वेडा पाऊस अंगणी

Submitted by कायानीव on 29 July, 2017 - 06:09

वेडा पाऊस अंगणी
मला चिंब भिजवतो
थेंब थेंब आभाळाचा
भाळ माझं सजवतो

वेडा पाऊस अंगणी
धुंद मला बनवतो
ओढ त्याला जमिनीची
उगा मला मध्ये घेतो

वेडा पाऊस अंगणी
तुझा स्पर्श आठवतो
माझ्या तनुचा रोमांच
वेडा पाऊस लाजतो

वेडा पाऊस अंगणी
गंधाळली ओली माती
तिचा होकार मिळता
कोसळतो भेटीसाठी

वेडा पाऊस अंगणी
झरे निर्मोही हा योगी
बीज धरतीचे पोटी
जाई गाभाळून भोगी

© मनीष पटवर्धन
मो. +९१९८२२३२५५८१

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

छान !

छान!