Submitted by अनन्त्_यात्री on 28 September, 2017 - 06:54
एकदा एका मैफलीत कुमार गंधर्वांनी गात असलेल्या रागात अचानक वर्ज्य सूर लावला. मात्र मैफल नेहमीप्रमाणे जिंकली. मैफलीनंतर कुणीतरी एका रसिकाने याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की तो सूर केव्हापासून दरवाजातून येऊ का ? असं खुणवत होता, मग मला नाही म्हणवेना .
कदाचित कुमारांची मनस्थिती तेव्हा अशी झाली असावी:
त्या एक स्वराची बिजली
स्पर्शून निसटती गेली.....
ती मैफल मग जमलेली
ती बंदिश मज सुचलेली
....मग माझी उरली नाही
उघडता दार अज्ञात
होऊन अनावर आत
कोसळतो कुठुन प्रपात
हे काय भिने रक्तात
...त्या वेळी कळले नाही
ओथ॑बुन चिद्घन आला
निष्पर्ण वृक्ष सळसळला
डवरून फुलांनी गेला
अवचित मग कळले मजला
..... मी देही असुन विदेही!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओथ॑बुन चिद्घन आला
ओथ॑बुन चिद्घन आला
निष्पर्ण वृक्ष सळसळला
डवरून फुलांनी गेला
अवचित मग कळले मजला
..... मी देही असुन विदेही!!!
सुर्रेखच !!!
सुंदर!!!!!!!
सुंदर!!!!!!!
सुंदर प्रकटीकरण...
सुंदर प्रकटीकरण...
व्वा! सुरेख..
व्वा! सुरेख..
रे, अनंता कोसळतो तुझा
केवढ्यानं हा काव्यप्रपात !
सखी सरस्वती! संगतीनं तू
खेळतोस शब्दांच्या जगतात
व्वा अप्रतिम रचना
व्वा अप्रतिम रचना
राहुल मस्तच रे
जबरदस्त....
जबरदस्त....
राहुलजींच्या मताशी पूर्ण सहमत....
मेघा., शिवाजी, अक्षय आपल्या
मेघा., शिवाजी, अक्षय आपल्या प्रतिसादांबद्दल आभार!
राहुल, कवितेला कवितेतून
राहुल, कवितेला कवितेतून मिळणारी दाद ही खरी दाद! धन्यवाद!!