शब्द-शृंखला - १ मार्च

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 00:36

आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.

आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.

१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.

उदाहरणः
उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत.

१. एक होती
वाक्य -एक होती तनया यादवाडकर रात्री-बेरात्री तारकसमुहात तळपताना निरनिराळया यानांकडे डोळ्यांत तिरके कटाक्ष क्षितिजापर्यंत ताणवून नखशिखान्त न्याहाळत तन्मयतेने नाचायची.

२. गाथा
वाक्य - गाथा थडग्याशी शोधताना नकळत तिच्याकडून नामस्मरण नेमके कसे सांजवेळी लगोलग गवसले.

३. आमच्या वेळी
वाक्य - आमच्या वेळी लोकांना नकटीच्या चहासाठी ठरवुन न्यायचे.

४. समस्या
वाक्य - समस्या स्विकारुन नागरीक काहीतरी रसभरीत तजेलदार रहस्ये यदाकदाचित ताडून नष्टचर्य राजदरबारी रयतेच्या चांगल्यासाठी ठिगळ लावून नक्षीदार रांगोळ्या योजतील.

५. डाकू
वाक्य - डाकू करणसिंग गब्बरसिंगच्या चुकीमुळे लालकिल्ल्यावर रणरणत्या तेजोनिधीसमोर रात्रभर रांगत तेवीसाव्या वेळी लकबीने निघुन नशीबाच्या चव्हाट्यावर रदबदली ललाटीला लिहीलेल्या यवनांसमोर रोखून नटवरसिंगाने नतमस्तक केले.

६. खट्याळ
वाक्य - खट्याळ लेकीची चुगली लंकेश्वराने नेहमीच्या चौकटीत तिरस्कारयुक्त कुचेष्टेने नेहापर्यंत तावातावाने नवर्यासमक्ष क्षोभाने नेण्याची चाल लिलयेने निभावली.

७. आक्रमण
वाक्य - आक्रमण नुसते तेंडुलकरने नेटाने न्यूझीलंडसमोर रोखलेल्या यष्टीचितांचे चुकारपणे निसटलेल्या यानागत तारुन नेले.

८. झुंबड
वाक्य - झुंबड डोंगरगावातून नदीच्या चंद्रकोरीसारख्या खोबणीत ताटकळत तट्टेबुरुज जवळून निरखत तरातरा रस्त्याला लागली.

९. ऐश्वर्य
वाक्य - ऐश्वर्य येथे थुईथुई ईंद्रदरबारी रंगमहालात तारकांच्या चमचमण्याने नृत्यशैली लेवुन नवरस सांडते.

१०. टाकाऊ
वाक्य - टाकाऊ उकीरड्यातून नाकारलेल्या लाल लंगोटास सरळ लंकेत तारेवर रोवावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृ Wink

गाथा थडग्याशी शोधताना नकळत तिच्याकडून नामस्मरण नेमके कसे सांजवेळी लगोलग गवसले.
गायले.... ऐवजी वापरुन पण संपवता येईल..

Pages