नमस्कार मायबोलीकर मंडळी,
मी बरीच वर्षे मायबोलीवर आहे परंतु लिखाण करण्यापेक्षा वाचण्यातच रमते. आज अंधांच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताला सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली. त्या निमित्त चारुदत्त जाधव या व्यक्तिमत्वाचा परिचय माझे पती श्री उदय ठाकूरदेसाई यांनी त्यांच्या वेबसाइट वर लिहिला आहे. तो मायबोलीकरांपुढे ठेवत आहे. प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत !
कमल
----------------------------------------------------------------------
सतत नाविन्याचा ध्यास असणारा, सतत नवी नवी क्षेत्र काबीज करणारा, कुशलतेले आपल्या ध्येयाची पूर्तता करणारा चारूसारखा दुसरा माणूस मी आजवर पाहिला नाही.
चारुचं आजचं यश बघताना मला त्याच्या संगतीत घालवलेल्या जुन्या गोष्टी आठवल्या.
तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर मी चारूबद्दल लिहिलेल्या तीन लेखांतील वरील तीन अवतरण ही चारू वेगवेगळ्या टप्प्यांवर कसा बदलत गेला, नव्या क्षितिजांना कसा सामोरा गेला हे आपल्यासमोर नकळत उलगडवणारी आहेत.
चालू अंध आशियाई स्पर्धेचं त्याने केलेलं नेटकं आयोजन आणि त्यात मिळालेलं यश पाहताना , मी त्याच्याबरोबर २००३ च्या पहिल्या वाहिल्या अंध आशियाई स्पर्धे दरम्यान मुंबईच्या हॉटेल मिरॅडोर मध्ये घालवलेल्या दहा दिवसांचा कालावधी आठवला.
हॉटेल मिरॅडोर च्या ऐका स्वीट मध्ये चारू आणि त्याचा सहाय्यक म्हणून वावरत असताना मला त्याच्या नेतृत्व गुणांचा कस लागलेला तर दिसलाच परंतू वागण्या, बोलाण्या, चालण्यातला त्याचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. हे त्या वेळी प्रत्येकालाच जाणवत होतं. एकाच शब्दात सांगायचं तर चारू 'हिरो' होता त्या काळात . आजही तो हिरोच आहे म्हणा ! त्यावेळी तो जीटील मध्ये होता नंतर तो टीसीएस मध्ये गेला. त्यानंतर चारुने २००६ मध्ये अंधांची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडून दाखवली.. २००९ आणि २०१२ अंधांच्या चेस ऑलिम्पियाडचं देखील चारूने (आणि त्याच्या टीम ने ) उत्कृष्ट आयोजन करून दाखवलं .
काल संपलेल्या अंधांच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या किशन गांगोलीने सुवर्ण, अश्विन मकवानाने रौप्य आणि सौंदर्य प्रधानने कांस्य मिळवत सर्व पदकांची लूट करून, नेत्रदीपक कामगिरी करून, भारताची मान आणि शान क्रीडा जगतात उंचावली.
चारुदत्त जाधव, सर्व पदक विजेते आणि चारुची सहकारी मंडळी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन !
--------------------------उदय ठाकूरदेसाई
टीप : चारूवर मी लिहिलेले दोन लेख तुम्हाला माझ्या uthadesai.com या वेबसाइटवर वाचता येतील. तिसरा आणि महत्वाचा शब्द दिवाळीअंकातला लेख लवकरच अपडेट होईल.
छान लेख !
छान लेख !
चांगली तोंडओळख
चांगली तोंडओळख
Thank you Dinesh and Harpen !
Thank you Dinesh and Harpen !
हा काय लेख? अपूर्ण वाटतो.
हा काय लेख? अपूर्ण वाटतो. नुसती लिंक देऊन भागवले आहे.