सॉरी बॉस! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही!
जालावर एक मननीय ब्लॉगपोस्ट वाचण्यात आली :
हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम.
खेरीज 'हिंदू'मधील एक झकास माहितीपूर्ण लेखही वाचण्यात आला :
(इंग्लिश लेख) Hindi chauvinism
आज हे दोन लेख टाकण्यामागचं सूत्र म्हणजे - मो.क. गांधी! भारतीय प्रजासत्ताकाच्या शासनमान्य राष्ट्रपित्याचे हिंदुस्तानी (हिंदी+उर्दू मिसळ) स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा असावी असे एके काळी मत होते. काळाच्या ओघात (सुदैवाने) प्रजासत्ताकाची ती राष्ट्रभाषा झाली नाही (*१). पण हे वास्तव दडपून हिंदी प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा असल्याचा खोटारडा प्रचार चालवला जातो. या बुद्धिभेदाचे, फसव्या प्रचारतंत्राचे दुष्परिणाम महाराष्ट्रात - विशेषकरून मुंबईत - आपण बघतच आहोत (खुद्द हिंदी भाषेचं आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय (*२) हिंदीभाषिक प्रदेशांत नसून, महाराष्ट्रात - वर्ध्यात - आहे. आता बोला!).
मो.क. गांधी यांची जयंती आज भारतीय प्रजासत्ताकात साजरी केली जात आहे. त्याचं औचित्य साधून 'हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा नाही' (असा वस्तुनिष्ठ प्रचार) ठसवणारी ही रंगीबेरंगी पोस्ट!
तळटीप :
*१. भारतीय राज्यघटनेतील कलम ३४३ अनुसार (अधिकृत इंग्लिश दुवा) हिंदी भारताच्या संघराज्याची अधिकृत भाषा आहे. ३४३ व्या कलमातील अधिकृत नोंद असे म्हणते :
(इंग्लिश : ) The official language of the Union shall be Hindi in Devanagari script.
(मराठी भाषांतर : ) देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची अधिकृत भाषा असेल.
घटनेत कुठेही 'राष्ट्रभाषा' किंवा 'राष्ट्रीय भाषा' असा उल्लेख नाही. किंबहुना नेमकेपणा अनुसरत हिंदीला 'official language of the Union' म्हटले असून, 'official language of the India' अशी संदिग्ध वाक्ययोजना नाही हे लक्षात घ्यायला हवे. भारतीय घटनेनुसार मराठीसह २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. त्यांची यादी आठव्या अनुसूचीत नोंदवली आहे.
'अधिकृत भाषा (Official language)' व 'राष्ट्रीय भाषा/राष्ट्रभाषा (National language)' यांमध्ये भेद असल्यास निस्संदिग्धपणे तसे-तसे उल्लेख त्या-त्या देशांच्या घटनांमध्ये नोंदवलेले असतात. याचं एक उदाहरण म्हणून सिंगापूरच्या प्रजासत्ताकाच्या घटनेतील कलम '१५३ अ' पाहता येईल. हे कलम म्हणते (इंग्लिश मजकूर):
Official languages and national language
153A. —(1) Malay, Mandarin, Tamil and English shall be the 4 official languages in Singapore.
(2) The national language shall be the Malay language and shall be in the Roman script:
Provided that —
(a) no person shall be prohibited or prevented from using or from teaching or learning any other language; and
(b) nothing in this Article shall prejudice the right of the Government to preserve and sustain the use and study of the language of any other community in Singapore.
यात सिंगापूरच्या प्रजासत्ताकाची 'मलय' ही 'राष्ट्रीय भाषा' आहे असा उल्लेख असून 'मलय, मँडरिन चिनी, तमिळ व इंग्लिश या चार अधिकृत भाषा आहेत' (यातील 'अधिकृत भाषा' / 'official language' असा उल्लेख भारतीय राज्यघटनेतील याच उल्लेखाच्या संदर्भात विशेष चिंतनीय आहे.) असा स्पष्ट उल्लेख आहे.
दुसरं उदाहरण पाकिस्तानाचं. पाकिस्तानी राज्यघटनेच्या २५१ व्या कलमानुसार 'उर्दू' ही पाकिस्तानाची 'राष्ट्रीय भाषा' आहे असे निस्संदिग्ध रित्या नोंदवले गेले आहे. इंग्लिश मजकूर :
(1) The National language of Pakistan is Urdu, and arrangements shall be made for its being used for official and other purposes within fifteen years from the commencing day.
(2) Subject to clause (1), the English language may be used for official purposes until arrangements are made for its replacement by Urdu.
(3) Without prejudice to the status of the National language, a Provincial Assembly may by law prescribe measures for the leaching, promotion and use of a Provincial language in addition to the National language.
यावरून एखाद्या देशाच्या राज्यघटनेत 'राष्ट्रीय भाषा (national language)' म्हणून उल्लेख असला, तर एखादी भाषा त्या देशाची राष्ट्रभाषा ठरते हे ध्यानी येईल. या निकषानुसार हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही, हे लक्षात येते.
*२. 'महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा' संस्थेचे अधिकृत संस्थळ (इंग्लिश व हिंदी भाषेतच उपलब्ध.)
त्याला पण शशी थरुर च्याच
त्याला पण शशी थरुर च्याच लेखाचाच आधार मिळाला का ? तो थरुर हल्ली काही पण बरळत असतो. पडला होता तेव्हापासुन डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या.
<< तो थरुर हल्ली काही पण बरळत
<< तो थरुर हल्ली काही पण बरळत असतो. पडला होता तेव्हापासुन डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या.>>
ही कुठली तुमची चर्चेची पद्धत? मी म्हणू का, श्री१२३ ना यडचॅप आहे झाले!!
अहो शशी थरूरवर वैयक्तिक टीका का? तुम्ही वाचा घटने मधे नि द्या आधार की तो म्हणतो ते चुकीचे आहे! मग त्याच्यावर टीका करा. हिंदी राष्ट्रभाषा नाही, तसे घटने मधे कुठेहि म्हंटले नाही, माझ्या माहितीप्रमाणे. आता मायबोलीवर भारतीय राज्यघटना वाचलेले अनेक लोक असतील, ते सांगतील.
आपण महाराष्ट्रात चुकीची समजूत करून घेतली की हिंदी राष्ट्रभाषा आहे, याचे कारण महाराष्ट्रीय लोकांना स्वतःबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल यत्किंचितहि अभिमान नाही. त्यांना लाजच वाटते. दोन मराठी लोक बाहेर आपआपसात देखील मराठी बोलत नाहीत, कारण प्रचंड लाज! या उलट हिंदीभाषी सरळ सर्वांशी हिंदीतच बोलेल, नि लाळघोटे मराठी हिंदीत बोलायला लागतील. नाहीतर इंग्रजीत, पण जीव गेला तरी मराठीत बोलणार नाहीत! फक्त त्यांच्यावर टीका केली की मोठमोठ्याने गर्जना करतील (कदाचित् हिंदी किंवा इंग्रजीतूनच).
माहितीबद्द्ल धन्यवाद! तळ्टीपः
माहितीबद्द्ल धन्यवाद!
तळ्टीपः दुसर्याचे मोठेपण मान्य करायला स्वतःचे मन देखील मोठे असावे लागते.
भारत राष्ट्राला आजच्या घडीला
भारत राष्ट्राला आजच्या घडीला तरी कुठलीही राष्ट्रीय भाषा नाही.
भारतीय राज्यघटनेत कुठल्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला नाही की कायद्याने भारतात प्रचलित असलेल्या असलेल्या कुठल्याही भाषेस राष्ट्रभाषा म्हणून मान्यता दिलेली नाही.
एक भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणून घटनेत बदलासाठी कुठल्याही सरकारने ठराव मांडला तरी तो संमत होणे अशक्य आहे. निदान हिंदीसाठी तरी, इंग्रजीबद्दल असे सांगणे अवघड आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदीसाठी पटेलांच्या वेळी बहूधा ह्याबद्दल जोरदार हालचाली झाल्या होत्या.
अमृतयात्री आणि थरूरांनी लिहिले ते बरोबर आणि घटनेतील परिच्छेद ३४३, ३४५, ३४७ ला धरून आहे. १९६३ च्या प्रशासकीय भाषेबद्दलच्या कायद्याबरोबरच १९७६ च्या प्रशासकीय कामांसाठी वापरावयाच्या भाषेबद्दलच्या नियमांचाही संदर्भ याबाबतीत दिला जातो.
खरच हे मला माहितच
खरच हे मला माहितच नव्हतं.
माहिति दिल्याबद्दल धन्यवाद.
हिंदी हि भारताची राश्ट्रभाशा म्हणून पिल्लु सोडना-याचा निशेध असो.
मला ही 'बातमी' च आहे. मराठी
मला ही 'बातमी' च आहे. मराठी कुठल्याही प्रकारे हिंदी पेक्षा कनिष्ठ नव्हतीच. उलट हिंदी मध्येच बरेच भ्रष्ट शब्दप्रयोग असल्याने (उदा: बक्सा - Box वगैरे) ती कधीच आवडली नाही. आता तर केवळ नाइलाजास्तव बोलावी लागेल तेव्हाच हिंदी बोलणार. (आणि मराठी बोलणार ती देखील शक्य तेवढी शुद्धच !)
रवि करंदीकर
आयला, शाळेत तर आम्हाला
आयला, शाळेत तर आम्हाला "हिन्दी" हीच राष्ट्रभाषा म्हणून शिकवल जायच!
(घरी आई मात्र सान्गायची, अस्ली काही भाषा बिषा नाही, सरळ मराठीला धरुन रहा - अन करायची तर सन्स्कृत राश्ट्रभाषा म्हणून होऊ शकते, पण आता ते होणे नाही)
त्यातुन म्हणे हिन्दीच्या कसल्याश्या परिक्षा दिल्या की सरकारी नोकरीत बढती पगारवाढ वगैरे फ्याड महाराष्ट्रातलीच की सर्व देशभराची? अन त्यान्ना कायदेशीर आधार काय?
आपण महाराष्ट्रात चुकीची समजूत
आपण महाराष्ट्रात चुकीची समजूत करून घेतली की हिंदी राष्ट्रभाषा आहे, याचे कारण महाराष्ट्रीय लोकांना स्वतःबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल यत्किंचितहि अभिमान नाही. त्यांना लाजच वाटते. दोन मराठी लोक बाहेर आपआपसात देखील मराठी बोलत नाहीत, कारण प्रचंड लाज! >>> झक्की मला तर माझ्या मातृभाषेविषयी पुर्ण अभिमान आहे . तुम्ही बघितलेले महाराष्ट्रीय / मराठी वेगळे असतील कदाचीत .
मलाही ही 'बातमी' च आहे!! पण
मलाही ही 'बातमी' च आहे!! पण मग शाळेत शिकवताना हिंदी ही राष्ट्रभाषा असं का सांगितल जायच? लाजेकाजेस्तव मराठीत बोलत नाहीत असे लोक हिंदीत तरी कुठे धड (शुद्ध) बोलतात?
शुद्ध हा शब्द फारच सापेक्ष
शुद्ध हा शब्द फारच सापेक्ष आहे. भारतासारख्या देशात, जिथे इतक्या भाषा आहेत, तिथे एका भाषेतले शब्द सहज दुसर्या भाषेत मिसळून जातात. मराठीत कितीतरी इंग्रजी शब्द मिसळलेलेल आहेत्,नवनवीन शब्द मिसळण्याची उदाहरणे दररोज दिसतात. मग ती भाषा शुद्ध कशी राहील?
माफ करा थोडसं वेगळं वळण देत
माफ करा थोडसं वेगळं वळण देत आहे . "राज ठाकरेंनी एका सभेत म्हटले होते की जेव्हा राष्ट्रभाषेचा ठराव करण्यासाठी विचार झाला त्या वेळी मरठी एका मताने मागे राहीली म्हणून हिंदी राष्ट्रभाषा झाली"
आणि (भारतीय राज्यघटनेत कुठल्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला नाही की कायद्याने भारतात प्रचलित असलेल्या असलेल्या कुठल्याही भाषेस राष्ट्रभाषा म्हणून मान्यता दिलेली नाही.) असं तुम्ही म्हणताय? (मला खरच या विषया वर पुरेशी माहीती नाही पण या पैकी ख्ररं विधान कोणतं याचा कृपया खुलासा करवा)
अच्छा , म्हणजे पोस्ट सुरू
अच्छा , म्हणजे पोस्ट सुरू करणार्याची मो.क.गांधी ही मळमळ आहे तर! आणि एके काळी या मो.क. गांधी यानी हिन्दी राष्त्रभाषा व्हावी असे मत व्यक्त केले होते हा त्याचा गुन्हा तर.! म्हणून त्याच्या जन्मदिनी हिन्दी भाषा ही राष्ट्रभाषा कशी नाही हे इथे बहुतेकाना माहीत असलेली माहिती पुन्हा ओकार्या काढून आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे नाही का? गांधी जयन्ती 'साजरी' करण्याची ही पद्धत आणि आम्ही कसे त्याना 'महात्मा' म्हणायलाही नकार देतो हे मो.क.गांधी असे म्हणून ठसवण्याचा हा प्रयत्न नवा नाही. चिंता करू नका गांधी जयन्तीचा 'त्रास' होणारे लोक इथं काही कमी नाहीत. मायबोलीवर हिन्दी राष्ट्रभाषा आहे असा कुणी दावा केल्याचे नजीकच्या भूतकाळात दिसून येत नाही. त्यामुळे हे 'संशोधन' नेमके २ ऑक्टोबरलाच मायबोलीच्या पटलावर ठेवण्याचे आणि मायबोलीकराना शहाणे करून सोडण्याचे 'प्रचारी' 'औचित्य' न ओळखण्याइतके इथे कोणी 'येडे' नाहीत.
ह्या विषयासंबंधित संकेतस्थळ:
ह्या विषयासंबंधित संकेतस्थळ: http://india.gov.in/knowindia/official_language.php
तुम्ही वाचा घटने मधे नि द्या
तुम्ही वाचा घटने मधे नि द्या आधार की तो म्हणतो ते चुकीचे आहे! मग त्याच्यावर टीका करा. हिंदी राष्ट्रभाषा नाही, तसे घटने मधे कुठेहि म्हंटले नाही, माझ्या माहितीप्रमाणे. आता मायबोलीवर भारतीय राज्यघटना वाचलेले अनेक लोक असतील, ते सांगतील. >>> घ्या वाचा वरची लिंक , आता म्हणु नका ती कामकाजाची भाषा आहे , राष्ट्रभाषा नाही . आमच्या राष्ट्रपित्याने सांगितलं आहे की हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि आम्ही तेच मानणार .
नेहरु एकदा म्हनाले होते Rules
नेहरु एकदा म्हनाले होते Rules are for fools! Wise make them, wise break them...
थोद्दक्यात शहाने लोक जे थरवतात ती राष्ट्रभाषा. दक्शीन भारतीय खरच शहाने अहेत.
श्री, तुम्ही नीट वाचलं, तर
श्री, तुम्ही नीट वाचलं, तर कळेल की हिंदी व इंग्लिश या केंद्रीय सरकारच्या कामकाजाच्या भाषा आहेत. 'राष्ट्रभाषा' नाहीत.
>>आमच्या राष्ट्रपित्याने सांगितलं आहे की हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि आम्ही तेच मानणार .
तुम्हांला मानायचं ते माना. वास्तव थोडीच बदलणारे?
रॉबिनहूड, तुम्ही 'आज तक' वगैरे पीतपत्रकारितावादी चॅनलांचे पत्रकार आहात काय? माझ्या मुद्द्यांचा असला जबरी विपर्यास वाचून, माझी मोठी करमणूक झाली.
फ- पटलं नाही. "मो.क्.गांधी "
फ- पटलं नाही.
"मो.क्.गांधी " तर मुळीच नाही.
न पटण्यासारखं काय आहे? मी
न पटण्यासारखं काय आहे? मी स्वतःची सहीदेखील 'सं.वि. द्रविड' म्हणून करतो. ज्या-त्या व्यक्तीचे अधिकृत नाव वापरण्यात काहीही गैर नाही. मी 'मो.क. गांधी', 'बा.गं. टिळक' असं म्हटलं, लिहिलं, वापरलं, तर ते अजिबात गैर नसून, अधिक वस्तुनिष्ठ आहे.. भावनिक मुलामा देऊन ज्यांना पदव्या वापरायच्या असतील, ते पदव्या वापरतीलच. मला वस्तुनिष्ठ नावे वापराविशी वाटली, तर त्यात मी कुणाच्याही कर्तृत्वाला उणेपणा देतोय, असे मानणे हा एकतर भोळसटपणा म्हणावा लागेल, नाही तर विपर्यास तरी.
>>>> एकतर भोळसटपणा म्हणावा
>>>> एकतर भोळसटपणा म्हणावा लागेल, नाही तर विपर्यास तरी.
नुस्ता विपर्यास नाही तर मूळ महत्वाच्या विषयाला बगल द्यायचा केलेला प्रयत्न वाटतो!
आमच नशिब थोर, की राम कृष्ण विठ्ठल/पान्डुरन्ग वगैरे विभुतीन्ना अन थोर थोर ऋषीमुनीन्ना मागे अस्ल्या कस्ल्या पदव्या लावण्याचे त्या युगात नव्हते! नुस्ते श्री लावले तरी तेव्हाही भागायचे, आत्ताही भागते! इतकेच काय, देवान्ना "अरे रामा" करुन हाकारायची देखिल फुल्ल परवानगी अजुनतरी ये मराठीचीये देशी शिल्लक आहे! (पण काही सामान्य मर्त्य मानव जरा जास्तच असामान्य असल्याने..... चालायचच!)
अर्थात तरीही त्याकाळच्या/नन्तरच्या काही भाविक लोकान्नी सहस्रनामावल्या प्रकाशित केल्याच म्हणा ! (कालच तोन्ड दुखेस्तोवर [वा फाटेस्तोवर] श्रीदत्ताची नामावली दत्तयागाकरता घोकून आलोय )
मी तर हूडाला असे सुचवेन की त्यान्नी देखिल "कै. मो.क. गांधी" याचेकरता एखादी "सहस्रनामावली" तयार करुन प्रकाशित करावी. तुफान खपेल!
पुन्हा सरकारी आशिर्वाद मिळेल तो वेगळाच!
लिंबु, <<सन्स्कृत राश्ट्रभाषा
लिंबु,
<<सन्स्कृत राश्ट्रभाषा म्हणून होऊ शकते, पण आता ते होणे नाही)>>,
उगिच घाबरुन गेलो मी क्षणभर. आत्ताच पोरांचा अभ्यास घेताना दमछाक होते.
संस्कृतच्या नावानी आम्हा दोघानाही ( बायको व मी) गोळाच येतो.
त्यात आमचं कारटं तर प्रश्नांचा सारखा भडिमार चालु ठेवतो.
आमचा जीवच घेतला असता त्यानी, त्या संस्कृतच्या नावाखाली.
माझी बायको तर म्हणते.
मी लहानणी जरी मराठी माध्यमातुन शिकले असले तरी आता मात्र दोनदा कॉन्व्हेंट मधुन माझं शिक्षण झालं या पोरांबरोबर. मी मात्र आजुनही नॉन कॉन्व्हेंटच आहे. पोरं काही आंगलाळलेलं विचारत आले की तिच्याकडे बोट दाखवुन मोकळा होतो.
ऋग्वेद, सन्स्कृत मलाही येत
ऋग्वेद, सन्स्कृत मलाही येत नाही, जरी माझे वडील शन्कराचार्यान्च्या मठात सात वर्षे राहून (अर्थात माधुकरी मागुन) सन्स्कृत अन वेदविद्या शिकले!
पण माझा मुलास मात्र ज्ञानप्रबोधिनीच्या कृपेने "शालेय अभ्यासक्रमात" जेवढे शिकवले जाते तेवढे सन्स्कृत येते!
कुणी सान्गाव? कदाचित आमच्या पुढच्या पिढ्या सन्स्कृतभाषेला प्रथम स्थानी आणतील! त्याकरता अगदीच काही जर्मन्/ब्रिटीश वा अमेरिकन विद्वान्नान्नी येऊन सान्गायला/शिकवायला हवे असेच काही नाही!
रिडिक्युलस पोस्ट. तुम्हाला
रिडिक्युलस पोस्ट. तुम्हाला हिन्दी व गान्धी दोन्ही आवड्त नाही ते कळले. बंद पेटीत ( क्यूबिकल) मध्ये
काम करणार्यांचे विचार आहेत हे. जरा भारत भर हिन्डून बघा. म्हण्जे कळेल हिन्दीचे महत्त्व. चेन्नैतील ट्रान्स्पोर्टर, विजयवाड्यातील ग्राहक, मुम्बै तील सप्लायर, ओरिसातील कुरीयर वाला यान्च्याशी कॉन्फरन्स कॉल करून एक कन्साइनमेंट व त्याचे कागद शोधून काढ्ताना हीच मावशी उपयोगी पड्ते. त्या लेखाखालील दुसरी पेंडसे यान्ची प्रतिक्रिया वाचा क्रुपया.
मामी एंदुकु इंता कोपाम
मामी एंदुकु इंता कोपाम आयतुन्नारु मिरु.
नेनु गुडा हैद्राबादलो पानि चेसॅनु.
नाकु बागा तेलसु. साउथईंडयन आंटे एला बिहेव चेस्तारो ?
मारी मिरु एंदुकु एक्ष्साईट आयतुन्नरु ?
पोनी मामी, पोनी.
प्रश्न 'कायदेशीर' रीत्या
प्रश्न 'कायदेशीर' रीत्या हिंदी ही राष्ट्रभाषा हे की नाही असा आहे. सर्वत्र समजणारी भाषा कोणती, हा नाही. तसे पाहिले तर इंग्रजी हि तितकीच बर्याच ठिकाणी समजते. शिवाय आजकाल प्रत्येक भाषेत इतर भाषांची मिसळ होऊन एक वेगळीच भाषा निर्माण झाली आहे.
<<साउथईंडयन आंटे एला बिहेव चेस्तारो ?>>
हे वाचून फक्त मराठीच इंग्रजाळलेली नाही तर इतरहि भाषा तश्याच झाल्या आहेत, हे कळले. त्यामुळे वरील तेलुगु सुद्धा बरेच कळले.
"दक्षिण भारतीय म्हणून असे वागता?"
मी हैदराबदला कामाला
मी हैदराबदला कामाला होतो.
तेलुगु शिकण्याचि काहीच गरज नाही.
जर तुम्हाला मराठी व इंग्रजी येत असेल तर पहिल्या दिवशि पासुन तेलुगु समजु लागते. कारण जरी मराठी शब्द तेलुगुमधे नाहित तरी संस्क्रुत (मराठिच) व इंग्रजिचा बराच वापर होतो. मराठी फार बरी आहे हो, या दक्षीणात्य भाषापेक्षा, आपल्या मराठीत तुलनेने फारच कमी आंग्ल भाशा येते. पण दक्षिणे, प्रत्येक भाशा (तमिल, मलयालम, कन्नाडा, (तुळू मात्र अपवाद आहे, असा माझा अनुभव आहे, चुकिचाही होऊ शकतो.) मधे फार जास्त प्रमाणात इंग्रजीचा वापर होतो.) आंग्लाळलेली आहे.
जसे.
१) अन्नाम, भोजनम
२) प्रति मानसी.
३) प्रति कोसाम
४) आनंदम
५) उज्जोगम
६) भ्रस्ट
७) रोगाम
८) वेदना
९) रहस्यम
१०) हच्च्या ( हत्या )
अशा प्रकारे बरेच.
इंग्रजी तर तुम्हाला वाटेल तिथे घुसवा. फक्त ते तेलुगु वाक्यात घुसविले असेल तर या लुंगीवाल्याना बरोबर कळते. आम्हि हिंदि मधे इंग्रजी घुसवला की हि कोंगाळि न समजणयाचे नाटकं करायची मात्र तेलुगुत इंग्रजी घुसडवलं कि त्याना बरोबर कळायच. फार नाटकी असतात बर, ते कोंगाळी.
बरे त्यांच इंग्रजिच स्वत:च काही तरी वेगळं लॉजिक आहे. जे मला त्या ३-४ वर्शात बरेच प्रयत्न करुनही कळलं नाही. तुमच्या पैकी कुणाला माहीत असल्या नक्की लिहा.
Geeta = Geetha
Shrihari=Srihari
Katha = Katha ( Pronunciation “ka da”)
Sharada=Sarada
हे असलं त्यांच स्वतंत्र लॉजिक.
काय मामी ? बरोबर ना. माझा तिन वर्शाचा अनुभव आहे हैद्राबादचा.
अश्विनीमामी, मला हिंदीबद्दल
अश्विनीमामी, मला हिंदीबद्दल द्वेष वाटतो असं नाही. मी फक्त 'हिंदी ही राष्ट्रभाषा नाही' हे वास्तव सांगणारं पोसृअ आणि आनुषंगिक माहिती मांडली आहे. तुम्हांला हे वास्तव 'रिडिक्यूलस' का काय ते वाटत असेल, तर वाटो. आपापल्या मनाच्या मर्यादेत काहीही वाटून घेण्याचा हक्क सर्वांनाच आहे.
दुसरी गोष्ट मो.क. गांधी मला आवडतात की नावडतात याबद्दल : मला ते आवडतही नाहीत व नावडतही नाहीत. त्यांच्या विचारांबद्दल, निर्णयांबद्दल, कृतींबद्दल माझी सकारात्मक, नकारात्मक मते आहेत. पण त्यावरून मी कुणाला विशेषणं (जशी तुम्ही या मुद्द्यांना शेलकी विशेषणे बहाल केलीत तशी) बहाल करायला जात नाही.
बाकी, 'गांधी' व 'हिंदी' दोहोंबद्दल वाटत असलेल्या तुमच्या निष्ठा जगजाहीर करून समाधान मिळवण्यासाठी ही पोस्ट तुमच्यासाठी एक साधन बनली, याचा मला आनंद वाटतो.
>>प्रश्न 'कायदेशीर' रीत्या हिंदी ही राष्ट्रभाषा हे की नाही असा आहे. सर्वत्र समजणारी भाषा कोणती, हा नाही.<<
झक्की, अनुमोदन. 'हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा आहे' असा खोटा प्रचार उघडकीला आणणारी माहिती मला यांतून ठळकपणे मांडायची होती.
अधिक वस्तुनिष्ठ >>
अधिक वस्तुनिष्ठ >> ?
ज्ञानेश्वरांना- ज्ञा.वि.कुलकर्णी किंवा तुकारामांना तु.बो.आंबिले , म्हाराजांना शि.श.भोसले, बालगंधर्वांना ना.राजहंस असे तर आपण संबोधत नाही. लोकगंगेतील, महाराष्ट्राच्या इतिहासातील मानाची पानं आहेत ती. त्या त्या पदव्या ह्या भावबंधनं आहेत हो. या देशाचे वैशिष्ट्यच आहे ते.
वस्तुनिष्ठच पद्धतिने विचार करायचा झाल्यास गांधींनी गुजराथी/कच्छी वगैरे सोडून हिंदी हीच भाषा का मुकरर केली ?
तसेच- हिंदी ही निदान भारतीय उपखंडातील भाषा तरी आहे हे तर बरे, निदान ईंग्रजी तरी नाही.
फ, नमस्कार, सर्वप्रथम्..मला
फ,
नमस्कार,
सर्वप्रथम्..मला गांधीजी किंवा त्यांचे विचार याविषयी प्रेम आहे असे नाही. मी संघाच्या शाखेत जायचो.
मराठी विषयी मला एखाद्या सर्वसामान्य मराठी माणसाला असावे तितके प्रेम आहे. माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातुन झाले आहे. तरीही हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणण्याला माझी काहीच हरकत नाही किंवा हिंदी मुळे मराठीचे नुकसान झाले आहे हे मला व्यक्तीशः मान्य नाही.
(तुमच्या लेखाचा मुळ मुद्दा "हिंदी ही राष्ट्रभाषा हा अपप्रचार चालवला गेलाय" हा मुद्दा मान्य करुन)
थोडेसे विषयांतर(क्षमा करा):
तुम्ही हिंदी ही समस्त भारताची भाषा न मानता फक्त उत्तर प्रदेश किंवा एका विशिष्ट प्रदेशाची भाषा मानता का? आणि त्यामुळे ती भारताची राष्ट्रीय भाषा आहे असे म्हणण्यात कमीपणा वाटतो? मी हिंदी ही भारताची (हिंदुस्तानची भाषा) या अर्थी राष्ट्रभाषा मानतो. भारतातील सर्व प्रदेशात समजली जाणारी भारतीय भाषा ही मला वाटते हिंदीच आहे (इंग्लीश आहेच अर्थातच!). मग तुम्हाला इंग्लीश ही राष्ट्रभाषा म्हणालेले चालेल का?
जाता जाता..
मराठीचे नुकसान माझ्यासारख्या मराठी माणसाने केलेय असे मला वाटते (इथे माझ्याबरोबरच विसंगत वागणार्या राज ठाकरे सारख्या माणसांचा समावेश आहे..सन्माननीय अपवादानी स्वतःला वगळावे) .
एकीकडे मराठीबद्दल अभिमान वगैरे बोलायचे, मराठीचे नुकसान होतेय असे उसासे टाकायचे आणि स्वतःच्या मुलाना सी बी एस ई किंवा आय सी एस ई मधे घालायचे किंवा कॉन्वेंट च्या शाळेत घालायचे (भरमसाट पैसे भरुन). तिथे ऑप्शनल लॅ.ग्वेज सुद्धा आपली भारतीय भाषा न घेता फ्रेंच किंवा जर्मन घ्यायचे. दुसर्या मराठी माणसाबरोबर बोलतानाही आपण मागासलेले दिसु या भीतीने मराठीत न बोलता इंग्लीशमधे बोलायचे. हा सगळा विचार मी करतो तेव्हा ही विसंगती जाणवुन माझी मलाच लाज वाटायला लागते. आणि मराठी बद्दल काहीही बोलण्या/लिहिण्याचा नैतीक अधिकार मी गमवलाय असे वाटते.
असो.
बाकी, 'गांधी' व 'हिंदी'
बाकी, 'गांधी' व 'हिंदी' दोहोंबद्दल वाटत असलेल्या तुमच्या निष्ठा जगजाहीर करून समाधान मिळवण्यासाठी ही पोस्ट तुमच्यासाठी एक साधन बनली, याचा मला आनंद वाटतो. स्मित>> इथे काय निष्ठा व्यक्त करणार. ती ही जागा नाही. ही मराठी साइट आहे. इथे फक्त मत व्यक्त केले आहे.
आपापल्या मनाच्या मर्यादेत काहीही वाटून घेण्याचा हक्क सर्वांनाच आहे.>> अनुमोदन. मग तुम्ही जाहीर का केलेत? मग लोक प्रतिक्रीया देणारच ना. तुमचे मत रंगीबेरंगीवर व माझे मनात असेच ना. सम पीपल आर मोअर इक्वल. मी माझा अनुभव शेअर केला फक्त. ना मि झों?
पोनी मामी, पोनी.>> जायला सांगता आहात. जाते. मी तेलुगु नाही. पुणेरी देशस्थ मराठी. दिस इस सो रिडिकयुलस.
>> भारतातील सर्व प्रदेशात
>> भारतातील सर्व प्रदेशात समजली जाणारी भारतीय भाषा ही मला वाटते हिंदीच आहे (इंग्लीश आहेच अर्थातच!). मग तुम्हाला इंग्लीश ही राष्ट्रभाषा म्हणालेले चालेल का?<<
याला काही पुरावे?
आणि समजा, काही वर्षांत मराठी भाषिकांची प्रजा भरपूर झाली, तर मग मराठी ही राष्ट्रभाषा करायची का? घटनासमितीने या सर्व मुद्द्यांचा उहापोह करून भारताला कुठलीही राष्ट्रभाषा न ठेवता सर्व २२ भाषा 'भारतीय प्रजासत्ताकाच्या अधिकृत भाषा' म्हणून पुरस्कारल्या आहेत. माझा आक्षेप, हिंदीला घटनेत तसे नमूद केले नसतानाही 'राष्ट्रभाषा आहे' अशा खोटारड्या प्रचाराने पसरवण्यावर आहे.
>>सम पीपल आर मोअर इक्वल. मी माझा अनुभव शेअर केला फक्त. ना मि झों?
अहो अश्विनीमामी, मा ना झों नाही. पण तुम्हाला न साहवणार्या वास्तवाचा पुनरुच्चार करणार्या पोस्टीला 'रीडिक्यूलस' वगैरे शेलकी विशेषणे पहिल्याच प्रतिक्रियेत वापरण्यावरून खर्या मि कु झों ते कळलं.. सारवासारवीची गरज नाही.
Pages