सारेगमप - लि'ल चँप्स (झी टीव्ही)

Submitted by गजानन on 8 March, 2017 - 00:41

यंदाचे झीटीव्हीवर चालू झालेले सारेगमप लिटल चँप्स मधले स्पर्धक खूपच दमदार वाटतात. सध्या टॉप १४ ची निवड चालू आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खूप धमाल आणणार असे वाटतेय.

तुम्ही पाहताय की नाही? हिमेसभाय परिक्षक म्हणून आहेत म्हणून सुरुवातीला पाहण्यात उत्साह नव्हता पण आता त्याचे एपिसोड चुकवावेसे वाटत नाहीत.

या स्पर्धेबद्दल इथे चर्चा करू या.

-----------------------------------------------
टॉप १४:
१) राजश्री बाग
२) रिया बिसवास
३) श्रेयन भट्टाचार्य
४) सोनाक्षी कर (सोनाक्षी याआधी सोनीच्या इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये होती.)
५) ध्रुन टिक्कू
६) जस्सू खान मिर
७) युमना अजीन
८) सत्यजित जेना
९) उत्कर्ष वानखेडे
१०) तान्या तिवारी
११) शक्तीस्वरूपा पांडा
१२) शन्मुखप्रिया
१३) सायमन सेवा
१४) अदनान हुसेन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही पाहताय की >>>>हो,मधे मधे पहातो आम्ही....कलर्स वरचा राइसिन्ग स्टार्स पण याच वेळी लागतो ना,म्हणून.... रियॅलिटी शो खूपच आवडतात... सिन्गिग शो तर पहातेच...

परिक्श्क :
१)हिमेश
२)नेहा कक्कर
३)जावेद अली
हे आहेत...
यातले काही स्पर्धक 'द वॉइस इन्डिया' मधे पण आले होते...
छान आहे धागा... Happy

sony idol मधले स्पर्धक मागच्या वेळी फार चांगले होते. मला ओडिशन्स बघायला फार आवडतात.

कावेरी, हो. आम्ही इकडे जाहिरात आली की रायझिंग स्टार्स कडे वळतो. Happy (तिकडे शंकर महादेवन, मोनाली आणि कोण ते सरदारजी आहेत ना?) आपली कार्तिकीही तिथे आहे हे माहीत नव्हते.

निधी, हो. माझेही तसे होते. पण मुलांच्या गाण्यासाठी बघायला लागलो. जावेद अलीची हजेरीही जमेची बाजू आहे. ज्युरींची मोठीच फौज तैनात आहे इथे. ज्युरींमध्ये वैशाली माडे पण आहे का?

कोण ते सरदारजी आहेत ना?>>>अहो,ते दिलजीत पाजी आहेत....
आणि,कार्तिकी आहे त्यात.... टॉप १६मधे सिलेक्ट होउदेत आता...

बर झाल हा धागा काढला...इथे लिहित जाउ आता... Happy
ते indian idol पहायला नाही मिळत...बाकीचे पहाते...
दुसर्या शो मधिल लिहिल तर चालेल ना????

वेळा आणि वार सांगा, रायझिंग स्टार्स आणि लिटल चॅम्प्सचे.
एकदा टिव्ही साफ करुन सुरु करतोच आता.

काका,
१)रायझिंग स्टार्स(colors):- रात्री ९:००वाजता,
२)आणि लिटल चॅम्प्स(Z tv):- सेम टाइम(९ वा.),
३) द वॉइस इन्डिया(& tv):- ९वा.
४)Indian Idol(sony):- रात्री ८:३० वा.
चारही शनी आणि रवी.....पाहू शकता.... Happy

या सर्वांपेक्षा स्टार वरचा "दिल है हिंदूस्तानी" नामक कार्यक्रम फार उजवा ठरत आहे. नुसते गाणे यापेक्षा त्यात वाद्यांचा सुध्दा समावेश आहे.

दिपस्तजी आम्ही स्टार प्लस नाही पहात...
आता पहानार...त्यातले परिक्श्क माहीती आहेत,
१)शेखर
२) शाल्मली
३)बादशहा...

आज रात्री पहा हं...
आणि काय वाटलं,ते इथे लिहा.... Happy
मी रायजिन्ग स्टार्स्,सारेगमप पहाणार.जमल तर मधे मधे द वॉइस पण पाहीन...

टॉप १४:
१) राजश्री बाग
२) रिया बिसवास
३) श्रेयन भट्टाचार्य
४) सोनाक्षी कर
५) ध्रुन टिक्कू
६) जस्सू खान मिर
७) युमना अजीन
८) सत्यजित जेना
९) उत्कर्ष वानखेडे
१०) तान्या तिवारी
११) शक्तीस्वरूपा पांडा
१२) शन्मुखप्रिया
१३) सायमन सेवा
१४) अदनान हुसेन

सोनाक्षी याआधी सोनीच्या इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये होती. त्या पर्वात माझ्या आवडत्या स्पर्धकांपैकी ती एक होती.

अरे वा.. गेले दोन्ही रविवार 'लिटिल champs' आणि 'रायजिंग स्टार्स' वर मनसोक्त उधळले. इन फॅक्ट, नवरा आणि मी एकमेकांच्या उरावर बसलेलो असतो रविवारी.. त्याला 'रायजिंग..' बघायचे असते आणि मला 'सारेगमप..'.

अतिशय थक्क करतील असं गातात लहान मुलं. मी तर हिप्नोटाईझ झाले आहे. मला तान्या तिवारी, सायमन सेवा, अदनान हुसेन आणि ती एक लतादीदींचीच गाणी म्हणते ती खूप आवडते. काल तिने 'इन आखों कि मस्ती कें' म्हटलं ती, आणि अजून एक जिच्या शाळेचा युनिफॉर्मच साडी आहे ती बंगाली मुलगी. Happy तो कोण 5 वर्षाचा छोटा मुलगा आहे त्याला उगाच ठेवले आहे असे वाटते.

संपादनः 'दिल हैं हिंदुस्तानी' बघायचा प्रयत्न केला. पण त्यात मी जरा जास्तच उथळपणा बघितला. फॉरेनर मुली मुद्दाम छोटे कपडे घालून आल्या होत्या, जजेस स्पर्धकांसोबत फ्लर्टींग करतात, शाल्मली काही काही गायकांचं इतकं कौतुक करते कि बस्स.. पण मी जेव्हा जेव्हा तिने असे कौतुक करताना बघितले, ते गायक मला अजिबात डिझर्विंग वाटले नाहीत. किती ओव्हर कौतुक करतेय असं वाटलं. ओव्हरॉल संगीताच्या स्पर्धेपेक्षा उथळपणा बघून कंटाळून बघणे सोडून दिले.

या धाग्यावर मी नेहेमी असणार आता. तान्या चं 'नमक इस्क का' ऐकून रेखा भारद्वाज यांच्या अंगावर पण काटा आला असेल हे नक्की. Happy

जिच्या शाळेचा युनिफॉर्मच साडी आहे ती बंगाली मुलगी <<< ती राजश्री बाग.

लताची गाणी म्हणणारी म्हणजे रिया बिसवास का?
या दोन्ही मुली आणि ध्रून, जस्सू आणि अदनान हे स्पर्धक माझ्या आवडत्या यादीत. रियाच्या शैलीत लताचे 'बेताब दिल की' हे मदन मोहनचं गाणं आणि राजश्रीच्या आवाजात 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे खळ्यांचं गाणं ऐकायला मिळावं ही माझी इच्छा आहे.

'व्हॉइस ऑफ इंडिया' बघायचा प्रयत्न केला. पण त्यात मी जरा जास्तच उथळपणा बघितला. फॉरेनर मुली मुद्दाम छोटे कपडे घालून आल्या होत्या, फ्लर्टींग करतात जजेस स्पर्धकांसोबत, शाल्मली काही काही गायकांचं इतकं कौतुक करते कि बस्स.. पण मी जेव्हा जेव्हा तिने असे कौतुक करताना बघितले, ते अजिबात डिझरविंग नाही वाटले. ओव्हरॉल संगीताच्या स्पर्धेपेक्षा उथळपणा बघून कंटाळून बघणे सोडून दिले.>>> voice of indiaमध्ये की राइझिंग स्टार मध्ये? VOIमधे असे काही नाहीये/नव्हते. काल संपले पणVOI

VOI आणि रायझिंग स्टार मध्ये इतका चकचकाट आणि झगमगाट असतो की त्यात गाणे आणि कलाकार दुय्यम वाटू लागतात.

सॉरी प्राची, मला 'दिल हैं हिंदुस्तानी' म्हणायचे होते. माझी पोस्ट संपादीत केली. भंपक शो झाला तो एकदम.
व्हॉईस ऑफ इंडिया पाहिलेच नाही मी बहुतेक. Uhoh

गजानन जी धन्यवाद Happy

VOI संपलं कालच...
सारेगम... पहात होते मधून मधुण खुप छान म्हणतात छोटीशी मुले...
डीटेल नन्तर लिहिन...

२)नेहा कक्कर ही कोण?
हिंदी फिल्मी गाण्यांच्या एका कार्यक्रमात "कक्कर" नावाचीच कुणी सुंदरि सुत्रसंचालन करते.
तिचीच बहिण वगैरे तर नाही?

गजाननजी तो जस्सू खान काय जबरी गायला ना,आवाज बसला होता त्याचा पण गाताना अजिबात जानवलं नाही ते...

ती रीया बिस्वास किती क्युट आहे,छान गाते..
आणि तो जाडू कोन आहे बरं??? किशोर कुमारची गाणी म्हनतो तो...

रायजिन्ग स्टार्स टॉप १६ :
इथे पाहू शकता

मला अमेय दाते आवडतो.. अमेय आणि मोनाली indian idol मधे होते,त्यावेळी तो टॉप ५ मधे पोहोचला होता तर मोनाली टॉप ६ मधे पण नव्हती...पण आज ती टॉप गायिकांमधे गणली जाते आणि अमेय च अजून करियर स्टार्ट पण नाही झालं खुप वाईट वाटत त्याच...
ती मैथीली खतरनाक क्लासिकल गाते.

ओके कावेरी, आज संध्याकाळी टीव्हीवरचा (बहुधा सोनी) तो शो, त्याचे नाव, तिचे नाव असे लिहुन आणतो. Happy
(माझी मेमरी (स्मृति) अतिशय कच्ची आहे Sad साध्या साध्या गोष्टी, नावे, ठिकाणे, व्यक्ति लक्षात रहात नाहीत)

Pages