आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!
या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड!!! म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.
चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.
स्पर्धेचे नियम -
१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.
२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.
४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.
९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.
१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.
११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.
___________________________________________________________________________
या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
खास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या
'तिखट' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60250
'गोड' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60251
मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.
लँडिंग पेज अपडेट करा प्लिज
लँडिंग पेज अपडेट करा प्लिज
थिंकिंग अलाऊड माठ बटाटा लसूण
थिंकिंग अलाऊड
माठ बटाटा लसूण पराठा
मुळा बीट लवंग गोड वड्या
(हे पदार्थ बनवणार्याचं देव भलं करो आणि खाणार्ञाला सद्गती देवो)
लँडिंग पेज अपडेट करा प्लिज .
लँडिंग पेज अपडेट करा प्लिज .
मी काही वेळ पुर्वी रेसिपी
मी काही वेळ पुर्वी रेसिपी टाकली.ती मास्टर शेफ च्या लेंडिग पेज वर केव्हा दिसेल?
रेसिपी बद्दल चे मतदान कुठे
रेसिपी बद्दल चे मतदान कुठे करायचं.
Rupali Akole, प्रशासक लवकरच
Rupali Akole,
प्रशासक लवकरच तुमची रेसिपी लॅण्डिंग पेजवर टाकतील. सध्या ती नवीन लेखनात दिसते आहेच.
अजून अनंत चतुर्दशीपर्यंत स्पर्धा सुरू आहे. ती संपल्यानंतर मतदानाचे धागे उघडले जातील. तेही नवीन लेखनात दिसतील.
माझे शब्दखुणा मधे मायबोली
माझे शब्दखुणा मधे मायबोली मास्टर शेफ लिहायचे राहिले ते कसे लिहायचे.
तुमच्या धाग्यावर संपादनात
तुमच्या धाग्यावर संपादनात जाऊन ती शब्दखुण अॅड करता येईल.
मास्टरशेफांनी बर्याच छान-छान
मास्टरशेफांनी बर्याच छान-छान प्रवेशिका दिल्यात. तर तिखट आणि गोड किंवा अशी काही वर्गवारी करून एकाहून अधिक मत देण्याची सोय करणार का?
धनि संपादन पुर्वी दिसत होते
धनि संपादन पुर्वी दिसत होते पण प्रतिसाद आल्या नंतर दिसत नाही आहे.
धनि संपादन पुर्वी दिसत होते
धनि संपादन पुर्वी दिसत होते पण प्रतिसाद आल्या नंतर दिसत नाही आहे.
Please allow us to vote for
Please allow us to vote for our top 3 or top 4 recipes..even top 5 will do! This time the contestants have all done really well..
लँडिंग पेज अपडेट करा प्लिज
लँडिंग पेज अपडेट करा प्लिज
एक से बढकर एक पाकृ आल्या
एक से बढकर एक पाकृ आल्या आहेत.
मतदान करताना 'कोणता झेंडा घेऊ' होणार आहे.
प्रवेशिका देताना 'नवीन
प्रवेशिका देताना 'नवीन लेखनाचा धागा' हाच प्रकार निवडायचा आहे का? मला 'नवीन पाककृती; हा पर्याय दिसला नाही. तसंच `मायबोली गणेशोत्सव २०१६' सोबत 'पाककृती आणि आहारशास्त्र;' हा गृप निवडता आला नाही.
बिस्कीट मोदक ची रेसिपी
बिस्कीट मोदक ची रेसिपी लेंडिंग पेज वर का दिसत नाही ?
लेंडिंग पेज अपडेट करा प्लीज
लेंडिंग पेज अपडेट करा प्लीज
वर च्या प्रश्न चे उत्तर
वर च्या प्रश्न चे उत्तर मिळेल का ?
गेले काही तास तांत्रिक
गेले काही तास तांत्रिक कारणामुळे वेबसाईट अपडेट होऊ शकली नाही. आता अपडेशनचे काम सुरु आहे.
यावेळी मतदान किमान तीन
यावेळी मतदान किमान तीन पाककृतींना तरी करता आले पाहिजे प्लीज खुपच सुंदर पाककृती आहेत यावेळी.
सगळ्यांन ची रेसिपी लेंडिंग
सगळ्यांन ची रेसिपी लेंडिंग पेज वर आली पण तीच का राहिली ?
फोटो लोड करायची काही सोपी
फोटो लोड करायची काही सोपी मेथड डेवलप करा लाइक फेसबुक आणि व्हॉटसअप.
बिस्कीट मोदक रेसिपी अजुन ही
बिस्कीट मोदक रेसिपी अजुन ही लेंडिंग पेज वर आली नाही.अपडेट लेंडिंग पेज प्लीज.
रेसिपी लेखना बद्दल काही
रेसिपी लेखना बद्दल काही प्राब्लम आहे का?
रुपाली, काहीही प्रॉब्लेम
रुपाली, काहीही प्रॉब्लेम नाही. आपले admin US मध्ये आहेत, त्यांच्या वेळेनुसार ते धागे अपडेट करतील. कृपया थोडा धीर धरा.
सगळे धागे लँडिंग पेजवर अपडेट
सगळे धागे लँडिंग पेजवर अपडेट झाले आहेत.
मतदान केव्हा,कशे आणि कुठे
मतदान केव्हा,कशे आणि कुठे करायचे आहे.
रुपाली ! तुम्ही नविन असल्याने
रुपाली ! तुम्ही नविन असल्याने तुमची उत्सुकता समजु शकते पण उत्सव जस्ट सन्पलाय, अॅडमिन लवकरच त्याविषयी रितसर घोषणा करतील.
वोटिंग ओपन कधी होणार?
वोटिंग ओपन कधी होणार?
कधिच झालेय, खाली लिंक
कधिच झालेय, खाली लिंक दिल्यात
http://www.maayboli.com/node/60251
http://www.maayboli.com/node/60250
Pages