दिल दोस्ती दोबारा - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 5 February, 2017 - 02:57

तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टायटल song मला कळलंच नाही नीट. आधीचं आवडायचं. ह्याची सवय व्हायला वेळ जाईल. आशु rocking again , this time as पप्या.

सुजुला दाढी का दिलीय, श्या बाबा आणि गौरव नाव त्याचं ह्यात. सखी परत नाहीच आवडली मला, अमेय पण नाही. पूजा ठीक. स्वानंदी आवडेल परत असं वाटतंय.

सिरीयल आवडेल मला बहुतेक.

पहिल्या सीजनचं सगळं अजूनही डोक्यात ताजं आहे. ते सर्व पुसून पूर्णपणे नवीन शिरायला जरा वेळ लागणार असं दिसतंय. त्यामुळे कालच्या भागात टायटल साँग सकट मजा नाही आली.. आगे आगे देखते है होता है क्या !!

मित, अगदी अगदी.... कित्ती मोदक देऊ..
खरंतर याने आपनच या भागाची मजा मिसतोय पण त्याला पर्याय नाही..
पुढचा भाग जssssरा इंटरेस्टींग वाटतोय

आजचा स्पेशल बघितला. अ‍ॅना डोक्यात गेली पार आजतरी. आनंदी म्हणजे जुनी मिनल आवडली. डायलॉग छान होते, विशेषतः अमेय वाघचे काही. आज सखी नव्हती. मला आवडतेय ही पण. रंगेल ही सिरीयल. सर्वात बेस्ट पप्याच वाटलाय मात्र, आज तो नव्हता मिन्स अगदी शेवटी आला.

अमेय दाढीत बरा दिसत होता. सुव्रतला का दाढीत ठेवलंय Sad .

आनंदी म्हणजे जुनी मिनल आवडली.>>> आनंदी म्हणजे जुनी अ‍ॅना , मुक्ता म्हणजे जुनी मिनल.
आंनदीला जरा जास्तच धार्मिक आणि सोज्वळ दाखवले आहे. गौरवची सेल्स्मनशिप पण जरा जास्तच होत होती. पप्या, अमेय आणि मुक्ताचे डायलॉग आणि काम मस्तच.
रंगेल ही सिरीयल>> +१

सुजय = गौरव
आशू = पप्या
अ‍ॅना = आनंदी
मीनल = मुक्ता
कैवल्य = साहील
रेश्मा = परी

मला तो अमेय वाघ अज्जिबात आवडत नाही. डोक्यात जातो. अतिशहाणा
त्या मिथिला पालकरला एखादा बरा मुलगा नाही मिळाला का ? Uhoh

मला तो अमेय वाघ अज्जिबात आवडत नाही. डोक्यात जातो. अतिशहाणा
त्या मिथिला पालकरला एखादा बरा मुलगा नाही मिळाला का ? >>>>>>>>>>>> + १११११११११११११

त्या मिथिला पालकरला एखादा बरा मुलगा नाही मिळाला का ? >>> अगदी अगदी.

अमेयला भाव खूप देतायेत सिरियलवाले, त्याला काही डायलॉग चांगले दिले होते. आनंदी फारंच बोअर,
धार्मिक असुदे, पण जे बोलते ते पार डोक्यात जातंय.

ओहह सॉरी मुक्ता आवडली मला, आनंदी नाही.

ती मिथिला पालकर - चित्रा पालकर >>> चित्रा पालकर कोण?

मिथिला फार गोड आहे, फार भाग्यवान आहे अमेय.

फायनली म्हणजे मला पुष्कराज, स्वानंदी आणि सुव्रत हेच आवडतायेत इथेही, मागच्यासारखे. तेवढी सुव्रतची दाढी नको वाटते.

ए...कोणीतरी सांगा ना काय चालू आहे.
आमचा T.V. बंद आहे आणि Data pack पण कमीच टाकतो आहे सध्या. (१२ वी ची परीक्षा चालू आहे ना...!)

मला आवडला कालचा भाग, अगदी पोट दुखेस्तोर हसली मी>> मला पण आवडला.
आनंदीने केलेल्या जेवणाचा पहिला घास घेतल्यावर मुक्ताची रिअॅक्शन नि डायलाॅग लय जबरी. Rofl

मी पहिला भाग पाहिला आणि कालचा भाग. पण मला नीट लींक लागेना.
मी नक्की किती एपिसोड मिसलेत? हे सगळे एकमेकांना कसे भेटले तेच मिसलं मी बहुतेक.
त्यामुळे कालचा टफी मॅटर कळलाच नाही. श्या !!!

मुक्ता तमिळ आण्टीच्या टफीला फिरायला घेऊन गेलेली असते. तेव्हा साहिल मध्ये आल्याने टफी पळून जातो. मग मुक्ता नि साहिल टफीला पकडायला त्याच्या मागे पळत असताना त्यांना मॅग्नेटची अॅड करणारा गौरव भेटतो. आण्टीला पटवायला मुक्ता गौरव नि साहिलला घरी घेऊन जाते. तिथे आनंदी आण्टीचं फेशियल करत असते. टफी हरवल्याने मुक्ताची नोकरी जाते. आणि आनंदी मुक्ताला तिच्या घरी घेऊन जाते.
पप्या नि गौरव आधीपासूनच एकत्र राहत असतात. साहिलची पण हाॅटेलमधली नोकरी गेल्याने तो जबरदस्तीनी गौरवच्या घरी रहायला जातो.

दिदोदो चा पहिला भाग पण आवडला नव्हता आणि दुसऱ्या भागाचा कालचा एकच एपिसोड बघितला . ईतका बोअर ?
चित्रा पालेकर म्हणजे अमोल पालेकरची पहिली बायको अंजु Happy

Pages