वर्षा विहार २०१७: फक्त १७ जणच का ?

Submitted by केदार जाधव on 31 July, 2017 - 01:05

मित्रानो ,

काल मायबोलीचा २०१७ चा ववि पार पडला . माझी ३.२ वर्षाची ओवी धरून ( तिचा हा तिसरा ववि) अवघे १७ लोक होते. मुंबईहून ८ अन पुण्याहून ९.
अर्थात या १७ जणानी धमाल केली , नवे जुने मित्र भेटले , ओवीने अगदी दंगा घातलाही.
पण मला पडलेला प्रश्न होता की १७ च का ? संयोजक सोडून तर फक्त ६ लोक ?

१. गेल्यावेळी साधारण १२० लोक होते
२. गेल्या वविला काही मोठे प्रॉब्लेम झाल्याचही आठवत नाही
३. संयोजक अन त्यांचे प्रयत्नही तितकेच .

मग नक्की झाल तरी काय ? काही संयोजकांशी मी चर्चा केली , पण त्यांची उत्तरे फारशी पटली नाहीत .
सगळ्यांचे स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतीलही , ते नेहमी भेटत असतीलही , पण वविचा युएसपी नविन लोकाना भेटणे हा होता , ते वविला कसे रिप्लेस करू शकेल ?
आणि २०११ मधले ७०० अन २०१७ मधले ११०० रू एकच ना ?
अन गेल्या वेळच्या सगळ्या १२० लोकाना असे Unavoidable Issues असतील की Priorities बदलल्या आहेत ? नवीन कुणीच नाही ?

मनात आल तस लिहित गेलोय . कदाचित थोड्या वेळाने वेगळे विचार येतीलही , पण थोड अस्वस्थ वाटल इतकच .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण फक्त रूनमेश आणि सिंथेटिक जिनियस च्या धाग्यांमुळे माबो वर येतो...>> मला त्यांच्याचमुळे विट आलाय माबोचा Proud Lol आवड आपली आपली आणखी काय ..
धाग्याचा विषय सोडून लिहिल्याबद्दल क्षमस्व..

मला त्यांच्याचमुळे विट आलाय माबोचा Proud Lol आवड आपली आपली आणखी काय . >> टिने इथे तुला सेम पिंच..
सिंजी एकवेळ परवडले...

दक्षि,
तू , साधना अन बहुतेक रीयापन माझ्याच गटात असेल हे माहिती होतं मला.. समदु:खी आपण.

कंटाळा आलाय बाकी राजकारणी चिखलफेकीचा...
Submitted by च्रप्स on 10 August, 2017 - 03:35

>>> असे होत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ चर्चा ह्या तुल्यबळ होत असून कोणत्याही बाजुचे पारडे जड नाही. तसेच ज्यांनी आपल्या भूमिका ठरवून घेतल्यात त्यांना आता त्या चर्चेत रस नाही, ज्यांच्या भूमिका ठरल्या नसतील त्यांनाही कंटाळा आला असेल तर तेही उत्तमच आहे. येनकेनप्रकारेन बॅलन्स राहतोय ये महत्त्वाचे हय

मी पण फक्त रूनमेश आणि सिंथेटिक जिनियस च्या धाग्यांमुळे माबो वर येतो...>> मला त्यांच्याचमुळे विट आलाय माबोचा Proud Lol आवड आपली आपली आणखी काय ..
धाग्याचा विषय सोडून लिहिल्याबद्दल क्षमस्व..
+९९९९९९९९९९९९९^९९९९९९९९९

वेळ बदलते, वय वाढते तशा प्रायॉरिटिज ही बदलतात ही गोष्ट सत्य आहे पण त्यातूनही ज्यांना खरंच मराठी आणि मायबोली बद्दल प्रेम होते ते प्रेम अजूनही आहेच. शिवाय माबो ने जो गोतावळा जमवून दिला तो सगळे जतन करत आहेत.
मायबोली ने मला काय दिलं ते शब्दात व्यक्त करणं कठिण आहे.<<< दक्षे एकदम मनातले लिहले आहेस.

वेळ बदलते, वय वाढते तशा प्रायॉरिटिज ही बदलतात ही गोष्ट सत्य आहे पण त्यातूनही ज्यांना खरंच मराठी आणि मायबोली बद्दल प्रेम होते ते प्रेम अजूनही आहेच. शिवाय माबो ने जो गोतावळा जमवून दिला तो सगळे जतन करत आहेत.
मायबोली ने मला काय दिलं ते शब्दात व्यक्त करणं कठिण आहे.<<<१००००००% मनातलं.

पतंग उडवतांना जेव्हा तो आकाशात उंच असतो तेव्हा हातातला मांजा ताणलेला असतो तो ढील पडू लागला की कळते वारा पडू लागला आहे.

१. जेव्हा मी माबोवर नविन होते तेव्हा जो ग्रुप अ‍ॅक्टिव्ह होता त्यात (दिनेश, आरती, बॉम्बे वायकिंग, अंतुबर्वा, सत्या, डॅफो आणि इतर अनेक लोक होते. तेव्हा व्हॉटसप किंवा फेसबूक नव्हते, माबो हा एकच प्लॅटफॉर्म होता सर्वांना एकत्र यायला.

Thanx a ton dakshina... After so many years I am glad to know that i am still part of memories.... one reason ( and probably the most important ) for such incident is that Life has changed and so priorities. God bless us.

Could have share it in marathi ( but now zakki is less seen here )

Pages