Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एग सॅलेड, डेव्हिल एग, पोटॅटो
एग सॅलेड, डेव्हिल एग, पोटॅटो सॅलेड्,पास्ता सॅलेड्, ग्रिन सॅलेड, क्रॅकर आणि डिप, चिप्स आणी सालसा
फ्रुट क्रिम, पेक्न्, अॅपल, पपकिन यापैकी एक पाय आनी व्हॅनिला आइस्र्किम
शेव दही बटाटा पुरी
शेव दही बटाटा पुरी
भेळ (कमी तिखटाची)
आलू टिक्की / जिरा आलू
मका कणीस भाजलेले दाणे तिखट मीठ लिंबू चाट मसाला लावून
छोले उकडून तिखट मीठ चाट मसाला भुरभुरून (उकडताना दालचिनीचा तुकडा घालून उकडल्यास मस्त स्वाद येतो)
पापड्या कुरडया मिरगुंडं तळून
दडपे पोहे, फक्त कुरकुरित
दडपे पोहे, फक्त कुरकुरित भाजून घ्यायचे कांदा पण मस्त भाजून, दाणे तळून, डाळिंबाचे दाणे, मिर्गुंड तळून त्याचा चुरा वरून, ओलं खोबरं, कोथिंबिर.... खल्लास... तिखटासाठी फारतर आपली तळणीची मिरची चुरडून घालायची. तेव्हढा तिखटपणा पुरेसा होतो.
लालूची पांढरा रस्सा चिकन
लालूची पांढरा रस्सा चिकन रेसिपी आहे . त्यात चिकन च्या बरोबरीने भिजवून शिजलेले काबुली चणे / कॅनलॉनी किंवा ग्रेट नॉर्थन बीन्स घालून व्हाइट चिकन चिली म्हणून करुन न्या. क्रॉकपॉटमधे केल्यास ने आण करायला आणि गरम ठेवायला पण सोपे पडेल. थंडीच्या दिवसात आवडणारा पदार्थ आहे
पनीर फ्रिटर्स (पकोडे) करू
पनीर फ्रिटर्स (पकोडे) करू शकते...त्या सोबत चि. गू. चटणि आनि पुदीना चटणी मिक्स चान्गली वाटेल का ? की केचप ?
प्राजक्ता, डेव्हील एग कसे
प्राजक्ता, डेव्हील एग कसे करायचे ?
पनीर पकौड्यांबरोबर पुदिना
पनीर पकौड्यांबरोबर पुदिना चटणी व केचप छान लागेल. चिंगु चटणीही ओके वाटेल. बटाटा भजी, कांदा भजी, पालक भजी वगैरे मिक्स भजीही छान वाटतील.
ट्रॅडिशनल डेव्हिल एग्स मधे
ट्रॅडिशनल डेव्हिल एग्स मधे हार्ड बॉईल्ड एग मधुन कापायचे पिवळा बलक एका बॉल मधे काढुन घ्यायचा त्यात मेयो,मस्टर्ड सॉस, मिरपुड्,मिठ वैगरे कालवाय्च आणि परत अन्ड्यात भरायच.. वरुन पार्सले वैगरे कापुन घालतात काहिजण!
माझ एक इडियन व्हर्जन पण आहे त्यात मी कान्दा-टोमॅटो-बेल पेपर अगदी बारिक कापुन थोड्या तेलावर एकजिव परतुन घेते मग त्यात तिखट्,पॅपरिका,हलका पावभाजि मसाला,धना-जिरा पुड टाकुन मसाला करायचा त्यात पिवळे बलक मिसळुन घ्यायचे मग ते अन्ड्यात भराय्चे.
डेव्हिल्ड एग्ज् चे इन्डियन
डेव्हिल्ड एग्ज् चे इन्डियन व्हर्जन इंटरेस्टींग वाटत आहे (वर कोथींबीर राहिली ;))
इकडच्या पद्धतीत किंवा कॅलिफोर्निया स्पेशल कदाचित अव्हाकाडो आणि/किंवा ग्रीक योगर्ट वगैरे घालतात जर मेयो वापरायचं नसेल तर.
भारतीय व्हर्जन मध्ये योक चं क्रीमी टेक्स्चर आणि चव एन्हान्स करायची नाही का प्राजक्ता, अमुल चीज किंवा बटर इत्यादीने?
डेव्हिलड एग कॉम्बो
डेव्हिलड एग कॉम्बो
ग्रीक योगर्ट, झतार स्पाइस, लेमन जूस . पार्सले , डिल
ग्रीक योगर्ट किंवा चक्का, तंदुरी मसाला, हि मिरची , कोथीम्बीर
वसाबी मेयो + पार्सले
स्रिरचा सॉस, पातीचा कांदा
अव्हाकाडो , ( मेक्सिकन ) व्हॅलेंटिना हॉट सॉस, केसो फ्रेस्को
मेधा, मस्त आहेत आयडियाज्
मेधा, मस्त आहेत आयडियाज् डेव्हिल्ड एग्ज् स्पाइस-अप करण्याकरता.
सशल ! कोथिबिर पण चान्गली
सशल ! अमुल बटर आणि कोथिबिर पण चान्गली लागते , वरतुन बारिक श्रेडेड चिझ टाकायच आणि अगदी हलक ब्रॉइल करायच ! थॅन्क्सगिव्हिन्ग ला अॅपेटायजर म्हनून केल होत
निमित्त - पार्कमधे १५० जणांची
निमित्त - पार्कमधे १५० जणांची पिकनिक ११ ते ४. मिसळपाव मुख्य पदार्थ. अजुन २-३ सोपे पदार्थ सुचवा. आम्ही १५ लोक आदल्या दिवशी करणार त्यामुळे फार खटाटोप असलेले करायला वेळ नसेल.
सुनिधी,
सुनिधी,
दही भात, टॅमरिंड राइस, लेमन राइस, पोंगल असा भाताचा प्रकार ,
ढोकळा, सुरळीच्या वड्या , इडली - सांबार असा अजून एक स्नॅक प्रकार
जिलबी, रसगुल्ला, गुलाबजाम किंवा आइसक्रीम + चॉकलेट सॉस, कॅरॅमेल सॉस, नट्स असे टॉपिग्स.
मेधा +१. गोड साठी केक, बर्फी
मेधा +१. गोड साठी केक, बर्फी असे खायला सोपे काहीतरी बरे पडेल का?
पार्क मध्ये खायला फळे पण छान वाटतात ... मात्र खरबूज, टरबूज इ घेतलं तर १५० लोकांसाठी चिरणे/तुकडे करणे बोरिंग काम स्ट्रॉबेरी, केळ असे काही सोपे.
स्ट्रॉबेरी, केळ असे काही सोपे
स्ट्रॉबेरी, केळ असे काही सोपे. >>>> द्राक्षं ????
सँडविचेस! पार्क मध्ये पिकनिक
सँडविचेस! पार्क मध्ये पिकनिक म्हंटलं की निरनिराळ्या प्रकारची सॅडविचेसच सुचतात मला.
मेधा, सीमंतिनी +१
मेधा, सीमंतिनी +१
सँडविचेस् नेहेमीच ग्रेट पण मिसळपावाबरोबर परत ब्रेड नको असेल तर भरीला गोडाचा शिरा आणि/किंवा भेळेचं साहित्य (मिसळी मुळे ओव्हरलॅप असेलच) नेऊन आयत्या वेळी भेळ करायची.
(चिप्स/व्हेजीज् आणि डिप्स असले फिंगर फूड चालणार असेल तर तेही )
गोडाचा शीरा मस्त. आणि फळांची
गोडाचा शीरा मस्त. आणि फळांची कल्पना ही उत्तम !
मिसळीबरोबर कांदा , टोमॅटो वगैरे जाणार असतीलच. त्याबरोबरच मग सेलरी, काकडी, गाजर, ग्रीन / रेड पेपर असे डीप बरोबर चांगले लागतील. म्हणजे जरा तिखट तेलकट बरोबर साधे काही तरी
इथे वाचून मलाच तडक करून
इथे वाचून मलाच तडक करून खावासा वाटला गोडाचा शिरा
मस्त... खुप धन्यवाद सर्वांना.
मस्त... खुप धन्यवाद सर्वांना.
१२ मोठे आणि ६ लहान यांचं
१२ मोठे आणि ६ लहान यांचं पॉटलक आहे.
बाकी मंडळी बिर्याणि, छोले आणि चपाती आणणार आहेत. बटाट्याला सगळे कंटाळलेत.
सोपं पण जरा वेगळं काय नेता येईल? अंडीपण चालतील.
बघारे बैंगन किंवा मिर्ची का
बघारे बैंगन किंवा मिर्ची का सालन - बिर्यानीसोबत मस्त होईल. इथे रेसिपी आहेत दोन्हीच्या .
बरोबर रायता पण.
option # 1 - methi mutter
option # 1 - methi mutter malai, corn palak, kofta curry with चपाती
option # 2 - छोले aahet tar...choley chat or readymade samosa + choley chat....Biryani chya adhi starter mhanoon chaan lagel.
option # 3 - अंडीपण चालतील. ...bharli andi.
१२ मोठे आणि ६ लहान यांचं
१२ मोठे आणि ६ लहान यांचं पॉटलक आहे.>> अॅपेटायझर किंवा गोड पदार्थ न्या काहीतरी
नक्की हेडकाउंट असेल तर छोट्या ग्लास किंवा क्लीअर प्लास्टिक बोल मधे ट्रायफल पुडिंग नेता येईल., चॉकलेट फॉण्ड्यू नेता येईल,
देशी प्रकारच हवे असतील तर गाजर हलवा , रसमलाई, डबल का मीठा नेऊ शकता.
अॅपेटायझर - सुरळीच्या वड्या, कोथिंबीर वड्या, डेव्हिल्ड एग्ज,
बघारे बैंगन मस्त वाटतीये पण
खूप खूप धन्यवाद. भरपूर पर्याय मिळाले.
बघारे बैंगन मस्त वाटतीये पण आधी केली नाही कधी. आता नक्की करून बघेन. पदार्थ बिघडवण्यात हातखंडा आहे.
मसालेदार भरली अंडी आणि गुलाबजामुन करायचे ठरवले. मिल्क पावडरचे केले पण ते खूपच घट्ट झाले आहेत. आता त्याना कसं सुधारता येईल?
गुलाबजाम भरपूर पाकात असतील तर
गुलाबजाम भरपूर पाकात असतील तर लो फ्लेमवर पाक गरम करत ठेवा. पाक गरम झाला की तो गुलाबजामच्या आत शिरेल.
बट बी व्हीजलंट, खूप गरम झालं तर गुलाबजाम भंयकर टम्म फुगतील आणि पाक कमी असेल तर एकमेकांना चिकटतील. (मी एकदा उकळी आणलेली तेव्हाच्या गुजाच्या तव मिठीत विरघळणाऱ्या लाघव वेळा आज स्मरतायत)
अमित
अमित
अमितव
अमितव
शेवटी कुकरमधे घालून थोडं प्रेशर येईपर्यंत ठेवलं. मस्त झाले.
सगळ्यांना परत धन्यवाद.
३५-४० लोकासाठी कट बिन्स ची
३५-४० लोकासाठी कट बिन्स ची भाजी करायला किती एलबी बिन्स लागेल, ओल खोबर २ पाकिट पुरे की ३ ?
( बेकाक च्या २ धाग्यावर लिहल होत आधी चुकुन, नविन धागा आल्यावर आधिचा बन्द का करत नाहियेत)
Pages