पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याची ती सिंहासनावरच मुटकुळे करून झोपण्याची पद्धत एकदम सल्तनत-ए-हिंद राजेशाही वाटली. "मी झोपतो करून हिमालयाची उशी"!!! म्हणणार्‍या नानू सरंजामेला जशी ट्राम ची आडवी सीट पुरत असे Happy

>> कोपच्यात भेटणार

पण तेव्हा तो रिटायर्ड हर्ट असतो ना? त्याहीपेक्षा जास्त जखमी असतो तेव्हा बेशुद्धीतून शुद्धीवर येऊन एका माणसाचा खून करतो. पण पद्मावती येणार तेव्हा आधीपेक्षा थोडा जास्त हेल्दी असूनही फक्त कोपच्यात.

ओह्ह सिंहासनावर झोपतो पण का! झोपेत गेलं बहुतेक ते माझं Wink
मला फक्त सिंहासनावर घसरगुंडीवरून खाली घसरतात त्या पोजमध्ये राजेशाही लोकं कशी बसत असतील तसा बसलेला आठवतोय.

ओह्ह सिंहासनावर झोपतो पण का! >>> हो. रावळ त्याला भेटायला येतो तेव्हा हा डुलक्या मारत असतो सिंहासनावर आडवा होउन. मग रावळ ने तू जखमी असल्याने आत्ता मारणार नाही वगैरे उसूल्स ऐकवल्यावर मला वाटले होते हा विचारेल "अरे मग मारायचे नव्हते तर झोपेतून कशाला उठवले? चांगला डोळा लागला होता...."

>>> उसूल्स Lol

ती खिलज्यांची फॅमिली ट्रेट दाखवली आहे - आधी रजा़ मुरादही सिंहासनावर डुलक्या घेत असतो.

>> अरे मग मारायचे नव्हते तर झोपेतून कशाला उठवले? चांगला डोळा लागला होता....
Lol

पण राँग ना? रावळ (की रतन?) येतो तेव्हा तो जागाच असतो. कारण झटका बसल्यासारखा पद्मावती ऐवजी रावळ रतन ला बघून "आता तू कशासाठी टपकलास" अशा अर्थाने काहितरी डायलॉग मारतो ना तो.
नंतर मग आपले सैनिक त्यांनां कॅप्चर करून समोर पेश करतील अशा समजुतीखाली मग त्याला झोप लागते ते कोणतरी दगा फटका झाल्याची गर्जना करत येतो तेव्हा जाग येते ना?

ती खिलज्यांची फॅमिली ट्रेट दाखवली आहे >>> Lol इथेही पुलंच आठवले. मुलाने बापाचा हा एवढाच गुण उचलावा? ("कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो")

नंतर मग आपले सैनिक त्यांनां कॅप्चर करून समोर पेश करतील अशा समजुतीखाली मग त्याला झोप लागते ते कोणतरी दगा फटका झाल्याची गर्जना करत येतो तेव्हा जाग येते ना? >>> अरे हो. हे बरोबर आहे. नक्की केव्हा तो डुलक्या मारत असतो लक्षात नव्हते.

पण तेव्हा तो रिटायर्ड हर्ट असतो ना? त्याहीपेक्षा जास्त जखमी असतो तेव्हा बेशुद्धीतून शुद्धीवर येऊन एका माणसाचा खून करतो. पण पद्मावती येणार तेव्हा आधीपेक्षा थोडा जास्त हेल्दी असूनही फक्त कोपच्यात. >>> हे "स्पॉट ऑन" आहे Happy ताप उलटतो तसा त्याची बाणाची जखम उलटत असेल कदाचित.

झोपेतून कशाला उठवले? चांगला डोळा लागला होता >>>
>>> कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो >>> Lol
>>>ती खिलज्यांची फॅमिली ट्रेट दाखवली आहे>>> वा वा. याला म्हणतात सिनेमॅटिक व्हिजन! यावेगाने रुपकपण समजणार तुला बघ! Lol
मी काम करताना माझ्या खुर्चीत झोपतो तसे राजेरजवाडेपण झोपत. इतकंच रुपक मला जाणवलं. Wink

आणि सुरूवातीच्या शिकार सीन बद्दल आधी चर्चा झाली आहे का लक्षात नाही.
पण क्राउचींग टायगर हिडन ड्रॅगन च्या तोडीस तोड दिपीका च्या ग्रॅव्हिटी डिफाय करणार्‍या उड्या आणि अ‍ॅवटार च्या तोडीस तोड असलेलं जंगल आणि प्राणी बघून मी तर जागच्या जागी थिजले Lol
त्यात मग लगेच खिल्जी ने आणलेला शहामृग! भन्साली नी त्याचं तंत्रज्ञान ऐकत नाहीत.

शेवटच्या लढाई च्या वेळचे जडशीळ पोशाख बघून साइनफेल्ड मधला जॉर्ज चा एक एपिसोड आठवला. बेसबॉल खेळणारे प्लेयर्स लई टाईट कपडे घालतात म्हणून त्यांच्या कम्फर्ट करता तो नॅचरल फील चे कॉटन चे युनिफॉर्म्स सजेस्ट करतो तो एपिसोड.
ह्याबाबतीतही तेव्हाचं ज्ञान अगदीच सुमार होतं बहुतेक. चांगले सुटसुटीत कपडे घालून त्यावर चिलखत चढवायचं तर रावळ रतन डिझायनर वेअर मध्ये अडकून पडला. किती वजन नुसतं त्या चिलखताच्या आतल्या सुट चंच असेल ते फक्त त्यालाच ठाऊक!

हो. ते जंगल आवडलं मला. मी बघायला जाईपर्यंत मरकॅडोचे थ्रीडी गॉगल्स शो संपलेले. थ्रीडी मध्ये जंगल भारी दिसलेलं का?

>> ते जंगल आवडलं मला
पण मौका कुठला, दस्तूर कुठला नी हे सीजीआय जंगल कुठलं! मला तरी तो अट्टाहास वाटला.

आमच्या एका टपोरी मित्राला दीपिका आवडते पण भन्साली सिनुमे नाहीत , हा बघितला ३डी आहे म्हणून , आधी आम्हाला विचारलं वर्थ आहे का म्हणून, आम्ह्रे अर्थातच होsssss म्हंटल Proud
दुसर्या दिवशी फ्र्स्ट्रेटेड फोन कॉल, “ साले क्युं भेजा यार ३ डी पद्मावती देखने, सोचा था दीपिका पाससे दिखेगी लेकिन पास सिर्फ शतुर्मुर्ग आगया यार, बाकी बस नौटंकी जैसा फील आया “ ( दिल्ली अ‍ॅक्सेंट मधे करा इमॅजिन ! )

थ्रीडी मध्ये जंगल भारी दिसलेलं का << जंगल एकदम भारी दिसतं पण पिक्चर २ डी मधेच चांगला दिसला असता अस मला तरी वाटलेल. ३ डी च नक्की काय टेक्निक असत माहीत नाही पण जे मल्टीपल लेअर्स असतात त्यात प्रपोर्शन बरोबर वाटत नाही. जंगलात ते चालुन जातं.

खिल्जी ने आणलेला शहामृग >>> ते शहामृग पण "कधीनवद मिळालाय रोल तर घ्या ओव्हरअ‍ॅक्टींग करून" करत एंट्री मारत. शहामृगावर अजून फक्त ५ मिनीटे कॅमेरा ठेवला असता तर विद्या बालनची सिल्क स्मिता अंगात संचारल्यागत त्याने नाकमुका डान्स केला असता.

विद्या बालनची सिल्क स्मिता अंगात संचारल्यागत त्याने नाकमुका डान्स केला असता.
<
कोणी शहामृगाने का ?
Btw, मुळ कथेतल्या पद्मावतीच्या पोपटावर कट मारून भन्सालीने मेहरुन्निसेला शहामृग द्यायचे ठरवले कारण पोपटापेक्षा भन्सालीला मोर, शहस्मृग असे भव्यं रॉयल पक्षी आवडत असणार Proud

कमेंट भयंकर आहेत.
मला खिलजी सिंहासन बैठकीवरुन परत प्रेम रतन धन पायो मधला अंतर्वक्र सोफा आठवला. Happy

Pages