माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
नारळ्याच्या वडीसाठी एकदम
नारळ्याच्या वडीसाठी एकदम सोपी, हमखास जमणारी रेसिपी : १ वाटी खवलेला नारळ + १ वाटी साखर + १ वाटी दुध, एका भाड्यांत मध्यम आचेवर ठेवायचं. मधुन मधुन हलवत रहायचं, चांगलं गोळा होण्याएवढं आटलं म्हणजे वेलदोडा पुड घालुन मिसळुन घ्यायच मग तुप लावलेल्या ताटात पसरवुन वरुन चारोळी घालुन वड्या पाडायच्या. नक्की जमते आणि चव सुरेख.
कढईच्या कडेला साखर सुटु लागली
कढईच्या कडेला साखर सुटु लागली की मगच वड्या थापायच्या.
कढईच्या कडेला साखर सुटु लागली
कढईच्या कडेला साखर सुटु लागली की मगच वड्या थापायच्या.>>> थापायच्या वाचल आणि शिंडीबाय काश्टा नेसुन थापताना डोळ्यासमोर आली.
तू कधी पाहिलस मला तसं
तू कधी पाहिलस मला तसं
धन्यवाद प्रीती, पण मला सुक्या
धन्यवाद प्रीती, पण मला सुक्या किसाची रेसिपी हवी आहे.घरी खूप पडला आहे म्हणून वड्या कराव्याशा वाटल्या...
स्नेहा, सुक्या किसाचं करंजीला
स्नेहा, सुक्या किसाचं करंजीला सारण करतो तसं करून संपवू शकतेस. कुकीज, बिस्कीटं, नानकटाई मधे वापरू शकतेस.
लसणाची चटणी, तीळाची चटणी,
लसणाची चटणी, तीळाची चटणी, कारळ्याची चटणी, कांदा खोबरे मसाला, शिराळ्याच्या सालाची चटणी, पुलाव मसाला मधे सुका किस वापरता येतो.
नुसता सुका किस तव्यावर
नुसता सुका किस तव्यावर भाजायचा, गुलाबी होईपर्यंत. आवडेल तितका (शक्यतो भरपूर) लसूण थोड्याशा तेलात खरपूस करुन, सुक्या मिरच्या पण तशाच खरपूस करुन घ्यायच्या. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि एकत्र सगळे मीठ घालून वाटायचे. छान कोरडी चटणी तयार होते.
स्नेहा, इथे पहा
स्नेहा, इथे पहा http://www.maayboli.com/node/10848
यात ओल्या नारळा ऐवजी मी सुखा किस घलुन करते. किस थोडावेळ दुधात (मापातल्या १ कप दुधात) भिजत घालायचा आणि वापरायचा. वडी तितकीच मस्त होते. करुन बघ
सगळ्यांना धन्यवाद्.लाजो, मला
सगळ्यांना धन्यवाद्.लाजो, मला ही रेसिपी बघता येत नाही
स्नेहा१ तुम्ही "आहारसास्त्र
स्नेहा१
तुम्ही "आहारसास्त्र आणि पाककृती" ग्रूपचे सदस्यत्व घ्या घेतले नसेल तर म्हणजे या गटातल्या सगळ्या कृती दिसतील.
मी काल रसमलई केली ... कुकर
मी काल रसमलई केली ... कुकर मधे.. पण रसगुल्ले खुप कडक झाले.. आणि .. कुनी सांगु शकेल काय चुकले हे
पाक कडक झाला ( पाणी कमी पडले
पाक कडक झाला ( पाणी कमी पडले ) किंवा पनीरमधे मैदा वगैरे जास्त पडला असेल. आता रसमलाई चे पण इन्ष्टंट मिक्स मिळते.
पनीरमधे मैदा वगैरे जास्त पडला
पनीरमधे मैदा वगैरे जास्त पडला असेल
मी मैदा अजीबात घातला नव्हता
पाक कडक झाला ( पाणी कमी पडले ) : २ वाट्या पाणी आणि १ वाटी साखर आणी केलेले गोळे direct कुकर ला लाउन १ शिटी दिली
पनीर कोरडं होतं का? पनीर तयार
पनीर कोरडं होतं का? पनीर तयार झाल्यावर ५ ते १० मिनिटे कपड्यात टांगुन नंतर छान मळुन घ्यायचे.मग उकळत्या पाण्यात कुकरमध्ये १ शिट्टी करायची.
पनीर २० मिनिटे टांगुन ठेवले
पनीर २० मिनिटे टांगुन ठेवले होते.. पण उकळत्या पाण्यात न टाकता गार पाण्यात टाकले होते .. पुढच्या वेळी उकळत्या पाण्यात टाकुन करेल... धन्यवाद
उद्या संकष्टी सोडायला दोघींना
उद्या संकष्टी सोडायला दोघींना जेवायला बोलावले आहे.गोड म्हणून शिरा करायचा आहे.मला पुण्या मधे लग्नाच्या आदल्या दिवशी काही कार्यालयांमधे कसा शिरा असतो तसा एकदा करायचा आहे.माझा शिरा कधीच तसा छान मऊ होत नाही. चवीला बरा लागतो पण ढेकळे होतात. माझी मामी म्हणते की ते रवा तुपात न भाजता रिफाईंड तेला मधे भाजतात.पण माझे धाडस नाही होत.कितीही तूप घातले तरी तसा शिरा काही जमत नाही.काही टिप्स असतील तर द्या ना पटकन.
माझ्या सासुबाईपण तेलात करतात
माझ्या सासुबाईपण तेलात करतात शिरा.मस्तच होतो.
सायोने 'गोडाचा शिरा' असे
सायोने 'गोडाचा शिरा' असे शिर्षक असलेली क्रुती टाकली आहे इथेच. तिथे इतर बायांनी पण आपापल्या शिर्याच्या कृती लिहिल्यात.
सिंड्रेला, धन्यवाद्.सायो ची
सिंड्रेला, धन्यवाद्.सायो ची 'गोडाचा शिरा' ची लिंक मिळाली.छान वाटतो आहे.रुपा तुझ्या साबा तेलात कसा करतात्?विक्चारून सांग ना जमले तर.
रुपा तुझ्या साबा तेलात कसा
रुपा तुझ्या साबा तेलात कसा करतात्?विचारून सांग ना जमले तर.>><>>>>
अगं,तुपात भाजायच्या ऐवजी तेलात भाजतात रवा बाकि सगळं सेम
रवा तूपात चांगला भाजून त्यात
रवा तूपात चांगला भाजून त्यात अडीच पट ह्या प्रमाणात उकळतं दूध+पाणी घालून चांगला शिजवून घे. मग साखर घालून नीट ढवळून झाकण घालून बारीक गँसवर ठेव. मग शिरा होत आला की कडेने त्यात तूप सोड. छान मऊ शिरा होईल.
काल मी बटाट्याच्या फोडी साल
काल मी बटाट्याच्या फोडी साल काढुन कुकरमध्ये झाकण ठेवुन वाफवल्या तर त्या काळपट झाल्या, यात कुठे काही चुकल का? आणी कशा प्रकारे बटाट्याच्या फोडी वाफवता येतील रंग न बदलता? मी कुकरमध्ये खाली पाणी ठेवला होता नेहमीप्रमाणे( बटाटी टेवलेल्या भांड्यात नाही).
अजुन पर्यत मी पनीर वापरुन काही केलेला नाही त्यामूळे तो कसा कधी वापरतात ते माहीत नाही. आज आलु-मटार्-पनीर करायचा बेत आहे तेव्हा पनीर कधी कसा टाकु, म्हण्जे बटाटे, मटार (वाफवुन) तेलात परतवताना टाकु की सगळ्यात शेवटी ग्रेव्ही टाकल्यानंतर?
बटाटा चिरल्यावर त्याचे काप
बटाटा चिरल्यावर त्याचे काप लगेच पाण्यात टाकायचे, म्हणजे काळे होत नाहीत.. तुम्ही उघड्यावर ठेवले असणार.. मी पण असेच करतो... ( हे माहीत असून पण
)
बटाट्याच्या फोडी करुन
बटाट्याच्या फोडी करुन वाफवण्यापेक्षा आख्खे बटाटे तसेच साल न काढता कुकर मध्ये वाफवुन मग फोडी केल्यास असे नाही होणार.
पाणिपूरीची पूरी मऊ पडते. मी
पाणिपूरीची पूरी मऊ पडते.
मी रवा आणि मैदा एकत्र करुन पूरी करते.काय चुकलं असेल? आणि सोडा घालायचा का?
मी काल रात्री ईडलीचे पीठ
मी काल रात्री ईडलीचे पीठ वाटून ठेवले आहे, १ वाटी ऊडीद डाळ + २ वाट्या ईडलीचा रवा असे प्रमाण घेतले आहे. ओव्हन २०० वर प्रिहिट करुन मग पीठ आत ठेवले आहे. आज सकाळपर्यंत तरी थोडेपण फुगले नाहीये आणि ईडल्या आज रात्री करायच्या आहेत. प्लिज कोणी सांगेल का काय करु ते? नेमका आज पाऊस पडणार त्यामुळे थंडी पण आहे बरीच, त्यामुळे पीठ फुगत नाहिये का?
चिकु, कांद्याचा साधारण १/४
चिकु, कांद्याचा साधारण १/४ भाग पिठात घालुन ठेव. संध्याकाळपर्यंत बर्यापैकी फुगेल. ओव्हन अजुन एकदा गरम करायला हरकत नाही.
थन्कु, करुन बघते, पण पीठाला
थन्कु, करुन बघते, पण पीठाला कांद्याचा वास नाही का लागणार?
नाहीतर हॅलापिनो काप मध्ये व
नाहीतर हॅलापिनो काप मध्ये व जरा पेटव गॅसवर व लगेच त्या टोपात वरती अलगद ठेव. झाकन मार. पिठ आलेच पाहिजे.

नाहीतर हात धूवून घे वरवर मग एकाच दिशेने फेटव ते पिठ त्या हाताने. रस्त्यावरच्या इडलीवाल्यासारखे मळकट असतील हात तर उत्तम.
Pages