आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा.....
भाग-1
https://www.maayboli.com/node/65783
भाग-2
https://www.maayboli.com/node/65793
भाग-3
https://www.maayboli.com/node/65800
भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807
भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
संजनाने समिधाला डोळ्यांनी इशारा केला. तीला काय करायचं ते समजलं. ती बोलता बोलता राजेशला म्हणाली ; दादा तु आम्हाला इतकं मस्त फिरवून आणलंस आमच्यासाठी तुझा वेळ दिलास म्हणून आम्ही पण तुला एक सरप्राईज द्यायचं ठरवलय. राजेशला आपली बहीण अजूनही आपला इतका विचार करते म्हणून मनस्वी आनंद झाला आणि आनंदाने त्याने होकार दिला. तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती कि सगळीच सरप्राईज चांगली नसतात.काही जिवावरी बेततात. समिधाला वाटलंही नव्हतं की इतक्या लगेच तो तयार होईल.इतक्या आनंदात असलेल्या त्याला आपण असं फसवणार याचं तीला राहून राहून वाईट वाटत होतं. पण तीने सगळे विचार मनातल्या एका कप्यात बंद करून टाकले आणि दूर अंधारात त्याची चावी फेकून दिली. सरप्राईजसाठी तिने त्याचे डोळ्यांवर काळी पट्टी बांधली. दहा मिनीटात गाडी कड्यापाशी येऊन थांबली.
सगळे गाडीतून उतरले. समीरने डोळे बांधलेल्या राजेशचा हात पकडून त्याला चालायला मदत केली . खरं तर आधीही ते तिथे आलेले. पण तेव्हाचं वातावरण आणि आताचं वातावरण यात फरक होता. आता ते सावजाला शिकार्याकडे घेऊन चालले होते. शेवटी एकदाचे ते कड्यापाशी आले. समीर ;संजना ;आणि समिधा रिंगणात येऊन थांबले. राजेशला काहीतरी जळल्यासारखा वास येत होता. पण त्याने दुर्लक्ष केलं. समिधाने त्याला डोळ्यावरची पट्टी काढायला सांगितली. त्यानंतर त्याने समोर जे दृष्य पाहिलं ते बघून फक्त चक्कर यायची बाकी होती त्याला. समोर रोहनची प्रतिमा बघून खरं तर सगळेच अवाक् झाले होते. पण आपण केलेल्या दुष्कृत्यांची चित्रफीत राजेशच्या डोळ्यांसमोर आली आणि त्याला दरदरून घाम फुटला. ओळखलं नाहीस मला राजेश! असं रोहनने विचारल्यावर तर भीतीने त्याच्या तोंडातून आवाजच फुटेना. टोकदार गोष्टीने लोखंडावर ओरखडे काढल्यावर जसा आवाज येतो तसा रोहनचा आवाज राजेशच्या कानात घुमत होता. रोहन त्याला जाब विचारत होता. भयंकर राग आला होता त्याला . शेवटी महंत रोहनला समजावायला लागले. तरीही त्याचा राग शांत होईना. महंतांना आता वेगळीच चिंता वाटू लागली होती. एकतर राजेशला अद्दल घडवायची म्हणून त्यांनी कोणतंच सुरक्षाकवच त्याला दिलं नव्हतं . त्यामुळे आता जर काही बरं वाईट झालं तरी ते सुद्धा राजेशला वाचवू शकणार नव्हते. रोहनच्या रागाची पातळी समुद्राला त्सुनामीत येणार्या लाटांसारखी वाढत चालली होती. त्याचे डोळे आग ओकत होते. असं म्हणतात की शांत माणूस खूप कमी वेळा चिडतो. पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा मात्र तो कोणालाच आवरत नाही. रोहनचही असंच झालं होतं. एका क्षणाला रोहन राजेशचं बेफिकीरीचं वागणं बघून संतापला. आणि दुसर्याच क्षणी त्याने धावत येऊन राजेशला जोरात धक्का दिला. सगळ्यांना हे अनपेक्षित आणि तितकंच भयानक होतं. दरीत राजेशची एक जोरदार किंकाळी घुमली. सगळे जागीच थिजून उभे होते. महंतांच तर डोकंच चालत नव्हतं. घरून येताना आजीला ते वचन देऊन आलेले की राजेशच्या जिवाला काही धोका होणार नाही. आता काय करायचं हे त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह होतं. समिधाला तर हे सगळं असह्य होऊन तिथेच चक्कर आली. बाबांनी आणि समीरने तिला सावरलं. या सगळ्यात एकटा रोहनच बेफिकीरीने हसत उभा होता......
क्रमशः
----आदिसिद्धी
भाग जरा मोठे टाक पु.भा.प्र.
भाग जरा मोठे टाक
पु.भा.प्र.
त्यामुळे आता जर काही बरं वाईट
त्यामुळे आता जर काही बरं वाईट झालं तरी ते सुद्धा रोहनला वाचवू शकणार नव्हते. >> इथे राजेशला वाचवू शकणार नव्हते असे पाहिजे.
मस्त चाललीय कथा..
मस्त चाललीय कथा..
हो ते चुकून झालेलं. केलं मी
चूक सांगितल्याबद्दल धन्यवाद नरेन. केलं मी दुरूस्त ....मोबाईलला प्राॅब्लेम झाल्यामुळे एकतर हाच धागा दोनदा प्रकाशित झालाय... एक वेमांना उडवायला सांगितलाय...आपल्याला डिलीट करता येतो का???
धन्यवाद आनंद.. कऊ पुढच्यावेळी
धन्यवाद आनंद.. कऊ पुढच्यावेळी नक्की प्रयत्न करेन मोठा भाग टाकायचा...अभ्यास करून बोअर झालं की लिहीते...त्यामुळे जरा छोटे होत असतील भाग...हाच भाग सकाळपासून तीन वेगवेगळ्या वेळी टाईप केलाय ब्रेक घेतल्यावर....माफ कर प्लीज...
एक वेमांना उडवायला सांगितलाय.
एक वेमांना उडवायला सांगितलाय...आपल्याला डिलीट करता येतो का???>>>
नाही
. कऊ पुढच्यावेळी नक्की प्रयत्न करेन मोठा भाग टाकायचा...अभ्यास करून बोअर झालं की लिहीते...त्यामुळे जरा छोटे होत असतील भाग...हाच भाग सकाळपासून तीन वेगवेगळ्या वेळी टाईप केलाय ब्रेक घेतल्यावर....माफ कर प्लीज...>>>
यात माफी कशाला..?????
सुरुवातीला मी पण याच चुका केल्या आहेत :|
पुढचा भाग जरा वाढव बस
आदिसिद्धी भारी जमलाय हाही भाग
आदिसिद्धी भारी जमलाय हाही भाग. पुलेशु.
धन्यवाद द्वादशांगुला....
धन्यवाद द्वादशांगुला....
छान झालाय हा भाग सुद्धा
छान झालाय हा भाग सुद्धा
धन्यव
धन्यवाद वेदराजे जी
Wow what a treat!!!
Wow what a treat!!!
I was expecting 4 and got 5, and 6 as well
उत्तम लेखन
धन्यवाद गुगु....मला हातात
धन्यवाद गुगु....मला हातात घेतलेलं काम पूर्ण करायला आवडतं......वाचणार्याला उगाच ताटकळत ठेवलं की त्याचा त्या कथेतला रस निघून जातो....म्हणून रोज एक भाग टाकते....
थोडा मोठा भाग टाका जरा
थोडा मोठा भाग टाका जरा
छान लेखन शैली फक्त भाग मोठे
छान लेखन शैली फक्त भाग मोठे टाका .
छान लेखन शैली फक्त भाग मोठे
छान लेखन शैली फक्त भाग मोठे टाका .
छान लेखन शैली फक्त भाग मोठे
छान लेखन शैली फक्त भाग मोठे टाका .
छान लेखन शैली फक्त भाग मोठे
छान लेखन शैली फक्त भाग मोठे टाका .
छान लेखन शैली फक्त भाग मोठे
छान लेखन शैली फक्त भाग मोठे टाका .
छान लेखन शैली फक्त भाग मोठे
छान लेखन शैली फक्त भाग मोठे टाका .
हो नक्की पुढच्या वेळी प्रयत्न
हो नक्की पुढच्या वेळी प्रयत्न करेन....सुचनेसाठी आभारी आहे...
पुढील भाग वाचण्यासाठीचा दुवा
पुढील भाग वाचण्यासाठीचा दुवा कसा मिळेल?
भागाच्या शेवटी तो दुवा ठेवला तर वाचण्यात मदत होईल.
माझ्या लेखनात जाऊन वाचा...
माझ्या लेखनात जाऊन वाचा....आता सगळं नीट नाही करता येणार ...साॅरी... मी कथा पूर्ण केलीये...पुढच्यावेळी नक्की ही सुचना लक्षात घेईन...आता माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन वाचा... रियली साॅरी...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/65949
हा शेवटचा भाग आहे...याच्या सुरूवातीला सर्व भागांच्या लिंक्स आहेत....इथे एकत्रीत मिळेल सर्व...