.. पायरेट्स ऑफ कॅरिबियन च्या धर्तीवर पायरेट्स ऑफ अरेबियन काढलाय ठग्स ऑफ हिन्दोस्तान च्या नावाखाली..

मायबोलीवर लेख आहेत का ठगांबद्दल ?
लहान असताना बरेच वाचन होते. त्यात ठगांबद्दल जे काही वाचले ते क्रूर होते सर्व. हा क्रूरपणा धार्मिक समजुतीतून होता. इंग्रजांनी त्यांचा कसा बंदोबस्त केला याचे निवेदन कुठल्या तरी मासिकात यायचे. ते पुस्तक मिळवून वाचले होते.
पेंढा-यांचा पण बंदोबस्त ब्रिटीशांनी केला होता. मात्र पेंढा-यांनी स्वातंत्र्ययुद्ध पुकारले होते याचे उल्लेख वाचले होते. बहुतेक पेंढा-यांना भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतीकारकांनी बंडासाठी तयार केले होते असा काही उल्लेख होता. त्याच दरम्यान आनंदमठ वाचल्याने दोन्हीत खूप गोंधळ होतो आजही .

वाचला लेख. खूपच संक्षिप्त आहे. एपिक वाहीनीवर ठगांवर एक मालिका आली होती. ती सुद्धा बघण्यासारखी आहे. फक्त रूमालानेच गला दाबून खून नाहीत केलेले तर क्रौर्याच्या सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. ब्रिटीशांकडे तक्रारी आल्यानंतर ते ही वर्णने वाचून शहारले होते.

मात्र पेंढा-यांनी स्वातंत्र्ययुद्ध पुकारले होते याचे उल्लेख वाचले होते
>>>
याच्यावर आधारित सल्लूचा 'वीर' होता.

ठग्ज बद्दल काय बोलू?? डायरेक्टर विक्टर (विजय कृष्ण आचार्य) धूम १ चा रायटर म्हणून चांगला आणि २ चा रायटर म्हणून ओके होता. त्यानंतर त्यानी डिरेक्ट केला 'टशन' (हर हर) जो निदान फ्लॉप झाला. पण धूम ३ च्या (कितीही सुमार असूनही) कमाईमुळे ठग्ज पदरात पडला. पण ट्रेलर वरून हा पण टोटल गंडेश वाटतोय. मुळात भारतात त्या काळात किती लोक आरमार वापरून लढायचे? पायरेट्स कॉपी करायचा तर निदान कन्सेप्ट इंडिअनाईज तरी करून घ्यायची (विशाल भारद्वाजकडे ट्यूशन लावा). अमिताभला त्या सना शेखचा आजोबा दाखवला असेल तर ठीक ए, पण बाप वगैरे प्लीज नसूदे (तसं असेल तर कुणीतरी थोडा मध्यमवयीन अ‍ॅक्टर घ्यायला हवा होता- जॅकी श्रॉफ, अनील कपूर वगैरे). कतरीनाला (धूम ३ प्रमाणे) इथेही फक्त नाचगाण्यापुरतं घेतलंय असं दिसतंय. आमिर थोडा लगान, थोडा पीके, थोडा मंगल पांडे थोडा थ्री इडियट्स आणि थोडा धूम ३ मधून गोळा केल्यासारखा वाटला.
टशन आणि धूम ३ दोन्ही फर्स्ट डे पाहिले होते.
या वेळी मात्र ठगणार नाही.

येत्या २ महिन्यात माझ्यासाठी इंटरेस्टिंग सिनेमे सध्यातरी: फ्राय डे (घरचं कार्य), अधाधुन आणि बाजार...

https://www.youtube.com/watch?v=3WTTa4HfuHc - ढ नावाच्या पिक्चरचा ट्रेलर.. ट्रेलर वरुन तर मस्त वाटला पिक्चर चालेल किती ते नाही सांगता येणार.. कारण स्टार कास्ट नाहीये कोणीच

ठग्ज ऑफ हिंदुस्तान बहुतेक क्रांतीचा आणि पायरेट्सचा एकत्र रिमेक दिसतोय. >>>>> ++++++११११११११ ट्रेलरमध्ये अभिताभ (क्रांतीच्या)दिलीपकुमार सारखा दिसत होता.

कत्रिना अगदीच मॉडर्न आयटम गर्ल, आणि कम्प्लीटली आउट ऑफ प्लेस वाटते आहे. >>>> अगदी अगदी. जशी क्रांतीमध्ये परवीन बाबी आउट ऑफ प्लेस वाटते. Lol

बाकी कतरिना सुन्दर दिसलीये ट्रेलरमध्ये. Happy

ढ नावाच्या पिक्चरचा ट्रेलर.. ट्रेलर वरुन तर मस्त वाटला पिक्चर चालेल किती ते नाही सांगता येणार.. कारण स्टार कास्ट नाहीये कोणीच >>>> नसीरुद्दीन शहा आहे की. Happy

मंगल पांडे + pirates of the Caribbeans + शीला की जवानी = ठ्ग्ज ऑफ हिन्दोस्तान ( credit : insta )

ठग्जच्या ट्रेलरमधलं पहिलंच समुद्राचं दृश्य पाहिलं आणि व्हीएफ़एक्स फसलेलं दिसलं! हा काय मुंबईचा समुद्र म्हणायचा का? घळीतून वाट काढणारा समुद्र आहे मुंबईला? दिसला नाही कोणाला कधी तो! नंतरही व्हीएफएक्स मर्ज झालेले नाहीत, पॅची दिसतात, खोटं आहे हे कळतं. अशाने मनच उडतं सिनेमावरून. ’ठग’ हा शब्द ’गंडवणारे’ अशा अर्थाने घेतलाय बहुतेक, जे क्रूरकर्मा ठग होऊन गेले त्यावर नसावा सिनेमा. उगाच ख-या ठगांवर सिनेमा काढून इतिहासाशी कोण प्रामाणिक राहणार, त्यापेक्षा ’काल्पनिक’ म्हटलं की मान मोकळी होते ना.
स्वत:ला शहाणा समजणा-या आमीर खानचा आणि त्याच्या पात्रांचा कंटाळा आलाय. कतरिनाच्या उघड्या मांड्याही नको झाल्यात. सना शेख मस्त वाटली. अमिताभला पाहून मात्र हृदय द्रवतं. म्हातारा काय काम करतो का काय करतो? किती कष्ट रे बाबा या वयाला! बट नॉट वर्थ धिस मूव्ही! खूप पैसे घातलेत, पण ते योग्य ठिकाणी न घातल्यामुळे सगळे वाया जाणारेत!

इतका भिकार ट्रेलर की तोही पूर्ण बघवला गेला नाही. कॅतरिना सगळीकडे दिसते तशीच इथेही. तिला मॉडर्न साय फाय मध्ये टाका नाहीतरी ऐतिहासिक, हिचा ड्रेसअप आणि चेहऱ्यावरचे भाव कधी बदलणार नाहीत बयेच्या.

सणकून आपटला पाहिजे हा

उरी चा ट्रेलर प्रॉमिसिंग वाटत आहे. पण त्यात फिल्मी माल मसाला मिसळू नये अशी मनापासून इच्छा आहे. जे गाझी अॅटॅकचे केले तसेच इथही होईल अशी भिती आहे.

https://www.youtube.com/watch?v=aXYPUqFL9ZU

8 वर्ष व 12 वर्ष वयाच्या मुलींना परीक्षा संपल्याबद्दल थिएटर ला जॉनी इंग्लिश स्ट्राईक्स अगेन दाखवायचाय.दोघींना रोवेन आवडतो.बाकी पिक्चर बघण्याची लेव्हल अपरिचित, भुलभुलैय्या, वेलकम, हाऊसफुल, धमाल, तुम्हारी सुलू, बाहुबली,एंटरटेनमेंट आणि कोणीतरी ओरडून चॅनेल बदलायला लावेपर्यंत साऊथ इंडिअन मारामारी पिक्चर ही आहे.किसिंग सीन्स वगैरे बघतात.
दाखवायला चालेल का?(प्लिज हो म्हणा)

आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर .. टिझर पाहिला का?
मस्त वाटतोय.. >>>> हो. पण सुलोचना म्हणून (सि) सोनाली कुलकर्णी सूट होत नाहीये. अलका कुबल हवी होती. दोघीन्चे ( सुलोचना आणि
अलका कुबल) चेहरे आणि त्यान्ची इमेज, चित्रपट मिळतेजुळते आहेत.

https://youtu.be/eBw8SPPvGXQ
मणिकर्णिकाचा टीजर आला आहे. सगळे भव्य सेट्स इ. ठीक आहे पण फर्स्ट लूक मधे तरी कंगना ही फक्त कंगनाच वाटते आहे! मणिकर्णिका नाही!! तिचं बोलणं, दिसणं अगदीच मॉडर्न वाटलं. आजादी, हर हर महादेव असे ओरडते तेव्हा पुढचे वाक्य हिंग्लिश मधे येईल की काय अशी मला भिती वाटली! हा सिनेमा भन्साळीने करायला हवा होता असे वाटून गेले Happy ( नको दीपिका अज्जिबात नको Proud पण प्रियांका चालली असती!)

मणिकर्णिकाचा टीजर आला आहे. सगळे भव्य सेट्स इ. ठीक आहे पण फर्स्ट लूक मधे तरी कंगना ही फक्त कंगनाच वाटते आहे! मणिकर्णिका नाही!! तिचं बोलणं, दिसणं अगदीच मॉडर्न वाटलं. आजादी, हर हर महादेव असे ओरडते तेव्हा पुढचे वाक्य हिंग्लिश मधे येईल की काय अशी मला भिती वाटली!
>> १००% अनुमोदन
तुमची पोस्ट वाचुन ट्रेलर पाहुन आले.. तेव्हा वरील सर्व बाबी दिसुन आल्या

कोणताही ताकदीचा अभिनय करणारा आणि ताजा चेहरा सुद्धा चालला असता मला तर!

ट्रेलर आवडला... झाशीच्या राणीची कहानी तशी सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे ट्रेलर मधून ओळख करून देण्यासारखे काही नव्हते. लढाईचे प्रसंग सफाईदार वाटत आहेत. कंगनाच्या अभिनयाबद्दल पर्फॉर्मन्सबद्दल मत बनवण्याएवढे काही ट्रेलरमध्ये दिसले नाही.
ट्रेलरमधले काही जर आजिबात आवडले नसेल तर ते म्हणजे 'अमिताभ बच्चनचा आवाज' कंटाळा आला आहे त्या एकसुरीपणाचा..

मैत्रेयी सहमत, मॉडर्न वाटते कंगना, आणि ते हर हर महादेव मलाही खटकले. ते नक्की कसे म्हणावे हे माहीत नाहीय, वाचून स्वतःच ठरवून ठोकून दिले असे काहीसे वाटले.

एकंदरीत झाशीची राणी तटावरून उडी मारून दोन पाच हजार सैनिक लीलया मारणार असे वाटत आहे.
त्यातून कंगणाचे उच्चार बरेच सदोष वाटले. माणिकर्णिका म्हणून प्रभावी नाही वाटली इतकी

त्यातून कंगणाचे उच्चार बरेच सदोष वाटले. >>> पुष्कळ दा तिचे उच्चार तोतरे वाटतात.
"ठग" वरुन आमिर "महागुरु"च्या वाटेवर जात आहे असच दिसतय, सतत माझीच लाल नि मोठी Uhoh
कंटाळा आलाय तेच ते कलाकार बघुन, आमिर ने आता बास करावं

दिवाळीच्या दरम्यान असेच पिक्चर्स धंदा करतात. दिवाळीची सुटी, नवीन कपडे, नातेवाईक जमा झालेले.. मित्र मैत्रिणी असे सगळे मिळून ख्वाडा किंवा कोर्ट ला गेलेत असे गेल्या दहा हजार वर्षात झालेले नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षात होणार नाही.

आमीर आणि महागुरू ? महागुरू हे नावाचे पिळगावकर आहेत. त्यांची सर कुणालाच नाही. अमिताभ मात्र थकलाय. त्याचे डोळे पाहवत नाहीत. एके काळी त्याचे प्रमुख अस्त्र होते ते. भयंकर आजारी माणसाला बघतोय असे वाटते. एक व्हॉईस ओव्हर करणारी आर्टिस्ट आहे. तिने अमिताभचे तिच्या सोबत काढलेले (बिना मेक अपचे) फोटो दाखवले. बघवत नाहीत. मात्र त्याची विनोदबुद्धी, एटीकेट्स हे आजही आकर्षित करतं.

कंगनाचे जे आधीपासूनच फोटो पाहिले होते , मला वाटल कहानीमे ट्विस्ट म्हणजे अधुनिक मणीकर्णिका असणार, कारण हायलायटेड हेअर, परफेक्टली लेयर्ड हेअरकट् वगैरे.. पण ही तर खरोखरची झाशीची राणी आहे ट्रेलरवरून कळल्लं Proud
अ‍ॅक्टींग, अ‍ॅक्शन कशी करतेय ते बघु आता, यात फक्त अजिबात न जमलेला लुक समजला.

Pages