ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर, पण आपलं विवरण माझ्यासारख्या सामान्यांच्या डोक्यावरून जाणार आहे, माझ्या बहिणी च्या द्वितीय विवाहासाठी खूप प्रयत्न करत आहोत, जमलं जमलं म्हणताच काही तरी अगदी साधी अडचण येते आणि बीनस्त, तिला मंगळ आहे, मकर रास, आता एक चांगलं स्थळ आलं, त्यांचा घटस्फोट 1 महिन्यांत होईल असं सांगितले होतं, पण आता 1 वर्ष झालं अजून पूर्ण झाला नाही, त्यांना राहू मुळे उशीर होतोय असं त्यांच्या आईंचं म्हणणं आहे, त्यांची सिंह रास आहे, सिंह मंगळ जमत नाही असं म्हणतात, पण गुरुजींनी पत्रिका जमते असे सांगितले, आता काय करावं काही सुचत नाही,
वाट बघण्याशिवाय दुसरं काही करू शकतो का ?
कृपया मार्गदर्शन करावे

ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह तयार केला आहे.
हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी.

ज्योतिष विषयावर
माहितेची देवाण घेवाण,
सल्ला मसलत,
कुंडलीची चर्चा,
बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा,
नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय,
अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे.

या समुहावर ज्योतिष/भविष्य संबंधित विषयाशिवाय इतर कोणतीही चर्चा करता येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या समुहात ज्योतिष खरे की खोटे ही चर्चा निषिद्ध आहे!
तसेच ज्योतिष या विषया व्यतिरिक्त इतर कोणतेही फॉर्वर्डसना परवानगी नाही, प्रसंगी समुह दिवसेंदिवस थंड राहिला तरी चालेल!

समुहात सामील होण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक निरोपाने अथवा विपु मध्ये कळवावा.

आपला नम्र
निनाद

शनि बदल २०१७ शनि चे धनु रशिमध्ये आगमन होइल जानेवारी २०१७ मध्ये. हा शनेबदल तुळ रशिची साडेसाती सम्पवेल आणि मकरची सुरु करेल. शनि चे भ्रमण पुर्ण वर्श मूळ ह्या अतिशय योगकारक किन्वा कार्मिक म्हणता येइल अश्या नक्शत्रा मध्ये आहे. शनि चे लक्श व्रिश्चि

गुरू आज कन्या राशीत प्रवेश करत आहे. याविषयीचे गोचर फल काय?
कोणकोणत्या राशींसाठी फायद्याचे तर कोणत्या राशींसाठी काळजी करण्यासारखे आहे?

मकर रास, आता एक चांगलं स्थळ आलं, त्यांचा घटस्फोट 1 महिन्यांत होईल असं सांगितले होतं, पण आता 1 वर्ष झालं अजून पूर्ण झाला नाही, त्यांना राहू मुळे उशीर होतोय असं त्यांच्या आईंचं म्हणणं आहे, >>> म्हणजे नक्की काय प्रकार आहे हा ? कुकातकुका Lol

कुणाचं काय तर कुणाचं काय = कुकातकुका

श्री, गब्बस रे! Lol ह्यातलं काही कळत नाही म्हणून वर्षा दोन वर्षाने इथे फिरकते तर फिसकन हसवलंस.

पण निदान कुकातकुका चा अर्थ सांगण्यापुरता तरी उपयोग झाला.

लोकहो, सॉरी मध्येच निरर्थक पोस्ट टाकल्याबद्दल. तुमचं चालू दे. तुमच्या सर्व समस्या योग्य पद्धतीने सोडवल्या जाऊदेत ह्यासाठी शुभेच्छा. जाता जाता एकच सांगेन, जर त्या सर्वश्रेष्ठ शक्तीला मानत असाल तर तुमच्याकडून भरपूर परिश्रम करा आणि बाकिचं त्याच्यावर सोपवा. तो जे करील ते योग्य करील आणि योग्यवेळी करील हा विश्वास बाळगा. ग्रहतारे ये तो उसके बाये हाथ का खेल है| ज्योतिष विद्या ही एक फक्त मार्गदर्शन म्हणून वापरायची तर वापरा... तीही एखाद्या उत्तम अभ्यास, अनुभव आणि उत्तम आचार विचार बैठक असलेल्या व्यक्तीकडूनच. पण त्यावर पूर्णपणे अवलंबून कधीच राहू नका. स्वत: परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्याल तेव्हा त्याचे परिणाम accept करायची ताकद आपोआपच तुमच्यात आलेली असते. नुसतंच एखाद्या ज्योतिष्यावर अवलंबून राहून निर्णय घ्याल आणि त्याप्रमाणे नाही झालं तर फ्रस्ट्रेशन येईल.

agadi barobar ashwini k jyotish shastracha vapar margardashak mhanunach kela pahije.

shani dhanu rashit 27 jan 2017 la pravesh karel parantu nanatar kahi divasani vakri zalyane parat vruschiket 22 june la yeil ,margi zalyavar 25 oct 17 la punha dhanu madhe jail .

<>>>> vakri zalyane parat vruschiket 22 june la yeil ,margi zalyavar 25 oct 17 la punha dhanu madhe jail <<<
या अशा वक्री कालावधीत मागिल राशीतुन शनी कशाप्रकारे फळ देतो? Happy

vakri zalyane parat vruschiket 22 june la yeil ,margi zalyavar 25 oct 17 la punha dhanu madhe jail

>>
२२ जुन ते २५ आॅक्टोबर २०१७ ला शनि वक्री होऊन वृश्चिक राशीत आल्यावर तुळ राशीला पुन्हा साडेसाती लागेल ना?

'योग प्रसिद्धीचे ' ह्या मी व श्री सुनील देव ह्यांनी मिळून लिहिलेल्या पुस्तकाचे नुकतेच पुण्यात प्रकाशन झाले . त्याबद्दल थोडेसे :
http://anaghabhade.blogspot.in/2016/09/blog-post.html

october mahinyache raashibhavishya naahi aale ajun

या फोरम मधे आपल्या पर्सनल जोतिश्य प्रश्न विचारु शकतो का? आधी विचारलेले दिसतात. पन आता उत्तर मिलेल का महिती नाहि म्हनुन विचारले.

नमस्कार, वधू वराचे गुणमेलन करताना, रास ,नक्षत्र, चरण, नाडी, योनी सगळं सारखं असेल तर लग्न जमत नाही ते का? नाडी एक असल्यामुळे ते 8 गूण सोडले तर 28 गूण जमत आहेत,परंतू एक रास,नक्षत्र,चरणअसल्यामुळे लग्न टाळण्यास सांगत आहेत.तसेच एक रक्तगट असला तर काही प्रॉब्लेम येतो का?

धन्यवाद प्रकाश घाटपांडे, हो तुमच्या पुस्तकात पण असेच वाचले.तुम्ही पहिल्या प्रश्नावर काही भाष्य करू शकाल का? एक चरण,नक्षत्र, राशी असेल तर लग्न का करू नये असे मानतात?

एक नक्षत्र एक चरण हा दोष का मानावा याचे समर्पक उत्तर मिळत नाही. वधु वर हे एकमेकांना पुरक असावे समान नाही यातुन असेल कदाचित

<<<<ज्योतिष विद्या ही एक फक्त मार्गदर्शन .......................... आणि त्याप्रमाणे नाही झालं तर फ्रस्ट्रेशन येईल.>>>
उत्तम.
एक प्रश्न - ज्यांचे भविष्य बर्‍याच लोकांच्या बाबतीत खरे ठरते, विशेषतः लग्न केंव्हा होईल, व्यवसायात भरभराट कधी होईल, संतति केंव्हा होइल, इ. बाबतीत, त्यांना एक प्रश्न - जसे साडेसाती केंव्हा येईल नि आयुष्यात वाईट दिवस केंव्हा येतील हे सांगता येते, तसे मृत्यूयोग केंव्हा आहे हे पण सांगता येत असेल, पण सांगत नाहीत. का? निदान काही सहा महिने, वर्ष या कालखंडात? जसे २०१८ च्या पूर्वार्धात, किंवा २०२१ पर्यंत नाही, असे.
नाहीतरी त्यावर पूर्णपणे अवलंबून कधीच रहाणार नाही, पण अंदाज?

Diwalichya saglyana Khoop Khoop shubhechha!!
Wish you all a very healthy and prosperous Diwali!

Pages