पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच ताजा ताजा थेटर मधून बाहेर आलो,
पकाव पिक्चर आहे.
मला स्टोरी माहीत होती म्हणून इंटरेस्ट कमी होता म्हणू शकता एक वेळ, पण काहीही स्टोरी माहीत नसलेली बायको पण थोड्या वेळाने हताश झाली.

सेट्स , दागिने आणि कपडेपट नो दाऊट भव्य आहे, पण डिटेलिंग कडे कमी लक्ष दिलेय.

यापुढे स्पॉईलर अलर्ट,

एकतर शत्रूसीमेपर्यंत घेईपर्यंत याना पत्ता लागत नाही, पहिल्या वेळेस नाहींतर दुसऱ्या वेळेस सुद्धा,

तो राघव , यांच्या अत:पुरापर्यंत पोचतो.यांच्या महालाबाहेर पहारे नसतात का? बाजीराव मध्येपण मस्तानी अशीच बाजीरावाच्या शयनगृहात घुसलेली.
राघव खिलजी ला मिळाला हे रतनसिंग ला थेट कैद झाल्यावर कळते,
खिलजी चितोड च्या दारावर उभा ठाकल्यावर चितोड इतर राजांबरोबर आघाडी करायचा प्रयत्न करते,
हेर खाते नावाचा प्रकार अस्तित्वात नसावा तेव्हा बहुतेक.

नॉर्मली किल्ल्याबाहेर शहर असते, आणि त्यातली fortified जागा म्हणजे किल्ला, पण इकडे किल्ला आणि आजूबाजूला मैलो गणती पसरलेले वाळवंट.

भांडरात धान्य कमी आहे ही बातमी सेनापती राजाला होळी खेळायला लोक जमले असताना सांगतो, आणि राज त्याला सांगतो ही गोष्ट अजून कोणाला साहू नकोस, मी राणी बरोबर होळी खेळून येतो ( खरेतर रंग उधळून येतो असे हवे होते तिकडे) अरे काय चाललंय काय??

पहिल्या प्रसंगात खिलजी देवगिरीच्या राजकन्ये बरोबर दिसतो, (ही राजकन्या खरंच देखणी आहे btw) हिच्या हातात पेटलेले पालिते आहेत, खिलजी अंगचटिला येतो , उचलून घेतो तरी बाई शांत, दुसरी असायची तर त्या पालित्याने पेटवले त्याला.

चितोड उदयपूर जवळ, रतनसिंग दिल्ली मध्ये, पद्मिनी 800 सैनिक घेऊन दिल्ली ला जाते,खिलजी च्या राजधानीतून 800 सैनिक घेऊन लढाई करून उदयपूर पर्यंत मजल मारायचा त्यांचा exit प्लॅन काय?
मेहरूंनीसा मदत करेल हे काय आधीपासून माहीत होते का?
तिने दाखवलेल्या भुयारातून पायी पायी हे निघतात, अल्लादिन ला त्यांना इंटरसेप्त करायची कुठलीच संधी मिळत नाही??

आदल्या दिवशी मारें पद्मिनी सांगते ते नमाज पढत असतील तेव्हा बेसावध असतील,
इकडे दुसऱ्या दिवशी पद्मिनी बंदीगृह, बंदीगृहातून रत्नसिंग अल्लादिन च्या दरबारात जातो, परत येतो तरी यांचा नमाज चालूच असतो,
अरे नमाज आहे की मजा?

परत आल्यावर पण थेट किल्ल्यात पोचल्यावर त्याच्या पहिल्या पत्नीला खबर मिळते, त्या आधी काही पत्ता नसतो.

शेवटच्या लढाईत खिलजी किल्ल्यात आणि बायकांची जौहार ची रेस हा उगाच खेचलेला क्लायमॅक्स आहे.
मात्र मामी म्हणतात तसे संगीत विसंवादी वाटले नाही,
पिक्चर खटकत संपवलेला वाटतो या बद्दल सहमत.

या छोट्या छोट्या गोष्टींमुळे पिक्चर बाहुबली किंवा चांदोबातील गोष्ट याच लेव्हल ला येतो.

आणि हे शेवटचे,
जौहार कुंडा बाहेरच्या भिंतीवर असंख्य सतीचे हात कोरलेले दाखवले आहेत, वस्तुतः हा इतिहासातील पहिलाच जौहर होता.
इतक्या मोठ्या प्रमाणावर बायका त्या कुंडात त्या आधी सति जाण्याचे कारण नव्हते. तरीही तिकडे त्याची केलेली नोंद खटकली

पाहिला. छान वाटला.

इथले सर्वांचे परिक्षण आवडले.
दुसरी असायची तर त्या पालित्याने पेटवले त्याला.>>मलाही तेच वाटले.
एकतर शत्रूसीमेपर्यंत घेईपर्यंत याना पत्ता लागत नाही, पहिल्या वेळेस नाहींतर दुसऱ्या वेळेस सुद्धा,>>>हेर खाते नावाचा प्रकार अस्तित्वात नसावा तेव्हा बहुतेक.>>>+१११
तिन्ही प्रसंगात, सुई-दोरा एकदम व्यवस्थित दिसेल याची कॅमेराचे योग्य अँगल लावत संलीभ ने तजवीज केलेली दिसते>>त्याच्या जवळ जवळ सगळ्याच चित्रपटात सुई-दोरा पाहिल्याचे आठवते Happy
दिपीकाचे सतत डबडबलेले डोळे बघून तिला डोळ्यांच्या मेकपचा त्रास होत असावा असे वाटले.
जौहार करायला सुद्धा नवर्‍याची परवानगी घेतली जायची हे माहिती नव्हते.

आणि ते खिलजी च्या तंबूतून इतके सारे सैनिक राजाला घोड्यावरून गेले नी बाहेर असलेल्या सैनिकांना कळलेच नाही, ते पण आहेच की रहस्य.

दिपीकाचे सतत डबडबलेले डोळे बघून तिला डोळ्यांच्या मेकपचा त्रास होत असावा असे वाटले. >> +1

तिन्ही प्रसंगात, सुई-दोरा एकदम व्यवस्थित दिसेल याची कॅमेराचे योग्य अँगल लावत संलीभ ने तजवीज केलेली दिसते>>त्याच्या जवळ जवळ सगळ्याच चित्रपटात सुई-दोरा पाहिल्याचे आठवते
>>>>>>>>>>>>

ओरीजिनल आयड्या मोहोब्बतेची आहे... ऐश्वर्या दाखवलीय त्यात.. शाहरूखच्या आठवणीत.. सुईत दोरा ओवताना..

आत्ताच बघितला.
३ डी मधे. ३ड प्रकार मला आवडत नाही. प्रपोर्शन मधे गंडतो अस मला वाटतं. २ड बघितला असता तर बर झाल असत अस वाटल. पण ऑपशन नव्हतं.
रण्बीर हापर असल्यामुळे ह्यात तर एक्स्ट्रिम करणार अस डोक्यात ठेउन चित्रपट बघितला, पण तितका जास्त वाटला नाही म्हणुन आवडला.
दिपीका ला रिसीव्ह करतांना खुप संदर आहेस अस म्हणतांनाच्या शॉट मधे अदिति खुप सुंदर दिसते.
शहिद मला नेहमीच आवडतो. ह्यात ही आवडला पण (बहुतेक ३ड मुळे) एकदम बारकासा वाटला.
जय भवानी अस आपले शिवाजी महाराज आणि मावळे म्हणायचेत. चित्तोड वाले पण म्हणतील अस वाटल नव्हतं.
चित्रपटात मात्र सगळ्यांना प्रेसेन्ट पेक्श्या "ईतिहासाची" जास्त काळजी होती.
एकुणात चित्रपट आवडलाप ण आणि नाही पण आवडला Happy

युट्यूब वर मेकिंग ऑफ ज्वेलरी व कॉ स्चुम्स ऑफ पद्मावत असे दोन व्हिडीओ आले आहेत. जरूर बघा.

१५०० पीसेस ऑफ ज्वेलरी बनवले. संशोधन करून व त्याकाळच्या सारखे खडे वापरून. म्हणजे अनकट व कुंदन.
डोक्यावर बोरला, हाथ फूल, पग फूल, हर प्रकारचे कंगन गळ्यातला मोठा नेकलेस व तीन झुमक्यांचे कानातले हा सेट फारच भारी आहे त्या नेकलेसचे वजन २५० ग्राम आहे. पाच देवतांची चित्रे आहेत बारक्या बांगड्यात बसवल्यासारखी व त्याला खाली डेकोरेशन्स, आणि वर बसरा पर्ल्स स्टोन्स हे काम आहे. मी हा पीस माझ्या खडे मण्यामधून बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
पायल नॉर्मली फार साधे असतात पण तीन अनकट खड्यांचे रोज व खाली एमराल्ड खडे असे मस्त पायल आहेत जे तुम्ही चोकर म्हणूनही वापरू शकता.

ती नाकात एक रिंग घालते त्याला सेप्टम रिंग म्हणतात ही पण छान आहे. तनिश्क मध्ये हे उपलब्ध असतील

कपड्यांवरही फार काम करून घेतले आहे. मुलांचे कपडे अंगरखे देखील ब्लॉक प्रिंटींग व व्हेजिटेबल डाइज वापर लेले आहेत. दोन्ही डिझायनर्स ना विश्वास वाटतो आहे की हे कपडे दागिने ब्रायडल क्लोथिंग मार्केट मध्ये नव्या ट्रेंड सुरू करतील. कदाचित तसे होईलही पण त्याचे डीपर मीनिन्ग व मग परिणाम ह्यावर दोन मिनिट विचार केला तर
मी कपडे दागिने ह्यांचे कौतूक नक्की करेन पण नववधू साठी घेणार नाही.

जितके फोटो पाहिले त्यात पद्मावतीचे (आणि एकंदरच राजस्थानी) दागिने प्रचंड जड वाटले कॅरी करायला.
अगदी ब्रायडल साठी ट्रेंड आला तरी आयुष्यात एकाच दिवशी घालता येतील असे दागिने.
(अवांतरः घुमर गाणे आणि त्याने इन्स्पायर्ड अमेरिकन परफॉर्मन्सेस पाहिले. मला ते गाणे सूर आणि डान्स दोन्हीने खास वाटले नाही. खरं तर इतका बूम होण्याचे पोटेन्शियल नगाडे संग ढोल मध्ये होते.गाणे ऐकायला मस्त आणि कोरीओग्राफी पण छान.)

सेप्टम रिंग गुगल करुन पाहून असंभव मधली भूतीण्/व्हिलनीण आठवली. ती घालायची सेप्टम रिंग तिच्या भूतावतारामध्ये
(कोणी तिचे सिरियल मध्ये भूत आणि करंट नॉन भूत जन्मातले नाव आठवून सांगेल का?)
आम्ही त्या काळी जोक्स मारायचो की ती शुभ्रा चे व्ही एन सी घेते(रिमोट डेस्कटॉप सारखे, एका पीसी वरुन दुसरा पीसी अ‍ॅक्सेस करणे)

ओह हां!! मला विशाखा आठवत होते सारखे.
काय जबरा दिसायची ती भुतावतारात. मला तो शेवटी तिचा आत्मा रिप्रेझंट करणारा पुतळा पण आवडायचा.(आता विषयांतर थांबवते.सेप्टम रिंग वरुन मन भरकटले.)

जय भवानी अस आपले शिवाजी महाराज आणि मावळे म्हणायचेत. ---- शिवाजी महाराज मेवाडच्या राजघराण्याचे वंशज आहेत असं कोल्हापूर च्या राजवाड्यात जी फ्रेम केलेली वंशावळ आहे ती सांगते. मालोजीचे वडील अर्जुनसिंग म्हणून होते. भोसले हे आडनाव बहुतेक भोसावत / भुसावत (?) चा अपभ्रंश आहे - असे गुगल / विकिपीडिया मध्ये आहे.

मिरझाराजे जयसिंग (आग्रा कैद फेम) हे शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते हे तर इतिहास च्या पुस्तकात पण लिहिलेले आहे.

जित के फोटो पाहिले त्यात पद्मावतीचे (आणि एकंदरच राजस्थानी) दागिने प्रचंड जड वाटले कॅरी करायला.>> हे सुद्धा
पुरुष प्रधान व्यवस्थेचेच एक गोंडस रूप आहे. बायकांनी नटायचे का तर पुरुषांचे लक्ष वेधायला. त्यांची ओन्ड स्त्री सुरेख व हेवा करणीय दिसली पाहिजे. इतर पुरुषांना जेलसी व ईर्षा वाटली पाहिजेच. असे त्या ज्वेलरी साठी पैसे देणार्‍या पुरूशाचे कॅलक्युलेशन असते. सुरेख दिसते व पैसे आहेत म्हणून स्त्रीला सोन्याने दागिन्यांनी मढवून टाकायचे. ह्यात स्त्रीचे हालचाल स्वातंत्र्य कमी करून तिला जखडून टाकायचे हेच असते. ( गोल्डन डॉग बेल्ट)
इतके दागिने व जड घागरे घालून तिला महालाच्या बाएर जाता येत नाही. गडाखाली तर सोडाच. ह्याचाच परि णाम स्वरूप विधवेला विद्रूपच करायचे. शी इज अनक्लेम्ड गूड्स. सुंदर दिसली तर व्यवस्थेत डेव्हिएशन येते. एखाद्या अ‍ॅटॅच्ड पुरुषाला मोह पडू शकतो.

सिंहला मध्ये कशी ती चपळ्तेने इथे तिथे फिरते शिकार करते ते सर्व मेवाड मध्ये बंद. आणि ह्या राजाला एक नव्हेतर चौदा राण्या होत्या असे काल वाचनात आले. सो देअर. एकपत्नि रामाचा आदर्श कुठे जातो अश्या वेळी?

स्त्रियांच्या पायात पैंजण घालतात ते देखील ती कुठे आहे ते घरच्य मालकाला पेढीवर बसल्याबसल्या कळावे म्हणून.
चीन मध्ये उच्च वर्गातील स्त्रियांचे पाय इतके बुटात जखडून टाकत की ते पार डिफॉर्म होत व तिला आधाराशिवाय उभे राहणे चालणे हे ही शक्य नव्हते. आनि त्याचे च तिला ग्रेट वाटायचे की किती ती उच्च व्र्णीय व तिला कायम आधाराला दासी लागते!!!

ते हाताचे ठसे आधीच कोरून ठे वले आहेत बांधतानाच/ किल्ला बांधतानाच जौहर कुंड रचले व बांधले गेले आहे.
सेल्फ इन्फ्लि क्टेड जिनोसाइड साठी. इन फ्युचर कधी वेळ आलीच तर धिस इज द वे टू जौहर कुंड प्लीज प्रोसी ड हे कळायला ते हात कोरले आहेत. नथिंग ग्लोरिफाइड अबाउट इट.

पॅट्रार्की :वन विमेन्स राइट टु लिव्ह : झीरो.

शिवाजी महाराजांनी ती सिसोदिया घराण्याशी जी वंशवेल जोडून आणली ती मला व्यक्तिशः अजिबात आवडलेली नाही. त्यावेळेची गरज होती म्हणून ठिक आहे. पण कचखाऊ लाळघोट्या गुलाम राजपूत घराण्यांशी महाराजांसारख्या लढवय्या स्वाभिमानी बहाद्दराने नातं सांगावं हे फार म्हणजे फार खटकतं. राजपूतांचा कोणताही पळपुटा गुण महाराजांनी कधीच दाखवला नाही. महाराज व त्यानंतरची मराठेशाही एकमेवाद्वितिय आहेत.

शिवाजी महाराज समजायचे असतील तर नरहर कुरुंदकरांना वाचावे. फार छान विष्लेषण केले आहे. - अवांतर. विषय निघालाच म्हणुन

अमा
पद्मावत आवडला कि नाही , दागिने आवडले कि नाही कळलं नाही.
आवडला नाही असं वाटलं होतं एकंदरीत पण दुसर्यांदा पाहिल्याचं आलय पुढच्या पोस्टीत .
दागिने आवडले असं वाटलं तेवढ्यात दुसरी पोस्ट आली Happy
पण तो तुमचा दागिन्यांच्या हेतुचा मुद्दा बरोबर आहे, हाय हिल्स बद्दल पण असच वाचलय.
मराठी दागिन्यांबद्दल म.वि. सोहनींच्या पुस्तकात छान माहिती आहे, मालकी हक्कं सांगणारे दागिने(त्यात मेन दागिना नथ, नथ शब्दाचा अर्थ प्राकृत मधून आलाय ज्याचा अर्थच बैलाच्या नाकातली वेसण असा होतो) मुघल आणि इतर आक्रमणांनी बदललेले दागिने , मंगळसूत्रं मुळात आपला पारंपारीक दागिना नसणे इ.बरीच इंटरेस्टींग माहिती आहे.
बाकी सिनेमातले दागिने सुंदर आहेत, व्हिडिओ पाहिला.
तो ५ देवता असलेला स्टेट्स्मेंट नेकलेस म्हणून प्लेन ब्लॅक ड्रेस वर, सिंपल फिटेड प्लेन स्पॅगेटी टॉप वर छान दिसेल.

दीपांजली, सोहोनींच्या पुस्तकाचं नाव काय आहे? वाचायला आवडेल असं वाटतंय.
असं म्हणतात ना की नथ माहेरुन आणावी ते अशा समजुतीनुसार असणार की सासरची नथ म्हणजे वेसण!

दागिने आवडले कि नाही>> दागिने सुरेखच आहेत. वर्क ऑफ आर्टच. आणि ती डिझायनर व कपडे डिझाइन करणा रे किती इन्वॉल्व्ह होउन सांगत आहेत. बिच्यारे वी वील स्टार्ट अ न्यू ट्रेंड इन द ब्रायडल स्पेस वगैरे सांगत आहेत.
कन्सिडरिंग वॉट हॅपन्ड टू धिस पर्टिक्युलर वन... डिरेक्टरला व्हिजन लागते ती ह्यामुळेच नाहीतर कॉस्च्युम ड्रामा बनतो.

नथ आणि कानांच्या दागिन्यांविषयी मीही असेच वाचले आहे. पूर्वी या वळ्यासारख्या नथणीला साखळ्या असायच्या. कानांतल्यांनाही साखळ्या असायच्या. शेकडो वर्षांपूर्वी म्हणे या साखळ्या खूपच लांब आणि मजबूत असत. तांड्यातून चालताना बायकामुले सर्वात मागे असत आणि त्या साखळ्यांची टोके पुढे चालणाऱ्या पुरुषांच्या हातांत असत. या विषयी अधिक संदर्भ मात्र वाचनात आले नाहीत. त्यामुळे सत्यता पडताळता आली नाही.

त्या आईस स्केटिंग वालीच व्हिडिओ पण पाहिला.डान्स सुंदरच केलाय.
कपडे शॉर्ट हा स्केट चा स्टँडर्ड पोशाख आणि तिचा चॉइस म्हणून सोडून देऊ.पण त्या कॉस्च्युम चा ब्राईट लाल भडक रंग आणि पिवळ्याकडे झुकणारी जर डोळ्यात रुतली.
ओरिजिनल पद्मावती कॉस्च्युम हा डार्क रेड्/मरुन वर जरी/कुंदन काम आहे तो इतका डोळ्यात रुतत नाही.
एकंदरच मनाला लाल भडक साड्या आणि सोनेरी जर यांचा सोप ऑपेरा आणि हिंदी पिक्चर मुळे अतिरेक झाला असावा.

मला एक असं लक्षात आलं की लास्ट सिन मधे दिपिकाचा घागरा चोली लाल रंगाचा आहे. आणि जेव्हा ती जोहरसाठी पाठमोरी चालताना दाखवलीये.. राणी कलरची ओढणी दिसते... कोणाला जाणवला हा फरक ?

मला एक असं लक्षात आलं की लास्ट सिन मधे दिपिकाचा घागरा चोली लाल रंगाचा आहे. आणि जेव्हा ती जोहरसाठी पाठमोरी चालताना दाखवलीये.. राणी कलरची ओढणी दिसते... कोणाला जाणवला हा फरक ?>>>हो मला पण राणी कलरची ओढणी पाहिल्याचे आठवते आहे

येस मलापण. पण लाल/गुलाबी रंगाच्या ईतक्या शेड्स होत्या की कदाचित राणी कलरच आधी घातला असेल असे वाटले.

मला एक असं लक्षात आलं की लास्ट सिन मधे दिपिकाचा घागरा चोली लाल रंगाचा आहे. आणि जेव्हा ती जोहरसाठी पाठमोरी चालताना दाखवलीये.. राणी कलरची ओढणी दिसते... कोणाला जाणवला हा फरक ?>> +१

आज पाहिला.. बोर झाला मला..
खुप खुप सारे पिच्चर ढापाढापी झाली हे ठळक दिसुन आलं..
हे सारेच्या सारे सतत डॉळ्यात पाणि घेऊन का वावरलेय.. अन किती त्या क्लोजअप मधे ठळक दिसलय सारं..
खिलजी क्रुर कमी आणि विक्रुत जास्त वाटला मला... आवाजही कधी कधी चिरका..
मेवाडचे राजाराणी सतत ते पण असं मधेमधे का बोलतात?
उर्दू कमी हिंदी जास्त वाटली.. आणि राणी पद्मावती जर श्रीलंकेची होती तर तिने सिंहली भाषा बोलायला हवी ना? (हकुना मटाटा Biggrin )
ती आल्यानंतर बडी राणीसासोबत तिचं वागणं फार रुड आणि अहंकारी वाटल..
शेवट तर निव्वळ वाया घालवलाय..
गफुर आवडला..रणवीर ठिक, शाहिदही आवडला अन आदिती राव पन.. दिपीकाने मात्र कचरा केलाय..श्या...
असो.. पडद्यावर घुमर ठिक पण खली वली जास्त आवडलं.. स्पेशली रणवीरची एनर्जी त्यात..

वाट लागलीचा डान्स अन खली वलीचे बीट जास्त जुळतात..
खालच्या कमेंट्स वाचल्या का कोणी?
का इतका राग आणि तिटकारा आहे लोकांमधे कळेना धर्माबद्दल.. कुठेही सुरु होऊन जातात...

लोक वेडे आहेत. एकाच अ‍ॅक्टरने दोन्ही रोल काय जबरदस्त निभावलेत ते न बघता एकमेकांचे गालगुच्चे घेत बसलेत. जणू एक काँग्रेसचा आणी दुसरा भाजपाचा, जणू एक शिवसेनेचा आणी दुसरा राष्ट्रवादीचा अशी लढाई चाललीय.

Pages