"जीता दिल इंडिया का, जीतनी है दुनिया,
ये बस टीम नही है, ये है इंडिया"
गेल्या दोन महिन्यांपासून दर दोन मिनिटाला TV वर ऐकू येणारी ही Anthem ऐकून उत्सुकता नक्कीच वाढलेय. ही उत्सुकता आहे कबड्डी वर्ल्डकप 2016 ची. उद्यापासून चालू होतोय.(कदाचित माझ्यासारखे बरेच असतील पहिल्यांदाच हा वर्ल्डकप बघणारे.)
प्रो कबड्डीचा चौथा सीजन संपतानाच कबड्डीच्या वर्ल्डकपची घोषणा करण्यात आली. आता हा खेळ अगदी घराघरात मोठ्या चवीने बघितला जातो. हल्ली कबड्डीला चांगले दिवस आलेत असे म्हणायला हरकत नाही. कारण अगदी गावागावात जिथे दर दोन महिन्यांनी क्रिकेटच्या 'टुर्नामेंट' व्हायच्या तिथे आता कबड्डीचे सामने रंगलेले दिसतात. मोठ्या शहरांमधे महाकबड्डी पर्व वगैरे सुरू झालेत. खासकरून महिला कबड्डीला प्रोत्साहन दिले जातेय. प्रेक्षकही पसंती देतायत. छान आहे.
प्रो कबड्डीने या खेळाला नवीन 'ग्लॅमर' दिलेय. तेच आता इंटरनॅशनल लेव्हलला बघायचेय. कबड्डी हा भारताने जगाला दिलेला खेळ आहे असे म्हणतात. त्याची ही वर्ल्डकपची स्पर्धा 2004 पासून सुरू झाली. पहिले दोन वेळा ही स्पर्धा 'इंटरनॅशनल स्टाईल' ने खेळवण्यात आली. तर 2010 पासून 'इंडियन स्टाईल' ने खेळवली गेली. आता दोन स्टाईल्समधे फरक म्हणजे 'प्रो कबड्डी स्टाईल/ नियम' आणि 'आपण शाळेत खेळलेली ती कबड्डी स्टाईल/ नियम'. 2016 चा वर्ल्डकप पुन्हा इंटरनॅशनल स्टाईलने खेळला जाणार आहे. ( जास्तच इंटरनॅशनल टीम्स आल्यात म्हणून असेल. 'एकदम सोफिस्टिकेटेड!!!')
आता भारताच्या टीम सिलेक्शनची कहाणी... निवड झालेले सगळे खेळाडू चांगलेच आहेत. पण सर्वोत्तम म्हणता येणे जरा कठीणच. त्यात करून 99% खेळाडू North side चे म्हणजे पंजाब, MP, UP चे. फक्त एक चेरलाथन South चा. महाराष्ट्राचे नामोनिशाण नाही. ( It hurts बरं.) राहूल चौधरी, मनजीत छिल्लर, अनूप कुमार, दीपक हुडा, चेरलाथन आणि परदीप नरवाल हे उत्तम आहेतच. पण बाकीचे खेळाडू निवडताना थोडी गडबड वाटते. म्हणजे त्यांच्यापेक्षा चांगले Options असताना ते या टीममधे असू नयेत ही खंत. आता अजय ठाकूर माझा कितीही लाडका असला तरी त्याच्यापेक्षा काशीलिंग अडके नक्कीच उजवा आहे. बोनस अगदी सराईतपणे मारतो. नितीन तोमरपेक्षा निलेश साळुंखे छान खेळला असता, वगैरे वगैरे. जाऊदेत. आता टीम तयार झालीच आहे तर बोल कशाला लावा???
पण कालच TV वर बाकीच्या टीम्स आणि त्यांची प्रॅक्टिस बघितली 'कॅबदी, कॅबदी' करत. देवा रे!! इंग्लंडच्या टीममधे तर सगळे WWE वाले पैलवान आहेत असंच वाटतंय. पोलंडच्या टीमचा स्टॅमिना थक्क करणारा आहे. कोरियाची टीम म्हणजे [जँग कुन ली × 7] अशी आहे. ऑस्ट्रेलियाची टीम पण त्यांच्या 'गिलख्रिस्ट' वाल्या क्रिकेट टीमची आठवण करून देणारी आहे. केनियाची टीम म्हणजे कायच्या काय चपळ. थोडक्यात काय तर त्यांना सगळ्यांना बघून 'आमच्या पोरांची' काळजीच वाटून राहिलीये. यंदा वर्ल्डकप खिशात घालणे एवढे सोपे नाही हेच खरे.
पण आमच्या लाखो शुभेच्छा आमच्या टीमच्या पाठीशी आहेत. सोबत त्यांची स्वतःची मेहनत आणि योग्यता आहेच. त्यामुळे वर्ल्डकप आहे तिथेच रहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
कोरियाने चांगलाच धक्का
कोरियाने चांगलाच धक्का दिलाय.
आधी फक्त इराणच तयार झालेय असे वाटायचे.
अरे व्वा ! मजा येणार बघायला .
अरे व्वा ! मजा येणार बघायला .
कसली मस्त मॅच होती
कसली मस्त मॅच होती कोरियासोबत...पण हरले..
अमेरिकेची मॅच पूर्णपणे
अमेरिकेची मॅच पूर्णपणे एकतर्फीच चालू आहे.. :|
अगदीच बोअर...
बेसिक रुल्स पण माहिती नाहीयेत त्याना. इराणचे खेळाडू पण कंटाळलेत. काहीच काॅम्पिटिशन नाही.
तुफान झाली भारत - कोरिया
तुफान झाली भारत - कोरिया मॅच.. जॅन कुन ली नी प्रोकबड्डी मधे मिळालेला सगळा अनुभव पणाला लावून मॅच खेचली.. आपल्या लोकांनी जरा जास्तच लाईटली घेतले कोरियाला... आता ग्रुपमध्ये आपण दोन नंबरला येणार आणि मग सेमीमध्ये इराणच्या विरुद्ध खेळावे लागणार..
इंग्लंड वि.
इंग्लंड वि. बांग्लादेश....बोअरिंग
पोलंड वि. केनिया... मस्त...पोलंडचा कॅप्टन छान आहे..;)
आता भारत वि. ऑस्ट्रेलिया....एकतर्फी पण मजा येतेय...
समहाऊ तितकी मजा येत नाहीय पण
समहाऊ तितकी मजा येत नाहीय पण .

इंग्लंड , अमेरिका , ऑसीज धरून आणल्यासारखे खेळतायत .
हे म्हणजे फुटबॉल वर्ल्ड कप ला भारत अन बांग्ला ला आमंत्रण दिल्यासारख झाल्य .
सध्यातरी कोरिया , केनया अन बांग्ला ओके दिसतायत . इराण कायमच बलाढ्य होता
जपान , थाई अन अर्जेंटीना कसे आहेत पाहूया
जान कुन ली ला भारताने
जान कुन ली ला भारताने सामन्यातला पुष्कळसा भाग बाकावरच बसवलेले. पण तो मैदानात आला आणि डाव उलटला. इतका प्रभावी तो लीगमध्येही वाटला नव्हता. भारताने कोरियाला लाइटली घेतले असे वाटले. शिवाय खेळाडूंच्या फॉर्म आणि कामगिरीपेक्षा नावावर घेतलेय असे वाटले. नव्या खेळाडूंना कमी संधी मिळाली. अर्थात हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे हे बोलायला घाई झाली असेल.
कोरिया वि. अर्जेंटिना...फुलऑन
कोरिया वि. अर्जेंटिना...फुलऑन एंटरटेन्मेंट
अगदीच हातात दिली नाही मॅच कोरियाच्या. आणि अर्जेंटिना टीमने हरल्यानंतर सुद्धा केलेला जल्लोश भारी होता.
भरत जान कुन ली, लीग मधे जितके
भरत जान कुन ली, लीग मधे जितके सामने मैदानावर होता ते ते सामने कोलकत्याने सहजा सहजी सोडलेले नाहीत.. त्यांच्या विजयात त्याचा सहभाग बराच मोठा आहे... तो रेडला गेल्यावर काहीतरी घडवणारच अश्या पद्धतीतच रेड करतो.. क्वचितच तसाच परत येतो.
थायलंडची पोरं अगदीच बच्चा
थायलंडची पोरं अगदीच बच्चा वाटली आपल्या दांडग्यांसमोर.
मला तर शेवटीशेवटी त्यांची दया यायला लागली.
आता टफ इराण विरुद्ध फायनल.
जीता दिल इंडिया का...और जीत
जीता दिल इंडिया का...और जीत ली है दुनिया...इस टीम के साथ है देखो...जीत गयी इंडिया...!!!
अप्रतिम मॅच... Breath taking....
आणि अजय ठाकूर इज दि बेस्ट..
थायलंडसोबतची मॅच
थायलंडसोबतची मॅच जिंकल्याबद्दल अजिबात कौतुक नाही... पण आजची हातातून जवळजवळ निसटलेली मॅच जिंकल्याबद्दल मात्र खूप खूप कौतुक..

प्रो कब्बड्डी पहाताना जेवढी
प्रो कब्बड्डी पहाताना जेवढी मजा येते तितकी मजा नाही आली, पण फायनल मात्र जबरदस्त झाली.