Submitted by अंतरा on 13 April, 2017 - 07:20
आई अमेरिकेत जाणार आहे ४ महिन्यासाठी. तिची आयुर्वेदिक औषध ( थायरॉईड साठी) कशी पाठवावी ? तिच्या बरोबर की कुरीयर ने ?
औषधां बरोबर prescription /bill ..काय द्यावे लागेल ?.. एकदम ४ महिन्याची पाठवता येतील का? कुठले कुरीयर औषध पाठवते का?
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
औषधे द्रव स्वरूपात आहे की
औषधे द्रव स्वरूपात आहे की कोरड्या गोळ्या/चूर्ण? कोरडे असेल तर सहज हातात (carry on ) घेऊन जाता येतात. बरोबर डॉ. चे इंग्लिश मधे प्रीस्क्रिप्शन (आणि हे कुठल्या आजारासाठी आहे हे त्यावर लिहलेले असावे) काही प्रश्न येत नाही.
द्रव स्वरूपात असेल तर मात्र खूप व्यवस्थीत बांधून , सामानात चेकइन करावे लागेल. कारण चार महिन्याचे औषध असेल तर जितके द्रव पदार्थ हातात बरोबर नेता येतात (carry on ) त्यापेक्षा जास्त होईल.
औषधे प्रिस्क्रिप्शन सकट कॅरी
औषधे प्रिस्क्रिप्शन सकट कॅरी ऑन लगेज मधे नेलेली उत्तम. आमचे आई-बाबा येतात तेव्हा तसेच करत आले आहेत दर वेळी.
यावेळी एक महत्त्वाचे औषध विसरले होते ते. DHL कुरियर ने भारतातून भावाने इकडे (अमेरिकेत) पाठवले. त्यांनी फक्त सोबत ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन - ( इन्ग्रजीतले) मागितले. साधारण ४ हजार रुपये लागले. पण काहीही त्रास न होता औषध इथे घरपोच ५ बिझिनेस डेज मध्ये पोहोचले.
खर्च पहाता एरव्ही हा ऑप्शन वापरण्यात अर्थ नाही पण आमच्यासारखी केस झाली तर ही सोय फार महत्त्वाची वाटली.
द्रव स्वरूपात असेल तर मात्र
द्रव स्वरूपात असेल तर मात्र खूप व्यवस्थीत बांधून , सामानात चेकइन करावे लागेल. >>+१ त्याऔषधा बरोबर्च डॉ. चे इंग्लिश मधे प्रीस्क्रिप्शन (आणि हे कुठल्या आजारासाठी आहे हे त्यावर लिहलेले असावे) ठेवावे. मागच्या प्रवासात माझी चेकइन बॅग कुलुप तोडून तपासून त्यामधे custom check चा फॉर्म ठेऊन दिलेली. त्यामधे माझ्या मुलासाठी लागणारे द्रव स्वरुपातील औषध होते. उतरल्यावर जेव्हा बॅग मिळाली तेव्हा ती चेक केल्याचे कळले.
प्रतिसादां बद्दल धन्यवाद...
प्रतिसादां बद्दल धन्यवाद...
सगळ्या गोळ्याच आहेत.४ महिन्यांची औशधे बरोबर नेली / बॅग्ज मधे ठेवली तर चालतील ? असे विचारले कारण कुरीयरवाले ( DHL,dtdc) म्हणतात की फक्त ३ महिन्यांची औषध पाठवता येतिल..
मी DHL कडे चौकशी केली तेव्हा त्यानी प्रीस्क्रिप्शन बरोबर बिल, लेटर ( ही औषधे मला स्वतः साठी हवी आहेत, विकायला नाही) द्यायला सांगितले आणि ह्यात अमली पदार्थ नाहित ह्यासाठी डीक्लेरेशन...हे द्यायला सांगितले..dtdc कडे चौकशी केली तर त्यानी प्रीस्क्रिप्शन,बिल, आईच्या पासपोर्ट ची झेरॉक्स कॉपी द्यायला सांगितली...बरोबर नेली औषधे तर त्या बरोबर फक्त प्रीस्क्रिप्शन द्यायचे ना?
पिस्क्रिप्शनसोबत बिल असू द्या
पिस्क्रिप्शनसोबत बिल असू द्या.
तसेच अर्ध्या दिवसांचे औषध केबिन बॅगेजमध्ये आणि उर्वरीत चेक्डइन बॅग मध्ये (दोन्ही ठिकाणी पिस्क्रिप्शन बिलाच्या फोटो कॉपी सोबत) अशी विभागणी करा. म्हणजे जर कदाचित दोन्ही पैकी एखादी हरवली तर औषधांसाठी लगेच धावपळ करावी लागणार नाही.
'रस' शब्द शेवटी असलेल्या
'रस' शब्द शेवटी असलेल्या गोळ्यांत पारा ( मर्क्युरि )असतो. ती अलाउड नसतील कदाचित.
काही भस्मांत अँटिमनि,लेड,अर्सेनिकची संयुगे असतात.
काय शिंची कटकट , गड्या गाव
काय शिंची कटकट , गड्या गाव आपुला बरा !
कुरीयर ने पाठवताना अर्थातच
कुरीयर ने पाठवताना अर्थातच सर्व कागदपत्रे लागतात. ( तो कमर्शियल एक्स्पोर्ट नाही, अमली पदार्थ नाही याची
ते खात्री करून घेतात. पण ते फार कठिण नसते, बहुतेक डिक्लरेशन चा फॉर्मॅट त्यांच्याकडे तयार असतो )
पाठवणार्याचा पण आय डी प्रूफ लागतो.
डीचल कडे आहे फॉर्मॅट.. काही
डीचल कडे आहे फॉर्मॅट.. काही औषधे बरोबर घेवून जायचे आणि बाकीची कुरीयरने पाठवेन असा विचार करते आहे.
आणखीन एक शंका आहे. गोळ्यांच्या पॅक वर लेबल असते त्यावर ingredients ची list असणे आवश्यक आहे का?
अंतरा, आई स्वतःच जातेय तर
अंतरा, आई स्वतःच जातेय तर तिच्या सोबत गोळ्यांच्या स्वरूपातली औषधे आणि केबिनमध्ये अलौड असलेल्या प्रमानातली द्रवरूप औषधे आरामात जाऊ शकतात हे वर जाणकारांनी लिहिलेय.
कोणी स्वतः न जाता केवळ कुरिअरने पाठवत असेल तर कुरिअरसाठी वेगळे नियम असावेत जे त्यांनी तुम्हाला सांगितले.
चार महिन्यांसाठी चार पाच किलो औषधे नक्कीच लागणार नाही. आई थोडी औषधे स्वतः बरोबर थोडी चेक इन मध्ये आणि दोन्हीकडे सोबत प्रेसक्रिपशन असे करून नेऊ शकते. त्यासाठी कुरिअरचा खर्च कशाला करता? डॉक्टरना सांगितले तर ते देतील प्रेसक्रिपशन तसे.